Sunday, January 22, 2012

आया मौसम निवडणुकीचा ..... .

निवडणुकांचे ढग दाटू लागलेत, आता पैश्यांचा पाऊस पडणार. गावोगावी दारूचा महापूर येणार.. सर्वत्र नोटांची हिरवळ असेल आणि परत एकदा मौसमी बेडक डराव - डराव करीत आप आपल्या बिळातून बाहेर पडतील.
आपल्या कडे कोणाला जर विचारले ' तुझा आवडता ऋतू कुठला रे' ? तर १० पैकी ९ जन सांगतील पावसाळा त्याच प्रमाणे आपल्या भारतीयांचा अजून एक आवडता ऋतू म्हणजे निवडणुकांचा काळ. रोज रोज त्या डेली सोप मालिका बघून कंटाळा येतो, अंतर राष्ट्रीय क्रिकेट एखाद्या गल्ली क्रिकेट सारखा रोजच खेळला जातंय, २४ तास न्यूज चैनल वाल्यांच्या अतिरेकी ब्रेकिंग न्यूज मुळेही डोक गरगरून जांत. अशावेळी या सर्वातून घात्काभाराची करमणूक म्हणजे निवडणुकांचा काळ.

तुम्ही म्हणाल लोकशाहीतील सर्वात कसोटीचा प्रसंग म्हणजे निवडणुका आणि मी त्याला करमणूक म्हणतोय, ज्या उदात्त हेतूने लोकशाहीची स्थापना आपल्या थोर नेत्यांनी करून ठेवली ती अभिप्रेत लोकशाही खरच आपण रोज अनुभवतो का? कधी कधी हा सगळाच प्रकार करमणुकीचा वाटायला लागतो आणि आपण त्याचे प्रेक्षक. लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे "आपण लोकच" जर प्रेक्षक म्हणून बसलो तर मग इतरांना आपली करमणूक केल्याखेरीज पर्याय तरी काय उरतो.

सध्या झेड पी आणि महापालिकांच्या निवडणुका आल्या आहेत. साठ वर्षांची गोळा बेरीज केली तर एकीकडे स्वतःला भविष्यातली जागतिक महासत्ता वैगेरे म्हणवून घ्यायचा आणि दुसरीकडे दिवसोंदिवस गावं भकास आणि शहरे बकाल होत असतांना उघड्या डोळ्यांनी बघायचे. लोक म्हणतात आमच्या अपेक्षा खूपच साध्या आहेत हो, अगदी रोजच्या जगण्याच्या काही अडचणी आहेत. तुमच्या आमच्या रोजच्या प्रश्नांवर समाधान देणारी यंत्रणा म्हणजेच झेड पी आणि महानगर पालिका. खर तर इथे फ़क़्त विकासाची गोष्ट व्हायला हवी, तुमच्या प्रश्नांवर राजकीय पक्षांच्या भूमिका समोर याव्यात, रोजच्या प्रश्नाचे उत्तर कोण देतो हे आपण पहिले पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होतांना दिसत आहे, गावं असो वा शहर नेत्यांनी दाखवलेल्या दीड पैश्याच्या अमिषाला, त्यांच्या लोकल गुंडा गर्दीला आपण बळी पडतो. एरवी देश सुधारण्याच्या गप्पा (फेसबुक वर) करणार्यांसाठी हि तर एक चिल्लर निवडणूक म्हणून त्यासाठी त्यांना वेळच नसतो आणि फारसे स्वारस्य हि नसते आणि ज्यांना वेळ असतो ते मागचे सर्व काही विसरून आपला काही स्वार्थ साध्य करण्यासाठी यात सहभाग नोंदवितो.

