Thursday, February 18, 2010

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

                                                                         शिवजयंती विशेष जिजाऊ.कॉम

      छत्रपती शिवाजी महाराज जयंती
                                    [१९ फेब्रु १६३०- ३ एप्रिल १६८०]


"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
-
समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
आजच्या या पावन दिनी जिजाऊ.कॉम तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

"
शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.


कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड, शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!


शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!


कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

महत्वाची नोट: महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. जमेल तेथे यासाठी आग्रह धरावा.
राष्ट्रकार्यात सहभागी व्हा: जिजाऊ.कॉम वर नोंदणी करा

 

पीडीएफ वाचा, आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास सहकार्य करा आणि हा मेल सर्वांना पाठवा.
                                                            सर्व हक्क CC न्वे www.jijau.com

Tuesday, February 16, 2010

नटरंग आणि मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री नटरंग साठी पहिला सर्च रिजल्ट!

Monday, February 15, 2010

कौल मराठी मनाचा .. मराठी माणसाला नेमकं काय हवं आहे ?

पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले he jagala samajale pahije हे जगाला कळले पाहिजे
राहुल तुझ्या आजीने इंदिरा गांधीने अकाली दलाला नष्ट करण्यासाठी पाकीस्थान सरहददीवर असलेल्या संवेदनशील पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले त्याचे नाव तुला माहित नसल्या मुळे सांगतो General Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही राहुल जरा खालील मजकूर वाच .आणि नंतर up,bihari सैन्याच्या गोष्टी त तुझी अक्कल ठिकाणावर येईल
The Maratha Light Infantry It was formed as the 103rd Maharattas in 1768, making it the most senior light infantry regiment of the Army.Indian state of Maharashtra.One of the most famous regiments of the Indian Army, the history of MLI spans over 240 years. Their military qualities were brilliantly optimised in their historic campaigns against the Mughals and the British
राहूल यांनी सैन्यदलाला या वादात ओढून मोठी घोडचूक केली.आता पर्यन सैन्याला राजकीय वादात कोणी वापरले नव्हते म्हणूनच भारत सुरक्षित राहिला होता. नाही तर पाकीस्थान सारखे हाल होण्यास वेळ लागला नसता.आज पाक चे जे हाल झाले त्यास सेन्य आणि राजकारणी यांची परस्परावर मात करण्याची लागलेले चढाओढ. लंका,पाकीस्थान,बांगलादेश हे याच करणा मुळे अराजकतेच्या वाटेवर जावून बरबाद झाले आहे. फोडा आणि राज्य करा हि कांग्रेस ची नेहमी नीती राहेली आहे आधी बिमार राज्ये विकसित करा.रोजगार निर्माण करा चिदंबर दक्षिणेत हिंदी बोला म्हणा
Always Visit :- http://www.thanthanpal.blogspot.com

====================================================

Namaskar,

marathi ya muddyachi khar tar aaj maharashtrala ,khar tar pratek marathi manasala garaj aahe.pan vichar kela tar kharch aaj marathi bhasha ,tyacha sakhol abhyas ,tyachyavarache vichar manthan hyache praman kitise urale aahe?Aaj pratyek aai - vadilana vatatay aapale apatya english school madhye shikayala havay ,doctor ,engineer vyayala havay ani US,UK madhye jaun paisa kamavayala havay.Ani aaj mi baghate ki mule lahan asalyapasunch marathi hi matrubhasha asunhi ;ti na shikavata english var bhar jast aahe.Ha english jaruri aahe pan mulana adhi tyanchi matrubhasha tar yayalach havi ki nako?
Pan rajkarani ha vishay uchalat aahet tar tyat kitise satya aahe aani kon agadi manapasun ya goshtisathi prayant karat aahet ha tar vadacha mudda asel.
Pan Mumbai fakt marathi manasachich aahe ani baki bhashikani etar rajyatalya lokani tithe yeuch naye ya goshticha mi purn virodh karate.Are ekach apalya deshat anakhin kiti fut padata ani jar etar rajyataly lokana tumhi hakalale tar kay khatri aahe ki etar rajyatun marathi bhashikana hakalun denar nahit?aahe kahi guarantee? Tar te lok dusari bhasha bolatat dusarya rajyatale aahet mhanun tyana hakalun lavane ha kahi marathicha mudda sidha karanyacha upay nave.Ha tumhi jar anakhin navin lok Mumbai madhye yeu nayet mhanun kahi upay yojana karu shakat asal tar thik aahe karan tas baghav tar Mumbai chi lok sankhya etaki afat zali aahe ki anakhin lokanchi bhar mhanaje to anirek hoil ani sarv jaruri goshtinchi kamatarata houn jail.
Swine flu ne aaj sara Maharashtra trast aahe .Tyasathi kahi changale prayant vyayala havet.Americe madhye H1N1 che dose nighale aahe tar Maharashtrat,bharatat tya doses chi garaj aahe.
Rajakarani lok tar ekach muddyavar bhandat asatat aani samanya manasache laksh vedhun ghetat.Tar aapan marathi manasani tharavave ki aapalyala konachi sath haviye.Amachya navane bhandane band kara mhanav ani kharya avashak tya goshtinkade laksh dya mhnanv ya rajakarani lokana.

