Tuesday, November 29, 2011

हल्ले, आंदोलन, राष्ट्र आणि राजकारण ....

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याला एक वेगळाच रूप आलेल दिसतंय. सरळ पाहता तो हरविंदर का कोण वेडा वाटतोच. पण त्याच्या कृत्याने समाज जागा झाला आहे आणि एकदम क्रांती होणार आहे अशा भ्रमात जे आहेत किंवा जे क्रांती सदृश्य परिस्थिती असं याच वर्णन करतात त्यांनी कृपया याचा विचार करावा की खरचच अस कृत्य म्हणजे महागाई किंवा इतर गोष्टींचे सोल्युशन आहे का? 
मला सत्ताधारी पक्ष किंवा शरद पवार यांची पाठराखण करायची नाही किंवा कुणाला विरोधही करायचा नाही. पण राष्ट्राच्या हिताच काय ते सांगण्यपेक्षा विरोधी पक्ष आयत्या बिळावरचा नागोबा होत आहे. बरं त्यांना ही बाजूला ठेवले तर ज्यांना अस वाटतेय की हा हल्ला योग्य होता, जनतेचा रोष होता, तर त्यांना मला हे सांगावस वाटतेय की बाबांनो या देशात रोष याव्यात अशा घटना रोजच होत आहेत आणि कदाचित अनेक शतकां पासून होत आहेत. समाजातला गरीब आणि दलित वर्ग इतका छळला जात होता आणि जातोय आणि त्याच कारण काही परकीय शक्ती किंवा अंतराष्ट्रीय धोरण वगेरे नव्हते. ते होते आणि आहेत आपलेच सामाजिक आणि आर्थिक गटातील स्वार्थी वरचे गट. मग त्या खचलेल्या आणि त्रस्त वर्गांनी कधी यांच्यावर लाथाबुक्क्यांनी किंवा तलवारीने वार केले का? आणि कुणी तशी परिस्थीच नव्हती अस म्हणत असेल तर क्षमा करा पुढे आपण वाचू ही नका कारण तुम्हाला ते समजणार ही नाही. 
हे हल्ले करणारे माथेफिरू आणि व्यवस्था बदलण्यासाठी इच्छुक असणारे क्रांतिकारी यांच्यात फार फरक असतो. राजकारण्यांनी या राष्ट्रात खूप चुका केल्यात, पण या राष्ट्राच स्वातंत्र्य ही अबाधित आहे त्यांच्या मुळेच आणि हा गाडा चालतोय त्यांच्या मुळेच. आता त्या चुकांचं खापर फक्त त्यांच्यावर फोडून वाल्ह्या कोळ्याच्या कुंटुंबा सारखं करत आहोत आपण. भारत पारतंत्र्यात होता तोवर हिंसक आणि अहिंसक सगळेच मार्ग राष्ट्रासाठी चांगले होते. पण जेंव्हा आपण स्वतंत्र झालो त्या नंतर मतदान आणि लोकशाही नावाची खूप मोठी हत्यारे आपल्या हातात दिली गेली. 
पण त्यांचा वापर न करता आपण नको त्या मार्गाने आपल्याच निर्वाचित शासनाला गुन्हेगाराच्या कठडीत उभं करून नग्न करत आहोत. म्हणजे आंदोलन करायचेच नाही का? - तसं नाही आंदोलन करायचे, पण शासनाला वेठीस धरण्यासाठी नव्हे तर लोक जागृती साठी. मग ते राजकीय पक्ष काढून का असेना किंवा मग न काढता का असेना. कारण या मार्गाने प्रश्न मुळापासून सुटेल आणि चिघळत जाणार नाही. कारण सध्य प्रकारच्या आंदोलनाने राजकीय जमातीची इतकी अब्रू गेली आहे की राजकारणी व्हायला आणि सरकारी कर्मचारी व्हायला ही कदाचित पुढच्या पिढ्या दहादा विचार करतील आणि पुन्हा अक्षम आणि समाजाची जाण नसणारे इथे राज्यकर्ते बनतील, अशी भीती आहे. उलट प्रकार तर असा व्हावा की राजकारणाबद्दल तरुण पिढीत फक्त जागृती नको तर आवड निर्माण व्हावी - कारण लोकशाहीत प्रत्येकजण राज्यकर्ता असतोच की. आणि एकदाका तशी लाट आली की मग समाजातील योग्य ती लोके बरोबर राज्यकर्ते बनतील. पण लोकशाहीला मारक हा घृणास्पद खेळ थांबवायला हवा.
राष्ट्र निर्माण ही फक्त शासनाची जिम्मेदारी नाहीच, एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करणे ही ही शासनाची जिम्मेदारी नाही, ती आहे फक्त आणि फक्त आपली. विचार करणारी डोकी निर्माण करणे आणि त्या डोक्यांना विचार करायला चांगले विचार देणे हे राष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकाचे काम आहे नव्हे त्याला हे बंधनकारक आहे, नसता मग त्याला पुन्हा हे राष्ट्र अस का आहे अस म्हण्याचा हक्क माझ्या मते तरी नाही. सध्या जे होतेय ते म्हणजे निवडणुकीच्या वेळेस- "अरे वेळ नाही असल्या फालतू गोष्टी साठी मला" -आणि जेंव्हा स्वतःला कुठे तरी आपल्या आळसाचा फटका बसतो तेंव्हा - "अरे कुणी निवडून दिली असली फालतू लोक इथे" - अशी ओरड. अशांना माझा सल्ला -  जा आणि जाऊन बघा किती लोक उभी आहेत आपल्या मतदार संघात, किती अपक्ष वेड्या सारखी दर वेळी जनता आता जागेल उद्या जागेल म्हणून उभी असतात. बर फक्त ते निवडून आले तर एका दिवसात प्रश्न सुटेल का ? तर नाही. कुणी ही निवडून आला तर प्रश्न एका दिवसात सुटणार नाही. पण समाजात एक आशा मात्र येईल की बदल घडू शकतो. आणि सध्या जी आशा निर्माण झाली ती खरं तर पूर्णतः समाजाची आशा मारणारी आहे. आंदोलन यशस्वी झाले तर आनंदच, पण पुढे १० वर्षा नंतर राष्ट्र कुठे असेल याची मला भीतीच वाटते. भ्रष्टाचार तर जायलाच हवा आणि तो एक मोठा शत्रू ही पण मार्ग... असो. 
सुजाण समजून घेतील!

