Saturday, May 2, 2020

४०० ते ५०० वर्षांत उभी राहिलेली संस्कृती आपली खरी संस्कृती - महाराष्ट्र दिन २०२०


महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तसं ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, त्याचा हा आधुनिक जन्म दिवस. महाराष्ट्र कधी पासून अस्तित्वात असेल? म्हणजे इथली संस्कृती, आपण जे वागतो, जगतो, बोलतो, राहतो वगैरे वगैरे. कधी पासून हे सगळं असं असावं? याचं उत्तर आपल्या सारख्या सामान्यांपेक्षा हा ज्या कोणत्या विषयाचा विषय असेल त्या विषयाच्या निष्णातांना जास्त चांगलं माहित असेल. तरी, आपला एक सामान्य माणूस म्हणून या भूमीवर अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आपण आपला एक अंदाज लावू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर-नामदेव इथे आपल्याला या मराठी राज्याची - महाराष्ट्राची - सुरुवात झाली असावी, असा अंदाज लावता येईल.म्हणजे आजच्या आपल्या मराठी म्हणता येईल अशा संस्कृतीची सुरवात तिथून झाली असं आपण समजू शकतो. किंवा मला जे मांडायचं त्या साठी ते सोयीचं आहे म्हणून समजा हवं तर! पण मीच कशाला वारकरी साहित्यातच संत बहिणाबाईंनी लिहून ठेवलयं -


संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥
नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ ५ ॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें वोजा ॥ ६ ॥  तर ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई इथून ते अगदी तुकाराम महाराजांपर्यंत या संस्कृतीची पाळेमुळे पक्की झाली. बरं फक्त वारकरी संस्कृतीच तेंव्हा सगळ्या महाराष्ट्राची संस्कृती होती का? तर कदाचित तीच मुख्य संस्कृती असावी. कारण इथल्या सर्व स्तरातील सगळ्या जातीत आणि अगदी धर्मातही वारकरी संत होऊन गेलेत आणि दुसरं काही इतकं प्रबळ नव्हतं ही. किंवा कर्मकांडाची आणि सनातन्यांचीही संस्कृती असावी, पण तिला वेळो वेळी ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी पराजित केले. म्हणून तीही आपली मुख्य संस्कृती नसावी. ही जर आपली अगदी ४००  ते ५०० वर्षांत उभी राहिलेली संस्कृती आपली खरी संस्कृती होती, तर ती आपण तशीच जपलीये कि त्यात सरमिसळ - भेसळ कलीये हे आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने पुन्हा पाहायला हवं. ज्ञानेश्वर, एकनाथ, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, तुकाराम, दामाजी, नरहरी सोनार, नामदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, सावता माळी किंवा सोपानदेव आणि इतर अनेक संत पाहिल्यास किंवा त्यांच्या लिहलेल्याचा सार पाहिल्यास खालील २ महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात.

१. जाती पातीचा कसलाही भेद या संस्कृतीने शिकवला नाही किंवा किंबहुना जाती पती मिटाव्यात, भेदा भेद अमंगळ हीच या संस्कृतीची शिकवण राहिली. त्याकाळी अगदीच भेदा भेद इथे नव्हताच असं मला म्हणायचं नाहीं. पण तो यां त्या काळच्या आदर्शांत तरी दिसत नाहीं.  
२. सगळ्याच संतांनी कर्मकांड, वेद, सनातनी धर्मांधता, चमत्कार इत्यादींच्या मागे न जाता (किंवा जशास तसे न जाता त्यांना पारखून आपल्या हिताचं ते घ्यावं) खरा भक्तिमार्ग जो नामस्मरणात आहे तो सांगितला. आणि याला साक्षात ज्ञानेश्वर माउलींच्या या ओळींचा आधार आहे -

योगयागविधी येणे नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म  ।।१।।
भावेविण देव  न कळे निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।
तपेविण  दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेविण  हित कोण सांगे ।।३।।
ज्ञानदेव सांगे  दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।।      अजून पुढे आपली गफलत होऊ नये म्हणून 'साधू' ची व्याख्याही जगतगुरु तुकाराम महाराजांनी केलीये ती अशी -

जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥अजून ज्ञानेश्वर माउली म्हणतात - 


जरी वेद बहुत बोलिले | विविध भेद सुचिले |
तऱ्ही आपण हित आपुले | तेचि घेपे ||


म्हणजेच वेदांमध्ये जरी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतील तरी आपण  त्यातून आपल्या योग्य आणि हिताचे तेच निवडावे, हा अधिकार माउलींनी सर्व ज्ञानी जणांना दिला होता.आणि जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात ही -

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।


म्हणजेच आपल्याच या वेदान्तातून ज्ञान न घेता त्याचा केवळ भार वाहने म्हणजे वेडेपणाच असे काहींसं तुकोबांनी देखील सुचवले.पुढे वेदांचा अर्थ काय तर -

वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।


आणि ते या सगळ्याचा असा सोक्ष मोक्ष लावतात -

तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।


खरं  तर चारही वेदांचे सार तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये अतिशय परखडपणे आणि सामान्य लोकांना समजेल या भाषेत लिहून ठेवले. म्हणून तुकोबारायानंतर वेदाच्या किंवा धर्माच्या पुन्हा आपल्याला नव्या व्याख्या कुणी सांगायची गरज नाही.

म्हणजे हे सगळं व्यस्थित पाहता आपली महाराष्ट्राची संस्कृती ही भेदा - भेद न मानणारी, धर्माच्या रूढी, त्याचे जाचक नियम मोडून काढणारी, दांभिकतेला ठेचून काढणारी होती. पूजा पाठ आणि कर्मकांड यात न रमता फक्त नामस्मरणाने भक्तीमार्ग प्राप्त करणारी होती. गोर गरीब यांचा कैवार करणारी होती. आपल्या कामात 'कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाई माझी' म्हणून देव पाहणारी होती.

पुढे, जिजाऊ साहेबांनी, शिवरायांनी आणि संभाजी महाराजांनी शतकभर इथल्या माणसांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्य शिकवलं. वरच्या सगळ्या गोष्टी तशाच ठेऊन. म्हणूनच तर शिवशाहीत स्त्रियांना सन्मान होता. जाती पतींच्या पलीकडे प्रत्येकाला कर्तृत्वानुसार जागा होती, संधी होती. सोप्या भाषेत सांगायचे तर संत परंपरेने सांगितलेल्या संस्कृतीस राजाश्रय लाभले.


अजून पुढे, शाहू महाराजांनी इथे न्याय आणि समानतेची चळवळ अजून मजबूत केली आणि वंचित आणि संधीच्या परिघाबाहेर असलेल्यांना परिघात आणलं, आणण्याचे प्रयत्न केले. पुढे महात्मा फुल्यांनी, बाबासाहेबांनी या सगळ्या प्रयत्नांना सामाजिक आणि राजकीय आधार आधार दिला. अगदी बाबासाहेबांपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची नाळ जशास तशी दिसेल. या भूमीत भेदा-भेद आणि दांभिकतेचा विरोध ज्ञानेश्वर माउलींनी सुरु केला, जगतगुरूंनी प्रखर केला, छत्रपतींनी त्या विरोधाला राजकीय छत्र दिलं, शाहूंनी त्याला व्यापक केलं, फुल्यांनी पुन्हा वेगळ्या भाषेत ते लोकांपर्यंत नेलं आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्याला आधुनिक जगात, बदलेल्या राजकीय व्यवस्थेत, जगतगुरु तुकाराम महाराजांसारखं प्रखर करून व्यवस्थेच्या तोंडावर मारलं! हि संस्कृतीची नाळ इथवर कायम होती म्हणूनच बाबासाहेबांच्या पहिल्या पाक्षिकाला (म्हणजे मॅगझीनला जे १९२० ला त्यांनी सुरु केले) तुकाराम महाराजांच्या विचारांची प्रेरणा होती. बाबासाहेबांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या या ओळी मूकनायक या पाक्षिकाच्या नावासोबत अगदी वरती छापत.


काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।      
हीच आपली खरी संस्कृती!आता आपण या संस्कृतीचे अजूनही खरंच पाईक आहोत कि भरकटलोत ?आजूबाजूला जातीय द्वेषाच्या, म्हणजे जाती पाळणाऱ्या आणि द्वेषातून जातीअंत करू पाहणाऱ्या सवयी, चळवळी बघितल्या की हीच का आपली संस्कृती जी निपजण्यासाठी ८००-९०० वर्ष लागलीं? ज्ञानेश्वर माउली ते तुकारामांनी यासाठीच का घातला होता अट्टाहास या संस्कृतीच्या इमारतीचा ? असे प्रश्न पडतात.  ज्या कर्मकांडाच्या आणि जाचक रूढी-धर्माच्या बाहेर इथला समाज पडावा म्हणून माउलींनी अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, नामदेवांनी प्रबोधन केलं, तुकारामांनी तर सरळ सरळ युद्ध केलं, त्यातच पुन्हा आपण फसणार आहोत का? देवाला बाद करायला मुळीच सांगत नाहीये. पण आपण या संतांनी सांगितलेला निकोप मार्ग सोडून पर्यायाने आपली खरी संस्कृती सोडून आपण इतर मार्गांनी देव मिळवायचा प्रयत्न आपण करणार असूत, तर आपला धर्म आणि संस्कृती हायजॅक म्हणजे अपहरण केली जातीये याची जाणीव होऊ नये इतके निर्बुद् आपण आहोत का?खरं तर जे (सत्ता पिपासू आणि धनलोभी लोक) आपल्याला नवा धर्म शिकवत आहेत तेच एका भयंकर मोठ्या अरिष्टात फसलेत आणि त्याची त्यांना कल्पनाही नाही. म्हणून हि संस्कृती वाचवायची असेल. ही म्हणजे वर आपण जिच्या बद्दल बोललो ती. तर आपल्याला सगळ्यांना - प्रत्येक मराठी म्हणून घेणारांना - पुन्हा ज्ञानेश्वर तुकाराम वर्तनात आणावे लागतील. त्यांच्या सांगितल्याचे नवे अर्थ लावावे लागतील आजच्या समाजानुसार. तेंव्हाच दीन म्हणजे दरिद्री होत जाणाऱ्या महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात खरा आनंद येईल!

जय महाराष्ट्र!     Sunday, April 26, 2020

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | त्यांच्या काही विचारांचा सारांश

महात्मा बसवेश्वर भारतीय प्रबोधन परंपरेतील एक महान संत. त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अवघ्या ३६ वर्षाच्या आयुष्यात ज्यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी इतका मोठा विचार रुजवून ठेवलाय. त्यांच्या कर्तृत्वाचं विस्मरण आपल्याला होऊ नये. त्यांनी सांगितलेला मार्ग आपण सोडू नये, हीच त्यांना आदरांजली. खाली त्यांच्या विचारांचे काही स्क्रीनशॉट्स देत आहे. फार नाही, इतकं जरी कळलं तरी, आपल्या सारख्यासाठी बसवेश्वरांच्या विचार समुद्रातले हे चार थेंबही आयुष्यभर पुरतील.


                 


 

संदर्भ : भारतीय साहित्य अकादमी या भारत सरकारच्या संस्थेकडून प्रसिद्ध साहित्य. लिंक 

Friday, April 24, 2020

फेक न्यूज | Fake News

फेक न्यूज बद्दल आपल्यात बऱ्यापैकी जागृती येतीये आणि हि खूप चांगली गोष्ट आहे. याच अनुषंगाने फेक न्यूज  नेमकी काय असते त्याचा अभ्यास आणि ती ऑटोमॅटिकली ओळखता येते का या बद्दल माझ्या एम टेक मध्ये मी यावर थोडं काम केलं होतं. बऱ्याच वेळा ते काम ओपनसोर्स करावं असा विचार ही केला, पण वेळेच्या अभावाने त्याला शेअर करण्यासारखं स्वरूप अजून देता आलं नाही. म्हणजे लोकांना काही वापरण्यासाठी द्यायचं असेल तर ते त्यांच्या वापरण्यासारखे असावे म्हणजे दुसऱ्या डेव्हलोपर्सना ते नीट समजावं आणि जमल्यास त्यात भर घालता यावी. पण अजून तरी जमलेलं नाही.
असो.

