Monday, March 26, 2012

आयडिया अनएक्स्चेंड - डॉ. गिरधर पाटील


आयडीया एक्स्चेंज च्या माध्यमातून प्रसिध्द उद्योगपती अजित गुलाबचंद यांची मुलाखत वाचली आणि यातील एक्स्चेंजचा भाग जो राहून गेला होता त्या निमित्ताने हे दोन शब्द.
लेखाची सुरवातच कोणताही उद्योग हा समाजाची सेवा (खरे म्हणजे त्यांना गरज अपेक्षित असावे) करण्यासाठीच उभा रहात असतो या वादग्रस्त विधानाने झाल्याने पुढचा सारा लेख काळजीपूर्वक वाचणे हे ओघानेच आले आणि त्यातील ब-याच विधानांची दखल घेणेही क्रमप्राप्त ठरले.
त्यांनी सरकारची उद्योगविषयक धोरणे, अर्थव्यवस्था व आजच्या प्रशासनाची अवस्था यावरची मांडलेली त्यांची सारी मते ही बहुश्रुतच असून आजवर उदारमतवाद्यांनी मांडलेल्या मतांशी साधर्म्य साधणारी आहेत. ही मते मांडतांना त्यांना प्रसिध्द उदारमतवादी राजगोपालाचारी यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्तच ठरले असले तरी त्याच साखळीतील हा विचार पुढे नेणारे प्रसिध्द उद्योजक मिनू मसानी व आजवर त्यांच्या विचांरांचा प्रसार करणा-या फ्रिडम फर्स्ट या नियतकालिकाचे संपादक एस,व्ही.राजू व यावर सखोल अभ्यास असणारे अनेक अभ्यासक यांचा उल्लेख या एक्स्चेंजमध्ये करता येईल. त्यांनी व्यक्त केलेली सारी मते ही अत्यंत विस्ताराने व तपशीलवार या नियतकालिकातून गेली कित्येक वर्षे मांडली जात आहेत. या निमित्ताने ती प्रकाशात आली. एवढेच नव्हे तर गेली काही वर्षे सरकारी अर्थसंकल्पाबरोबर अर्थ व उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने आदर्श ठरावा असा तज्ञांनी तयार केलेला समांतर अर्थसंकल्प प्रसिध्द केला जात आहे. हे सारे सांगण्याचा एकमेव उद्देश हा आहे ही की ही सारी मते मी काहीतरी वेगळे सांगतो आहे या अविर्भावात प्रकट होत असल्याने या क्षेत्रात काम करणा-या या सा-या मंडळीवर अन्याय होऊ नये. शिवाय हे तत्वज्ञान आपल्या व्यवसायाचे ब्रीद असल्याचे कधी दिसून न आल्याने त्यावर त्यांचा कितपत विश्वास आहे हेही स्पष्ट होत नाही.
उद्योगक्षेत्रातील शासकीय हस्तक्षेपाचा उल्लेख त्यांनीच केल्याने बरे झाले. भारतीय उद्योग व सरकार यांच्यातील परस्पर संबंधावर अनेकवेळा लिहिले गेले आहे. नियोजन व नियंत्रणवादी धोरणांचा परिणाम म्हणून शासनाचा वरदहस्त असल्याशिवाय भारतात उद्योग करता येत नाही ही मानसिकता लायसन परमीट कोटा जाऊन खुलेपणा आलातरी भारतीय उद्योजकांच्या पचनी अजूनही पडत नाही. जोवर हा वरदहस्त सोईचा तोवर फायदे घेत रहायचे आणि गैरसोईचा ठरू लागताच गळा काढायचा हे अनेकवेळा घडले आहे. या संबंधात त्यांनी लवासाचा उल्लेख केला आहे. लवासा हे एक अत्यंत गुंतागुंतीचे वादग्रस्त प्रकरण आहे आणि त्याचे अस्तित्व, विकास व प्रगती केवळ उद्योजकीय क्षमतांमुळेच झाली आहे असे कदाचित अजित गुलाबचंदही म्हणू शकणार नाहीत. अजित गुलाबचंदाच्या क्षमता असणारे इतर कोणी उद्योजक महाराष्ट्रात नाहीत आणि सा-यांना समान संधी असतांना स्पर्धेतून हा प्रकल्प अजित यांनी उभारला असेही झालेले नाही. गिरीस्थळांबरोबर नववसाहती, पर्यटन व कृषीप्रक्रीया उद्योगांना अदिवासी जमीनी घेता येतील हे शासनाचे धोरण कित्येक वर्षांपासूनचे आहे. कित्येक वर्षे सर्वसामान्यांना तर ते माहितच (होऊ दिले) नव्हते. या धोरणांनुसार शासनाने या विविध क्षेत्रात इतर किती उद्योजकांना परवानग्या दिल्या हा एक संशोधनाचा विषय ठरावा. वास्तवात ही सारी क्षेत्रे नवउद्योजकांना आव्हानात्मक व आकर्षित करणारी असली तरी या सा-या धोरणांचा राजकारणी व त्यांच्या कंपन्यांना अदिवासींच्या जमीनी बळकावण्यापलिकडे झालेला नाही. या जमीनींवर सदरचे उद्योग न उभारल्यास मूळ मालकाला जमीनी परत करण्याचे प्रावधान होते. मात्र अदिवासी न्यायालयात गेल्यावर शासनाचे कायदाच बदलून या सा-यांना पूर्वलक्षी सवलती देऊन या जमीनी वाचवण्याचे महत्कर्म केले आहे.
प्रश्न शासनाच्या अशा धोरणांचा नसून अजित गुलाबचंद सारखे उद्योजक या खुलेपणातील बंदिस्तपणाबद्दल काय भूमिका घेतात याचा आहे. कृषिक्षेत्रात उदारमतवादाचा पुरस्कार करणारे मा.खा. शरद जोशी यांनी सा-या उद्योग जगताला व्यक्तीगत आणि जाहीर पातळीवर पत्र लिहून उद्योग व आर्थिकक्षेत्राला जाचक ठरणा-या या व्यवस्थेबद्दल विचार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र अशी स्वतंत्र भूमिका घ्यायला कोणीही उद्योग वा उद्योजक पुढे आला नाही. स्वतंत्र भूमिका घेतली की ती सेटींग बिघडवते ही या सा-यांची अडचण आहे हे सर्वश्रुतच आहे. त्याबद्दलही कोणाला काही हरकत असण्याचे कारण नाही मात्र तत्वज्ञानाचा आधार घेऊन आम्ही नाही त्यातले हा आव तरी त्यांनी आणू नये.
जकातीचा मुद्दा त्यांनी काढला आहे. गेली चाळीस वर्षे चालू असलेले हे आंदोलन गुलाबचंदाना माहित नसावे असे वाटते. गेल्या आंदोलनात व्यापारीच नव्हे तर ग्राहक व शेतकरी या आंदोलनात उतरले. मात्र उद्योग क्षेत्र जाहिर भूमिका घेऊन या सा-यांच्या पाठीशी आले नाही. याच प्रश्नावरून बजाजांना त्यांचा स्वयंचलित दुचाकींचा पिंपरीचा कारखाना अन्यत्र हलवावा लागला.
मला वाटते उदारमतवादी तत्वज्ञान सांगतांनाच लवासाला त्या पातळीवर नेऊन उद्योगांची कशी गळचेपी होते आहे हे सांगण्याचा हा सारा खटाटोप आहे. या सा-या चर्चेत मेघा पाटकरांनाही त्यांनी ओढले आहे. त्या काही मुद्दे घेऊन लढताहेत आणि त्यांचा तो अधिकारही आहे हे दाखवण्याइतपत आपण उदारमतवादी आहोत हे सांगण्याची संधीही त्यांनी गमावली आहे. त्यांच्या विमानप्रवासाचा व खर्चाचा उल्लेख तर अनाठायीच असून विमानाने फिरण्याचा हक्क केवळ उद्योजकांनाच आहे ही कोण बया विमानाने फिरायला लागली असा बालिश आरोपही त्यातून ध्वनित होतो.
एकंदरीत सरकार गरीबांना सक्षम न करता नाहक पोसत रहाते हा त्यांचा आरोप मात्र उद्योगांसाठीही खरा ठरावा. खुलीकरणानंतर आजवर सरकारी संरक्षणात वाढलेल्या भारतीय उद्योगाच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते भांबावलेले आहेत. खरी स्पर्धा टाळून लेवल प्लेईंग फिल्डच्या नावाखाली अजूनही त्यांना संरक्षणाचीच अपेक्षा आहे. खरे म्हणजे गरीबांचे पोषण व उद्योगांना संरक्षण हे सरकारलेखी सारखेच. गरीब त्यांना मतांसाठी लागतात. ही मते हस्तगत करण्यासाठीची रसद उद्योग त्यांना पुरवतात. स्वबळावर, स्वकर्तृत्वावर उभे रहात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होण्याचे स्वप्न खरे होऊ शकेल असे मानणारा उद्योजक यबद्दल काही बोलला तर त्यावर विश्वास ठेवता येईल.