जय हिंद!
                                                                                                           - प्रकाश पिंपळे     

शरद पवार हल्ला प्रकरण - माझे प्रामाणिक मत

आयुष्याचे ४५-५० वर्षे सार्वजनिक जीवनात अहोरात्र खर्च करणाऱ्या एका ज्येष्ठ वयाच्या नेत्यावर एक मनोविकृत माणूस हल्ला करतो आणि त्याच्या ह्या कृतीने आपलेच काही देशबांधव / मराठी बांधव एका आसुरी आनंदाने हुरळून जातांना बघून खरच आच्छर्य वाटले, देश, भ्रष्टाचार या सारख्या मुद्द्यावर बोलणारे साध्या सरळ भारतीय संस्कारांना कसे विसरले.
शरद पवार आणि त्यांचा भ्रष्टाचार हे मुद्दे वेगळे आणि त्या रोगी माणसाने "पाठीमागून" एका ज्येष्ठ वयाच्या व्यक्तीवर केलेला वार हि घटना निराळी, दोन्हींची सांगड घालून आपण आपल्यातल्या विकृतीला खतपाणीच घालत आहोत असे मला वाटते.
दोन्ही गोष्टींचा तितक्याच प्रखरतेने विरोध करावा पण निदान आपल्या सांस्कृतिक दिवाळखोरीचे प्रदर्शन थांबवावे असे मला वाटते. रस्त्यावर एखाद्या मोठ्या वयाच्या माणसाला / स्त्रीला कोणी मारहाण केली तर पेटून उठणारे आज नक्कीच एवढे हि मनाने पांगळे बनले नाहीयेत.