खाली त्याच्या रेपोर्टचा काही भाग देतोय. कदाचित कुणाला उपयोगी पडेल.

 ABSTRACT :
News articles that are intentionally and verifiably false, and could mislead readers are called as fake news. These news articles are mainly used to spread hatred and  manipulate public opinions among other serious purposes. These are mostly spread through digital media platforms like facebook, whatsapp and only online news sites. Avoiding fake news or making it easier to identify one is an important task for many digital platforms and even the whole society. Currently, the widely used methods to control the fake news are manual. Many platforms allow users to report such news so that the platforms can manually verify them. Some platforms pro-actively monitor the news and control the same. Given the volume and variety of the content and users, it’s a very challenging task.

There are attempts at making the process automatic using various natural language processing and machine learning techniques. Methods of stance detection and text classification have been applied. These methods have achieved the considerable ‘contest’ accuracy. But, fake news is a variable entity and plain text classification methods based on historical data are not sufficient in the real world.

In this work, an attempt to identify fake news using unsupervised and supervised methods is made. The devised system tries to verify the candidate fake news using other news sources over the web. It also makes use of text classification based on historical data to identify the fake news. The report details the explorations done to devise the system and reports some of the evaluations carried out. 1.1 Overview

“To be news articles that are intentionally and verifiably false, and could mislead readers”

It is one of the a definitions of fake news. A recent study [1] used this to define Fake News. It further says that, the main motivations behind the production of fake news are financial and ideological. Both the aspects, financial and ideological are an important aspects of the human society. With fake news there is an effort to alter and manipulate those and that is fundamentally wrong and unethical.

Fake news is in existence for long time and many evidences can be referred from the history. What has changed is the speed with which the fake news travels. With the rapid developments in the communication and computing technologies, the spread of fake news is just click/swipe away. And with the same speed it affects the normal course of life of a society.

Corporations and governments are trying hard to minimize the fake news and its repercussions. Technological interventions can be devised to tackle it to some extent. We can explore technological solutions and their applications to deal with the fake news and contribute to the efforts of minimizing it and its repercussions.

The repercussions of the fake news are so serious that it changes the course of progress of the society. Recently it has shown its impacts in three important events in the history. One, the American Presidential election, two the Brexit and three, the last Indian election and post election events.

Various studies have been conducted to asses impact of the fake news on various events.   Authors of [2] from MIT studies fake news and its spread in comparison to the real news. They found out astonishing facts about fake news one of which is reproduced below for the ready reference.

Falsehood diffused significantly farther, faster, deeper, and more broadly than the truth in all categories. The effects were most pronounced for false political news than for news about terrorism, natural disasters, science, urban legends, or financial information. Controlling for many factors, false news was 70% more likely to be retweeted than the truth.

The finding is surprising as our, or least mine, assumption about the collective public opinion is that collectively humans make right decisions. This assumption is also supported by the fact that Wikipedia has been equally ‘good and erroneous’ source of information as Encyclopedia [3]. Similarly, it’s also evident from the success of the crowdsourcing. But when it comes to news it’s a different fact. The fake I.e false is upheld taller than the real. This contradiction can be subject of another study. There must be  factors affecting these two different case differently.

The fake news is different from a real typical news in following special ways:

Fake news is made up of content that gives rise to feelings like  fear, disgust and surprise in the minds of readers, whereas real news gives rise to feelings like joy, sadness and trust.
Fake news has shocking claim in the headline and sounds unbelievable
It's mostly published on not-so reliable source or circulated on social media sites
It's not professionally written, there may be spelling errors and bad formatting

This work aimed to contribute to the task of controlling fake news through application of text processing to the news articles. Following sections will help readers understand the technical definition of the fake news and use of various approaches to build the fake news identification system. The report will also talk about the build system, it’s advantages, limitations and future scope.