Thursday, March 22, 2012

अमोल सुरोशे-नांदापूरकर यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.




अनेकांच्या सहवासाने तुमच्यात आणि तुमच्या विचारात बदल घडत असतात. त्याच प्रकारे माझ्यावर आणि माझ्या विचारांवर ज्यांचा खूप मोठा प्रभाव आहे असे माझे मित्र अमोल सुरोशे-नांदापूरकर यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू

प्रिय भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू,
   तुमच्याच बलिदानाने आजच्या बागा फुलल्यात. 
   तुमच्या पराक्रमानेच आमच्या गोष्टी ही भरल्यात.
   तुमच्या स्मृती आणि आदर्श सूर्य चंद्र असे पर्यंत इथे आठवल्या जातील.
   तुम्हाला आणि तुमच्या पराक्रमाला त्रिवार वंदन!

   (२३ मार्च : शहीद दिन)




Wednesday, March 21, 2012

सरकारी शाळेत शिकलेले सगळेच नक्षलवादी असतात

खरच सरकारी शाळेत शिकलेले सगळेच नक्षलवादी असतात. कारण तेच एक आहेत जे प्रस्थपित आणि जाचक व्यास्थेला सुरुंग लावण्याच्या प्रक्रियेत अग्रणी आहेत. मग प्रस्थापितांच्या पोटात दुखणारच आणि म्हणून खाजगीकरणाच्या गप्पांची ही कुरापत. तसेही हा/हे बाबा खिसे गरम असणारांचेच आहेत.
जय गुरुदेव!