विकृत मानसिकतेने ग्रासलेल्या देशात काही हि घडू शकते, एरवी मातीमध्ये राब राब राबणाऱ्या त्या शेतकऱ्याची कोणाला आठवण येत नाही , तो कसे जीवन जगतो, त्याचे कुटुंब कुठल्या परिस्थतीत आहे ह्याची दुरूनही जाणीव नसणारेही आज शेतकर्यांबद्दल कळवळून बोलत आहेत, प्रत्येक आठवड्याचे दोन दिवस सिनेमे आणि मॉल मध्ये घालवणारे आणि उरलेले पाच दिवस बैलासारखे काम करणारे अगदी थोडीशी सवड मिळाली कि सबंध देशाच्या समस्यांवर फारच पोट तिडकीने बोलतांना दिसतात आणि एका ब्रेक मध्ये चुटकीसरशी सारे प्रश्न सुटले पाहिजेत ह्याची अपेक्षा करून आणि देश पुन्हा त्याच पुढाऱ्यांच्या हातात देऊन पुन्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मग्न होतात.

संविधान कर्त्याने मतदानासारखे शक्तिशाली हत्यार हाती दिलेले असतांना आता देश हरविंदर सिंग सारख्या मनोविकृत माणसावर जास्त विश्वास करते याचे फार वाईट वाटते आणि देशाच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण होते. मला माहित आहे शहाण्यांना शहाणपण शिकवावे लागत नाही पण वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्या विचारांना आवर घाला कारण आपले विचारच आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत, आणि ते नक्कीच उज्वल आणि सुसंकृत असावे यामध्ये नक्कीच कोणाचे दुमत नसावे.

- अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Friday, November 25, 2011

जगातून आतंकवादाचा नायनाट करण्यात सगळी मानवजात लढेल

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण होतील. या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आणि बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतींना अभिवादन. तुमचे बलिदान व्यर्थ जाणारच नाही. देशातून आणि जगातून आतंकवादाचा नायनाट करण्यात सगळी मानवजात लढेल ही अपेक्षा.
जय हिंद!

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्तींना विनम्र अभिवादन

यशवंतराव चव्हाण
 [१२ मार्च १९१३ - २५ नोव्हेंबर १९८४]


पुरोगामी महराष्ट्राचे वैचारिक आधारस्थंभ आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, एक आदर्श राजकारणी, जाणते नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्तींना विनम्र अभिवादन. साहेब तुमच्या विचारांची आणि मार्गदर्शनाची आज खूप खूप गरज भासते आहे. तुमचे विचार आम्हाला असच मार्गदर्शन करत राहोत ही परमेश्वरा कडे प्रार्थना. 

Thursday, November 24, 2011

Educated class: Selfish expectations


We, specifically the educated ones, have become a society where we need all the fruits of free market economy and global open market. But we want government to enforce heavy regulations on the lower economic classes in this nation like farmers and other labor class population. We want the salary hikes every time the petrol prices go up and we still want the food prices to stay down. Agreed, the growing food prices doesn't always benefit the farmers directly, but it isn't that plain reason to not accept the price rise.
I have observed some of economic dailies in this nation criticizing government and making jokes of policies when some package or subsidiaries are announced for the agriculture. These are the same dailies which appreciates the government reducing taxes on corporations and help the dying corporations (for their own mistakes). It's the worst form of the capitalism. Or in known words it's the old sucking Jamindari capitalism where media, power and policies are always in favor of the rich. I strongly support the free market economies and yes strong regulations by government too, but both things have to practiced in fair way. Let farmers decide their own prices and let global food giants come to this nation. People will buy from who sells it cheaper.