अगोदर म्हणायचे गावाकडे - झोपड पट्टी मध्ये खूप पैसा वाटला जातो, दारू वाटली जाते पण आता तर चांगल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील वेगळ्या प्रकारे अनैतिक मार्गांचा वापर केला जातोय. केबल चे पैसे भरणे, सोसायटीमध्ये बोअर पाडून घेणे, महिलांसाठी छान अशी फाईव स्टार पिकनिक काढणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ स्थळांच्या वाऱ्या घडवून आणणे, मंदिर बांधून घेणे हे सर्व अगदी उघड पणे सुरु असते आणि आपण त्याचे मूक साक्षीदार देखील असतो.

या सर्वांचा कळस या धुमधामी म्हणजे साड्या बदलाव्या तस लोक पक्ष बदलत असतात, निवडणुकीचे तिकीट नाकारल्या नंतरच या सर्वांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाण होते, कधी हि न आठवलेले विकासाचे प्रश्न आठवतात, विठ्ठल आठवतो, जनता आठवते.. पण हे सर्व होतांना आपण मात्र सर्व काही विसरतो. पक्ष बदलला म्हणून त्याला मतदान करू नये अस मी म्हणत नाहीये पण तो माणूस किती बदलला हे आपण तपासणार आहोत कि नाही? त्याची इतिहास - भूगोल कसा बदलला ? रस्त्यांवर रोज दिसणारा नेता कधी काळ्या काचांच्या अलिशान गाड्यांमध्ये गायब झाला ? दिवसभर कट्ट्यावर बोलणार्यांना आज त्यांच्या बंगल्यात सुद्धा भेटायला वेळ नसतो, चार आठ तरुण पोर जवळ करायची आणि स्वतः किती कार्य सम्राट असल्याचा आंव आणायचा. आपल्या भागाच्या विकासापेक्षा यांचे झालेले विकास आपल्याला का दिसत नाहीत?

दोस्त हो, निवडणुकांचा हा खेळ वर्षानुवर्षे असाच चालत आलाय याला कारण म्हणजे त्याला लाभलेला प्रेक्षक वर्ग. तो कधीच बदलला नाही त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोन्ही हि कायम तसाच राहून चाललंय. गेलेले वर्ष बऱ्याच क्रांत्यांनी गाजलेले, लोक थोड्या काळासाठी का होईना जागे झालेले आम्ही पहिले. प्रामाणिक इच्छा ठेवून, आपले दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी आपला दृष्टीकोन बदला नक्कीच येणारा काळ बदलाकडे पहिले पाउल घेऊन जाणारच असेल याची मला खात्री आहे.

लोकशाहीच्या या निवडणुकी सणामध्ये तुम्ही सर्वांनी हिरारीने सहभाग घ्यावा, स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच शोधा. केवळ बघ्याची भूमिका घेऊन प्रश्न सुटणार नाहीत.

संधी चालून आलेली आहे, आपली गल्ली सुधारा.. दिल्ली सुधारायला वेळ लागणार नाही.

जय महाराष्ट्र.

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

मनातली शाळा पुन्हा एकदा लावा, शिरोडकर सहित :)

प्रत्येकाच्या मनात खरच एक गोड शाळा लागलेली असते. फक्त इमारतच नव्हे तर तिथली मित्र, मनातल्या मनात मानलेल्या 'मैत्रिणी', आवडते शिक्षक, शिक्षिका वगैरे वगैरे ने आपली ही मनातली शाळा गच्च भरलेली असते. हाच संदेश शाळा हा चित्रपट देऊन जातो. अगदी प्रत्येक आठवण जागी करतो. चित्रपटाने सगळे बारकावे पकडले आहेत. त्यातली त्यात चिमुकल्यांची प्रेम कहाणी जिचा खरच खऱ्या आयुष्यात (म्हणजे वयाने मोठ्या झालेल्यांच्या भाषेत) फार काही सिग्नीफिकंस नसतो, ती तर इतकी छान चीत्रतीत केलेली आहेत की ज्यांना कधी शाळेतल्या चिमुकल्या प्रेमाची जाणीव झालेली नसेल त्यांना ही जाणवेल की अरे आपण तर त्या मनातल्या 'शिरोडकर' च्या प्रेमात होतो. मनातली शिरोडकर. व्वा. तुम्हाला त्या सगळ्या आठवणी जाग्या करायच्या असतील तर नक्की पहा आणि मनातली शाळा पुन्हा एकदा लावा.
http://www.shalacinema.com/

