Friday, April 30, 2010

महाराष्ट्रदिन: वाटचाल आणि अवकळा




महाराष्ट्रदिन

[१ मे २०१०]


जय जिजाऊ ,

महाराष्ट्राच्या सुवर्णमोहत्सवी वाटचालीनिमित्या सर्व महाराष्ट्रीय बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे (मराठी मुलखाचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना ह्या कार्यात यश यावे म्हणून जीवाच रान करून लढलेले मावळे, त्यांची वाटचाल पुढे तशीच यशस्वी ठेवणारे शंभूराजे आणि या दोघांना ही आपल्या मायेच्या छायेत आणि संस्कारांच्या कुशीत वाढवणारी आऊ -राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या सगळ्यांना आधी प्रणाम. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व मराठी-अमराठी नेते, महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारक आणि हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून बलिदान देणारे सगळे हुतात्मे, या सर्वांना नमन. आज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणारा कार्यकर्ता, तुम्हा आम्हाला अन्न मिळावे म्हणून राबराब राबणारा अन्नदाता शेतकरी आणि सीमेवर, इथे तुम्ही आम्ही सुरक्षित असावे म्हणून लढणारा प्रत्येक सैनिक आणि अंतर्गत शांतता राखली जावी म्हणून डोळ्यात तेल घालून जागणारे सगळे 'प्रामाणिक' पोलीस, महाराष्ट्राच भविष्य निर्माण करण्यासाठी गावोगावच्या शाळेवर प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारे शिक्षक, महराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी झटणारे सगळे उद्योजक, सांस्कृतिक ठेवा जपणारे सगळे कलावंत, राब राब राबणारा मजूर, नव तंत्रज्ञान निर्माण करण्यसाठी दिन रात मेहनत करणरे तंत्रज्ञ-अभियंते, महाराष्ट्राच्या प्रकृतीची काळजी घेणारे डॉक्टर्स आणि महराष्ट्राच्या अस्तित्वाचा घटक असणारा आणि लोकशाहीचा मुलभूत घटक प्रत्येक नागरिक यांना जिजाऊ.कॉम चा सलाम!संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वाला ५० वर्षे झाली आणि ही सगळी वर्षे हा सिंहासारखा महाराष्ट्र गर्जून काढत आहे, याचा आपणा सर्वांना अभिमान आहेच. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुरोगामी असणारा हा महाराष्ट्र सगळ्या देशाचा मुकुटमनीच आहे; आणि त्यात कोणत्या ही प्रकारची शंका नाही. जिजाऊ साहेबांनी रोवलेले स्वाभिमानाचे बीज अजून ही ह्या महाराष्ट्रात 'बऱ्याच' जागेवर सशक्त झाड म्हणून उभे आहे. इंग्रजांच्या मुखातून देश निघाला आणि मग राष्ट्राच्या अंतर्गत प्रगतीकडे, प्रत्येक राज्याच्या प्रगतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले; जे अगदी स्वाभाविक आणि योग्य होते. त्यातून विविध नवीन राज्याची निर्मिती झाली, ती करत असतांना राजकीय डावपेच ही झाले, पुढे संघर्ष उद्भवला आणि काही राज्यांच्या निर्मितीला 'पुन्हा-एक-छोटा स्वातंत्र्य प्रपातीसाठीचा लढा' असे स्वरूप आले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महराष्ट्र वगैरे मराठी भाषिक प्रदेश मिळून १ मे १९६० रोजी सयुंक्त महाराष्ट्र एका संघर्षातून उभा राहिला! एक पुरोगामी राज्य, छत्रपती शिवाजी महराजांचा वसा जपणारे, संतांची भूमी असणारे, टिळक-गोखलें सारख्या स्वातंत्र्य सैनिकांचे संस्कार असणारे, सावित्रीबाई फुले-महात्माफुले सारख्या कर्मयोग्यांचे विचार जोपासणारे, बाबासाहेबांचा समानतेचा वारसा सांगणारे आणि बाबा आमटे सारख्या कर्मयोग्याचे राज्य अशी आपली ओळख. पुढे आपण सहकारात ठसा उमटवला, शिक्षणात क्रांती केली; मुंबईच्या बरोबरीचे औद्योगिक पुणे उभे केले आणि त्याच पुण्याच्या बरोबरीचे औरंगाबाद-नागपूर उभे केले. आपण स्वतः साठीच आव्हाने निर्माण केली आणि त्यांना पुन्हा पुन्हा यशस्वी मत दिली. अगदी पूर्णतः नाही म्हणता आल तरी बरीच प्रगती आपण 'काही क्षेत्रात' केली. आजचा (१ मे ) दिवस तसा सण आणि आनंदाचा; पण या ५० वर्षात काय चुकले आणि पुढे काय करायचे याचा लेखाजोखा आणि मांडणी करणे म्हत्वाचे; आणि उद्या तुमच्या माझ्या माझ्या पोरांनी 'संयुक्त महाराष्ट्रदिन' साजरा करावा म्हणून आवश्यक!तर मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून खूप लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईची आर्थिक स्थिती तशी चांगली आणि हा भाग बर्यापैकी प्रगत. तीच प्रगती मराठवाडा-विदर्भ आणि महराष्ट्राच्या इतर भागात यावी म्हणून वैधानिक विकास महामंडळे सुरु झाली, आता ही महामंडळे 'ऐतिहासिक-वर्तमान काळात' अस्तित्वात आहेत. ते असो. मराठवाडा आणि विदर्भ हे महाराष्ट्राचे दोन अविकसित भाग, मुख्य व्यवसाय शेती, त्याच्याशी निगडीत जोड धंदे तसे कमीच. पश्चिम महाराष्ट्रात शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय छान होतात आणि बाजारपेठेची जवळच असलेली उपलब्धता हा ही एक मुख्य मुद्दा. त्या गोष्टी मराठवाडा-विदर्भात नाहीत. कोकण आणि खांदेशाचे ठीक चालले आहे असे 'दिसते'. तिकडे  बेळगावचा प्रश्न भिजत पडला आहे आणि मुंबई-पुण्यात जागेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीकडे काही शास्त्रीय आकडेवारीच्या आधारे पहिले तर असे दिसते की उद्या आपली सध्याची छोटी शहरे रोजगाराचा प्रश्न सोडणार आहेत, कारण ते आजच्या मुंबई आणि पुणे यांच्या सारखे होणार आहेत; म्हणजे सरळ सरळ उद्या तेथे ही जागेचा आणि महागाईचा प्रश्न! प्रश्न पाठ सोडणार नाहीये, त्याच स्वरूप बदलणार आहे. म्हणून आपण अवलंबत असलेले प्रगतीचे विविध मार्ग आपल्याला पुन्हा एकदा तपासून पहावे लागणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, मुलभूत गरजांचा प्रश्न, जातीय वादाचा प्रश्न आणि अनेक सामजिक प्रश्न; अशी प्रश्नांची यादीच महाराष्ट्रासमोर उभी आहे. यातील बरेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते थोडे फार सुटत ही आहेत पण बरेच अजूनच बिकट आणि क्रूर होत आहेत. तस पाहता ५० वर्षे गेली असतांना विदर्भाला वेगळे राज्य घोषित करा ही मागणी व्हावी हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, कारण अशा मागणीला 'काही' लोकांना 'काही कारणे' मिळवीत आणि त्यात ही त्यांना ही मागणी करण्याची, इतकी वर्षे तिथेच सत्ता केल्यावर, हिम्मत व्हावी हेच घृणास्पद. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आमची १२ घरे, सगळ्यांची पैशासाठी ओढाताण आणि पैसा कशा साठी तर जनतेच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. सगळेच राजकारणी तसे/भ्रष्ट नसतात; पण बहुतांशांनी हे लेबेल राजकारणी या शब्दाला लावून घेतले. ५० वर्षात अब्जावधी रुपये खर्चून आणि भले मोठे कर्ज घेऊन आम्हाला सर्व समावेशक प्रगती साधता आलेली नाही. ह्याच कारणाने पूर्णतः नव्हे पण बहुतांशी आम्ही 'अपयशी' या प्रकारातच आपण मोडतो!
आम्ही काहीही निगेटिव बोलत नाहीत; फक्त सत्य बोलत आहोत. मागे जिजाऊ.कॉम ने मराठीच्या मुद्द्याबद्दल एक ऑन-लाईन सर्वे घेतला ८०% लोकांना कोणत्याही वादात पडायचे नाही त्यांना हवाय तो फक्त प्रगत महाराष्ट्र, पोटाला भाकर, पोरांना शिक्षण आणि घराला सुरक्षा. या पेक्षा कुणाला जास्त अपेक्षा नाहीत आणि इतक्या असणे ही रास्त. हिंसेने आणि पैशाने गढूळ झालेले राजकारण आम्हाला ५० वर्षात बरेच मागे घेऊन गेले. पक्ष कोणता ही असो सत्तेच्या पलीकडे कुणाला जनहित आणि राष्ट्रहित दिसले नाही. आधी सत्ता आणि ती टिकली तर मगच स्वहित आणि त्यानंतर जनहित हेच आजचे सूत्र. राजकारण आणि राज्य इतकं होरपळलेल नाही असा कुणाचा विश्वास असेल तर कृपया ग्रामीण महाराष्ट्र जाऊन बघावा. चार शहरांमध्ये वीज, पाणी आणि नोकऱ्या आल्या म्हणजे महाराष्ट्र प्रगत झालं, असे नाही! आणि त्या चार शहरांच्या तरी सगळ्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकत आहात का? हा राजकारण्यांना (सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांना) प्रश्न! कर्जाचा डोंगर डोक्याच्या वर गेला, खर्च ही झाला आणि महाराष्ट्र जीथच्या तिथे (उठ-सूट मुंबई-पुण्याच्या प्रगतीचे उदाहरण देऊ नका, आणि द्यायचेच असेल तर झोपड पट्ट्यासहित, ट्राफिक सहित आणि आरोग्याच्या अ-सुविधे सहित द्या). कोणतेही शासकीय पत्रक किंवा अहवाल बघा सगळ काही सुखा-सुखी चालले असेच चित्र! मग ओरडणारे काय .... आहेत? महाराष्ट्राला आम्ही मुकुटमनी म्हटलंय पण कारण आपण पुढे गेले हे नाही, तर देशात सुद्धा 'अजूनतरी' कुणीही पुढे आले नाही हे आहे; वासरात लंगडी गाय शहाणी! अजून ही गाव-गावातील 'गावापासून वेगळ्या' दलित वस्त्या पहिल्या की बाबासाहेबांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांची आणि आमच्या पायतानाची भेट व्हावी असे वाटते. याचा दोष नागरिकांना देवू नका, शासन आज काय करत आहे आणि आजपर्यंत काय करत होते? एका दिवसात क्रांती होत नाही हे ही मान्य पण ५० वर्षे झाली हे ही लक्षात ठेवा! आपण सगळे नागरिक आपापल्या संसारात गुंतलेले मतदान करून ह्यांच्या हातात राज्य दिले, पुढे आपण निश्चिंत आणि हे बेफिकीर.सत्ताधारी ही बेफिकीर आणि विरोधक ही; कारण महाराष्ट्राने सध्या राजकारणात असलेल्या सगळ्यांना सत्ता दिली, काय क्रांती झाली? फार दूरची गोष्ट नाही काही वर्षांपूर्वीच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात दस्तूर खुद्द छत्रपतींच्या राज्यात, बाबासाहेबांच्या राज्यात दलितांचे जातीवादातून बळी जातात. ह्याच राज्यात रामदास वी. तुकाराम उभे केले जातात, शिवाजी वी. बाबासाहेब उभे केले जातात, घराचे कमी पडतात म्हणून मग गांधी वी. गोडसे उभे केले जातात. का? कारण फक्त - राजकारण -> सत्ता आणि मग पैसा! अजून ही जातीची पाळली जाणारी कुंपणे आणि कळपा-कळपाने राहण्याची आमची सवय अजून ही आम्हाला सामाजिक समतेच्या अपयशाची धनीच म्हनावतेय. सामाजिक बदल हवाच आहे!