Tuesday, March 13, 2012

खऱ्या जातीयवादावर हल्ले करायचे सोडून बऱ्याच वेळी उगाच घोंगड्या झोडीत बसले जाते

जातीयवाद तो ही धर्म किंवा मग धर्म ग्रंथात आहे की नाही. या किंवा त्या ग्रंथात काय म्हंटले या पेक्षा समाजात तो आहे की नाही हे बघितला तर दिसेल की शिवा-शिव, वेगळ्या कपातला चहा वगैरे गोष्टी बऱ्याच बंद झाल्यात. पण खऱ्या जातीयवादावर हल्ले करायचे सोडून बऱ्याच वेळी उगाच घोंगड्या झोडीत बसले जाते. आणि हा जातीयवाद फक्त जातीने ब्राम्हण असलेलेच करतात हा एक मोठा गैरसमज निर्माण केला जातो आणि रुजवला जातो, कदाचित इतरांकडून होणारा झाकण्या साठी तर नव्हे. ब्राम्हन्यावर टीका करणारे हळू हळू ब्राम्हनावर सरकतात, कुणी राकीय पोळी भाजतो कुणी पुरणाची.असो.
पण खरा जातीय वाद जो राष्ट्रासाठी घटक आहे तो म्हणजे डोळेझाकून दलित आरक्षणाला विरोध करणारे. कोट्या मधून कुणी अडमिशन घेतली म्हणून त्याला शिक्षण होई पर्यंत आणि त्या नंतर ही हिणवणारे आणि त्रास देणारे - विद्यार्थी आणि शिक्षक. किंवा मग आपल्या जातीचा म्हणून आडनाव पाहून मार्क देवो की न देवो पण इतरान पेक्षा वेगळी वागणूक देणारे शिक्षक. आता हे कोणत्या जातीतले ते गौण. पण असा ही हा आधुनिक जातीवाद अजूनही अस्तिवात किंवा अशात अस्तित्वात आला आहे. हे कदाचित बरेच लोक मान्य करतील. कायद्याने जात मिटवण्याचा प्रयत्न होतोय पण बऱ्याच लोकांच्या (इथे फक्त एका जातीचे लोक अपेक्षित नाही) मनातून ती जात नाही. पण मग जाती निर्मुलांचा हा जो कार्यक्रम बरेच लोक हाती घेतात तो द्वेषातून आलेला आहे असे वाटते. फक्त आणि फक्त ब्राम्हण द्वेष हाच याचा पाया असेल तर जात कधीच जाणार नाही. इथे तो आहेच असा ही मला म्हण्याचा नाही एक जनरल निरीक्षण. उदेष्य जर योग्य असेल म्हणजे राष्ट्र निर्माणात समान संधी म्हणा किंवा जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान हक्क म्हणा असा असेल तर अभिनंदनीय. आणि प्रखरत किंवा आक्रमकता यांना विरोध नाहीच पण ती जातीनिर्मुलानाचे कार्य कारणांनी तुम्ही आम्ही जेथे जेथे कुणी जातीचे बीज पुन्हा पेरण्याचे काम करत आहे तेथे उपयोगात आणावी, जसे या (http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=4792%3Athe-death-of-merit&catid=119%3Afeature&Itemid=132) प्रकारात . हे ही एक जनरल निरीक्षण या पोस्ट बद्दल नाही. बाकी काही म्हणा अस्वस्थ भारताला जातीने जितके अस्वथ केले तितके कशानेच नाही :)





----
जागोजागच्या जातीय मक्तेदाऱ्या मोडून काढणे हे मुख्यमंत्री चे उदेष्य. मग त्यामक्तेदाऱ्या मराठ्यांच्या राजकारणातील असोत, ब्राम्हणांच्या सांस्कृतिक आणि सामजिक क्षेत्रातील असोत किंवा मग मारवाड्यांच्या व्यापारातील असोत,त्याच त्वेषाने मोडायच्यात. आणि त्यासाठीचा मार्ग त्यांना तेथून हाकलून नव्हे तर तर इतर सर्वांना तेथे पोहचवून.
जय महाराष्ट्र!


Monday, March 12, 2012

यशवंतराव आणि वेणूताई - प्रीतीसंगम




यशवंतरावांच्या सामाजिक आणि व्यक्तिगत प्रवासात ज्यांनी खूप मोलाची कामगिरी केली, यशवंतरावांची साथ दिली, प्रसंगी व्यक्तिगत आयुष्यातले सगळे कष्ट स्वतः उचलले आणि यशवंतरावांना सार्वजनिक आयुष्यात मोकळीक दिली  अशा वेणूताई, यशवंत रावांच्या पत्नी. त्यांच्या बद्दल आणि यशवंतरावां बद्दल हा एक खूप छान कार्यक्रम स्टार माझा कडून. स्टार माझाचे खूप खूप आभार.

Sunday, March 11, 2012

पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)


                                           
                                                              यशवंतराव बळवंतराव चव्हाण
                                                          [१२ मार्च १९१३ - २५ नोव्हे. १९८४] 
उद्या पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती. तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन. 

या जन्म शताब्दी वर्षात यशवंतराव नव्या पिढी पर्यंत पोहोचावेत. राजकारणात हौशांची आणि पैशांची झालेली गर्दी कमी करायची असेल तर यशवंतराव डोक्यात ठेवून नव्या दमाच्या तरुणांनी राजकारण करायला हवे. ज्या सहकाराला हाताला धरून आजचा महाराष्ट्र यशवंतरावांनी उभा केला त्या सहकाराला पुन्हा स्फुरण देऊन, भ्रष्टाचार मुक्त करून सशक्त आणि आर्थिक संपन्नेतेचे माहेरघर महाराष्ट्राला बनवण्यासाठी सर्वांनी मुख्यतः तरुणांनी पुढे यायला हवे. भांडवलशाही स्वतःलाच गिळंकृत करत असतांना आणि समाजवाद भरकटत जात असतांना पुन्हा लोक सहभागाची, लोकांची लोकांसाठी आर्थिक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे. कदाचित तीच येणाऱ्या काळात आपली झोप न उडवता आपल्याला भरपेट खाऊन झोपू देईल. नसता अलिशान घरातील चिंतेने न आलेली भांडवलशाहीतील झोप किंवा मग रोजगाराच्या आभावातून उपाशीपोटी न आलेली भरकटलेल्या-भ्रष्ट-समाजावादातील झोप आपली भविष्यात वाट पाहतच आहे.

यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्षात काही संकल्प समोर ठेवायला हवेत. जसे 
१) समजूतदार, शिकलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या राजकारण्यांची निर्मिती 
२) ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन आणि मदत 
३) सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी नव्या पिढीवर तसे संस्कार
४) साहित्य, खेळ आणि माणूस म्हणून जगतांना लागणाऱ्या सर्व मुल्यांची नव्याने येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा ओळख
आणि अशा प्रकारचे मनुष्य जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम. मुख्यमंत्री कार्यकर्ता यशवंतरावंना आपल्या प्रेरणास्थानांन पैकी एक मुख्य प्रेरणास्थान मानते. येणाऱ्या पिढीला; नव्हे याच पिढीला यशवंतरावांसारखा राजकीय नेता झाला होता हे सांगितले तर खरच विश्वास ही बसणार नाही इतकी दुर्दैवी अवस्था आज राजकारणाची झाली आहे; आणि म्हणून चांगले लोक या पासून चार हात नव्हे तर चार-पाच किलोमीटर लांबच राहतात. पर्यायी चुकीची धोरणाने, भ्रष्ट व्यवस्था आणि जनतेचीच पुन्हा कुचंबना. याला मुख्य कारण म्हणजे  यशवंतरावांसारखे नेतृत्व दृष्टी आड करणे, ते न अभ्यासाने.

आज यशवंतराव आपण नव्या पिढीला शिकवूत. ते ज्यांना ज्यांना कळतील ती नक्कीच घडतील, राष्ट्राचा गाडा खंबीरपणे आणि गतीने चालवण्यासाठी. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येणारा एक ग्रामीण तरुण पुढे राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि उप-पंतप्रधान होतो; भारत-पाक युद्धात देशाची मान ताठ ठेवतो आणि सगळ्या सोबतच कविता, लेखक, शेतकरी, उद्योजक, कामगार आणि सामान्य माणूस यांच्यात सारखाच रमतो; हे चित्र आणि हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आणि खूप प्रेरक आहे. त्यांच्या या विचारांच्या मुशीतून या देशाचा तरुण गेला तर, आर्थिक तर होईलच पण माणुसकीची महासत्ता म्हणून अव्वल राहणे या राष्ट्राला सहजच शक्य होईल.

मुख्यमंत्री कार्यकर्ता याच विचारांशी आजपर्यंत बांधील आहेच, पण या वर्षी विशेष असे जमेल ते प्रयत्न करेल यशवंतराव जन्मशताब्दी सार्थक ठरवण्यासाठी. या पूर्ण जन्मशताब्दी वर्षात मुख्यमंत्रीच्या साइड बार मध्ये यशवंतराव असतील.
तुम्हा सर्वांना या जन्मशताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

--
नक्की वाचावीत अशी काही पुस्तके:
१. कृष्णा काठ - यशवंतराव चव्हाण : आत्मकथा
२. यशवंतराव चव्हाण, राष्ट्रीय व्यक्तीमत्व : यशवंतरावांच्या राजकीय, सामाजिक आणि काही अंशी व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकाणारे एक अतिशय चांगले असे संपादित पुस्तक

तसेच आमच्या वाचनात येणारी इतर पुस्तके ही येथे वाढवत राहू. आपण काही स्वतः वाचलेली पुस्तके सुचवू इच्छित असाल तर आपले स्वागतच आहे. 
तसेच या निमित्यांने यशवंतराव वा मग वरील ४ संकल्पावर आधारित आपले काही विचार असतील तर मुख्यमंत्री कार्यकर्ता ते छापण्यास उत्सुक आहे. आपले लिखाण येथे (ई-मेलपत्ता:amol.suroshe@gmail.com आणि ई-मेलपत्ता:pbpimpale@gmail.com) पाठवावे.
जय महाराष्ट्र!

जन्म शताब्दी वर्ष निमित्य:
१. काही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे
http://www.mukhyamantri.com/2012/08/blog-post_25.html

२. अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते
http://www.mukhyamantri.com/2012/08/blog-post_26.html

३. आरक्षण : अखंड देश अस्तित्वा साठी गरजेचेच
http://www.mukhyamantri.com/2012/09/blog-post_2172.html

४. यशवंतराव चव्हाण विचार मंच
 http://www.mukhyamantri.com/2012/12/blog-post_13.html

५. यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगता
http://www.mukhyamantri.com/2013/03/blog-post_12.html


Saturday, March 10, 2012

राजकारणात खानदानी का होईना पण तरुण चांगल्या प्रमाणात महत्वाच्या पदावर दिसू लागलेत

समाजवादाचा तरुण आणि शिकलेला चेहरा श्री. अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री म्हणून बघतांना आनंद होत आहे. भारतीय राजकारणात खानदानी का होईना पण तरुण चांगल्या प्रमाणात महत्वाच्या पदावर दिसू लागलेत. ही सर्वांन साठी खूप आनंदाची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशला आणि भारताला प्रगतीकडे नेण्यात त्यांचे योगदान राहील ही अपेक्षा.
अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाला हार्दिक शुभेच्छा!

Friday, March 9, 2012

आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो

आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिऱ्हाईक फिरकता फिरकेना,
सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो, गर्दी पेलता पेलवेना.
                          - महाकवी सुधाकर गायधनी 


अनेक वर्षान पूर्वी याच ओळी यशवंतरावांनी औरंगाबादला एका साहितीकांच्या बैठकीत गायल्या होत्या, सुधाकरराव नवोदित असतांना. काल वाचनात आल्या. मनाला भावल्याम म्हणून तुमच्या साठी.

Tuesday, March 6, 2012

लोकसत्ताला ही 'पोटदुखी' चा विकार !