Thursday, January 19, 2012

पाटलांचा केवढा रुबाबा होता नाही पंचक्रोशीत

सुंबरान या चीत्रापातील शेवटचा हा प्रसंग आणि त्यातली पहिली काही वाक्य राष्ट्रा बद्दल आणि येथील शिक्षणाने केलेल्या क्रांती बद्दल खूप काही सांगून जातात. ज्यांनी चित्रपट पहिला नसेल त्यांच्या साठी - आधी तर त्यांनी तो नक्की पहावा; तूर्तास थोडा संदर्भ देतो - मुक्त बर्वे म्हणजे कल्याणी (कल्ली) ही एक मेंढपाळाची मुलगी असते. तिच्या मोठ्या बहिणीच आणि पाटलाच्या मोठ्या मुलाच म्हणजे वसंतच एक मेकांवर खूप प्रेम. पण जात आणि पत अडवी येते. लग्न होत नाही दोन आयुष्य जवळ पास उध्वस्त होतात. पण तिथेच या दोघांच म्हणजे पाटलाच्या लहान्या मुलाच आणि मुक्त बर्वे (कल्ली) जी नंतर शिकून कलेक्टर होते तिचा सहज जमत. पूर्ण चित्रपट भर एकांगी सत्ता शेवटी अशी बदलते आणि त्या बदलाच वर्णन मला तरी वाटते या काहीच वाक्यात खूप समर्पकपणे होते.
‎   
"पाटलांचा केवढा रुबाबा होता नाही पंचक्रोशीत. माझे आजोबा पणजोबा आणि तोच रुबाब तुझ्याकडे किती सहजपणे आला ..... शिक्षण दुसरं काही ही नाही.... हं शिक्षण!"       


Monday, January 16, 2012

शरद पवार - न पाहिलेले, न ऐकेलेले

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील केंद्रबिंदू म्हणून परिचित असलेले नेते शरद पवार यांची एक दुर्मिळ आणि अनोखी मुलाखात.
सौजन्य - स्टार माझाThursday, January 12, 2012

इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरू नका..


आज घरी राजमाता जिजाऊ जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.
या घरगुती कार्यक्रमा मध्ये सोसायटी मधील ३-४ लहान मुला - मुलींनी मला एक प्रश्न विचारला.. दादा हा फोटो कुणाचा ????
या प्रश्नाने मी दोन क्षण स्तब्ध झालो, खर तर हा प्रश्न येणाऱ्या पिढीने आपल्या वर्तमान पिढीला विचारलेला होता.
आपल्याला वाटते आपल्या मुला - मुलींवर शिवाजी - संभाजी किंवा जिजाऊ - झाशी च्या राणी सारखे संस्कार घडायला हवेत, पण जर त्यांना हे व्यक्तिमत्वच माहित नसतील तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये गैर ते काय, कोण आहे गुन्हेगार या परिस्थितीला ? आपल्या राष्ट्रीय प्रेरणा स्तंभांची आपणच केलेली उपेक्षा याला कारणीभूत आहे.
ज्यांच्यामुळे अस्तित्वामुळेच आपण आपली मान ताठ करून घराबाहेर पडतो आज त्यांनाच आपण विसरायला लागलो आणि जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य काय असते हे वेगळ सांगायची गरज नाहीये.
जिजाऊ सारख्या विरमातेचे, युगपुरुष छत्रपती शिवाजी राजांचे आणि संभाजी राजांचे संस्कार घरा घरा मध्ये रुजल्याशिवाय नवीन पिढी घडणार नाही.
पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ जयंती दिन निमित्य आवाहन करतो .. इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरू नका.. आटोकाट प्रयत्नाने पेटवलेली स्वाभिमानाची ती मशाल आपल्या हाताने विझवू नका... अन्यथा येणारी पिढी आम्ही आमच्या हाताने एका अंधाकारामध्ये ढकलून देऊ.
जय जिजाऊ.