गावागावात झेडपी च्या शाळा पोहचल्या, शिक्षण ही पोहचले आणि आता शिक्षणाचा प्रश्न सुटला असेच वाटले. मग आम्ही सगळेच नागरीक आणि म्हणून शासन, बिनधास्त. पण वैश्विकरणात फक्त शिक्षित आहे असे म्हणून नाही चालत हे आमच्या 'जवळपास-अशिक्षित' राजकारण्यांना नाही कळाले. मतदान करणाऱ्या जनतेला (ग्रामीण) ते कळायला हवे ही अपेक्षा ठेवणेही मूर्खता ठरेल. शहरात ज्यांना कळाले त्यांच्या येणाऱ्या पिढ्या वैशिविकीकरणासाठी तयार झाल्या. उर्वरित महाराष्ट्रात अभियांत्रिकी महाविद्यालये आली, वैद्यकीय महाविद्यालये आली म्हणजे तिथे सगळे 'तेथीलच' लोक शिकले असे नाही; आणि काही शिकले तरी त्यांच्या दर्जा बद्दल शंकाच! चूक त्यांचीही नाहीच. शिक्षण संस्थांचा व्यापार थाटून पालकांच्या मेहनतीचा पैसा खिशात घालून सुस्त झालेले 'शिक्षण-व्यावसायिक' आपल्याच शिक्षण संस्थातून दिल्या जाणऱ्या शिक्षणाच्या दर्जा बद्दल ही उदासीनच राहिले. त्याचे परिणाम त्यांना नव्हे तर विद्यार्थ्यांना भोगावे लागले. गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या खाऱ्या, पण पण ती शिक्षण व्यवस्थेची 'खरी' देण नव्हे तर बाजारातील वाढलेल्या मागणीची आहे. उद्या तुमच्या ह्या आय.टी कंपन्या बंद झाल्या तर तरुणाकडे असे कोणते कौशल्य आहे जे त्यांना तारेल? तसं आय. टी कंपन्या बंद होणार नाहीत हे खरे, पण या क्षेत्रातील रोजगार निर्मितीची गती कमी होणार हे नक्की. मग आम्ही बांधलाय का अंदाज की कोणत्या क्षेत्रात रोजगार निर्मिती होणार आहे ते किंवा अजून रोजगार निर्मिती साठी काय केले जावे? उगाच कागदो-पत्री अवहाल नको आहेत, ठोस काही केलेय का राज्याने? पुण्यात आणि मुंबईत खूप लघु उद्योग (त्यात आय.टी ही आले) उभे राहत आहेत त्यात महाराष्ट्रीय किती? हा प्रश्न फक्त भांडवल उपलब्धीचा नाही, तो तुमच्या शिक्षण व्यवस्थेत उद्योजकीय-संस्कार किती प्रमाणात आहेत याचा आहे. उगाच नावाला ई.डी.सी. ची उभारणी करू कितीक पैसा आम्ही असाच वाया घालवला. प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च-शिक्षणा पर्यंत हीच वाट. पैसा असेल तर शिका हा नियम. "सर, या वेळेस फीस भरायला पैसे नाहीत, उशिरा भरले तर चालतील का?" असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला-शेतकऱ्याच्या मुलाला "मग शिकता कशाला रे?" असा प्रती प्रश्न विचारणारे प्राचार्य 'तयार झालेत' आणि तेही याच शिक्षण क्रांतीच्या माहेरघरात, सुवर्ण मोह्त्सावी महाराष्ट्रात! एकीकडे भरमसाठ वाढलेली फी, घटलेले उत्पन्न आणि अगदी शेतकरी संबंधी अ-सहकार पुकारलेल्या राष्ट्रीयकृत-बँका-सुद्धा मिळून शोषण करत आहेत ही परिस्थिती. "एका विद्यार्थ्याशी असे घडले म्हणजे सगळी व्यवस्थाच अशी आहे असे म्हणे योग्य नाही" अस कुणी म्हणत असेल तर कृपया कृपया त्यांनी हा लेख पुढे वाचूही नये. देशाचा मुलभूत घटक नागरिक तसाच शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थी! शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतीची बनावटी सांखिकी एक-मेकांना दाखवून या महाराष्ट्रात एक मेकांची पाठ थोपटण्याचे काम चालू आहे असे सरळ सरळ दिसते. मराठी शाळांना मंजुरी मिळत नाही आणि त्याच मराठीच्या मुद्यावर निवडणुका लढल्या जातात आणि नागरिकांसाठी लाजिरवाणी गोष्ट ही की त्या जिंकल्या ही जातात; मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रात ही! सगळ्या पक्षातील जेष्ठ नेते आणि काही प्रामाणिक कार्यकर्ते सोडले तर पैसा आणि त्या साठी सत्ता हेच समीकरण जीवनाचे ध्येय सगळ्यांनी ठरवलेले दिसते. तसे लोक प्रतिनिधीचे काम सोपे नसते आणि हीच मंडळी इथे जितकं डोकं लावतात तितकं डोकं व्यवसायात लावतील तर आज अंबानी आणि टाटा यांच्या शेजारी बसणारे बरेच मराठी नावाचे दिसतील. पैसाच कमवायचा असेल तर, तुमच्या कडे असलेली बुद्धीमत्ता वापरून धंदा करा, महाराष्ट्राला देशो-धडीला लावू नका! बरं काही लोकांनी धंदा सुरु केलाय, काय तर म्हणे "धान्यापासून दारू", अक्कल आली पण तीही अशी उलटी! समस्त राजकारण्यांना या महाराष्ट्राच्या वतीने कळकळीची विंनती करतो, बरेच क्षेत्र आहेत ज्यात खूप पैसा आहे, सध्या गुंतवत आहात त्याच्या अर्धा जरी गुंतावालात तर चिक्कार पैसा मिळवाल; हा धन्यापासून दारूचा नाद सोडा आणि बियर-बार, मटका, भ्रष्ट गुत्तेदारी यातच पैसा आहे हा गैरसमज ही दूर करून घ्या. थोडसं इतर क्षेत्रांकडे लक्ष द्या कारण जग या १० वर्षात फार बदललय.
महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात एकीकडे महगाई वाढत आहे-दुसरीकडे अन्नाची नासाडी, एकीकडे कामगारांची उणीव आणि दुसरीकडे बेरोजगारीचा डोंगर अशी विपरीत परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही आणि महागाईवरील  टी.व्ही. कार्यक्रमाना भरपूर टी.आर.पी; आहे काय हे? गेल्या दशकापासून पुन्हा सरंजामशाही परत आल्यागत चित्र आहे. बुद्धिवंत गेले, सच्चे विरोधक गेले, मातीतले नेते गेले आणि बाष्कळ, दिखाऊ नेते आले आणि खूप कमी विचार करणारी जनता आली. मी, माझं घर, माझी मुलं आणि माझी नोकरी इतक्याच विचारांनी चिंताग्रस्त. समाज विचारांनी आणि वृतीने खूप संकुचित झाला. स्वतःच्याच क्षणिक स्वार्था पायी त्याने स्वतःचेच दूरगामी नुकसान करून घेतले. सगळीकडेच अराजकता माजली आहे अस नाही, पण वेगळा विदर्भ मागितला जावा, माझ्याच राज्यातील शेतकऱ्याला आत्महत्या कराव्यालागाव्यात, माझ्याच राज्यात पुण्यासारख्या शहरात स्त्रियांवर अत्याचार व्हावेत, एकीकडे अंतर्गत सुरक्षेला स्फोटा मागून स्फोटांचा हादरा बसावा, दुसरीकडे माझे नेते मंडळी, टी.व्ही. आणि मी चित्रपटांवरून आणि धर्मावरून वाद घालावेत, वृत्तपत्रांनी त्याच्या शिवाय इतर काहीच छापू नये, कुठे होत आहे माझ्या महाराष्ट्राची वाटचाल? आलाच माझा शिवाजी राजा तर काय दखवू त्याला- विटंबलेले किल्ले, धान्यापासून बनवलेली स्वस्त दारूपिवून मास्तावलेले गुन्हेगार आणि त्यांनी अत्याचार केलेल्या स्त्रिया आणि बाळे, की अखंड महाराष्ट्र रात्री उपाशी पोटी झोपू नये म्हणून झीझलेल्या शेतकऱ्यांचे हाल आणि माजलेली गुन्हेगारी, की त्याच्याच मावळ्यांच्या ह्या नव्या पिढ्यांनी स्वराज्याची केलेली मुघली अवस्था? हे सगळ बदलायलाच हवं!
अवस्था खूप खराब असली तरी खरच खूप अशा आहेत, कारण महाराष्ट्राच्या मातीत अजून ही शिवाजी महराजांनी पेरलेले स्वाभिमानाचे बीज पुन्हा पुन्हा उगत आहे. शिक्षण, साहित्य, कला-लोककला स्वतःच्याका जीवावर होईना धडपडत पुन्हा नवं स्वरूप घेत आहे. यातूनच देशाचे नवे नेतृत्व तयार होईल. बुद्धिमत्ता खूप आहे पण त्या सोबतच जुन्या पिढीचे नितीमुल्यांचे धडे ही यांना गरजेचे आहेत. महाराष्ट्राच्या येणाऱ्या नेतृत्वाला अजूनही बाळासाहेब ठाकरे, शरद पवार सारख्या नेत्यांचे-कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आहे, त्याचा येणाऱ्या नव्या पिढीने उपयोग करून घ्यावा. ह्या दोघांनी निवृत्त होण्या आधी एकदा सगळ्यांचे कान पिळून जावे ही पण अपेक्षा. येत्या काहीच वर्षात याच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जावा, मुलांनी/मुलींनी रोज हसत गावाच्या 'मराठी' शाळेत जाव, इंग्रजीच्या तासात फाड-फाड इंग्रजी बोलावं, संगणकाशी अशी मैत्री करावी जसा दारातल वासरू आहे, त्यांच्या बापाला त्यांच्या भविष्याची चिंताच राहू नये, मुलीच्या लग्नाची(हुंड्याची) ही चिंता राहू नये, विहिरीत भरपूर पाणी असाव, ते पाणी शेताला देण्यासाठी वीज असावी, भरपूर पिक याव, घरातल कुणी आजारी पडलं की गावातच माणुसकीची जाणीव असणारा डॉक्टर असावा, गाव स्वच्छ असावा, गावातून शहराला चांगले रस्ते असावेत, त्या रस्त्यावर सरकारी बसेस असाव्यात, शहरात लोक असावेत पण अति नकोत, गावातला शेतमाला शहरात यावा, शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि शहरातल्या माणसाला ही तो रस्ता भावात मिळावा, मुली-बळींना खरं स्वातंत्र्य अनुभवता याव, खूप कारखाने असावेत, प्रदूषण नसावे तर तेथे रोजगार असावा, सगळ्यांच्या हाताला काम असल्याने गुंडगिरी नसावी, दारू पिऊन रस्त्यवर फिरणारे नसावेत की बायकोला घरी जावून मारणारे नसावेत, कर्म-कांड नसावं तर रोज गावाच्या मंदिरात सावळ्या पांडुरंगाच्या पुढे त्याच गुणगान करणारा वारकरी असावा, लोकप्रतिनिधींचा लोकांना आदर वाटावा इतके ते चांगले असावेत आणि दर वर्षी संयुक्त महाराष्ट्र दिन(विदर्भा सहित!) आम्ही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी सारखाच साजरा करावा; भले जमले तर आहेत त्या सीमा ही मिटवाव्यात आणि हृदयात खरे महाराष्ट्रीयत्व असलेले आम्ही वैश्विक नागरिक बनावे; हेच जिजाऊ.कॉमच नव्हे तर कदाचित प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे स्वप्न.
पुन्हा एकदा ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी साठी लढलेल्या प्रत्येकाला स्मरून तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जिजाऊ ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!


