Wednesday, September 28, 2011

यांना खुपते ते काही शेतकऱ्यांचे चांगल्या गाड्यात फिरणेशेतकऱ्या बद्दलचा यांचा हा असा तळ-तळात. यांना खुपते ते काही शेतकऱ्यांचे चांगल्या गाड्यात फिरणे. बाकी ज्यांची दैनिया अवस्था आहे त्या बद्दल यांना ब्र ही नको. लावायचाच असेल तर कर, ठरवू द्या आमचे भाव आम्हाला. 

Saturday, September 17, 2011

मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इंग्रजांच्या तावडीतून देश जेंव्हा १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र झाला होता तेंव्हा देशातील अजून बरेच संस्थानिक आपले राज्य सोडायला तयार नव्हती. ह्या अशाच संस्थानांपैकी हैदराबाद संस्थान जिथे निजामांची सत्ता होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या प्रमाणे मराठवाड्यातील अनेकांनी आपले योगदान दिले त्याच प्रमाणात त्यांना पुन्हा निजामशाही विरोधात ही लढा द्यावा लागला. या प्रकारे मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा दुहेरी लढा अतिशय अवघड होता. भारत स्वातंत्र्य झाल्यावर निजामावर कारवाई करून मराठवाडा मुक्तीचे शेवटचे पाउल पडले. आणि १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान आणि त्याचा भाग असलेला मराठवाडा मुक्त झाला. पण या लढ्यात अनेकांनी आपले सर्वस्व त्यागले. हा इतिहास तितकासा नीट जतन झालेला नाही आणि लोकां पर्यंत पोहचलेला ही नाही याचे दु:ख वाटते. त्या सर्व हुतात्म्यांना मुख्यमंत्री कार्यकर्ता चे शतशः नमन.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंदतीर्थ (व्यंकटेश खेडगीकर) यांनी केले होते आणि मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक जसे गोविंदभाई  श्रॉफ, भाऊराव भिमाजी पाटील मतसागर, माणिकचंद पहाडे, सय्यद अखिल तसेच अनेक ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सेनानी यांनी आपले मोलाचे योगदान दिले होते.
त्या सर्व स्वातंत्र्य वीरांना स्मरून, मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!                                                जय महाराष्ट्र!

थोडीफार अधिक माहिती  येथे मिळेल

Thursday, September 15, 2011

या एका सोप्या पण महत्वपूर्ण कामात सहभागी व्हा

Wednesday, September 14, 2011

केरळा मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वेब कॅम खाली - अभिनंदन

केरळ मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे  कार्यालय जनतेला वेब वर खुले केले आहे. भ्रष्टाचाराला चांगलाच आळा बसेल आणि सगळ्यात म्हत्वाचे खऱ्या पारदर्शक कारभाराचे हे एक उदाहरण आहे. 
त्यांचे खूप खूप अभिनंदन.Monday, September 12, 2011

आमची नवी आणि सुंदर वेबसाईट


                            http://maharashtra.gov.in