- Arti Chamnikar

=====================================================
प्रश्न फक्त मराठी माणसापर्यंत सीमित नाहीये, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, महागाई आणि नोकरीचा प्रश्न इतर लोकांना पण त्रासदायक ठरत आहे. बेसिक ज्या गोष्टीसाठी लादायक व्हायला हवे ते प्रश्न मागे पडतात किंबहुना त्या प्रश्नाची मुदाम उपेक्षा केली जात आहे, आपले राजकारण फारच खालच्या स्तरावर गेलेले आहे असे नाही वाटत का? बेसिकली ह्या देशासाठी सर्व प्रथम सुरेक्षा ची जरूर आहे परंतु शिवसेना ची स्वाभिमानासाठी लाथा द्यायची पद्धत बदलण्याची गरज आहे, इतर पक्ष सर्वच बाबतीत लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. सुरक्षा नंतर महागाई आणि देशाचे युवा विद्यार्थी आत्महत्येला बळी पडत आहे. देशाची परिस्थिती काय आहे हे सांगला नको, सर्व विदित आहे आणि आम्हा सर्वांचा देव वाली आहे तो ठेवेल तसे राहावे लागेल किवा सर्वच प्रश्न जो पक्ष हाती घेत असेल तर त्या पक्षाला सहकार द्यायला हवा, शेवटी कोणीतरी आगेवानी घ्यायला पाहिजे तर आणि चमत्कार शिवाय नमस्कार नाही.
-k s पाटील

====================================================
Marathi mudda sodun changla raajkaran, maharashtracha vikas. shikshan, ani shetakryachya atmahatya thambavavya

- Manisha.

===================================================

सिमाभागात मराठी लोकांवर होणारा अन्याय सहन करणार नाही
पूर्वी कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांचे सरकार होते. त्यामुळे मराठी जनतेच्या भावना ते समजू शकले नाहीत. भाजप सत्तेत आल्यास तो या प्रश्नायबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न् मार्गी लावेल, असे वाटले होते; मात्र कर्नाटकात भाजप सत्तेत आल्यानंतरही मराठी जनतेवरील अन्याय दूर झाले नाहीत. याचा प्रत्यय मागील दोन वर्षापसुन दिसुन आला आहे. www.vallabhgad.com
गेली ५४ वर्षे हा प्रश्नर खितपत पडला आहे. आता महाराष्ट्र व सीमाप्रदेश यातील राजकारणी मंडळींनी सीमाप्रश्ान् अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे.

-Gajanan Salunkhe

====================================================
खरतर शिक्षण, नोकरी आणि आरोग्य हे प्रत्येकाला फारच गरजेचे आहेत, परंतु आज महाराष्ट्रात परप्रांतीयांनी इतकी गर्दी केलेली आहे की महाराष्ट्राची पूर्ण विलेवाट लावून टाकली आहे, कुठेही झोपड्या बांधतात, तेथेच राहतात, तेथेच जवळच्या ठिकाणी संडासला जातात, कोणत्याही कामाला वेळेचे बंधन नाही, त्याच्या मोबदल्याला मर्यादा नाही, ते एकाच घरात कितीतरीजण राहतात, त्यांच्या या राहण्याने आणि घाणकरण्याने आणि कामाच्या अमर्याद पद्धतीमुळे महाराष्ट्रातील माणसे हवालदिल झालेली आहेत, हळूहळू महाराष्ट्रातील माणसांनादेखील त्यांची हि घाणेरडी लागलेली आहे, अश्याने महाराष्ट्राचा देखील उतरप्रदेश आणि बिहार होईल, आणि पुन्हा महाराष्ट्रातील मराठी माणसांना देखील इतरत्र जाण्याची वेळ येईल. या सर्वांमुळे अशोक चव्हाण यांचा (अशोक चौहान) होईल.