राष्ट्रकार्यात सहभागी व्हा भेट द्या आणि नोंदणी करा: जिजाऊ.कॉम

आपलेच कार्यकर्ते



नोट: सदर लेखात बऱ्याच भावना स्वप्नाळू वाटत असतील, पण आमचा त्या पूर्ण होतील यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जाती-पातींवर वर आमचा विश्वास नाही असणारांचा आम्हाला द्वेषही नाही. जे जे राष्ट्रकार्याला उपयोगी आहे आणि बाधक मुळीच नाही अशा प्रत्येक कार्याचे/विचारांचे आम्ही स्वागतच करू. महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तटबंदी कायम राखण्यासाठी मावळे होवून जमेल ते, जमेल तेथे, जमेल त्या संघटनेत प्रयत्न करूयात.


सदर लेख कुणी ही कुठे ही छापू शकते, इतरांना पाठवू शकते, कृपया फक्त जिजाऊ.कॉम चा उल्लेख करावा.
सर्व हक्क CC न्वे मर्यादित जिजाऊ.कॉम

 हाच लेख येथे डावूनलोड करा

Thursday, April 29, 2010

५० वर्षे गर्जे महाराष्ट्र माझा

असे म्हणतात जगाला भूगोल आहे पण या माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, असा एक वेगळा इतिहास ज्याचे केवळ स्मरण जरी केले तरी आमच्या छाताडा मध्ये एक स्फुरण चढते, मान अभिमानाने उंचावली जाते, एक गर्वाची भावना मनामध्ये येते. पण हा गौरवशाली इतिहास घडवणारी माणसे काही सामान्य नव्हती, आपले रक्त सांडून , वेळप्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान देऊन त्यांनी हा अखंड, कणखर महाराष्ट्र घडवला. आज नकाशावर दिसणारा महाराष्ट्र म्हणजे आमच्या १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून मिळालेला हा सयुंक्त महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत, महाराष्ट्र आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. ५० वर्ष, ज्या सोनेरी महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पहिले होते, जो मंगल कलश घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये दाखल झाले होते, तो महाराष्ट्र आज गेल्या ५० वर्षामध्ये कुठे आहे आणि कसा आहे ह्याची एकदा उजळणी झाली पाहिजे, ह्या विचारांचा उहापोह आपल्या प्रत्येक मराठी मनाच्या लोकांमध्ये झालाच पाहिजे.

ज्यांनी आम्हाला एक स्वप्न दिले, ज्यांनी आम्हाला हा संपन्न महाराष्ट्र सोपवला त्या महाराष्ट्राचं आम्ही पुढील ५० वर्षामध्ये काय करणार हे हि आपल्याला ठरवावे लागणार.

१ मे १९६०, मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती झाली, स्वतंत्र भारतात स्वकियांशीच लढा देऊन सयुंक्त महाराष्ट्र मिळवावा लागला, जगातील ज्या महान स्वातंत्र्य लढ्याची जन्मभूमी हि महाराष्ट्र होती त्याच भूमीच्या अस्तित्वासाठी पुन्हा एक स्वातंत्र्य लढा द्यावा लागला. गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, कित्येक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, पण मराठी मातीत जन्मलेला, प्रचंड स्वाभिमानी वर्ग ह्या लढ्यामध्ये आपले सर्वस्व झोकून देत होता, सबंध महाराष्ट्र पेटून उठला आणि दिल्लीश्वरांना आपले गुडघे टेकवावे लागले, मुंबई, महाराष्ट्राविषयी आकस असणारे, लाचार आणि स्वाभिमान शून्य लोकांच्या पार्श्वभागावर लाथ घालून तमाम मराठी जनतेने एक आनंदाचा सोहळा अनुभवला.

मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्राची निर्मिती झाली, आणि या महाराष्ट्राने दाखवून दिले कि हाच सयुंक्त महाराष्ट्र या देशाच्या विकास कार्यामध्ये किती महत्वाचा सहभाग नोंदवू शकतो, असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे आज मराठी माणसाने आपला ठसा उमटवला नाही, महाराष्ट्राविषयी आणि मराठी माणसाविषयी आकस ठेवणारी माणसे नेहमी मराठी माणसाविषयी नकारात्मक बोलतात, पण आज महाराष्ट्रचे जे स्थान केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे ते कोणामुळे आहे, इथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या मराठी मनाच्या लोकांमुळेच ना, का स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्राचं विकास करायला कुठली इस्ट इंडिया कंपनी आली होती , नाही या महाराष्ट्राच्या विकासामागे दुसरा - तिसरा कोणी नसून इथे राहणारा मराठी माणूस आहे. मग ते अंबानी असतील, किंवा टाटा असतील, हे त्यांच्या तन- मानाने केवळ आणि केवळ मराठीच आहेत (दोन दिवसांपूर्वीच मुकेश अंबानीचे हे वक्तव्य - " मी जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीयन आहे ) अशा सर्व मराठी माणसांचा आम्हाला अभिमान आहे. आज सर्वच क्षेत्र मग ते कला, क्रीडा, चित्रपट, राजकीय, सामाजिक, आर्थिक , साहित्य ह्या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचे जे स्थान आहे ते खरोखरच आढळ आणि अटल आहे, त्या सर्वांचा आम्हाला खूप अभिमान आहे.

५० वर्षातील हि वाटचाल खूप सकारात्मक आहे, पण हा आनंद असतांनाच आपल्याला पुढील ५० वर्षामध्ये काही ध्येय धोरण करूनच पुढील वाटचाल करावी लागेल.
आज उर्जा, शिक्षण, रोजगार, शेती या क्षेत्रात महाराष्ट्राला मुलभूत बदल करणे आवश्यक आहे, आजवर महाराष्ट्राने भारतासमोर एक आदर्श निर्माण केला आहे तोच आदर्श आपल्याला पुढील काही वर्षामध्ये ह्या क्षेत्रांमध्ये देखील केवळ भारतासमोर नव्हे तर सबंध जगासमोर उभा करावा लागेल.

महाराष्ट्रातील प्रत्येक मुला-मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, शिक्षण घेतलेल्या प्रत्येक हाताला रोजगार देणे, ज्या काळ्या मातीचा अभिमान आम्ही बाळगतो ती माती जो शेतकरी आपल्या घामाने कसतो, त्या शेतकर्याची स्थिती हि बदलण्याची वेळ आता आली आहे. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आजवर तात्कालिक स्वरूपाचे औषध-उपचार झालेले आहेत, पण या क्षेत्राला लागलेल्या रोगांवर आता कायमस्वरूपी इलाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या सोनेरी महाराष्ट्राची स्वप्ने आपण बघत असतो, तो घडवायचा असेल तर आपल्यालाच आता या गोष्टींवर लक्ष देऊन त्या संदर्भात पाऊल उचलण्याची गरज आहे, या क्षेत्रांसाठी एक क्रांतिकारक धोरण आखले जाण्याची आज गरज आहे, महाराष्ट्रामध्ये बौद्धिक दिवाळखोरी कधी नव्हती ना सध्या आहे, गरज आहे आपला डोकं आता या प्रगत महाराष्ट्राच्या मुलभूत विकासाकडे लावण्याची. विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राला घडवण्यासाठी आपले विचार आपले आचार समाजासमोर आणण्याची गरज आहे.
जर प्रकाश आमटे सारखे लोक दुर्गम जंगलात राहून, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये देखील देखील तिथे "हेमलकसा" सारखे प्रकल्प याश्वासी करू शकतात, तर आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असतांना आम्ही का गप्प राहायचं. काही तरी करण्याची जिद्द सर्वांकडेच असते. गरज असते फ़क़्त सुरुवात होण्याची तर ती वेळ आज आली आहे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन एक संकल्प करावा कि आप आपल्या परीने मी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वतः पलीकडे जाऊन देखील काही तरी करील , संपूर्ण आयुष्य आम्ही स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी जगतो मग या आयुष्यातून काही वेळ आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काढूया, त्यांच्या समोर एका सकल, संपन्न आणि प्रगत महाराष्ट्र उभा करूया. मागील पिढीने जमीन कसून ठेवली आहे, आता त्यावर काही चांगल पेरणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, तेव्हाच येणाऱ्या पिढीला या सर्वांची फळे खायला भेटतील अन्यथा भविष्यात केवळ आणि केवळ अंधकार आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पणा निमित्य तमाम मराठी मनाच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा ...