अनेक वर्षांची लेखणीची चळवळ अर्ध्या हळकुंडानि पिवळ्या झालेल्या काही विशिष्ट पत्रकारांच्या हाती गेल्यावर त्याचा स्तर कुठल्या पातळीपर्यंत खाली येतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला.
निमित्य होते "लोकसत्ता" मधील 'वाचावे नेट-के' या नवीन सदराचे.
मागे एकदा एक मित्राद्वारे या लोकसत्ताच्या नवीन उपक्रमाची माहिती समजली, निव्वळ 'वरण-भात' लेखांचा भरणा असलेल्या या सदराखाली एखादी विचारांची झणझणीत मेजवानी लोकसत्ताच्या असंख्य वाचकांपर्यंत जाईल अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली. अतिशय प्रांजळपणे कुठलाही जास्त विचार न करता केवळ ब्लॉग ची यु आर एल थोडक्यात माहितीसह नेटके च्या महाशयांना पाठवली, आणि खरच विसरून सुद्धा गेलो.
काल अचानक लोकसत्ता हाती पडल्यावर या महाशयांनी अमोल 'सुरोशे' , प्रकाश 'पिंपळे-पाटील' आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता या ब्लॉग चा केलेला पोस्ट-मोंर्टम वाचला आणि अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही, किंवा त्याची फारशी दाखल घेतली नाही.

अगदी सुरुवातीलाच मोठ्या अविर्भावात 'आम्ही म्हणजे काही ब्लॉग माझा वाले नाहीयेत, उपलब्ध एंट्रय़ांमधूनच विजेते निवडणारं... प्रसिद्धी देणारं ' वैगेरे छापून उरलेला सबंध लेख केवळ आणि केवळ आमच्या ब्लॉग चे, त्या मध्ये व्यक्त केलेल्या विचारांचे आणि ग्रामीण, बहुजन पार्श्वभूमी असणाऱ्या योगदान कर्त्यांची जाणीवपूर्वक आणि निव्वळ आकसापोटी केलेली केलेली निरर्थक ओरड म्हणावी लागेल.

हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून पिंपळा वर वर्षानुवर्षे बसलेले हे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नकोच द्यायचे असे वाटते पण, नाही बोलले तर गैरसमज, तो हि हार मानल्याचा.
म्हणून खालील प्रपंच, नसता या 'नेटके' ची किंमत त्याच्या वृत्तपत्रा च्या किमती पेक्षा देखील जास्त नाहीये.

मी म्हणालो आकसापोटी, होय ! कारण ज्या ब्लॉग वर शंभराच्या वर एन्ट्रीज आहेत, २०१० पासून लिखाण आहे त्या ब्लॉग च्या पहिल्या पानावरच्या चार लेखांना वाचून ह्या विचारवंत महाशयांनी ब्लॉग आणि ब्लॉगर्स च्या आडून एका विचार धारेवरच हल्ला चढवला ! हे असले हल्ले आम्ही नेहमीच पचवत आलोय पण आम्हाला "प्रसिद्धीचे छुपे उमेदवार" म्हणणारे स्वतः ला कुठेतरी लपवून हे असले फुटकळ शाब्दिक वार करतात याचीच कीव येते.

आता यांनी ज्या चार लेखांबद्दल आक्षेप नोंदवला, त्या लेखांच्या गाभ्यात विचार होता तो महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या शिवरायांचा, सर्वांना पोटभर अन्न मिळाव म्हणून राब राब राबणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याचा, आणि साहित्याला गेली कित्येक वर्ष घुबडासारखे चिटकून बसलेल्यांवर जोरदार आसूड ओढणारा.. असा काहीसा विचार आणि नेमके इथेच ह्यांचा पोटशूळ !

शिवजयंतीच्या लेखात शिवरायांची थोरवी सांगण्याला आमचा मोह ठरवून सबंध लेखाला एका क्षणात निष्प्रभ ठरवेले !
महाशय, मुख्यमंत्री ब्लॉग च्या दर्शनी भागावरच अगदी ठळक अक्षरात लिहिले आहे, "आमचे श्रद्धास्थान" डोळे फाडून बघा नीट ! होय सबंध लेखच काय अख्खा ब्लॉग जरी महाराजांची थोरवी गाण्यासाठी वापरला ना तरी ते थोडेच! पण इथे तुमच्या पोटात का दुखतंय ? शिवजयंती च्या दिनी या महाराष्ट्रातील एक सर्व सामान्य तरुण सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक सोडून आत्ता विचार करायला लागला कि काय, हि भीती तर नाही ना !

दलित - ग्रामीण साहित्याबद्दल प्रस्थापितांची असलेली भूमिका अतिशय हलक्या-फुलक्या स्वरुपात, कुणाचेही मन नं दुखावता इथे मांडली त्याबद्दल हि खालच्या पातळीवर भाष्य ते वाचून तर यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते ! यांचे निदान वाचन कौशल्य कमी कि मुद्दाम ठरवून नेमका उलटा अर्थ काढायचा हे समजायला मार्ग नाही.

एका शेतकऱ्याच्या पोराने, शेतकर्यांबद्दल एखादा प्रखर विचार मांडला तर ह्यांना तिथे फ़क़्त शैली दिसते ! विचारांना झाकण्याचा कित्ती हा केविलवाणा प्रयत्न !

'शिवराय','दलित-ग्रामीण','शेतकरी' या शब्दांचीच ज्यांना मुळात एलर्जी आहे त्यांच्या कडून निराळी अपेक्षा हि नाहीये.

एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल एका विचारवंताने एवढ्या पब्लीकली एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिखाण केल्याबद्दल त्यांचे मनापसून आभार !