For the complete report - https://github.com/pbpimpale/fakenews/blob/master/FakeNews%20-%20Copy%20for%20Sharing.pdf

Saturday, April 4, 2020

COVID19 : Select Research Papers and Findings for easier access

I am going through some research papers on Covid 19 for some analysis purpose. I will be listing some of the interesting ones for reference to others who may be interested.
 • Clinical Features of 85 Fatal Cases of COVID-19 from Wuhan: A Retrospective Observational Study. 
  • The median age of the patients was 65.8 years and 72.9% were male. Common symptoms were fever (78 [91.8%]), shortness of breath (50 [58.8%]), fatigue (50 [58.8%]), dyspnea (60 [70.6%]). Hypertension, diabetes and coronary heart disease were the most common comorbidities. Notably, 81.2% patients had very low eosinophil counts at admission. Complications included respiratory failure (80 [94.1%]), shock (69 [81.2%]), ARDS (63 [74.1%]), arrhythmia (51 [60%]), etc. Most patients received antibiotic (77 [90.6%]), antiviral (78 [91.8%]) and glucocorticoids (65 [76.5%]) treatments. 38 patients [44.7%] and 33 [38.8%] received intravenous immunoglobulin and interferon α2b respectively
  • link: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/32242738
 • Imaging and Clinical Features of Patients With 2019 Novel Coronavirus SARS-CoV-2: A systematic review and meta-analysis.
  • Overall, 31 articles and 46959 patients were included, including 10 English articles, 21 Chinese articles. The results of meta-analysis showed that the most common clinical manifestations were fever (87.3%, 0.838-0.909), cough (58.1%, 0.502-0.660), dyspnea (38.3%, 0.246-0.520), muscle soreness or fatigue (35.5%, 0.253-0.456), chest distress (31.2%, -0.024-0.648). The main imaging finding were bilateral pneumonia (75.7%, 0.639-0.871), and ground glass opacification (69.9%, 0.602-0.796). Among the patients, the incidence of required intensive care unit (ICU) was (29.3%, 0.190-0.395), the incidence of acute respiratory distress syndrome (ARDS) was (28.8%, 0.147-0.429), the multiple organ dysfunction syndrome (MODS) was (8.5%, -0.008-0.179), and and the case fatality rate of patients with COVID-19 was (6.8%, 0.044-0.093).
 • Comparison of clinical and pathological features between severe acute respiratory syndrome and coronavirus disease 2019
  • Severe acute respiratory syndrome (SARS) and coronavirus disease 2019 (COVID-19) shared similar pathogenetic, clinical and pathological features. Fever and cough were the most common symptoms of both diseases, while myalgia and diarrhea were less common in patients with COVID-19. Acute respiratory distress syndrome (ARDS) was the most severe pulmonary complication that caused high mortality rate. Histologically, diffuse alveolar damage (DAD) was the most characteristic finding in non-survivors with either SARS or COVID-19. Cases of patients died less than 10~14 days of disease duration demonstrated acute-phase DAD, while cases beyond 10~14 days of disease duration exhibited organizing-phase DAD in SARS. Meanwhile, organization and fibrosis were usually accompanied by exudation. Coronavirus was mostly detected in pneumocytes, while less in macrophages and bronchiolar epithelial cells. Hemorrhagic necrosis and lymphocytes depletion were found in lymph nodes and spleen in both SARS and COVID-19, indicating a pathological basis of lymphocytopenia. Thrombosis was commonly observed in small vessels and microvascular in lungs accompanying DAD. Microthrombosis was also found in extrapulmonary organs in COVID-19, that was less reported in SARS. Damages in multiple extrapulmonary organs were observed, but coronavirus was not detected in some of those organs, might indicating an alternative mechanism beyond viral infection, such as hypoxemia, ischemia and cytokine storm induced immunological injury. Diffuse alveolar damage due to viral infection and immunological injury, as well as multi-organ dysfunction and extensive microthrombus formation, brought huge challenge to the management of patients with severe SARS or COVID-19.

Friday, April 3, 2020

शिवरायांप्रती खरी आदरांजलीफक्त जिवंत राहणे जरी माणसाच्या पृथ्वीवरील आयुष्याचं ध्येय असलं तरी, त्या जगण्याला स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचं अधिष्ठान असावं. या विचाराचं बीज ज्यांनी इथं रुजवलं अशा शिवरायांचा आज स्मृतीदिन. सामान्यातल्या सामान्याला जग बदलता येतं, परिस्थिती बदलता येते आणि अगदीच शक्य नाहीं अशा वाटणाऱ्या गोष्टीही धीराने आणि मेहनतीने करता येतात. या सगळ्यांची अनेक उदाहरणे महाराजांनी आपल्या समोर ठेवलीयेत. भेद, द्वेष आणि कपट यांच्या शिवाय न्यायाने कसं राज्य करता येतं याचंही उदाहरण महाराजांनी घालून दिलय.

अतिशयोक्ती नाही. पण इथल्या प्रत्येक वर्गाच्या, जातीच्या, धर्माच्या आणि लिंगाच्या माणसाला खचलेल्या क्षणीं हा राजा प्रेरणा आहे. तो अवतार नव्हता. त्याच्याकडे गडगंज संपत्ती नव्हती. झालंच तर, आपल्या पेक्षाही जास्त संकटं नकळत्या वयात झेलावी लागली, पहावी लागली. त्यातूनही कोटींच्या मनावर आपल्या कर्तृत्वातून या राजाने स्थान मिळवलंय. तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाचे संस्कार दिलेत.

म्हणून,
त्या संस्काराची आब राखणं
त्या स्वाभिमानाचा दुरूपयोग न करणं
त्याचं मग्रुरी म्ह्णून प्रदर्शन न करणं
दिन दुबळ्यांच्या शोषणाचं कारण न होणं
हीच आपली शिवरायांप्रती खरी आदरांजली होईल.

स्वतःचच उदाहरण म्हणून देतो. अगदी आपलं अस्तित्व शोधण्याच्या, त्याचं कारण शोधण्याच्या वयात 2003 ते 2007 साली, बरंच काही वाचलं. घरातून जिथं क्षणो क्षणी तुमची स्तुती होते, आपल्या छोट्याशा मित्रांच्या गटातून जिथं सगळ्यांना तुम्ही माहीत असता अशा जगातून तुम्ही जेंव्हा बाहेर पडता. तिथं असतं एक भलं मोठ्ठ जग. तुम्ही न पाहिलेल्या वर्गातली, वेगळ्या कापड्यातली, वेगळ्या भाषेची, आप आपल्या जगात ज्यांचं तुमच्यासारखच स्थान असतं अशा माणसांनी गच्च भरलेलं. त्यात तुम्ही स्वतःची जागा शोधता. अगदी गच्च भरलेल्या बस मध्ये जागा शोधण्यासारखं. तिथं कुणालाच ती सोडायची नसते. तेंव्हा शिवाजी महाराज भेटले. ईकडंच तिकडंच वाचूनझाल्यावर. कदाचित आपलं सोडून इतरांचं चांगलं असतं या न्यूनगंडाच्या प्रभावातून मला महाराजांपर्यंत यायला वेळ लागलेला असावा. पण जेंव्हा हे एक दोन वर्षांच्या शेवटीं कळालं तेंव्हा तेंव्हा कुठं पुन्हा आत्मविश्वास आला. खालच्या लिहलेल्या ओळीं माझ्या त्याच, माझ्यापुरत्याच का होईना, पण साक्षात्काराचा भाग होत्या. ज्या दिवशी हे कळालं तेंव्हाच्या भावना अजूनही मला जशास तशा आठवतात.

त्या ओळी -

कशास हवा तुम्हा सिकंदर
अन कशास हवा कोलंबस
छत्रपतीला स्मरा एकदा
शिव छत्रपतीला स्मरा एकदा
मग तुम्हीच हो सिकंदर
अन् तुम्हीच हो कोलंबस, तुम्हीच हो कोलंबस!

जय जिजाऊ. जय शिवराय.
- प्रकाश बालाजी पिंपळे
कार्यकर्ता, जिजाऊ.कॉम