चला एक महाराष्ट्र घडवूया ..... स्वप्न तुमचे - स्वप्न आमुचे - स्वप्न नव्या महाराष्ट्राचे ...

जय हिंद .. जय महाराष्ट्र
- अमोल

Tuesday, April 27, 2010

महाराष्ट्राच्या व्यवसाईकतेबद्दल आणि प्रगतीबद्दल - अंबानी !


अंबानी यांनी जे म्हटलं  ते नवीन नाहीये. कितेक महाराष्ट्रीय आणि इतर  या गोष्टी अनेक वर्षां पासून सांगत आहेत. पण अंबानींनी हे सांगितले आहे हे विशेष! त्यांनी एका व्यावसायिकाच्या आणि महाराष्ट्रीय माणसाच्या द्रीष्टीतून महराष्ट्राच्या विकासाकडे पहिले आहे. त्यांचे विचार खरच वाखाणण्या जोगे आहेत आणि त्यांनी दिलेल्या सल्यावर त्यांच्या बाजूने आणि विरोधात विचार करणेही फार महत्वाचे आहे!
नक्की वाचा तुम्हाला आवडेल!
जय महाराष्ट्र!

---- 

सौजन्य: नितीन पोतदार

 

मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.....मुकेश अंबानी

मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.

महाराष्ट्राची राजधानी असणा-या मुंबईत माझा जन्म झालाय, तोही महाराष्ट्र राज्यानिर्मितीच्या एका वर्षानंतर....माझे वडिल ज्येष्ठ उद्योगपती धिरूबाई अंबानी १९५८ मध्ये मुंबईत आले तेव्हापासून आमचे कुटुंब इथेच राहते आहे. ही स्वप्नभूमी आमची कर्मभूमीही आहे.  त्यामुळे मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.

याच मुंबईत माझ्या वडलांनी एक लहानसा व्यापार सुरू केला. १९७७ मध्ये लावलेल्या या लहानशा रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. त्यांच्या डोळ्यासमोरच रिलायन्स ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी झाली. त्या माझ्या महान वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची परंपरा राखण्याचा प्रयत्न मी करतोय आणि यापुढेही करत राहीन.

माझी पत्नी नीता ही सुद्धा मुंबईकरच.  आमची तिन्ही मुले मोठी झाली तीही याच मुंबईत. त्यामुळे जरी आम्ही गुजराती असलो तरी या महाराष्ट्राच्याच बहुरंगी बहुढंगी मातीचा भाग आहोत.   मराठी ही येथे मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी आणि या राज्याची अधिकृत भाषा आहे.  त्याहीपलिकडे जाऊन सांगायचे तर, सौंदर्याची आणि श्रीमंतीची खाण असणा-या या भाषेवर माझेही मनापासून प्रेम आहे.

या वर्षी आपला महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. भक्ती आणि शक्ती यांचा अद्वैत साधलेल्या या भूमीने मला कायमच भारावून टाकले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांसारख्या संताची या भूमीला छत्रपती शिवरायांसारखा जाणता राजा लाभला.  त्यांची ही परंपरा पुढेही अखंड राखली गेली. महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे समाजसुधारक असोत, की दादाभाई नवरोजी- लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यसैनिक अशा अनेकांनी ही परंपरा चालू ठेवली. महात्मा गांधीच्याही जीवनात मुंबईचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कोणी महाराष्ट्रीय या महान परंपरेचा विसर पडू देणार नाही.

सिनेमावर हा जिव्हाळ्याचा विषय असल्यान आपली मुंबई हे बॉलिवूड म्हणून ओळखले जाते याचा मला खूप अभिमान वाटतो. लता मंगेशकर आणि आशा भोसले हे स्वर्गीय स्वर ही महाराष्ट्राने सिनेजगताला दिलेली अमुल्य देणगी आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी सिनेमाही आता पुन्हा एकदा नव्या जोमाने वाढत असल्याचा मला अतीव आनंद आहे.

माझे शाळा-कॉलेजमधले दिवस असोत की माटुंग्याच्या युडीसीटीमधले केमिकल इंजिनिअरिंगचे दिवस असोत, प्रत्येक ठिकाणी माझे अनेक मराठी बोलणारे मित्र होते.  तसेच आता रिलायन्समध्येही ज्येष्ठ पदांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे काम करताना दिसतील.  या सा-यांकडून मी खूप काही शिकलोय. त्यांचे कामामधले झोकून देणे, मुल्यांबाबत त्यांचा आग्रह, शिक्षणाला दिलेले महत्त्व आणि सतत शिकत राहण्याची प्रवृत्ती ही कौतुकास्पदच आहे.

'मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.

माझे सारे आयुष्य मुंबईत गेल्यामुळे मी मराठी समाजामध्ये कायम एका विषयावर चर्चा होताना ऐकतो आहे, की मराठी माणूस व्यवसायात मागे का? अगदी मनापासून सांगायचे तर हे वाक्य कदाचित काही दशकांपूर्वी खरंही असेल, पण आज असे चित्र बिलकूलच नाही.  उद्योगधंद्याच्या अनेक क्षेत्रात आज मराठी नावं चमकताना दिसताहेत आणि मला त्यांच्या कौशल्याचे कौतुक वाटते. दुसरे असे की महाराष्ट्राने कायमच शिक्षणला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातून किंवा अगदी गरीब कुटुंबातही मुलांना शिकण्यासाठी आग्रह धरला जातो. त्यामुळे नव्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेमध्ये मराठी माणूस अग्रणी असेल यात मला तरी शंका वाटत नाही.

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)
देशातील आणि राज्यातील अनेक सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेले आढळते.  उदाहरणच द्यायचे तर मी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे देईन.  देशातील महत्त्वाच्या शास्त्रज्ञांमध्ये एक असणारे माशेल रिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळावर आहेत. तसेच नोबेल विजेते शास्त्रज्ञांचा समावेश असणा-या रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे ते नेतृत्त्व करताहेत.

आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला तुमचे लक्ष वेधायला आवडेल, की आता व्यवसाय उभारणे आणि तो चालवणे पूर्वीसारखे राहिलेले नाही. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे त्यात आमुलाग्र बदल झाले हेत. एकविसावे शतक जसे पुढे जात आहे तसतशी भारत एका जागतिक अर्थव्यवस्थेकडे एक एक पाऊल पुढे टाकत आहे.  त्यामुळे व्यवसाय करणे हा एका समुदायाची किंवा जातीची मक्तेदारी राहणेच शक्य नाही.   भौगोलिक आणि सामाजिक भिंती एवढ्या झपाट्याने कोसळत असताना घराणेशाही आणि समुदायाच्या परंपरेतून मिळणारा व्यवसायाचा वारसा हा फार काळ टिकणार नाही.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य शिक्षण , हुशारी आणि उद्योजकता असणा-याच्या विकासामध्ये जात , समाज , प्रांतांची बंधने आड येत नाहीत. त्यामुळे महराष्ट्राच्या कानाकोप-यातून तुम्हाला आज पहिल्या पिढीतले उद्योजक घडताना दिसतील. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच नांदेड, जळगाव, सांगलीसारख्या छोट्या शहरांमध्येही ही उद्योजकता ठासून भरलेली दिसते. खाद्यप्रक्रिया, वित्तपुरवठा, बांधकाम इथपासून ते अगदी आयटी कंपन्यांपर्यंत अनेक सेवा या अशा लहानमोठ्या शहरांमधून अहोरात्र सुरू असताना दिसतात. म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षणाची संस्कृती या नव्या युगात उद्योजकतेची कास घेताना मला दिसतेय. त्यामुळे ' मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.

सर्वांसाठी शिक्षण

महाराष्ट्राच्या या सुवर्णमंगल वर्षात माझी राज्यातील जनतेला आणि सरकारला एक कळकळीचे आवाहन आहे की , उत्तम दर्जाचे आणि सर्वांसाठी शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय असायला हवे. महाराष्ट्रात जन्मलेल्या , किंबहुना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असला तरी तो वास्तवात उतरायला हवा. जसे प्रत्येकाला अन्न मिळायला हवे तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळायलाच हवे. म्हणूनच माझी पत्नी नीता आणि मी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून ' सर्वांसाठी शिक्षण ' या ध्येयाचा प्रचार करतो आहोत.

हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आणि समाज अशा दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा. फक्त शिक्षणसंस्थांची संख्या वाढली म्हणजे चालणार नाही , तर त्याची दर्जाही सुधारायला हवा. पण दुर्दैवाने मला असे सांगावेसे वाटते की या राज्यातील प्रत्येक सरकारने शिक्षणाकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. उदाहरण द्यायचे तर , एकेकाळी आपल्य दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणा-या मुंबई विद्यापीठाला आज अवकळा आली आहे. देशातील एकही विद्यापीठ जगातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये नाही. शिक्षणाची महान परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी असे विद्यापीठ असावे यासाठी आपण ठोस पावले उचलायला हवीत.

यासाठीच मी समाज आणि राजकीय व्यवस्थेपुढे दोन मुद्दे मांडतो. एक तर हा आपल्याकडील अशा काही शिक्षणसंस्था शोधुयात ज्या पुढील ५ ते १० वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊ शकतील. त्यासाठी आपण अशी माणसे शोधुयात जी या ध्येयाने प्रेरित झालेली असतील. आपण आपल्या सर्व शक्तिने त्यांच्या पाठीशी उभे राहुयात. मी ज्या युडीसीटीमध्ये शिकलो ते उदाहरण पाहिल्यानंतर मला माझ्या या मुद्द्यावर ठाम विश्वास वाटतो.