मला "प्रसिद्धीचा छुपा उमेदवार" म्हणून ज्या अनेक शंका ह्यांनी उपस्थित केल्या त्याबद्दल थोडक्यात ;

'नेटके" ला पाठवलेला मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे म्हणजे मी स्वतः च म्हणूनच थेट पाठवलाय, तो मेल हि इथे वाचकांसाठी प्रसिद्ध करतो.. तुम्हीच बघा काही चुकल असेल तर !

amol suroshe Mon, Feb 27, 2012 at 3:53 PM
To: wachawe.netake@expressindia.com
मागील पिढी हि वर्तमान पत्र वाचून घडली, इंग्रजी सत्तेविरुद्धाचा असंतोष लेखणी द्वारे उभा राहायचा आता काळ बदललाय ! सध्याची आणि येणारी युवा पिढी त्यांचा जास्त काळ हा या इंटरनेट वर घालवते, विविध विषयांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते.
हीच काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्रातील प्रत्येक जिवंत कार्यकर्त्याची सामाजिक आणि राजकीय जडण घडण व्हावी, त्याच्या विचारांवर आपल्या सोनेरी इतिहासातील संस्कार व्हावेत या उद्देशाने "मुख्यमंत्री " या ब्लॉग ची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या तरुण मनातील राजकीय / सामाजिक / ऐतिहासिक प्रश्नांवर अगदी रोख ठोक पाने लिखाण करण्याचा इथे प्रयत्न केला जातो.

थोड्याच कालावधीत मुख्यमंत्री हा ब्लॉग सर्वदूर पसरला याचीच पोच पावती म्हणून स्टार माझा आयोजित "ब्लॉग माझा" या स्पर्धे मध्ये "मुख्यमंत्री" ने सन्मानाचे स्थान मिळवले.

लहानपणी वाटायचा, राज्याचा मुख्यमंत्री सगळेच प्रश्न चुटकी सरशी सोडवत असेल, मुख्यमंत्र्याची खुर्ची नाही मिळाली पण मुख्यमंत्री या ब्लॉग द्वारे या राज्याचे / देशाचे प्रश्न इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

आपण नक्की बघा www.mukhyamantri.com


अतिशय प्रांजळपणे ब्लॉग बघण्याची केलेली निव्वळ विनंती ह्या मेल मध्ये होती, ब्लॉग वर अगदी ठळक अक्षरात माझे आणि माझ्या सहकाऱ्याचे नाव हि आहे, प्रत्येक लेखाखाली लिहिणाऱ्याचे नाव दिसते असे असतांना मी स्वतःचा उल्लेख करणे टाळतोय असे म्हणून माझ्या साध्या शिफारशी बद्दल एवढ्या शंका उपस्थित करून ह्यांचा नेमका उद्देश्य काय आहे? स्वतःचा मोठे पण सिद्ध करायचा आहे का आम्हाला लहान दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न.

ब्लॉग उभारतांना उद्देश खूप मोठा होता , आहे आणि तो राहणार हे फ़क़्त इथे नमूद केले ! पण भाषा नम्रतेचीच !

कुठे हि आमच्या ब्लॉग बद्दल छापा ! आमच्या बद्दल लिहाच .. असे नसतांना देखील हि नसती उठाठेव कशासाठी केली हेच नेमके उमगले नव्हते म्हणून एवढा लिहाव लागतंय.

आणि हे इथे मुद्दाम नमूद करतोय कि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही, ना हि ह्यांच्यासारखे लिखाणावर आमचे पोट भरते.
खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. मनाला पडणारे प्रश्न मग ते सामाजिक असो व राजकीय ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आपले विचार कुठेतरी व्यक्त करावेत या साठी हा ब्लॉग .. प्रसिद्धी ,पैसा ह्याची भूक भागवण्यासाठी एवढी निच पातळी आम्ही गाठणार नाहीत.

याच लेखातून आमच्या वयक्तिक प्रोफेशन बद्दल हि बोलण्याचे धाडस या महाशयांनी केलेले आहे त्यांना एवढेच सांगतो ती तुमची पायरी हि नाहीये म्हणून त्या बद्दल बोलण्याची तसदी घेऊ नका!

मान्य आहे आमचे लेख अतिशय साधारण भाषे मध्ये असतात, त्यात व्याकरणाच्या अनेक चुका असतील पण तो तसाच राहणार कारण तोच तर त्याचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा 'शहाणपणा' किंवा 'खोडसाळपणा' तुमच्या पाशी जपून ठेवा, पुढे नक्की चार पैसे कमावण्यासाठी कामी येईल.

अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे यांच्या आडून या ब्लॉग मधल्या विचारांवर काही बोलायचे असेल ना ते समोर समोर थेट बोलले असते तर जास्त आनंद झाला असता !
काही शहाणी लोक लोकसत्ता वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग तुमच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री.कॉम कधीच समर्थन करत नाही आणि किंमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे आणि तुमचाच खरा चेहरा समोर आला आहे.

शेवटी गांधीजींच्या काही ओळी आठवतात

"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्यावर टीका करतात,तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता... विजयी होता ".

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता

Monday, March 5, 2012

मुंजे पिंपळा वरून लोकसत्तात उतरले

काल संध्याकाळी असच हातात लोकसत्ता घेतला आणि वाचावे नेटके या संपादकीय पानावरील (पण ७) मुख्यमंत्री.कॉम लिंक वर नजर गेली. वाचायला सुरुवात केली तर अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही. असो. पण आता हा लोकसत्ता मधील मुख्यमंत्री बद्दलचा लेख वाचून फारच कीव आली यांची. आणि नकळतच डोळ्यासमोर समोर हे खालील चित्र आले.गांधीजींच्या वाक्याचे - "आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता". 



तर घडले असे की एका मित्राने लोकसत्ताच्या वाचावे नेटके या ब्लॉग बद्दलच्या सदरा बद्दल सांगितले आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता ही पाठवा असे सुचवले. तेंव्हा खालील ई-मेल त्यांना पाठवला 


आणि मग लोकसत्तातील कुणी तरी हे खालील वर्णन म्हणजे 'प्रसिद्धीचा छुपा उमेदवार...' वगैरे मुख्यमंत्रीचे केले.