कृपया माझी मुखमंत्री श्री अशोक चव्हाण यांना विनंती आहे की, काहीही करून बाहेरून जे परप्रांतीयांचे लोढे येताआहात त्यांना आळा घाला "अन्यथा इंग्रज्यांची जसे भारतात राज्य केले. तसे हे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन मंत्रिमंडळात सहभागी झालेच आहेत, आणि हळूहळू महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्रातून बाहेर काढतील अगदी तुम्हा सर्व मंत्र्यान सुद्धा, तेव्हा वेळीच यावर उपाययोजना करून मार्ग काढा.

तुम्ही सर्व मराठी माणसेच जर एकमेकात्मध्ये भांडत बसलात तर बाहेरच्यांना त्याचा फायदा होईल.
आपण सर्व शिवाजी महाराज्यांचे वंशच आहोत तेव्हा सर्व एकत्र या आणि परप्रांतीयांच सामना करा.

विजय सदानंद महाडीक
वर्तक नगर, ठाणे
====================================================

ravindra pawar from nashik has written exactly what I would have said. Why not publish this in most of the marathi newspapers, so that maximum number will read this. So also a translation can be given for Times of India, Free Press etc. Pl think over. I do not know how to write in Marathi, hence english.........

-dr jayant P Baride
====================================================
marathi tun shikasn va marathi tun sheklylya mulana nokeri

-sanjivani tipnis

====================================================
marathi cha mudda khoop changla aahe. fakta farak evdhach havaa kee to bhashenech marathi asava ase nahee tar to manaane marathi asava. aaj maharashtra madhe ase barech lok aahet kee je bhashen marathi aahet pan manane matra marathi naheet. tyana marathi bolne, marathi medium madhe madhe mulana shikvane he kami panache vatate. tar kahi hindi bhashik dekhil tyanchya mulaana marathi shalet pathavtat.

-narendra lanjewar

====================================================
Maharashtrala eka changlya netyachi garaj aahe. changlya karyakartyanchi garaj aahe marathicha mudda khup gaun gostha aahe to mudda mahatwacha tar aahech pan tyavar honara rajkaran hi khup chintechi bab aahe. marathichya muddyashivay ase kititari mahatwache prashna ya maharastrat aahet ki je sodavane khup garajeche aahe.

Je kahi hot aahe te yogya nahi aahe pan he jar asech chalu rahila tar maharastrachi adhogati nischitach hou lagel.

- swati

सर्वांचे आभार ... आपण हि आपली प्रतिक्रिया नोंदवा,

http://mukhyamantri.blogspot.com/2010/02/blog-post_04.html


या आगोदर प्राप्त झालेल्या काही प्रतिक्रिया ...
http://mukhyamantri.blogspot.com/2010/02/blog-post_1336.html


मराठी माणसा जागा हो !!!!!!!!!!!!!!!!!

जय महाराष्ट्र
(टीप :- वरील सर्व प्रतिक्रिया / मते हे त्यांचे व्यायाक्तिक मत असू शकते, त्यांच्या आणि सर्वांच्या मताचा आम्ही आदरच करतो.)Thursday, February 11, 2010

ई - कार्यकर्ता अंक २ रा

ई - कार्यकर्ता अंक २ रा प्रसिद्ध झालेला आहे .
येथे डाउनलोड करावा !

                                      कार्यकर्ता उवाच !