युडीसिटी हा खरं तर मुंबई विद्यापीठाचा एक विभाग. २००२ पर्यंत विद्यापीठाचा विभाग म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थेने आपल्या शिक्षणाचा दर्जा एवढा उंचावला की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली जाऊ लागली. अखेर त्याला स्वतंत्र शिक्षणसंस्था म्हणून मान्यता मिळाली आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे युनिव्हर्सिटी इन्स्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे नामकरण झाले. त्यानंतर तर तिला ' इन्स्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' अशी स्वायत्त संस्था म्हणून मान्यता मिळाली. आज तर ते एक विद्यापीठ म्हणून नावजले जातंय. ही सारी किमया घडली ती प्रा. एम. एम. शर्मा यांनी अविरत घेतलेल्या ध्यासामुळे. युडीसिटीचे हेच उदाहरण आपण किमान १५-२० संस्थांमध्ये परावर्तित करु शकत नाही का ? नक्कीच करू शकतो आणि आपण ते केले पाहिजे.

माझा दुसरा मुद्दा असा की राज्य आणि केंद्र सरकारनेही उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात फक्त सुविधा पुरवण्याचे आणि नियंत्रकाचे काम करावे. बाकीची गुंतवणूक, व्यवस्थापन, विस्तार आणि गुणवत्ता विकास या बाबी खासगी संस्थाकडे सोपवाव्यात. २०२० मध्ये विद्यापीठांची संख्या दीड हजार करणे किंवा उच्चशिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण १२ टक्क्यावरून ३० टक्के करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी सरकारकडे असलेली साधने ही कायमच मर्यादीत स्वरुपाची असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे सरकारलाही शक्य नसते. म्हणूनच सरकारने खासगी शिक्षणसंस्था , कॉर्पोरेट्स आदींना या राष्ट्रीय अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणा-या योजना आखायला हव्यात.

याचाच एक भाग म्हणून रिलायन्स फाउंडेशनने जागतिक दर्जाचे, वेगवेगळ्या शाखांची आणि ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारे विद्यापीठ सुरु करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कायद्यातील बदल राज्य सरकारकडून व्हावेत याची आम्ही वाट पाहत आहोत. मला ठामपणे विश्वास आहे की, हे विद्यापीठ स्टॅनफोर्ड (जेथे मी शिकलो), हार्वर्ड, एमआयटी किंवा इतर महान विद्यापीठांच्या दर्जाचे असेल. जगभरातील उत्तम दर्जाचे शिक्षक तेथे शिकवतील. प्रत्येक शाखेतील अद्ययावत ज्ञान तेथे उपलब्ध असेल. या शिक्षणासोबत विद्यार्थ्याची एक नागरिक म्हणून जडणघडण करण्यासाठी अनेक शिक्षणेतर उपक्रमही असतील. तसेच येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची व्यवस्था असेल. विद्यापीठातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले तरी त्याचा आत्मा हा शंभर टकके भारतीय असेल. फक्त भारतीयच नाही तर मराठीसह सर्व भारतीय भाषांमधील ज्ञान तेथे दिले जाईल.

मला विश्वास आहे की, इतर कॉर्पोरेट्स आणि अन्य नामांकित शिक्षणासंस्थाही उच्च शिक्षणामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास इच्छुक असतील. आज चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इवल्याशा सिंगापूरने देखिल शिक्षणक्षेत्रात असे क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या प्रणालींचे यश पाहता , मी सरकारला, राजकीय पक्षांना आणि राज्यातील बुद्धिवंतांना विनंती करतो की त्यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेला पाठिंबा द्यावा.

भविष्यातील विकासाच्या पाऊलखुणा

मी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्तीचे अद्वैत आहे. पण आताच्या आधुनिक युगात शक्ती म्हणजे एकाद्या राष्ट्राची आर्थिक ताकद. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये महाराष्ट्र हे विकासचे ऊर्जाकेंद्र आहे. हे लक्षात ठेवायाला हवे की , आर्थिक विकास हा फक्त समर्थ उद्योजक आणि कुशल कामगारांवर नाही तर राज्याच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासनावर अवलंबून असतो. त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी आशा बाळगतो की आपले सरकार या महत्त्वाच्या मुद्द्यावर सिंहावलोकन करेल.

राज्यातील वीजेच्या कमतरतेचा प्रश्न हा युद्धपातळीवर सोडवला पाहिजे. शेती आणि शेतक-याचे प्रश्न तर कधीच आकाशाकडे डोळे लावून उत्तराची वाट पाहताहेत. जोपर्यंत शेतीतील संधीचा विचार होत नाही , तोपर्यंत ग्रामीण आणि शहरी जीवनमान उंचावणार नाही. सहकारी चळवळीने पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा बदलला. ग्रामीण महाराष्ट्र सध्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी अशा क्रांतिकारी पावलांची गरज आहे. फक्त हे पर्यात त्या भागासाठी योग्य आहेत की नाहीत हे आवर्जून पडताळून पाहावे लागेल.

याच वेळी आपल्याला हे विसरून चालणार नाही की , महाराष्ट्र झपाट्याने शहरी होतोय. नागरी सुविधा आणि नागरी प्रशासन अशा दोन्ही पातळीवर आमुलाग्र बदल घडवणे गरजेचे आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर मुंबईसाठी विशेष आणि सुनियोजित व्यवस्थापनाची गरज आहे. मुंबई ही महाराष्ट्र आणि भारताच्याही गाडीचे इंजिन आहे. म्हणूनच मुंबईसाठी एकत्रित आणि भविष्यवेधी योजना आखायला हवी. मुंबई , तिची उपनगरे , ठाणे , नवी मुंबईसह या शहाराचा महामुंबई म्हणून विचार करायला हवा. इथले अनेक प्रकल्प कित्येक दिवस प्रलंबित आहेत. मग त्यात ट्रान्स हार्बर लिंक असो , पनवेलजवळचा दुसरा विमानतळ असो किंवा उपनगरी रेल्वेचा विस्तार असो... या अशा योजना तातडीने पूर्ण करायला हव्यात.

मुंबईच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पुणे , नाशिक , औरंगाबाद आणि त्याही पलिकडच्या अनेक शहरांना वेगाने जोडले गेले पाहिजे. हे आर्थिक नेटवर्कच विकासाचा पाया ठरणार आहे. चीनमधील शांघाय-पुडोंग किंवा जपानमधील टोक्यो-योकोहोमा हे या पद्धतीच्या विकासाची उदाहरणे म्हणून पाहता येतील. या पद्धतीच्या विकासामुळे नवनव्या रोजगारसंधी निर्माण होतील , यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

असाच भविष्याचा विचार राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी करावा लागेल. विदर्भ , मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे अविसित राहण्याचे काहीच कणार नाही. या प्रदेशांच्या नैसर्गिक आणि स्थानिक बलस्थानांचा विचार करून त्यांच्या विकासाच्या योजना आखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकंदरित महाराष्ट्र @ ५० साठी सर्वव्यापी विचार करणारी विकास योजना , जगातील सर्वोत्तमाची आस धरणारा नवा दृष्टिकोन आणि सर्वांना घेऊन पुढे जाणारी नवी संस्कृती घडवायला पाहिजे. तर आणि तरच आपल्या जय हिंद , जय महाराष्ट्र या घोषणेला खरा अर्थ प्राप्त होईल.

मुकेश अंबानी,
चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर,
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दिनांक: २६ एप्रिल २०१०.
PS:  प्रत्येक वाचकाला विनंती, की त्याने हा लेख किमान ५ मराठी माणसांना तो वाचायला आग्रहाने द्यावा.  नितीन पोतदार.

Thursday, April 15, 2010

मराठवाडा विद्यापीठाची साईट पळवली. छान! आम्ही का अक्कल पाजळतोय?

खालील बातमी वाचून आनंद झाला. तशी ती पळवलेली साईट कालच पहिली. खूप विचार करून लिहिलंय मुलांनी. आमचा पूर्ण पाठींबा त्यांना. विद्यापीठाला विचारावे असे  बरेच प्रश्न आहेत, आणि याची ही कल्पना आहे की त्यांची उत्तरेही ही त्यांचाकडे नाहीत!
पण हे सगळ होत असताना बाकी काही न करता उपद्रवी चर्चा करायला आम्हाला कुठून सुचते काय माहित?
विषय विद्यापीठाच्या गैरकारभाराचा/असक्षम कारभाराचा आहे (फक्त याच नव्हे तर अनेक विद्यापीठात हेच चित्र आहे). पण येथे वाद होतोय: आरक्षण, पुणे विद्यापीठ वी. मराठवाडा विद्यापीठ. वगैरे वगैरे. या विषयांवर बोलण्यासाठी तितकी प्रगल्भता असावी किंवा चार कामे तरी केलेली असावीत. बघा तुम्हाला काही येथील 'काही वाचाळांना' उत्तरे द्यायची असतील तर. बाकी काही ही म्हणा  मुलांनी काम छान केलेआहे :)
साभार येथून: ई सकाळ
----
विद्यापीठाची वेबसाईट केली विद्यार्थ्यांनीच 'हॅक'!
सकाळ वृत्तसेवा
औरंगाबाद - परीक्षांचे निकाल वेळेवर लावा अशी मागणी करूनही निकाल लावले जात नाहीत, असे लक्षात आल्यावर काही विद्यार्थ्यांनी "हायटेक फंडा' वापरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईटच हॅक केली आहे! विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, परीक्षांचे निकाल वेळेवर लावा अशी मुख्य मागणी या प्रकरणातील विद्यार्थ्यांनी केली आहे. वेबसाईट हॅक करण्यामागे आमचा वाईट हेतू नाही, विद्यापीठाची कार्यपध्दती सुधारली पाहिजे असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी सायंकाळी उशिरा या संदर्भात बेगमपुरा पोलिस ठाणे, सायबर क्राईम ब्रॅंच व पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या www.bamu.net आणि www.bamu.ac.in या दोन वेबसाईट आहेत. यापैकी "बामू डॉट नेट' ही वेबसाईट जुनी आहे. 2003 या वर्षी ही वेबसाईट सुरू करण्यात आली. हीच वेबसाईट विद्यार्थ्यांनी हॅक केली. विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांना सकाळी कार्यालयात आल्यावर लक्षात आले. "सिलीकॉन अँड एन्ट्रॉपी' या गटाने वेबसाईट हॅकची जबाबदारी स्वीकारली आहे. वेबसाईट उघडल्यावर "बामू युनिव्हरसिटी इज हॅकड्‌, बट नीड नॉट टू वरी ऍज नो डॅमेज इज डन, प्लीज रीड फॉलोइंग पॉइंट्‌स' अशी वाक्‍ये दिसतात आणि त्यानंतर "हॅकड्‌ बाय सिलीकॉन अँड एन्ट्रॉपी' हा मजकूर दृष्टीस पडतो.

विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत याचा खुलासादेखील विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घ्या, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका. "बामू'च्या वेबसाईटची सुरक्षा यंत्रणा चांगली नाही. वेबसाईटचे डिझाईन चांगले नाही. सुरक्षा व डिझाईनसाठी काही वेबसाईट पाहण्याची सूचना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्या वेबसाईटचे पत्तेही देण्यात आले आहेत. परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रत्येक सेमिस्टरचा निकाल वेळेत लावा. परीक्षेचा निकाल वेळेत लावून विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचवा, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी (वॉचमन ते वरिष्ठ अधिकारी) विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागत नाहीत. विद्यार्थ्यांमुळेच त्यांची रोजी-रोटी चालते याची जाणीव त्यांनी ठेवावी. विद्यापीठाने शिक्षणाची, शिकविण्याची पध्दत बदलावी, अभ्यासक्रम बदलावेत, विद्यापीठाचे काही विभाग चांगले आहेत, पण काही विभाग फारच वाईट आहेत. विद्यापीठाची वेबसाईट चांगली करा, परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिळावेत.

निकाल ऑनलाईन मिळणे म्हणजे निकालपत्र स्कॅन करून वेबसाईटवर टाकणे असा त्याचा अर्थ नाही, निकाल व्यवस्थितपणे "ऑनलाईन' असले पाहिजेत. विद्यापीठाचे ग्रंथालय "ऑनलाईन' करा, शासनाच्या प्रत्येक जी.आर.ची माहिती ऑनलाईन द्या, ऑनलाईन चांगला संवाद साधता आला पाहिजे याची सोय करा, बीबीए व या समकक्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो, निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे नुकसान होत आहे, एका वर्षाचे नुकसान म्हणजे आयुष्यातला दोन टक्के वेळ वाया गेल्यासारखा आहे हे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे या वेबसाईटच्या "होमपेज'वर विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्यामागे आमचा वाईट हेतू नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही विद्यापीठाचे डोमेन विकले असते तर नऊ हजार डॉलर्स (साडेचार लाख रुपये) मिळवू शकलो असतो, पण आम्हाला तसे करायचे नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटमध्ये आम्ही व्हायरस टाकणार नाही किंवा तत्सम कृत्यही करणार नाही. विद्यापीठाची कोणतीही ठराविक कार्यपध्दती नाही, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यामुळे आम्ही हे कृत्य करीत आहोत असे वेबसाईट हॅक करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

हा खोडसाळपणा असू शकतो - डॉ. कोत्तापल्लेसध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट व ऍकॅडमिक कौन्सिलच्या निवडणुकीची नोंदणी सुरू आहे, "पेट' परीक्षेसाठीची नोंदणी सुरू आहे. या नोंदणी प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा खोडसाळपणा कुणीतरी केलेला दिसतो अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुन्हेगार सापडल्यावरच त्यांचा हेतू काय आहे ते लक्षात येईल. ही वेबसाईट तयार करणारी मूळ कंपनी अमेरिकेतली आहे, या कंपनीकडे सकाळी सातच्या सुमारास तक्रार नोंदविली आहे, पण त्या वेळी तेथे रात्र असते, सायंकाळी उशिरा त्यांनी कार्यवाही सुरू केली असण्याची शक्‍यता आहे. परीक्षेच्या निकालांबद्दल त्यात असलेल्या मजकुरासंबंधी बोलताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ज्या अभ्यासक्रमाला पुरेसे मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत त्या अभ्यासक्रमांचे निकाल लागूच शकत नाहीत, त्यासाठी कुणी काहीही केले तरी त्याला काही अर्थ नाही.

"हॅकर्स'ना होऊ शकते तीन वर्षे कैद, दोन लाख दंड "इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी ऍक्‍ट ऑफ 2000' प्रमाणे वेबसाईट हॅक करणाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदविता येतात. त्याप्रमाणेच प्रोसेक्‍युट केले जाते, यासाठी विशेष न्यायाधिकरण आहे. "द सायबर रेग्युलेशन ऍपेलेट ट्रॅब्युनल' असे त्याचे नाव आहे. केंद्र शासनाच्या नोटिफिकेशनप्रमाणे संबंधित प्रकरणी खटले दाखल करता येतात. विशेष न्यायाधिकरणासमोर हे खटले चालवावे लागतात. जर हॅकिंग सिध्द झालं तर 3 वर्षांपर्यंत कैद किंवा 2 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा संबंधित कोर्ट देऊ शकते. सायबर बाबतीतील विशेष न्यायालयाची सोय औरंगाबादला नाही, म्हणून अशा आरोपींवर नॉर्मली एखादा इंडियन पीनल कोडचा गुन्हा लावता येतो. तो गुन्हा लावून साध्या कोर्टात खटला चालविला जाऊ शकतो, असे शहरातील सायबर लॉ तज्ज्ञ ऍड. साधना जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.


वेबसाईट "हॅक' होण्याची दुसरी वेळ!वेबसाईट हॅक करण्याचे प्रकरण फार गंभीर आहे. सायबर क्राईमचाच हा प्रकार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. ए. जी. खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विद्यापीठाने ही वेबसाईट अमेरिकेतील "सरपास होस्टिंग डॉट कॉम' या एजन्सीकडून तयार करून घेतली आहे. वेबसाईटची सुरक्षा व अन्य बाबींची जबाबदारी त्याच एजन्सीवर आहे. साईट हॅक झाल्याची माहिती विद्यापीठाने त्या एजन्सीला कळविली आहे. वेबसाईट हॅक झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या समस्या मांडल्या आहेत त्याची चौकशी करण्यासाठी देखील एक समिती स्थापन केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 2006-2007 या वर्षातही वेबसाईट हॅक झाली होती, पण त्याचे कारण तांत्रिक होते असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