वरील ई-मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे या नावाने पाठवला गेला होता आणि वरील पिक्चर मध्ये 'अमोल सुरोशे' यांचे ठळक अक्षरात एकदम वरती असे नाव 'ब्लॉगर्स' म्हणून आहे. याचा अर्थ ते हा ब्लॉग चालवतात असा होतो आणि कुणाची ही त्यावर नजर पडेलच. तसेच अनेक लेखांच्या खाली ही सरळ सरळ अमोल सुरोशे हे नाव ही आहे. मराठी वाचणारा कुणी ही ते सहज वाचू शकतो. आणि पाठवलेल्या ई-मेल मधील हिरव्या रंगाने स्पष्ट केलेल्या ओळी अमोल सुरोशे या ब्लॉगच्या लेखकांपैकी एक आहेत हे ही ठीक ठीक मराठी वाचणारा आमच्या सारखा खेड्यातला माणूस ही सांगू शकेल राव. बर तिथे नीट समजले नसेल तर ब्लॉग वाचल्यावर  तर कुण्याही शहाण्या माणसाला ते समजेल.

म्हणजे याचा अर्थ  लोकसत्ताच्या त्या लेखाचा प्रॉब्लेम अमोल सुरोशे हे या ब्लॉग चे लेखक आहेत हा नव्हे तर अमोल 'सुरोशे' या ब्लॉग चे लेखक कसे, हा आहे का? ही पोट दुखी वेगळ्याच कारणाने आहे हे अगदी स्पष्ट होते. लोकसत्ता काही शहाणी (?) लोके लिहितात आणि काही शहाणी लोके वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग त्यांच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री आणि जिजाऊ.कॉम ही कधीच समर्थन करत नाही आणि किमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे. दुसरा काही तरी ट्राय करा. हा हा. कारण या असल्या टीकेने किंवा केलेल्या हशा ने फष्ट्रेत होणारांपैकी आम्ही नाहीच. दु:ख याचेच वाटते की अतिशय खालच्या पातळीवर येवून हीन अशा भाषेत लोकसत्ताच्या हुशार महोदयांनी हे लिखाण केलाय आणि हे कमीत कमी लोकसत्ता कडून  तरी अपेक्षित नव्हते. पण जेंव्हा जात आणि विशिष्ट वर्गाचा द्वेष डोळ्यात असते तेंव्हा मात्र हे होतेच. आणि या हुशार लेखकाचे तेच झाले.
हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून निघालेले हे पिंपळा वरचे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नको द्यायचे असे वाटते पण, न बोललेले शब्द म्हणजे गैरसमज आणि तो ही हार मानल्याचा म्हणून पुढील प्रपंच. नसता खरच मुख्यमंत्री समोर लोकसत्तातील हा लेख म्हणजे शुल्लक, आमच्यासाठी तरी. कारण आमचे ९०% पेक्षा अधिक वाचक कधीच डायरेक्ट डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. मुख्यमंत्री.कॉम टाकून ब्लॉग वर येत नाहीत ते येतात गुगल सर्च वरून. त्या मुळे त्या मुंज्याला अपेक्षित जाहिरात बाजी आम्हाला अपेक्षित नाहीच. आणि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही. खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. पण त्याच ही आम्हाला स्वतःलाच अप्रूप नाही. कारण मुख्यमंत्री.कॉम आणि जिजाऊ.कॉम  या विचारांसमोर अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे कुणीच नाहीत. असो. 