Wednesday, January 11, 2012

राजमाता जिजाऊ जयंती २०१२


                                                                   जयंती निमित्त विशेष येथे डावून्लोड करा
साडे-तीनशे वर्षे यवनांच्या आणि विविध परकियांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही मायभुमी, हीन आणि पशू यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख, स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखात बुडालेली आमची जनता आणि आपली निष्ठा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आमची वतनदार आणि जहागीरदार यांची जमात असा अंधकार सगळीकडे असतांना त्या काळात जिने एक स्त्री असूनही शतकानू शतके चालणाऱ्या सुलतानी सत्तेवर घाव घातला; दबलेल्या-पिचलेल्या रयतेला भरवसा दिला; ओळख दिली. जिने पार विझलेल्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवली, जिने सामान्य कष्टकऱ्यांच्या-शेतकऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याच निशाण सोपवल, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं कुंकू, मुलगा आणि नातू अगदी आनंदाने या मातीच्या ओंजळीत टाकले, वेळ प्रसंगी चौकट ओलांडून आलेल्या संकटाचा धैर्याने मुकाबलाही केला, एका स्वभामिनाच्या ठिणगीचा वणवा करून जिने गुलामगिरी आणि संकुचित विचारांच्या जंगलाची राख केली आणि तिथेच स्वराज्याची आणि मराठी मुलुखाची फुलबाग उभी केली आणि फुलवली. अशा वीर कन्येचा, जिजाऊचा, राजमातेचा, आऊ साहेबांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे १२ जानेवारी (वर्ष १५९८) ला आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या घरी झाला. याच शुभ दिनी या मातीत स्वाभिमानाचे पहिले बीज पेरले गेले, स्वातंत्र्याचा पहिला अंकुर फुटला, या मातीच्या प्रत्येक लेकराला अभिमान वाटावा अशा या दिनाच्या म्हणजेच राजमाता जिजाऊ जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
स्वाभिमान या राष्ट्रात आधी ही होताच, पण मरगळलेला. परकीय आक्रमणे, धार्मिक दांभिकता, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर लादलेली वैचारिक गुलामगिरी यामुळे तो स्वाभिमान एका कोपऱ्यात विझलेल्या अवस्थेत होता. सामान्य रयत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्याच अंधकारांनी भयभीत होती. अशा वेळी त्या सर्वसामान्य माणसांवर जिजाऊ साहेबांसारखी ठिणगी पडली आणि हाच स्वाभिमानाचा अंकुर पुन्हा याच मातीमध्ये नव चैतन्य निर्माण करून गेला. सबंध समाज एका दिलाने सर्व सामन्यांच राज्य प्रस्थापित करण्यासाठी शिवबा समवेत कामाला लागला.
खर तर हा दिवस आमच्या प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला गेला पाहिजे. याच दिवसाला आपण सगळ्यांनीच "स्वाभिमान बीज" दिन म्हणूनही इथून पुढे साजरा करायला हव. पुरोगामी महराष्ट्राच्या वाटचालीत हे फार मोठ आणि म्हत्वाच पाऊल असेल. आजच्या दिवशी शाळे-शाळेत आपल्या नव्या पिढीला गुलामगिरी विरहित आणि स्वाभिमानी समाज निर्मितीच शिक्षण द्याला हवं. आज आपण कितीही धर्मनिरपेक्ष आणि जाती विरहित समाजाच चित्र रंगवत असलो, तरी सत्य मात्र विपरीत आणि वेगळं आहे. आजही आपण धर्म, जाती आणि लिंग या आणि अशा अनेक बाबींनी माणसाला कमी किंवा जास्त लेखतो. कुणी कितीही विरोध करो पण हे मात्र खर आहे की अजूनही आमची शिक्षण पद्धत्ती कुण्या न कुण्या प्रकारचे गुलामच बनवत आहे. सत्याचा विचार देणार शिक्षण आणि फक्त माणुसकी शिकवणार शिक्षण अजून ही आपण स्वीकारलेला नाही.
आधुनिकी करणाच्या लाटेत जेंव्हा सगळं जग एक दुसऱ्याकडे अशेने बघत आहे. तेंव्हा आमच्या या संतांच्या भूमीत या जगाला नवा प्रकाश मिळावा अशी आपली इच्छा असेल तर महाराष्ट्राला ही सुरुवात आज करायलाच हवी. कारण याच मातीत ज्ञानेश्वर माउली झाले ज्यांनी जगत कल्याणासाठी पसायदान मागितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे जगतगुरू तुकाराम महाराज झाले आणि गुलामगिरी पेक्षा कोणतही ओझं मोठ नसत अशी शिकवण आपल्याला मुलाला आणि रयतेला देणाऱ्या जिजाऊ झाल्या. मानवजातीचा आणि मानवीय मुल्यांचा आदर हा इथच्या मातीत खूप आधी पासूनच आहे आणि जिजाऊ सारख्या माउली मुळे तो या मातीत अगदी रुजला आणि बहरला. विचार केला तर लक्षात येईल जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले नसते, शिवबा नसते तर पुढे त्याच विचारांचे शाहू, फुले आणि आंबेडकर ही कदाचित घडले नसते आणि आज ज्याला आपण आधुनिक भारत म्हणतो तो ही कदाचित काही तरी वेगळाच असता. म्हणून जिजाऊ हे पात्र भारताच्या इतिहासातील त्याच्या वर्तमानासाठी खूप म्हत्वाच अस आहे. आपण सर्वांनी ठरवलच तर याच पात्राला समोर ठेवून, तिच्या विचारांचे पाईक होऊन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांच्या तळपत्या तलवारी हातात घेवून, या राष्ट्राच भवितव्य खूप उज्ज्वल करू शकू. आणि तेच ध्येय आम्हा सर्व तरुणांच्या अंगात रक्ता सारखे वाहतेय. म्हणूनच प्रत्येक तरुण आज हे नक्कीच गातोय
||शंभू अन् शिवबाचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा त्या जिजाऊचा अंश आहे||


आजच्या या दिवशी आपण सगळेच पुन्हा एकदा जाती-विरहित, द्वेष-विरहित आणि गुलामगिरी-विरहित समाज निर्मितीची शपथ घेऊ.
आपण सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ!
आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम


शाळेला संगणक/पुस्तके द्या. गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडा आणि सोडवा - जिजाऊ.कॉम

Monday, January 9, 2012

जीवनसार...

विरार येथील साहित्य संमेलनाच्या प्रवेश द्वारावर असलेली या ओळी, काहीच शब्दात खूप काही सांगून जातात. 

Friday, January 6, 2012

एक लेख ज्याने खूप विचार करायाल लावले


Monday, January 2, 2012

आधुनिक युगाची सरस्वती सावित्रीबाई फुले

                                          जानेवारी ३, १८३१ – मार्च १०,१८९७


स्त्री शिक्षणाची  एक मूळ धुरा आणि आधुनिक युगाची  सरस्वती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिवसाच्या शुभेच्छा. आई तुझ्या लेकी विश्व पादाक्रांत करत आहेत, तुला आणि त्यांना या सगळ्या बद्दल खूप खूप शुभेच्छा. पण अजून खूप लांबचा प्रवास आणि संघर्ष आहे त्यांना आणि त्यांच्या साठी लढणारांना आशीर्वाद दे.
सर्वांना सावित्रीबाई  फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!