जय महाराष्ट्र,

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, टिळक अशा आणि अनेक महापुरुषांनी संस्कार केलेल्या महाराष्ट्राच्या मातीलाकपाळी भाळून हा छोटासा अंक आपल्या समोर आणत आहोत. हा अंक म्हणजे आपल्यापैकीच काही लोकांच्या/तरुणांच्या मनात चालेल द्वंद, समाज का बदलू शकत नाही? हा पडलेला प्रश्न आणि बदल घडवण्याची इच्छा शक्ती हे सगळ मांडण्यासाठी एक व्यासपीठ आहे आणि असेल. बदल नक्कीच घाडूशकतो, पण तो घडवावा लागतो! म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात! लोक म्हणतात, "काही तरी करून दाखवा, फक्त लिहू आणि बोलू नका!" आपल्या पैकी बर्याच तरुणांना हा अनुभव आला असेल; कारण आपल्यात चीड असते आणि आपण शोधात असतो नेमक काय करता येईल, मग आपल्याला काही तरी अर्ध सापडत, आपण ते मांडतो आणि लोक (ज्यातले बरेच खर तर काहीच करत नाहीत!) त्याला विरोध करतात आणि तो विरोध म्हणजेच त्याचं हे वाक्य "काही तरी करून दाखवा फक्त लिहू आणि बोलू नका!" या विरोधातून जे तरले ते बदलाकडे एक पाऊल नक्कीच पुढे जातात. पुढे ही खूप संघर्ष असतो; पण, सुरवात तर झालेली असते ना! त्यामुळे काही तरी बदलण्यासाठी काही तरी करत राहूत, शिकत राहूत, बोलत राहूत, नाव ठेवनारांना ओरडू द्या की काय ओरडायचे ते! पण कधी न कधी आपल्याला विचारांना क्रियेचे स्वरूप दिल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी वाटेल, 'THIS IS IT'! तिथे नक्कीच थांबूत आणि करूत! पण डोक्याला गंज चढू नये म्हणून, आधी वैचारिक बैठक नीट बसावी म्हणून खूप काही गोष्टींचा उहा पोह करावा लागेल. गौतम बुद्ध सांगतात तस प्रत्येक नियमाला आपल्या मापात एकदा टाकून बघाव लागेल! तेंव्हाच तर खरा 'कार्यकर्ता' जो Agent Of Change असेल, बनू शकतो!
हा अंक किती नियमित असेल माहित नाही [हा अंक २ रा], जमेल तस आणि जमेल तेंव्हा प्रकाशित करत राहूत. तुमचा ही सहभाग यात अपेक्षित आहे. तुमच्या कडून काही लेख कविता आल्या तर खूपचछान किंवा कधी तुम्हाला वाटलं की या वेळेस आपण काढावा "कार्यकर्ता" तर नक्की सांगा! निघेल तेंव्हा हा अंक तुमच्या इनबॉक्स मध्ये पोहचावा म्हणून कृपया इथे [sub-newsletter@jijau.com] एक एमैल पाठवा. काही सूचना असतील तर त्या ही पाठवा. शेवटी ही चळवळ सगळ्यांची आहे, फक्त आणि फक्त राष्ट्र निर्माणासाठी!

आपलेच मित्र,

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे
[या अंकाला Twitter वर follow करा: http://twitter.com/karyakarta]
 

Wednesday, February 10, 2010

भारतीय शेतीची लागलेली वाट आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल असलेली उदासीनता

भारतीय शेतीची लागलेली वाट आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल असलेली उदासीनता  बद्दल एक खूप छान लेख इथे इंग्रजीत(न्यूयॉर्क टाईम) आहे:  http://www.nytimes.com/2010/01/29/world/asia/29iht-letter.html


हेच पण मराठीत खूप दिवसांपूर्वी लोकसत्ताने खूप डिटेल मध्ये येथे लिहिले होते: http://mukhyamantri.blogspot.com/2009/08/blog-post_29.html

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अजून: 
http://mukhyamantri.blogspot.com/2009/08/blog-post_25.html
http://mukhyamantri.blogspot.com/2009/08/blog-post_23.html
http://mukhyamantri.blogspot.com/2009/08/blog-post_26.html

Friday, February 5, 2010

लोकांच्या प्रतिक्रिया: मराठी माणसाला नेमके हवे काय ?