तर आम्ही या मुंजाच्या लेखनाचा निषेध वगैरे नोंदवणार नाहीत, सरळ समाचार घेणार आहोत आणि पोटदुखीची करणे ही दाखवणार आहोत. तर या महोदयांचे म्हणणे आले की 'हा एक अतिशय सामान्य ब्लॉग आहे.' अहो आहेच हा ब्लॉग सामान्य, आणि तो सामान्यांसाठीच आहे. तरी एक हुशार व्यक्ती आमच्या ब्लॉगला सामान्य म्हणते यातही आमचे मोठेपणाच. यात फार आक्षेप नाही. पुढे शिवजयंतीच्या लेखा बद्दल ते म्हणतात की 'शिवरायांबद्दल अधिक लिहल गेलय आणि सध्य प्रश्ना बद्दल कमी.' अरे मुंज्या तो लेख शिवजयंतीचा आहे तिथे शिवरायाच केंद्र असणार. आणि तो लेखच नव्हे तर सगळा ब्लॉग आणि तुमचा सगळा पेपर ही त्या दिवशी शिवरायंचे गीत गाण्यात घालवला तरी ही त्यांचे उपकार फिटणार नाहीत. आणि त्यांच्या पुढे आपण सगळेच निष्प्रभ. तो तर एकच लेख होता. ओके ओके तर पोटदुखी याची का - की शिवजयंतीच्या दिवशी हे लोक 'विचार' करायला लागलेत. कारण समस्त मुंजांना वाटते की या समाज घटकाने फक्त रस्त्यावर फिरावे, धिंगाणा घालावा, आक्रमक व्हावे, ढोल ताशे बदडून जयंत्या साजऱ्या कराव्यात पण 'विचार' करू नये. कारण यांची खरी हार आम्ही विचारा करायला लागण्यात आहे. असो. आता तर अधिक पटीने विचार करणार.
पुढे आम्ही दलित ग्रामीण साहित्याच्या व्याखेची टर उडवली असे त्यांचे म्हणणे आहे आणि पुन्हा हे आमच्या 'हीन अभिरुचीच' उदाहरण अशी जी खालच्या पातळीची भाषा त्या मुंज्याने वापरली आहे ती वाचून त्यांचा पोटशूळ किती मोठा आहे ते कळाले. होय आम्ही ग्रामीण आणि दलित साहित्यिक अभिरुचीहिणच तुमच्या नजरेत. अरे बाबा ती व्याख्या पुन्हा एकदा वाच. ती आमची किंवा आमच्या मित्राची नसून, टेबलाच्या पलीकडचे म्हणजे आम्ही ज्या बाजूला आहोत त्याच्या विरोधी बाजूचे लोक (म्हणजे तुमच्या बाजूचे) दलित आणि ग्रामीण साहित्याकडे कसे बघतात हे सांगणारी आहे. आणि दलित आणि ग्रामीण साहित्याचा एकच शब्दखंड की काय तुमच्या सारख्यांनी एकाच पुस्तकात का केला याच कारण सांगते. तुम्ही दोन्ही साहित्य प्रकारांना थोड्या बहोत प्रकारांने चुकाच समजता. असो, तुम्ही आम्हाला आता पर्यंत अभिरुची हीन म्हणतच आलात, तुमच्यात फार फरक होणार नाही, तुम्ही लुप्त होई पर्यंत तरी. आणि हे ही पोट दुखीचे करणाच ना की शेतकरी, खेड्यातले अमच्यासाखे चार शब्द लिहायला शिकले. हो की नाही. :). असो. 
तुमचे विश्लेषण की काय ते आमच्या शैलीच्या पलीकडे विचारानं पर्यंत जाऊच शकले नाहीत. ते अधिक आवडले असते. चार शिव्या जरी दिल्या असत्या विचारांना तरी. कारण तिथे सरळ मुकाबला करता आला असता विचारांचा. पण इथे तुम्ही शैलीत अडकवून शालीतून जे निशाने साधायचा प्रयत्न करताय तो तुमच्या सारख्या प्रतिभावंताला (?) अशोभनीय आणि तुमचीच संकोचित विचार वृत्ती दाखवतो.
तसा लोकसत्ताचा आम्ही फार आदर करायचो पण जात्यंध आणि वर्गान्ध्या झालेले तुम्ही त्या नावाला एक दिवस काळिमा फसणार आणि तुमच्या मुळे नव्हे तर, गर्वाने सांगतो शिवरायांच्या विचारानं मुळेच, येणारा पुरोगामी महाराष्ट्र तुमच्या सारख्या पुरोगामित्वाच्या शाली पांघर्लेल्यांना कधीच माफ करणार  नाही. कारण तुम्ही अनेकांना दाबून दडपून, हीन लेखून निहीसे करण्याचा प्रयत्न करत आहात, हातात मेडीयाची ताकद असल्याने. पण बहुजन समाज आणि सामान्य माणूस हे सगळं आता तरी समजलाय. आणि तुम्ही चुकीच्यान वर वार केलाय, एकटे आम्ही कधीच नाहीसे होणारण नाहीत! जर आयोग्यच वाटत होता ब्लॉग तर अर्ध पण वाया घालवल नसतं तुम्ही. पण हीनवण्याची संधी सोडली तर ते मुंजे कसले! आम्ही म्हंटला ना तुम्ही आम्हाला बऱ्याच जागी भेटलात. पुण्यात ब्लॉगर्स मिट ला भेटलात. तेथे आमच्या सोबत आलेल्या कांबळे नावाच्या मित्राला त्याचे नाव माहित नसल्याने आनंदाच्या आवेगात जेंव्हा साहित्य संमलेनाच्या अध्यक्षान विषयी काही तरी बातमी आली तेंव्हा म्हणालात 'बरं झाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुणी शिंदे, जाधव, कांबळे झाले नाहीत'. त्या साहितीकाच्या विरोधात आम्हाला अस काहीच नाही. पण माननीय मुंजे तुम्ही आम्हाला अनेक ठिकाणी भेटता. तुम्हाला हा आत्मविश्वास झालाय की जिथे तुम्ही असता तिथे आम्ही पोहोचायची लायकीच नाही. पण तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. तुमच्या शालीच्या वरून तुम्ही कोण हे अनेकांना दिसले आहे आणि ज्यांना दिसले नाही त्यांना ही एक दिवस दिसेलच. तुम्ही व्यक्ती नाहीत तुम्ही एक प्रवृत्ती आहात - पिंपळावरील मुंजे - नावाची.                             
तुमच्या त्या द्वेष पूर्ण लेखाने आमच फार काही बिघडत नाही पण आमच्या वाचकांचा गैरसमज होऊ नये आणि तुमच्या सारख्यांचे जातीय विचार जास्त पसरून आमच्या या सामजिक क्रांतीच्या प्रवाहाला अडसर होवून नये ही काळजी म्हणून हा प्रपंच. आणि तस ही तुम्ही आता थांबवू शकत नाहीत आम्हाला. आता तर नक्कीच नाही! कारण आधी कधी कधी वाटायचे  आमचे विचार योग्य आहेत का? पण तुमच्या सारख्या कडून विरोध झालाय म्हंटल्यावर तर आत्मविश्वासच आला की नक्कीच आम्ही योग्य दिशेने जातोय. तो फुटकळ जातीय द्वेष पूर्ण लेख लिहून तुमच्या विचारांची किंमत तुम्ही अगदी तुमच्या पेपरच्या रद्दीच्या किमती इतकीच केलीत, अजून जास्त घसरू नका, वेळे आधीच नाहीसे व्हाल. 
आमचे विचार भले ही सामाजिक असोत,पण ते आमचे व्यक्तिगत विचार आहेत. ज्यांना पटतील त्यांनी जरूर वाचावेत, टीका कराव्यात, पण उद्देश्य स्पष्ट असावा. आमच्या या जिजाऊ, शिवराय, फुले, आंबेडकर, तुकडोजी, गाडगेबाबा यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळीला तुमच्या शुभेच्छा नसल्या तरी ही चालतील. आमचे मोजकेच का असेनात पण  हितचिंतक फार खंबीर आहेत.

जय जिजाऊ!                                                                                                                    जय शिवराय!
जय महाराष्ट्र!

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता