Thursday, December 13, 2012

यशवंतराव चव्हाण विचार मंचफेसबुक वर यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्य सुरु झालेल्या या उपक्रमाला आपली साथ लाभावी. त्यातून आणि या सह्याद्रीच्या मातीने बनलेल्या महापुरुषाच्या विचारातून तुम्हाला ही नक्कीच खूप काही सकारात्मक भेटेल. 

त्या पानावरील काही नोन्दी :

यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर ते खरे समाजकारणी होते. राज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवला. म्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनले. अखेरपर्यंत त्यांनी साहित्यसेवा केली. त्यांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे....”
-
मा.श्री. विनायकराव अभ्यंकर, निवृत्त नौसेना अधिकारी
-- 
"यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात समाज परिवर्तन घडविणारे अनेक चांगले निर्णय घेतले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. त्यांच्या आई, विठाई या न शिकलेल्या. घरात आर्थिक चणचण, कोणताही आधार नाही, अशा परिस्थितीत यशवंतराव मोठे झाले. त्यांच्या आईने त्यांना काबाडकष्ट करून शिकविले. याचे भान ठेऊन यशवंतरावांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो गरीब मुलांसाठी. या मुलांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी 900 रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलती देण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. यात तीव्रता होती, मात्र कटूता कुठेही नव्हती. संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा व निरोपाचा ठराव विरोधी पक्षाने मांडला होता. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. हीच याश्वान्त्रावांची खरी कमाई होती..."
-
मा. श्री. मधुकर भावे, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार
--
"यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे असामान्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांच्या नावाचे प्रभुत्व मराठी मनांवर आजही आहे. या नावाला अन्य विशेषणांची गरज नाही. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, निर्णय त्यांची संवेदनशीलता, सुसंस्कृतता यांचा प्रभाव नव्या पिढीवर पडणे गरजेचे आहे. शिक्षणाला साधन मानणाऱ्या यशवंतरावांनी गरीब घरातील मुलांसाठी आर्थिक निकष लावून मोफत शिक्षणाची सोय करताना आपले मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते...."-मा. डॉ. एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, पुणे.
--
युरोप अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे. कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. सहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाही. सद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे...”
-
मा. श्री. भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत 
--
यशवंतरावांनंतर राज्याचे विघटन सुरु झाले. यशवंतरावांनी महाराष्ट्राला जातीविरहित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यानंतर अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केले. मात्र आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीत. यशवंतरावानंतर महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आज देशात व महाराष्ट्रात राहिले नाही...”
-
मा. श्री. श्रीनिवास पाटील, माजी खासदार, कराड 
-- 
यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारला गवसणी घालून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे एकही नेतृत्व आज राहिले नाही. महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत मागे राहिला आहे. यशवंतरावानंतर जातिवादावर अस्मिता जपणारे संघटन वाढू लागले आहे...”
-
मा.श्री. किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत

अधिक जाणण्यासाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया येथे भेट द्या : https://www.facebook.com/pages/Yashwant-Vichar-Manch/280568318692687

Wednesday, December 12, 2012

वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - प्रकाशराव

आमचे लाडके मुख्यमंत्री.. म्हणजेच मुख्यमंत्री.कॉम  चे आणि  जिजाऊ.कॉम चे  संस्थापक, परम मित्र श्री. प्रकाश पिंपळे (उक्कलगावकर) यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा !
आई भवानी त्यांच्या आयुष्याला सुखा - समृद्धीने भरभरून आशीर्वाद देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना ! जगदंब .

जय जिजाऊ -जय शिवराय .

अमोल सुरोशे आणि समस्त मित्र परिवार
जिजाऊ.कॉम  / मुख्यमंत्री.कॉम

Tuesday, December 11, 2012

१२-१२-१२ : लोकनेते - शरद पवार आणि गोपीनाथराव मुंडे


आजच्या आगळ्या वेगळ्या आणि शतकातून एकदाच येणाऱ्या या दिनी महाराष्ट्रातील राजकारणामधील दोन रत्नांचा आज वाढदिवस. हे दोन्ही नेते खर्या अर्थाने लोकनेते आहेत. आयत्या पिठावर रेघोट्या मारून नेतृत्व झालेल्यांची संख्या आज भारतीय राजकारणात कमी नाही. अशा सगळ्या परीस्थित शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांसारखी राजकारणी म्हणजे खाणीतील हिरेच. दोघांनाही मुख्यमंत्री.कॉम  कडून जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पांडुरंगाचरणी दोघांना ही दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना.

पवार साहेब आणि गोपीनाथराव हे दोन्हीही नेतृत्व फक्त खादी घालून मिरवणारे राजकारणी नाहीत. तळा गळतील सामन्यांचे दुख समजून त्यावर शक्य ते राजकीय उपाय करणे यात या दोघांनचा हाथ खंडा.

शरद पवारांच्या दूरदृष्टीने राज्याला आणि राष्ट्राला सुखाचा मार्ग दिसेल यात शंकाच नाही. दोघांना ही जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Wednesday, December 5, 2012

खऱ्या स्वातंत्र्याची ओळख करून देणारा महामानव.भारतीय संविधानाचे निर्माते, बहुजन नायक भारतरत्न डॉ . बाबासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन !
त्यांचे उपकार केवळ दलित समाजावर नसून सबंध जगाला अचंबित करणारी सामाजिक क्रांती या महामानवाने प्रत्यक्षात घडवून दाखवली आणि हजारो वर्षे जाती - पातीच्या चिखलात रुतलेले भारतीय समाजाचे चाक खऱ्या अर्थाने फिरायला लागले.
सबंध जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या प्रतिकूल परीस्थ्तीमध्ये सामाजिक क्रांती होण्याची हि अद्वितीय अशीच घटना !

या महापुरुषाला केवळ एका जातीमध्ये अडकवून ठेवण्यचा कोतेपणा / संकुचितपणा गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालूच आहे, आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्य जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाच्या विचारांना खरच मनापासून अबिवादन करूया!


जय भीम. जय महाराष्ट्र.

- अमोल सुरोशे (नांदापूरकर)

---

बाबासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. आज असलेली सुबत्ता आणि समानता या भूमीवर तुमच्या शिवाय येणेच अशक्य होती. राष्ट्राला धर्माच्या पुढे नेवून आम्हाला मानवतेची शिकवण दिलीत आणि हात धरून त्या रस्त्यावर आणून सोडले. त्याची परतफेड फक्त आणि फक्त तुम्ही सुरु केलेला प्रवास संपवूनच केली जाऊ शकते.

जय भीम. जय महाराष्ट्र.

- प्रकाश बा. पिंपळे (उक्कलगावकर)