चांगल्या लोकांना राजकारणाच्या बाहेर पाठवून पुन्हा लोकशाहीच्या नावाने शिमगा

देश आणि लोकशाही कुठे चालली आहे. अहिंसा आणि बौधीकातेची माळा जपणारे असा करायला लागल्यावर देश अजून कुठेच जाणार नाही. महागाई असो किंवा इतर काहीही हे मात्र कुठे ही मान्य नाही. कोण कसा वागते ते समजणे जनतेला जास्त अवघड नाही. आणि अण्णांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते सुध्धा खूप खूप चुकीचे आहे. आता अन्नाच्या दोन प्रतिक्रिया म्हणजे जनतेला अण्णांनी मुर्खातच काढले की किंवा दुध खुळे समजले. 
देश एक दिवस चांगल्या लोकांना राजकारणाच्या बाहेर पाठवून पुन्हा लोकशाहीच्या नावाने शिमगा करेल आणि हुकुमशाहीला उद्या मार्ग मोकळा. ही भीती स्पष्ट पाने दाखवता येत नाही पण मनपासून वाटते साजुत्सर नागरिकांनी यावर विचार करावा.
स्वतःला शिकलेले म्हणणारे आणि मेणबत्त्या घेवून राष्ट्रवाद करायला निघणारे जसे काय या देशात राहातच नाहीत अशा प्रकारे वागत आहेत. उद्या देश चालवणे ही आउटसोर्स करतील ही मंडळी. आधीच गरीब आणि पिचलेली जनता खूप काही सहन करत आहे, गरीब श्रीमंत दरी वाढत आहे आणि त्यात पुन्हा राजकारण्यान बद्दल इतका अनादर म्हणजे लोकशाही वरचा विश्वास उडणे आहे आणि हुकुमशाहीला आमंत्रण आहे. आता हुकुम शाही कुणा पैश वाल्यांची आणि जात धर्माची येईल ते ही थोडा सुजाण नागरिक विचार करतील तर खूप चांगले. 
एकंदर असा दिसत आहे की कामे करा तरी ही अनादर आणि नका करू तरी ही अनादर. आता ज्यांना पोटातून आनंद झाला आहे ते उद्या भविष्यातला भारत पाहून रडतील असाच वाटतेय. असो असा ही जनतेने डोळे आणि विचार करणे बंद केले आहे.      
आणि  हे सोली सोराबजी भांडारकर, पुणे, मादर. जेम्स लेन बद्दल का बोलत आहेत? काय झालाय यांना. काय गोधळ आहे हा? किती वेळ चर्चाच करणार का? हे मान्य आहे का आता?  तिथे तुम्हाला चर्चा हवी आणि इथे जनता अस करतच असते म्हणे. अरे काय हे .......

शरद पवारांवरील हल्ल्याचा निषेध आणि एका वाईट भविष्याची नांदी - कुमार सप्तर्षी

समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे काय?

शरद पवार यांना हरविंदर सिंग नावाच्या तरुणाने बेसावध अवस्थेत गाठून मारहाण केली. एकदा लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला कि किमान सभ्यपणा अपेक्षित आहे. हा प्रकार असभ्य व रानटी आहे. शरद पवार त्यावेळी सावध असते तर त्या तरुणाने हल्ला करण्याचे धाडस केले नसते. म्हणून हा भ्याड हल्ला आहे. याच तरुणाने सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता. मानसशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक घटनांची अशी वैयक्तिक प्रतिक्रिया संभवत नाही. कदाचित या माणसाच्या मागे काही षडयंत्र रचणारी मनसे असू शकतात. मी प्रकारचा तीव्र निषेध करतो. कालच प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर बोलताना मी म्हणालो होतो कि, 'दारू सोडण्यासाठी बदडून काढणे आणि पुन्हा नाकावर टिच्चून सांगणे कि ३० वर्षापूर्वी मी ज्यांना बदडले ते आज माझे उपकार मानतात. अन्यथा माझ्या आयुष्याचे वाट्टोळे झाले असते असे ते मला सांगतात' हे अण्णा हजारे यांनी सांगणे गैर आहे. परत अण्णा असे म्हणतात कि, 'मी मातृभावानेने लोकांना बदडत होतो.' अशी भूमिका असणार्यांना प्रतीगांधी हि मान्यता मिळावी हे देशाचे दुर्दैव आहे. हेच अण्णा हजारे शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतांना फारच कुत्सित बोलले. ते असे म्हणाले कि, 'एकाच थप्पड मारली का?' म्हणजे अधिक थपडा मारायला पाहिजे होत्या अशी त्यांची अपेक्षा होती असे दिसते. 

काल मी अंदाज व्यक्त केला होता कि, जे दारूचे व्यसन सोडण्यासाठी मद्य प्रश्न करणाऱ्यांना बदडून काढण्याचा विचार मांडतात त्यांच्या मनात भ्रष्टाचारी माणसांना बदडून काढावे असाही विचार मूळ धरू लागेल. मग बदडून काढण्याची लाट येईल. मग हुकुमशाही व गुंड प्रवृत्तीचे म्हणू लागतील कि "तो अमुक आमुक दारुड्या होता किंवा भ्रष्टाचारी होता म्हणून आम्ही त्यांना बदडून काढले" हि भूमिका मुळातच विकृत आहे. 

शरद पवार हे माझे ५१ -५२ वर्षापासुनचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय घटनेपेक्षा आपल्या मित्राला अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वाईट वाटले. विशेषता त्यांच्या आजाराच्या जागेवर आघात करण्यात आला. हे तर फारच गंभीर आहे. आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असलो तरी आमच्या वैयक्तिक आपुलकी मध्ये अंतर पडलेले नाही. ७ वर्षांपूर्वी माझ्या घरावर, मी घरी नसताना बुरखाधारी सशत्र तरुणांनी जबरदस्तीने घरातल्या फर्निचर ची मोडतोड केली. माझ्या मुलाच्या शरीराला चाकू लावून हि राडेबाजी त्यांनी केली होती. त्या प्रसंगानंतर शरद पवारांचा फोन आला होता. मुख्यमंत्री सुशीलकुमार आणि छगन भुजबळ भेट द्यायला आहे होते. दीड वर्ष महाराष्ट्र सरकार तर्फे दोन सशत्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरावर राजकीय भूमिकेखातर हल्ले होतात आणि शासन संरक्षणही देते. शरद पवार हे माझ्या तुलनेने महान राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा प्रकार फारच गंभीर वाटतो. कुणीतरी, कोणालातरी सार्वजनिक जीवनातून बाहेर फेकण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा भास होतो. 

१९७८ साली शरद पवार पुलोद आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी जनता पक्षाचा आमदार होतो. आमचे राजकीय मेतकुट जमले होते. शरद पवारांनी कोन्ग्रेस व वसंत दादांशी गद्दारी केल्याचा राग इंदिरा कोन्ग्रेस च्या लोकांना आला होतो. कोन्ग्रेस चे भंडारा जिल्ह्यातील एक आमदार सुभाष कारेमोरे यांनी विधान सभेचे कामकाज चालू असताना 'गद्दार.. गद्दार ..' अशा घोषणा देवून शरद पवारांना चप्पल फेकून मारली होती. त्या प्रसंगाचा आम्ही सर्वांनी निषेध केला होता. मला वैयक्तिक दुख: झाले होते. त्या प्रसंगात शरद पवार त्यांची मनशांती ढळलेली नाही असे दाखवत होते. तथापि वरून तसे दाखवत असले तरी त्यांना अंतकरणात जखम झालेली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागले कि, साहजिकच कोणाच्याही मनात विचार येतो कि आपण समाजकार्य का करावे? आपण एका व्यक्तीला नकोसे झाले आहोत कि संपूर्ण समाजाला नकोसे झालो आहोत असा मनात संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी शरद पवार यांचे वय ३८ वर्षांचे होते. आज ते ७२ वर्षाचे आहे. भारतीय संस्कृतीत वयोजेष्ठतेला अपार महत्व आहे. मग सुखराम यांच्या सारख्या ८० वर्षाच्या नेत्याला मारहाण का झाली? समाजाची संस्कृती अवनत होत चालली आहे काय? असे अनंत प्रश्नाचे भोवरे मनात तयार होतात. कदाचित भविष्यकाळात जेष्ठ पुढार्यांना मारहाण करून नाउमेद व निरुत्साही करणे अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता आहे. म. गांधी यांच्या सारख्या ७९ वर्षाच्या वृद्ध माणसाला गोळ्या घालण्यात फार मोठे शोर्य होते असे मानणारे नथुराम वादी मंडळी अजूनही समाजात आहेत. सुखराम यांना ज्यावेळी तरुणाने मारले त्यावेळी येवढा निषेध झाला नाही. म्हणून त्याने पुन्हा शरद पवारांना मारून प्रसिद्धी मिळवली. या प्रकारची चटक विविध पक्षातील तरुणांना नक्की लागेल. तुरुनांच्या वयोगटाला वाह्यात नेते प्रियच असतात. असेच एक वाह्यात नेते राज ठाकरे म्हणाले कि, 'शरद पवारांना कशाला मारले' शरद पवार मराठी आहेत म्हणून राज ठाकरेंना आदरणीय वाटतात. ते पुढे म्हणाले कि. 'पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मारायला हवे होते.' इंदिरा कोन्ग्रेस चे लोक उद्या राज ठाकरे यांना मारण्यासाठी बक्षीस लावतील. हा खेळ चालू करून या देशाचे वाट्टोळे करण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला दिसतो. 

