Showing posts with label marathi news paper. Show all posts
Showing posts with label marathi news paper. Show all posts

Tuesday, March 6, 2012

लोकसत्ताला ही 'पोटदुखी' चा विकार !

अनेक वर्षांची लेखणीची चळवळ अर्ध्या हळकुंडानि पिवळ्या झालेल्या काही विशिष्ट पत्रकारांच्या हाती गेल्यावर त्याचा स्तर कुठल्या पातळीपर्यंत खाली येतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला.
निमित्य होते "लोकसत्ता" मधील 'वाचावे नेट-के' या नवीन सदराचे.
मागे एकदा एक मित्राद्वारे या लोकसत्ताच्या नवीन उपक्रमाची माहिती समजली, निव्वळ 'वरण-भात' लेखांचा भरणा असलेल्या या सदराखाली एखादी विचारांची झणझणीत मेजवानी लोकसत्ताच्या असंख्य वाचकांपर्यंत जाईल अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली. अतिशय प्रांजळपणे कुठलाही जास्त विचार न करता केवळ ब्लॉग ची यु आर एल थोडक्यात माहितीसह नेटके च्या महाशयांना पाठवली, आणि खरच विसरून सुद्धा गेलो.
काल अचानक लोकसत्ता हाती पडल्यावर या महाशयांनी अमोल 'सुरोशे' , प्रकाश 'पिंपळे-पाटील' आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता या ब्लॉग चा केलेला पोस्ट-मोंर्टम वाचला आणि अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही, किंवा त्याची फारशी दाखल घेतली नाही.

अगदी सुरुवातीलाच मोठ्या अविर्भावात 'आम्ही म्हणजे काही ब्लॉग माझा वाले नाहीयेत, उपलब्ध एंट्रय़ांमधूनच विजेते निवडणारं... प्रसिद्धी देणारं ' वैगेरे छापून उरलेला सबंध लेख केवळ आणि केवळ आमच्या ब्लॉग चे, त्या मध्ये व्यक्त केलेल्या विचारांचे आणि ग्रामीण, बहुजन पार्श्वभूमी असणाऱ्या योगदान कर्त्यांची जाणीवपूर्वक आणि निव्वळ आकसापोटी केलेली केलेली निरर्थक ओरड म्हणावी लागेल.

हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून पिंपळा वर वर्षानुवर्षे बसलेले हे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नकोच द्यायचे असे वाटते पण, नाही बोलले तर गैरसमज, तो हि हार मानल्याचा.
म्हणून खालील प्रपंच, नसता या 'नेटके' ची किंमत त्याच्या वृत्तपत्रा च्या किमती पेक्षा देखील जास्त नाहीये.

मी म्हणालो आकसापोटी, होय ! कारण ज्या ब्लॉग वर शंभराच्या वर एन्ट्रीज आहेत, २०१० पासून लिखाण आहे त्या ब्लॉग च्या पहिल्या पानावरच्या चार लेखांना वाचून ह्या विचारवंत महाशयांनी ब्लॉग आणि ब्लॉगर्स च्या आडून एका विचार धारेवरच हल्ला चढवला ! हे असले हल्ले आम्ही नेहमीच पचवत आलोय पण आम्हाला "प्रसिद्धीचे छुपे उमेदवार" म्हणणारे स्वतः ला कुठेतरी लपवून हे असले फुटकळ शाब्दिक वार करतात याचीच कीव येते.

आता यांनी ज्या चार लेखांबद्दल आक्षेप नोंदवला, त्या लेखांच्या गाभ्यात विचार होता तो महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या शिवरायांचा, सर्वांना पोटभर अन्न मिळाव म्हणून राब राब राबणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याचा, आणि साहित्याला गेली कित्येक वर्ष घुबडासारखे चिटकून बसलेल्यांवर जोरदार आसूड ओढणारा.. असा काहीसा विचार आणि नेमके इथेच ह्यांचा पोटशूळ !

शिवजयंतीच्या लेखात शिवरायांची थोरवी सांगण्याला आमचा मोह ठरवून सबंध लेखाला एका क्षणात निष्प्रभ ठरवेले !
महाशय, मुख्यमंत्री ब्लॉग च्या दर्शनी भागावरच अगदी ठळक अक्षरात लिहिले आहे, "आमचे श्रद्धास्थान" डोळे फाडून बघा नीट ! होय सबंध लेखच काय अख्खा ब्लॉग जरी महाराजांची थोरवी गाण्यासाठी वापरला ना तरी ते थोडेच! पण इथे तुमच्या पोटात का दुखतंय ? शिवजयंती च्या दिनी या महाराष्ट्रातील एक सर्व सामान्य तरुण सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक सोडून आत्ता विचार करायला लागला कि काय, हि भीती तर नाही ना !

दलित - ग्रामीण साहित्याबद्दल प्रस्थापितांची असलेली भूमिका अतिशय हलक्या-फुलक्या स्वरुपात, कुणाचेही मन नं दुखावता इथे मांडली त्याबद्दल हि खालच्या पातळीवर भाष्य ते वाचून तर यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते ! यांचे निदान वाचन कौशल्य कमी कि मुद्दाम ठरवून नेमका उलटा अर्थ काढायचा हे समजायला मार्ग नाही.

एका शेतकऱ्याच्या पोराने, शेतकर्यांबद्दल एखादा प्रखर विचार मांडला तर ह्यांना तिथे फ़क़्त शैली दिसते ! विचारांना झाकण्याचा कित्ती हा केविलवाणा प्रयत्न !

'शिवराय','दलित-ग्रामीण','शेतकरी' या शब्दांचीच ज्यांना मुळात एलर्जी आहे त्यांच्या कडून निराळी अपेक्षा हि नाहीये.

एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल एका विचारवंताने एवढ्या पब्लीकली एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिखाण केल्याबद्दल त्यांचे मनापसून आभार !

मला "प्रसिद्धीचा छुपा उमेदवार" म्हणून ज्या अनेक शंका ह्यांनी उपस्थित केल्या त्याबद्दल थोडक्यात ;

'नेटके" ला पाठवलेला मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे म्हणजे मी स्वतः च म्हणूनच थेट पाठवलाय, तो मेल हि इथे वाचकांसाठी प्रसिद्ध करतो.. तुम्हीच बघा काही चुकल असेल तर !

amol suroshe Mon, Feb 27, 2012 at 3:53 PM
To: wachawe.netake@expressindia.com
मागील पिढी हि वर्तमान पत्र वाचून घडली, इंग्रजी सत्तेविरुद्धाचा असंतोष लेखणी द्वारे उभा राहायचा आता काळ बदललाय ! सध्याची आणि येणारी युवा पिढी त्यांचा जास्त काळ हा या इंटरनेट वर घालवते, विविध विषयांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते.
हीच काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्रातील प्रत्येक जिवंत कार्यकर्त्याची सामाजिक आणि राजकीय जडण घडण व्हावी, त्याच्या विचारांवर आपल्या सोनेरी इतिहासातील संस्कार व्हावेत या उद्देशाने "मुख्यमंत्री " या ब्लॉग ची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या तरुण मनातील राजकीय / सामाजिक / ऐतिहासिक प्रश्नांवर अगदी रोख ठोक पाने लिखाण करण्याचा इथे प्रयत्न केला जातो.

थोड्याच कालावधीत मुख्यमंत्री हा ब्लॉग सर्वदूर पसरला याचीच पोच पावती म्हणून स्टार माझा आयोजित "ब्लॉग माझा" या स्पर्धे मध्ये "मुख्यमंत्री" ने सन्मानाचे स्थान मिळवले.

लहानपणी वाटायचा, राज्याचा मुख्यमंत्री सगळेच प्रश्न चुटकी सरशी सोडवत असेल, मुख्यमंत्र्याची खुर्ची नाही मिळाली पण मुख्यमंत्री या ब्लॉग द्वारे या राज्याचे / देशाचे प्रश्न इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

आपण नक्की बघा www.mukhyamantri.com


अतिशय प्रांजळपणे ब्लॉग बघण्याची केलेली निव्वळ विनंती ह्या मेल मध्ये होती, ब्लॉग वर अगदी ठळक अक्षरात माझे आणि माझ्या सहकाऱ्याचे नाव हि आहे, प्रत्येक लेखाखाली लिहिणाऱ्याचे नाव दिसते असे असतांना मी स्वतःचा उल्लेख करणे टाळतोय असे म्हणून माझ्या साध्या शिफारशी बद्दल एवढ्या शंका उपस्थित करून ह्यांचा नेमका उद्देश्य काय आहे? स्वतःचा मोठे पण सिद्ध करायचा आहे का आम्हाला लहान दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न.

ब्लॉग उभारतांना उद्देश खूप मोठा होता , आहे आणि तो राहणार हे फ़क़्त इथे नमूद केले ! पण भाषा नम्रतेचीच !

कुठे हि आमच्या ब्लॉग बद्दल छापा ! आमच्या बद्दल लिहाच .. असे नसतांना देखील हि नसती उठाठेव कशासाठी केली हेच नेमके उमगले नव्हते म्हणून एवढा लिहाव लागतंय.

आणि हे इथे मुद्दाम नमूद करतोय कि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही, ना हि ह्यांच्यासारखे लिखाणावर आमचे पोट भरते.
खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. मनाला पडणारे प्रश्न मग ते सामाजिक असो व राजकीय ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आपले विचार कुठेतरी व्यक्त करावेत या साठी हा ब्लॉग .. प्रसिद्धी ,पैसा ह्याची भूक भागवण्यासाठी एवढी निच पातळी आम्ही गाठणार नाहीत.

याच लेखातून आमच्या वयक्तिक प्रोफेशन बद्दल हि बोलण्याचे धाडस या महाशयांनी केलेले आहे त्यांना एवढेच सांगतो ती तुमची पायरी हि नाहीये म्हणून त्या बद्दल बोलण्याची तसदी घेऊ नका!

मान्य आहे आमचे लेख अतिशय साधारण भाषे मध्ये असतात, त्यात व्याकरणाच्या अनेक चुका असतील पण तो तसाच राहणार कारण तोच तर त्याचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा 'शहाणपणा' किंवा 'खोडसाळपणा' तुमच्या पाशी जपून ठेवा, पुढे नक्की चार पैसे कमावण्यासाठी कामी येईल.

अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे यांच्या आडून या ब्लॉग मधल्या विचारांवर काही बोलायचे असेल ना ते समोर समोर थेट बोलले असते तर जास्त आनंद झाला असता !
काही शहाणी लोक लोकसत्ता वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग तुमच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री.कॉम कधीच समर्थन करत नाही आणि किंमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे आणि तुमचाच खरा चेहरा समोर आला आहे.

शेवटी गांधीजींच्या काही ओळी आठवतात

"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्यावर टीका करतात,तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता... विजयी होता ".

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता