Wednesday, August 21, 2013

न संपणारा लढा ........

ज्या ऐतिहासिक महापुरुषांच्या केवळ नावामुळे या भौगोलिक महाराष्ट्राला एक इतिहास प्राप्त झाला आणि देशाच्या किंबहुना जगाच्या पाठीवर आपले कायम वेगळे पण ज्याने सिद्ध केले याच महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागणारी गोष्ट इथे घडली, सबंध आयुष्य अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी , परंपरा यांच्या विरोधात अतिशय सय्यमाने  आणि अहिंसक मार्गाने विधायक विरोध ज्यांनी केला त्या डॉ . नरेंद्र दाभोलकारांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत  म्हणजे पुण्यात भरदिवसा खून करण्यात आला.


खर तर ज्यांच्या नावांची रीघ लावून आपण या महाराष्ट्राला पुरोगामित्वाचे विशेषण लावतो त्यातील कुठल्या व्यक्तीला या खुनी प्रवृत्तींनी सोडलं ? कोवळ्या ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांना याच प्रवृत्तींनी लाथाळ्या घालून वाळीत  टाकलं, संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा असो व  जगत गुरु  संत तुकाराम  यांच्यावर याच धर्म आणि संस्कृती मार्तंड नि अनेक घाव केले.

सामान्य कष्टकर्यांचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय, लोकाराजे राजश्री शाहू महाराज यांना शुद्र म्हणून हिणवले, हजारो वर्षे गुलामगिरीच्या, अपमानाच्या कोंडवाड्यात अडकलेली स्त्री ज्यांनी मुक्त केली त्या महात्मा ज्योती फुल्यांना आणि सावित्री बाईंच्या विरोधात  "फुले नावाची दुर्गंधी" म्हणून अगदी कालपरवा पर्यंत गरळ ओकली जाते.  विशिष्ट जातींवरची धार्मिक गुलामगिरी  मोडून त्यांना नवा श्वास देणाऱ्या बाबासाहेबांना तरी यांनी कुठे सोडले, म्हणजेच ज्यांच्या नावांचा रोज या राज्यात जप केला जातो किंवा फ़क़्त यांच्यामुळेच या महाराष्ट्राचे महानपण वारंवार सिद्ध झाले त्यांच्या बाबतीत याच राज्यात त्यांच्या विरोधात विष पेरणारी विकृती सुद्धा  इथेच पोसली गेलि.

जग एकविसाव्या शतकाकडे वेगाने धावतेय परंतु आम्ही मात्र अजूनही अनेक शतकांचा लढा लढतच आहोत. रोज दाभोलकर सरांसारखे मुडदे पडताच आहेत. याला कारण म्हणजे आमची निष्क्रिय सज्जन शक्ती !

शेळ्या - मेंढरांसारखे जीवन जगणारे लोक पाहिलं कि अस वाटत दाभोलकर सारख्यांचा अजून दुसरा काय अंत होणार होता. कुणीतरी धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली आम्हाला हाकलायचं  आणि आम्ही सर्वांनी माना डूलवत आणि ढुंगण हलवत यांच्या मागे - मागे चालायच ! एवढे का बधिर आणि मतीमंद झालो आहोत आपण?

प्रत्येक वेळी आपला धर्म , आपली जात धोक्यात आहे हे सांगून आम्हाला इतर लोकांविरुद्ध पेटवायचे आणि यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या, यांची दुकानदारी चालू द्यायची कित्ती दिवस आणि कुठपर्यंत ?

नवीन पिढी सजग आहे, प्रत्येक गोष्टीला तपासून बघणारी आहे, त्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत आज प्रत्येकामध्ये एक नरेंद्र दाभोलकर आहे जो प्रत्येक गोष्टीला आपल्या सद - सद  विवेकबुद्धीला अगदी निरखून बघतो मग अशा लोकांच्या प्रश्नांना तुम्ही त्यांच्या मनातच मारणार का? धर्म - जात - संस्कृती या बद्दल बोलण्या आधीच त्या विचारांचा दररोज खून करायचा का ?

सहजच आठवले म्हणून इथे नमूद करतो, बाबरी मस्जिद पडली तेव्हा पण असेच वातावरण खूप गढूळ झाले होते, प्रत्येक हिंदूला वाटायचे कि जणू बाबर ने त्याच्या घरावर आक्रमण केले आहे, आमच्या पोरी बाळी  बाटवल्या  जात आहेत  थोडक्यात काय तर जसं "इस्लाम खतरेमे" तसं  तेव्हा हि "हिंदू खतेरेमे"  सारखे वातावरण निर्माण झाले, आणि त्याची परिणीती कशात झाली,  राम मंदिर झाले? रामराज्य आले ? उलट या नावावर कित्येक लोकांची दुकानदारी मात्र फोफावली. अनेक वर्षे लढून समाज सुधारकांनी सुधारलेला समाज पुन्हा भरकटला. 

कधीतरी स्वतःला प्रामाणिक पने हे प्रश्न विचारून बघा ? खरच आपणही कधी काळी या  शेळ्या मेढरांच्या कळपात सामील होतो का ? आपणही हि वैचारिक गुलामगिरी स्वीकारतो का ?  कुणी म्हणतय म्हणून माझ्यावर , माझ्या समाजावर धोका आहे कि दिनंदिन जीवनात खरच हा प्रश्न तितकासा  महत्वाचा आहे ?

आज हि कधी कधी फेसबुक , ट्विटर किंवा व्हाट एअप्स वरचे काही संदेश वाचले  कि असे वाटते पुन्हा तीच परिस्थती आणण्यासाठी  हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात आहेत.  लक्षात ठेवा तेव्हा "राम" होता,  कधी  काळी कुणी ज्ञानेश्वर - तुकाराम होता, कधी कोणी शिवाजी - संभाजी किंवा शाहू होता  तर कधी ज्योतिबा आणि बाबासाहेब होते…. दुर्दैवाने काल डॉ नरेंद्र दाभोलकर हे होते. त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा खून करण्याचा प्रयत्न गेली अनेक शतके अविरतपणे चालूच आहे आणि आपण समाज याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. 

परत - परत या शक्ती आपले डोकं वर काढतच असतात त्यांना तिथेच गाडून टाकण्याची खरी जबाबदारी स्वतःशी थोडे तरी प्रामाणिक असणार्या प्रत्येक नागरिकाची आहे.

जय महाराष्ट्र

- अमोल

Monday, August 19, 2013

वारकरी पुन्हा त्यांच्याच दावणीला

ज्यांच्या दावनीतून ज्ञानेश्वर-तुकारामांनी माणूस सोडून आणला त्यांच्याच दावणीला पुन्हा वारकरी आमच्या ढोंगी आणि स्वार्थी कीर्तनकारांनी आणि महाराजांनी नेउन बांधला आहे.
निन्दानिय.

एका पुरोगामी वादळ शांत : नरेंद्र दाभोलकर यांची हत्या

ही अतिशय निन्दनिय घटना आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक खूप मोठे प्रस्था म्हणजे दाभोलकर. अंधश्रध निर्मुलांच्या शेवटच्या टप्प्यावर असतानाच ही घटना म्हणजे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान.



त्यांचे कार्य त्यांच्या विचारांनी प्रेरित पुढे चालू ठेवतील ही आशा. 

Wednesday, August 14, 2013

भविष्यातील भारत भेदभाव आणि गरिबी मुक्त होईल या साठी नव्याने प्रयत्नाला लागण्याचा संकल्प करूयात

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 



या आनंदाच्या क्षणी भविष्यातील भारत भेदभाव आणि गरिबी मुक्त होईल या साठी नव्याने प्रयत्नाला लागण्याचा संकल्प करूयात. 

जय हिंद!