राष्ट्रवादी कोन्ग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजीचे बजीचे नाटक सुरु केले आहे. कारण सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणीचा मोसम सुरु आहे. साहेबांवरील हल्ल्यामुळे त्यांना झळकून घेण्याची, निष्ठेचे प्रदर्शन करण्याची ऐतीच नामी संधी प्राप्त झाली आहे. आर आर पाटील यांना तर मोठ्या व छोट्या या दोन्ही साहेबाना निष्टा दाखविण्यासाठी पोलिसांना निष्क्रिय राहण्याचा आदेश दिला आहे असे दिसते. नेमका असाच आदेश नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगली मध्ये दिला होता "... तीन दिवस निष्क्रिय राहा..!' तसाच हा प्रकार आहे. पोलिसांची निष्क्रियता पाहून अनेक भ्याड लोकांना शौर्य दाखविण्याची उबळ आलेली दिसली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचा निषेध करणार कोणावर दगड फेकणार आणि कोणाच्या गोष्टी जाळणार. दिल्ली मध्ये केंद्र सरकार मध्ये आणि महाराष्ट्रातही ते सत्तेत आहेत. रस्ता रोको हा प्रकार शासनाच्या विरोधासाठी करतात. बस जळतात ते हि शासनाच्या निषेधासाठी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त उपोषण करून सुताकामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आहे. रस्त्यावर येवून जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नुकसान करतील त्याची भरपाई त्यांनी दिली पाहिजे. ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यानंतर मंत्री पदे मिळाली. जय प्रकाश नारायण यांच्या आणीबाणी च्या आंदोलनात जे लोक कारावासात गेले त्यांनाच पक्षाने तिकिटे दिली. तसे राष्ट्रवादी करणार आहे काय..? शरद पवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा जे पी यांची चळवळ नाही. 

पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व संताप व्यक्त करतो!
                                                                                           - कुमार सप्तर्षी यांच्या फेसबुक वरून साभार

शरद पवार यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला शांत राहाण्याच विनंती.

शरद पवार यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला शांत राहाण्याच विनंती.


हल्ल्याचा निषेध

आधी तर शरद पवार याच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. पण काही ठिकाणी शहरे बंद केली जात आहेत ते केले जाऊ नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सुजाण नागरिक मदत करतील ही अपेक्षा.

Friday, November 18, 2011

बापुसाहेबां बद्दल त्यांच्या एका मित्रा कडून .....

बापूसाहेबांच्या निधनाचे वृत्त समजले. अलीकडेच झालेल्या आम्हा उभयतांच्या भेटीत त्यांच्या प्रकृतीचा अंदाज आला होता. उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले होते. माझा वाढदिवस 12 डिसेंबर व माझ्या पत्नीचा 13 डिसेंबर आहे. बापू मुंबईत हॉस्पिटलमध्ये होते. 12 नोव्हेंबरला मला व प्रतिभाला उभयतांच्या वाढदिवसासाठी, 12 व 13 डिसेंबरसाठी अभीष्टचिंतनाचे पत्र बापूसाहेबांकडून आले. त्यांनी हे पत्र महिनाभर आधीच का पाठविले याचा मी विचार करत होतो. 12 डिसेंबरपूर्वी बापूसाहेब निघून गेले. कदाचित आपण नसू याचा अंदाज व खात्री त्यांना असावी; म्हणून जाण्यापूर्वीच आम्हा उभयतांचे त्यांनी अभीष्टचिंतन केले असावे. 