नोंदणीमध्ये व्यत्ययडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या "पेट' परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. सिनेट व ऍकॅडमिक कौन्सिलच्या मतदारांची नोंदणीदेखील ऑनलाईन सुरू आहे. वेबसाईट हॅक झाल्यामुळे या नोंदणीला व्यत्यय आला आहे. www.bamu.net या वेबसाईटवरील सर्व तपशील विद्यापीठाने www.bamu.ac.in वर उपलब्ध करून दिला आहे. नोंदणीच्या प्रक्रियेत असलेल्यांना वेबसाईट हॅक झाल्याची कल्पना बुधवारी (ता.14) रात्री अकरा वाजेच्या सुमारासच आली होती, पण वेबसाईट "हॅंग' झाली असेल असा त्यांचा त्या वेळी समज झाला होता.
प्रतिक्रिया
On 4/16/2010 11:51 AM Nikhil said:
भारतात एवढे शिकलेले लोक असतांना अमेरिकेत कश्याला जायला पाहिजे?
On 16/04/2010 11:43 sandy said:
Agreed with Prashant_Bangalore.... डोक्याच्या कामासाठी जातीच्या वा आर्थिक वा कोणत्याही सवलती कशाला?
On 4/16/2010 11:34 AM ganesh said:
i m agree with prashant_bangalore
On 4/16/2010 11:02 AM Rhushikesh said:
छान, अमेरिकन कंपनी ने तयार केलेली वेब साईट मराठी मुलांनी hack केली . चांगले आहे. अमेरीकॅनांना भारतातल्या मुलांची ताकद कळूदे.
On 4/16/2010 10:23 AM prashant_bangalore said:
@pravin ..जे 'ओपन'वाले आहेत ते सगळेच श्रीमंत नाही आहेत, माझा एक 'ओपन' category तला एक हुशार मित्र होता, पाव,वर्तमानपत्रे विकून MPSC चा अभ्यास करायचा. हुशार असूनही केवळ open category मुळे त्याला नोकरी लागू शकली नाही.... तुम्हाला जर इतकच वाईट वाटत असेल तर मग सरकारला का नाही सांगत तुम्ही लोक कि आम्हाला जातीच्या नको तर आर्थिक आधारावर आरक्षण हव म्हणून.. आहे हिम्मत? जातीच्या कुबड्या तुम्हाला पंगु बनवतायेत.. का हवय IIT,ISRO,BARC,UPSC मधे आरक्षण? इथे डोक्याने काम चालत, जातीने नाही..
On 16/04/2010 10:17 Vachak said:
आरेय जरी ही आरीक्षित लोकांचे विद्यापीठ असेल पण मानाग्मेंत ही फ़क़्त मराठा लोकांची आहे.त्य्नाचाच कारभार आहे तिथे.
On 4/16/2010 10:14 AM ganesh said:
nil: तू काय बाबासाहेबंपेक्षा श्रेष्ट आहेस का ........ बाबासाहेबांनी १० वर्षासाठी आरक्षण दिले होते ...... मतासाठी ते ६० वर्षे सुरूच आहे ... आणि तुमच्या सारखे सुशिक्षित लोक सुधा तुमच्या जातीतील ज्यांना खरी गरज आहे त्यांना संधी देत नाहीत तर तेच वर्षानुवर्षे उपभोगतात ......... आणि ज्यांना खरी गरज आहे ते तिथेच राहतात हे नको आहे ...... आणि त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण देणे आवश्यक आहेत .......... नाहीतर तुझ्यासारखे फुकातेच याचा लाभ घेत बसतील ..........
On 4/16/2010 10:05 AM open_category_hacker said:
मुलांना शिक्षा होता कामा नये .. कारण त्यांनी साईटचे काही नुकसान केले नाही .. its called 'ethical hacking' (वेब साईट मधील उणीवा काढण्यासाठीचे hacking )... प्राचार्य उगीचच बाउ करीत आहेत... मला द्या नवीन साईट बनवायला.. मी बनवतो 'सेक्युअर साईट' ...पण मी ओपन क्याटेगारीचा आहे... मला बहुतेक नाही मिळणार काम ..
On 4/16/2010 9:55 AM you can said:
काही झाले तरी वेब site hack करणाऱ्या न शिक्षा होता कामा नये.......कारण त्यांना कदाचित हा एकच मार्ग दिसला असावा universitiy ला आदल घडवण्याचा......कारण धरणे धरून कोणतीच university ईकत नाही.....त्यांनी जे केले ते योग्यच केले......आम्ही तुन्मचा सोबत आहोत पोरानो....
On 4/16/2010 9:25 AM DEEP said:
ज्या कुणी केले आहे त्याने काहीही वाईट हेतू मनात ठेवून केलेले नाही. तर साईट अधिकाधिक चांगली आणि अद्ययावत बनवावी असा हेतू असल्याचे दिसून आले.
On 4/16/2010 9:22 AM amit said:
Pranav: मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ ह्यांच्यात बरोबरीच होई शकत नाही. त्यांच्या नावातच काय तो फरक समजून घे.
On 4/16/2010 9:21 AM S. said:
This comment for ek mahar: aare baba tu swathala eak marathi manus kasa mahnu shaktos jevha tu swathach swathacha ulekh EK MAHAR aasa kartos. Duheri bhomiket jagnyacha thambwa aata, Stop doing this
On 4/16/2010 9:04 AM ek mahar said:
माझी सर्व भावांना विनंती आहे !! कि हा जो प्रकार आहे तो विध्यापिठाच्या वाईट कामा मुले झाला आहे, हे मला हि मान्य आहे इथे मी शिक्षण घेण्यासाठी का आलो हेच मला माहित नाही , पण एक गोष्ट आहे कि आपल्याला कोणच्या हि जाती वर बोलणे किंवा आरक्षण याच्यावर बोलणे हे बरोबर नाही जर तुम्ही त्यांच्याजागी असता तर काय झाले असते हा विचार करा ..., त्या माणसाने काही चुकीचे केले नवते ...! तुम्ही असे बोलाल तर कसा मराठी माणूस एक राहील आणि आपणच मराठी माणूस स्वार्थी झाले असे म्हणतो ( एक महार )
On 4/16/2010 8:28 AM S. said:
महाराष्ट्रातल्या विद्यापिठ्ठा मध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणा साम्भ्न्धीच्या मुलभूत गरजा हि लक्षात घेतल्या जात नाहीत. आसे घाणेरडे शिक्षक भरून ठेवले आहेत कि ज्यांना धड इंग्लिश हे बोलता येत नाही. ज्यांना कॉम्पुटर हि ओपेरट करता येत नाही, हे काय विद्यार्थ्यांना शिकविणार. सारे वशिला आणि पैसे भरून आत शिरलेले, शिक्षणाचा बाजार करणारे लोक आहेत. या मध्ये पिळवणूक होते ती विद्यर्थ्यांची.
On 4/16/2010 8:28 AM Prashant Swamy said:
Very good, I wish I would be one of those hackers!!! Kudos and shame on BAMU and their survivors...!
On 4/16/2010 8:10 AM S. said:
आरे तुम्ही सगळे विषय सोडून कुठे जाती पती वर चर्चा करता आहात, त्या विद्यापीठात शिकणारे विद्यर्थी हे सगळ्या जातीचे आहेत, आणि हे काम करणारे विद्यर्थी हि वेगळ्या जातीचे असतील. विद्यापीठाच्या नावावरून आणि तीथल्य स्तफ्फ वरून जाती वर चर्चा करण्या पेक्षा त्या विद्यर्थ्यंचा प्रश्न समजून घ्या आणि त्यांना पाठींबा द्या. नाहीतरी हे परिस्थती मुंबई सोडून महाराष्टातल्या साग्ल्यचं विद्यापिठाची आहे. या वरून कळता कि विद्यापीठं विद्यार्थ्यांना किती त्रास देतात.
On 4/16/2010 6:53 AM Sakeena Khan said:
'एक ओपन' च्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.....
On 4/16/2010 6:48 AM Jadhav said:
मंगेश अंड ओपेन तुम्ही खरोखर मूर्ख आहात. आरक्षण आणि विद्यापीठ येथील प्राध्यापक यांचा संबंध लावणे योग्य नाही. येथे सुद्धा नियमाप्रमाणे नेमणुका झालेल्या आहेत. राखीव लोक फार कमी आहेत. तुमचे अज्ञान याने सिद्द होत्ये तसेच खुला वर्ग किती ज्ञानांनी/अज्ञानी आहे हे दिसते. हि साईट अमेरिकेतील कंपनीने केली आहे.
On 4/16/2010 6:36 AM Pranav said:
बाबांचे नाव देले मंजे काय लोकांची वृत्ती सुधारते का ? पुणे विद्यापीठ पण तसेच आहे ...आत्ता त्यांना कोणीतरी hack करावे मंजे त्यना कलेल काय होते ते .... बाबा त्यंच्या लोकांना साधे शिकवू शकले नाही का काय वाईत आहे ते ....
On 4/16/2010 3:31 AM nil said:
महाराष्ट्रामधली एक तरी युनिवर्सिटी दाखवा कि जिचा कारभार व्यवस्तित चालतो आहे. एक ओपेन जरा अजुन नीट बातम्या बघ, खुप जणांनी ज्या दोघांवर आणी मुंदडा ह्यांच्यावर आरोप केले आहेत आणी मुंदडा आणी कुष्नामुर्ति म्हणजे काय आरक्षित जमात आहे का? का उगिच देवाने अक्कल दिलि आहे म्हनुन नाहि तिथे पाजळवायची
On 4/16/2010 3:20 AM nil said:
खरच इथल्या प्रतिकिया वाचुन सखेद आशर्य झाला, विषय काय लोक बोलत काय आहेत? "एक ओपन" तुम्हि हातात तलवार घेउन बाहेर का पडत नाहित सर्व आरक्षित लोंकाना मारुन टाकण्यासाठी? तेवड्याने तुम्हाला मन शांति मिळनार असेल तर तेही करा, नुसता नशिब म्हणुन तुमचा जन्म "ओपन" मधे झाला आहे बाकि काहिच नाही, कधितरी ह्या लोकांकडे तुमचे वडील आजोबा बघत होते त्या नजरेने न बघता वेगळ्या नज़रेने बघायला शिका, तुमच्या बरोबर बिचार्या भारताच सुधा कल्याण होइन
On 4/16/2010 3:13 AM nil said:
प्रशांत: दिड हजार वर्षे असलेली गुलामीमुळे खचलेली मानसिकता,झालेली हानि आणि पिछाडी तुम्ही साठ वर्षात भरुन काढा अस का म्हणत आहात? साठ वर्षात निदान दोन पिढया देखिल पुर्ण पणे जगुन होत नाहित, उगिच शिव्या शाप एक दुसर्याल्या देण्यात काहिच अर्थ नाहिये, तुम्हाला आरक्षितांची प्रगति बघावणार नाही ना, तस सांगा अजुन पुढची हजार वर्ष ते तसच जनावराच जिण जगायला तयार आहेत कारण त्यांना तो अनुभव आहे, फ़क्त अनुभव नाहिये तो तुम्हाला , "त्यांना मानुस म्हनुन जगुन द्यायचा किंवा बरोबरीने वागवायचा"
On 4/16/2010 3:05 AM khaibarkhind said:
जे झाले ते चांगले झाले. आता तरी अक्कल यावी या लोकांना. काही अपडेट पण करत नाहीत आणि काहीच नाही. वेब साईट चा वापर करा कि निकाल लावण्यासाठी वैगेरे. आपण हाय टेक युगात आहोत याची जाण ठेवा कुलगुरू. नुसते कुलगुरू नागनाथ कोत्ता पल्ले नावाचे, जरा बघा काय करता येतंय ते आणि विद्यापीठ कस चांगला बनवता येत ते.
On 4/16/2010 1:56 AM raj said:
good सोलापूर uni. पण हीच बोंब ahe........................... नालायक आहेत सर्व जन.....................सिस्टम change झाली पहिजे....
On 4/16/2010 12:58 AM Pravin said:
mitrano, आरक्षण फक्त ५० टक्के लोकांना आहे (ज्यांची लोकसंख्या ८० टक्के आहे),बाकीच्या वीस टक्के लोकांनी त्या ५० टक्के नोकर्या वर आपली नाव नोंदविली आहेत,ते काय झोप काढतायेत काय? त्यांना तर डोक आहे,(तसे ते बरेच कालापासूल म्हन्तायेत,) लावा कि डोक.
On 4/16/2010 12:57 AM Ratnakar said:
site hack naka karu yethil nalayak karmchari (employees) na hakala jyanchi layaki nai ashane ithe baswale gele ahe. clerk pasun sagle nalayak lok bharle ahet. Cooperation hya word sobat hyancha kahi sambadhch nai. Shriman Kulguru Krupaya hya gostikade laksha dya. Kahi badal jala tar anand watel aplach ek trast student
On 4/16/2010 12:55 AM सुजाण नागरिक said:
बाबासाहेबांनी त्याकाळी (जेंव्हा सवलती मिळत नव्हत्या) शिक्षण घेवून आपली लायकी सिद्ध केली. स्वातंत्रोत्तर काळात त्यांच्या नावावर सवलती मिळवून लोकांनी काय दिवे लावले हे जरा तपासून पहा. जगात 'फिटेस्ट सर्व्हायवल' ह्या न्यायानुसार वागाल तरच टिकू शकाल हे जर कळल तरी पुष्कळ सुधारणा होईल. राम राज्यात सुद्धा राम हा नरच राहिला व मारुती हा वानर. रामाला वानराची मदत घ्यावीच लागली व मारुतीलाही रामाचे स्वामित्व मान्य होते. प्रत्येकाने आपली कुवत ओळखून वर्तणूक ठेवली तर पुष्कळसे प्रश्न आपोआप सूटतील.
On 4/16/2010 12:51 AM Pravin said:
मित्रानो सगळे आरक्षणाच्या मागे का लागलात,जर तुमच्या पूर्वजांनी सगळ्यांना बरोबरीने वागविले असते तर हि वेळ आली नसती,आणि आरक्षणाच्या नावावर बोंबा मारणारे एवढे क़ुअलिफ़िएद आहेत तर त्यांनी काय तीर मारले ते सांगावे,आरक्षणाने शिक्षण मिळते,पण तंत्रज्ञ व्हयला डोक लागत आणि मेहनत सुद्धा.जे आरक्षण घेवून शिकतात त्यांच्या घराची परिस्थिती काय असते ते तुम्हाला कस माहिती असणार कारण तुमच्या घरी तसली परिस्तिथी कधीच आलेली नसते.कुणी मला सांगाव कि त्यांच्या पैकी कुणाला जात विचारून kholi khali karayala कुणी lavali काय.
On 16/04/2010 00:14 Babare.Dubai . said:
माझे नशीब मला या विद्यापीठात इंजिनियरिंग च्या पद्वोत्तर अर्धवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता...पण कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यावेळी तो सोडवा लागला...देवाची कारणी आणि नारळात पाणी...अगदी असेच झाले म्हणायचे आणि काय...नाहीतर १९८३ साली यांचा काय सावळा गोंधळ चालला असेल त्यात मीही या विद्यार्थ्यान्च्याप्रमाणे भरडून निघालो असतो...देवा अशी वेळ शत्रूवर सुद्धा येवू देऊ नकोस रे...
On 15/04/2010 20:11 Anshuman said:
"एक ओपन" हा या मंचाचा चुकीचा वापर करत आहे. विद्यापीठात लायकी नसलेले लोक असतील, पण ते आरक्षणा मुळे नालायक झलेत असे नाही. ज्या उद्देशाने करणार्याने हे केले आहे ते विद्यापीठातल्या सगळ्यांचीच लायकी दाखवण्यासाठी केले आहे. त्यात कुणाची जात पाहून लायकी काढायची नाहीये. विद्यापीठात फक्त आरक्षण असलेलेच प्रोफेसर आहेत असे नाही. त्यांच्यात सगळेच आहेत आणि त्यांची लायकी सुद्धा काही आरक्षित प्रोफेसारांपेक्षा चांगली आहे असे नाही. त्यामुळे मुद्दा सोडून उगाचच जाती वाचक प्रतिक्रिया करू नये हि विनंती.
On 4/15/2010 7:14 PM महाराष्ट्राभिमानी said:
याला म्हणतात moral crime ... . पण यातून हे university वाले लोक शिकतील असे वाटत नाही ... अक्खा staff म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे.......तरी पण ...ते सरळ करण्याच्या या hacker च्या प्रयत्नांची दाद द्यावी लागेल ... GECA alumnus
On 15/04/2010 6:54 PM Vidhyarthee said:
या विद्यापीठात CEDTI हा एक अत्यंत घाणेरडा प्रकार आहे.येथील एक प्रध्यापक V Krishnamurthy आणि प्रध्यापक विनय मुंदडा हे एका दहशतवादी अतिरेक्या पेक्षा खराब आहेत.हे महाशय खुले आम सिगारेट फुंकतात. मागे झालेल्या अश्लील कांडत यांचा मोठा सहभाग होता.विध्यर्त्यनाना सतावणे हा तर यांचा मोठा धंदा आहे.पैसे घेवून पर्शान्पात्रिका फोडणे हे तर यांचे मोठे उद्योग आहेत. कुलगुरुनी यांचावर कारवाई करावी.समस्त विद्यार्थी
On 15/04/2010 6:54 PM vidhyarthee said:
Symbiosis Institute of Design चे सध्याचे डिरेक्टर विनय मुंदडा हे एक महाभाग या विद्यापीठात बर्यापैकी घाण करून गेले.विद्यापीठ घाण करायचे आणि मग दुसरी संस्था नासावालायला निघून जायचे.शिक्षण मंत्र्यांनी यांची जरा चोव्काशी करावी.यांच्या विरुद्ध बरर्याच तक्रारी आहेत.
On 4/15/2010 6:47 PM Sheetal said:
Very Good... ata tari dole ughdtil. sagli manmani suru ahe. universitiche nak kaple.
On 4/15/2010 6:44 PM amit said:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे सर्वात घाणेरडे विद्यापीठ असेल संपूर्ण जगात. बाबांच्या आशीर्वादामुळे सर्व आरक्षित लोक भरली आहेत. अजून काय होणार.
On 4/15/2010 6:18 PM mazi vithyarthi said:
very good, At least someone has raised these issues.Some one has mentioned about CEDI professors this is really true.What about quality of staff in other Engg.colleges. sinario is really very poor.JNEC is not paying salary regularly to professors,MIT is not merging DA .need not talk about other colleges.I do not know what university is doing against these people and what AICTE is doing? people are starting Engg.colleges like coffee shop.simply spoiling career of students in marathwada.
On 15/04/2010 18:02 Nitin UK said:
Site var khup chan message thevala aahe...vichar karnyasarakha aahe. Students chi kashi galchepi aani vidya pithanchya sites kashya asavyat hya baddal aahe. Sarvani jarur vachave. http://www.bamu.net/
On 4/15/2010 5:43 PM pralaynath said:
१४ एप्रिल या तारखेच्या मुहूर्तावर वेबसाईट हॅक झाली यावरून कळते कि कुणी हॅक केले असेल.
On 4/15/2010 5:37 PM danyu said:
वर प्रतिक्रिया denare bekuf aahet... विद्यापीठाच्या नावाचा, आरक्षणचा व वेबसाईट हॅकचा सबंध काय
On 4/15/2010 5:32 PM ganesh said:
@ abhijeetharle का रे quality नसताना आरक्षणाच्या जोरावर फुकट मध्ये जात नाही का पुढे तू ?????? आणि गरज नसताना हे महत्वाचे .......... जरा जाऊन बघ iit clg मध्ये किती आरक्षणाची गरज नसलेले लोक भरले आहेत तिथे बघ........ मणजे कळेल ......
On 4/15/2010 5:20 PM Sarang said:
मी "Ek open च्या मताशी पूर्णपणे सहमत आहे......
On 4/15/2010 5:03 PM you can said:
बाबा नि सागितले होते कि आरक्षण हे स्वतान्त्रानंतर फक्त १ वर्ष करता असावे...पण ह्या राजकारण्यांनी vote बँक करता खेळ मांडला इतके वर्ष.......
On 4/15/2010 4:49 PM Ratnakar Sapate said:
गुड
On 4/15/2010 4:48 PM Ek open said:
"गुरूवार (ता.१५) सकाळपासून विद्यापीठातील तंत्रज्ञ त्याचे कारण शोधण्यासाठी कामाला लागले आहेत" हे वाचून फार हसू आले ...अहो त्या विद्यापीठात कोणी "तंत्रज्ञ" असू शकते का? सगळे मेले आरक्षणामुळे भरले आहेत...त्याला "वेबसाईट हॅक" झाली याचा अर्थ कळला तरी आहे का?????
On 4/15/2010 4:45 PM Ratnakar said:
मी तर असे म्हणेल कि सर्वात बकवास विद्यापीठ म्हणजे मराठवाडा विद्यापीठाची होय. कारण त्यांच्याकडे काहीच मानागेमेंत नाहीहे. जे काही झाले आहे ते योग्यच..सर्व काही तेथे नोन IT person आहेत. Gooddddddddddd
On 4/15/2010 4:42 PM dankaya said:
आरे बापरे कालच बाबांची जयंती झाली कि आणि आज हे नाटक काय चालले आहे काळात नाही जरा आरक्षण जोरात लावून चालू करा कि वेब सीते चालू अगदोर चा बाबांचे vidheptihe नाव लई भारी आहे देग्री बघून लोक nokara धावत येवन देतात कि.
On 4/15/2010 4:20 PM Champak Bhumiya said:
उत्तम
On 4/15/2010 4:15 PM abhijeetharle said:
आरक्षणाच्या कुबड्या घेऊन सीते बनवली म्हणेजे नेमक काय.? आरक्षण हे कायदाने मिळालेलं आहे पण गणेश याच्या पोटात क दुखत आहे काही कळत नाही.
On 4/15/2010 3:45 PM sampat said:
mast
On 15/04/2010 3:22 PM Punekar said:
उत्तम लई भारी!!!जे काही केला आहे ते मस्तच आहे!!अशा पद्धतीनेच विद्यार्थी आपल्या प्रश्नांना वाचा फोडू शकतील!!!
On 4/15/2010 3:11 PM ganesh said:
आरक्षणाच्या कुबड्या घेऊन शिकलेल्या लोकांनी site बनविलेली असणार दुसर काय ??
On 4/15/2010 3:08 PM prashant said:
@वैभव जेवढे अन्याय झाले त्याच्या दुप्पट सवलती दिल्या......... अजून किती दिवस फुकट पाहिजे आहे ????
On 4/15/2010 2:59 PM balaji said:
हि बाबांची site आहे इथे site hack न करण्यासाठी technology वापरायला, शिक्षण लागते.. पण बाबांच्या राज्यात फक्त सवलत / आरक्षण मिळते!! जे लोक शिकलेत त्यान्हा नोकरी नाही.. आन्ही ज्यान्हा आहे त्यान्या आक्कल /ज्ञान नाही.. काई करणार !! आरक्षित आहेत ना ते!!
On 4/15/2010 2:49 PM Babare.Dubai . said:
हे हे हे...न चालणाऱ्या वेबसाईट हॅक करून हेकार्स ला काय मिळते कोणास ठाऊक...सगळ्या महानगरपालिकेच्या साईट, एअर इंडिया, इन्कम टक्स, बीएसएनएल अशी एक ना हजारो सरकारी साईटची नवे देता येतील...
On 4/15/2010 2:30 PM vaibhav said:
mangesh tuza thond band thev tumhi open vale kya ghari basun ahat kya . nalayak tumhi ahat sangale tumcha purvajani adhi cha amhala shikashan dila asta tar hi vel ali nasati.
On 4/15/2010 1:58 PM पंकज said:
ज्या कुणी केले आहे त्याने काहीही वाईट हेतू मनात ठेवून केलेले नाही. तर साईट अधिकाधिक चांगली आणि अद्ययावत बनवावी असा हेतू असल्याचे दिसून आले.
On 4/15/2010 1:18 PM mangesh said:
आरे बाबा!! हि बाबांची site आहे इथे site hack न करण्यासाठी technology वापरायला, शिक्षण लागते.. पण बाबांच्या राज्यात फक्त सवलत / आरक्षण मिळते!! जे लोक शिकलेत त्यान्हा नोकरी नाही.. आन्ही ज्यान्हा आहे त्यान्या आक्कल /ज्ञान नाही.. काई करणार !! आरक्षित आहेत ना ते!! हे हे आरक्षण बंद करा !! बंद करा!!! बंद करा!!!!
On 4/15/2010 12:47 PM punekar said:
Woooooo....whoever has done it then plz inform him to collect a cash prize from me nice work done! कारण त्यांची web site फक्त नावाला आहे त्याचा वर कधी result नाही बगायला मिळत etc.......