1967 मध्ये मी बारामतीहून व बापूसाहेब लातूरहून असे दोघेही महाराष्ट्र विधानसभेत आलो. बापूसाहेबांनी राज्याचे सहकारमंत्री केशवराव सोनावणे यांचा पराभव केला होता. मीसुद्धा एका साखर कारखान्याच्या धनाढ्याचा पराभव केला होता. मी सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य, तर बापूसाहेब विरोधी समाजवादी पक्षाचे सदस्य. पण आमची मैत्री विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातच झाली. बापूसाहेब उत्तम वक्ते होते. फार थोड्या कालावधीत वैधानिक कार्यात त्यांना मान्यता मिळाली. विधानसभेचे अधिवेशन असो किंवा राष्ट्रकुल संसदीय दलाची बैठक असो, मी आणि बापूसाहेब कायम बरोबर असायचो. पुढील निवडणुकीत बापूसाहेबांनी मतदारसंघ बदलला. मात्र, त्यांना त्या निवडणुकीत यश आले नाही. त्यांच्याविरुद्ध अंबेजोगाई पंचायत समितीचे सभापती बाबूराव आडसकर यांनी निवडणूक लढवली. बापूसाहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या भाषणाला उपस्थिती चांगली असायची. पण मतदारसंघातील विकासाची कामे करण्याचा अधिकार पंचायत समितीच्या सभापतींकडे असायचा. त्याचा फायदा श्री. आडसकरांना झाला. कोणत्याही खेड्यात गेले की श्री. आडसकर लोकांना विचारायचे आणि जाणवून द्यायचे, ""तुझ्या गावचा रस्ता कोणी केला? म्या केला. तुझ्या गावाला पाणी कोणी दिलं, म्या दिलं.'' ही प्रचाराची पद्धत. ""कामाला मत द्यायचे की उत्तम भाषणाला मत द्यायचे? उत्तम भाषण ऐकायचे असल्यास बापूसाहेबांचे भाषण मी गणपती उत्सवात ठेवेन. सबब मला मत द्या!'' अशा श्री. आडसकरांच्या प्रचाराच्या गमती बापूसाहेब आम्हाला हसून सांगायचे. 

1975 मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली. बापूसाहेबांनी जयप्रकाशजींच्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. त्यांना अटक होऊन 19 महिने कारावासाची शिक्षा झाली. आणीबाणी संपली; बापूसाहेबांची सुटका झाली. जनता पक्षाची स्थापना झाली. सर्व आणीबाणीविरोधक जनता पक्षात एकत्र झाले. बापूसाहेबांनी औरंगाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्‍याने जिंकली. बापूसाहेब दिल्लीला आले. जनता पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी चंद्रशेखर यांच्याकडे देण्यात आली होती. मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आले. बापूसाहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची परिस्थिती होती; पण बापूसाहेबांनी मात्र चंद्रशेखर यांच्याबरोबर जनता पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी घेणे पसंत केले. ती जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. पुढे राज्यसभेत बापूसाहेब आले, तेथेही उत्तम संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक झाला. बापूसाहेबांचा पिंड राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकाचा. सुरवातीच्या काळात बिहारला जाऊन जयप्रकाशजींबरोबर त्यांनी काम केले. महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी केले. 1980 मध्ये आम्ही मंडळींनी काढलेली जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी असो, की चंद्रशेखर यांची भारत यात्रा असो, कोठेही सामान्य माणसाच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष वा कार्यक्रम यामध्ये बापूसाहेबांचा सक्रिय सहभाग होता. एस. एम. जोशी हे बापूसाहेबांचे श्रद्धास्थान. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी नामांतराला पाठिंबा दिल्याने बापूसाहेबांना फार यातना सहन कराव्या लागल्या, त्याची बापूसाहेबांनी कधीही खंत बाळगली नाही. परंतु औरंगाबादला एस. एम. जोशींना यातना सहन कराव्या लागल्या, याचे दुःख बापूसाहेबांना झाले. पुढे दिल्लीमध्ये संसदीय काम, पक्षाचे संघटनात्मक काम करताना, बापूसाहेब मराठवाडा विकासाच्या चळवळीत गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्या समवेत राहिले. पण या चळवळीच्या काळात महाराष्ट्राच्या ऐक्‍याच्या संदर्भात मात्र कधीही तडजोड केली नाही. 

दलित, शोषितांवरील अत्याचाराचे किंवा अधिकाराचे प्रश्‍न असोत, अशात बापूसाहेबांनी कधीही माघार घेतली नाही. राजकीय, सामाजिक चळवळीसाठी त्यांनी आयुष्याचा फार कालावधी घालवला. अखेरच्या काळात सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. राज्यातील सर्व थरांतील शैक्षणिक प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष दिले. एक उत्तम सहृदयी मित्र, जिवाभावाचा सहकारी म्हणून बापूसाहेब आम्हा सहकाऱ्यांबरोबर होते. आम्हा दोघांचा पंचेचाळीस वर्षाचा स्नेहभाव होता. आम्हा दोघांचेही श्रद्धास्थान म्हणजे यशवंतरावजी चव्हाण व एस. एम. जोशी. एस. एम. यांच्या निधनानंतर बापूसाहेब फारच हळवे झाले. एस.एम. नाहीत हे त्यांना पटतच नव्हते. किशोर पवार, भाई वैद्य, मृणालताई गोरे अशांची संगत म्हणजे बापूसाहेबांचे टॉनिक होते. अखेरपर्यंत या सहकारी मित्रांच्या सार्वजनिक कामात बापूसाहेब रमत होते. सार्वजनिक जीवनात बापूसाहेबांसारखा निर्मळ मित्र, स्वच्छ राजकारणी, कौटुंबिक सलोखा जपणारा सहकारी मिळणे दुर्मिळ. सुधाताई व मुलींच्या दुःखाला कसा आवर घालावा हे काही समजत नाही. 
                                                                                         - शरद गो. पवार


सौजन्य: सकाळ  

Thursday, November 17, 2011

Capitalism and Communism (for India)

Yesterday a very good phrase occurred to my mind "Fairy Tales of Capitalism and Horror Storied from Communism". In relation to that....

Post 91 changes have transformed the vision of policy makers and executors. We as a nation are looking at prosperity and growth from another perspective and I, some times doubt about  that being an imported vision. I am not content with the 'kind' of growth that is happening and kind of people those leading it. But I was even not content with pre 91 days and the growth then.

So I have been asking myself  what do I want and what is that I think is the best for this nation. Obviously it is not the communism (-as it is) as (personally I think) the fundamental notion of individuals  being more productive and forward looking than the collectives (as opposed to individual) is correct and realistic. So is it Capitalism? Surely another 'no' here too. Individuals are important and should be awarded differently but can not be treated and favored for too long, which I think capitalism does a lot.

We being a nation divided into different social structures; wealth and power being centered to very few, can't afford to adopt capitalism. Yes mixed economy is answer, but then the ratio of capitalists and communist approaches is a factor to debate on.

Many say we are a mixed economy but I still think we have been moving to capitalism slowly. The poors being not able to visualize the move and not able to raise their voice are quite. The only hope is new world capitalists being not the believers of 'suck it all greed is good capitalism' and that they believe in enterprises for the mankind. That can happen only when those lower strata of this society understand this new world and the new capitalism for mankind as in fairy tales and some what similar to what communism expects from the societies.

 **
You might love to read :  
The New Capitalist Manifesto: Building a Disruptively Better Business

to watch: http://www.jijau.com/drupal/?q=node/39 


These will give both the perspectives.