काही लोकांचे मनोगत येथे देत आहोत:


As a domicile of Maharashtrian we want first security and development of Marathi manus. At the same time We should gate Edge over non-Marathi people as we our people go out side Maharashtra. they don't get some advantages over local people. But We should remember that our Marathi fellows are also outside Maharashtra and their should not cost their security.
When outside Maharashtra people are coming to Maharashtra for government services our people should also get employment in other state in that ratio.
And most imprortant burocracy of maharashtra has to be in hand of Marathi Manus.
--- Shivanand

hoy khrach marathi mansala bolayla haway nuste rajkeya bhasene aaikun kahee honar nahee aawaj utwlach paheejy naheetar maharashtratun marathi anee marathi manus naheesa honar aanee aapalya padcha peedhela marathi mahnjaykai hae shekawayche palle aaplaywar yenar ------ Sunil Patil


शिक्षण आणि नोकरी ची नक्कीच गरज आहे ....
मराठीचा अभिमान बाळगणे महत्वाचे आहे .. अमराठींचा द्वेष करण्यात काही अर्थ नाही.. -----Rohan Patil


आपले ही इथे नोंदवा: मराठी माणसाला नेमके हवे काय ?

देशात सध्या चालले आहे तोडा ,फोडा आणि राज्य करा चे राजकारण


मुंबई कुणाची ? हा सध्या देशाचा गंभीर प्रश्न सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांना 
सतवतो आहे. सर्व नेते मराठी जनतेला आणि उत्तर भारतीय जनतेला वेड्यात काढत आहेत. फक्त मुंबईची सुधारणा होऊन देश सुधारणार नाही, देशातील सर्व राज्यांमध्ये आणि शहारामध्ये रोजगाराच्या  संधी उपलब्ध झाल्या पाहिजेतसर्वांची ओढ मुंबई कडेच का? भामट्या नेत्यानो थोडा प्रामाणिक विचार करा आणि मुंबई ला वाचवायला मदत  करा; आणि मतांचे राजकारण बंद करा !
आपल्या देशाला सर्वात मोटा लाभलेला शाप आहे जातीवाद धर्मवाद,आता नवीनच निर्माण झालेला प्रांतीय वाद! हे सर्व आतापासून नाही इतिहासात पण आपल्या बघायला मिळेल ,राजे शिवाजी यांनी  आपल्याला एकत्र आणण्याचा उत्तम प्रत्यन केला होता आणि तो यशस्वी हि होत होता पण दुर्दैवाने राजे वेळेच्या अगोदर या जगातून गेले ,त्यांच्या राज्यात त्यांनी कोणत्याही धर्माचा , जातीचा तिरस्कार केला नाही त्यांना अखंड हिंदुस्तान निर्माण करायचा होता तो पण सर्वाना सोबत घेऊन ..पण हा जनता राजा या जगातून गेल्यानंतर नंतरची राज्यकर्ते आणि जनता सर्वे विसरली आणि आपापसात वैर निर्माण करून वागू लागली अजूनही आपल्या देशातील जातीव्यवस्था संपत नाही ,देशातील  जनता देशाचा चांगला आणि वाईट इतिहास विसरली आहे पण देशातील नेत्यांनी देशाचा वाईट इतिहास लक्षात ठेवला आहे  तो म्हणजे इंग्रजांनी वापरलेली थोडा फोड राज्य करा ची नीती, इंग्रजांनी आपलीच माणसे आपल्या विरुद्ध वापरली तेच काम आपली नेते आज करता आहेत !
देशासाठी बलिदान दिलेल्याला देशभक्तांचे जीवन व्यर्थ जाते कि काय असे वाटते. सुभाषचंद्र बोस सारखे नेते देशाबाहेर राहून देशा       साठी लढले ..लोकमान्य टिळक,भगत सिंग,मौलाना आझाद मादाम कामा , गांधीजी , बाबासाहेब आंबेडकर सर्व जातीची आणि सर्व धर्माची लोक देशासाती लढली पण आजची नेते देशात राहून देश  आणि  जनतेमध्ये फुट  पडण्यासाठी लढत आहेत , देशातील नेत्यांसाठी  गंभीर प्रश्न आहेत देश कुणाचा  हिंदूंचा  कि मुसलमानाचा ? मुंबई कुणाची ? विदर्भ वेगळा हवा आहे कशाला ? तेलंगाना वेगळा हवा आहे कशाला ? काश्मीर मध्ये काय चालू आहे करोडो रुपयांचा खर्च  करून पण झेंडा फडकवू शकत नाही २६ जानेवारीला! देशाचे तुकडे करून नेत्यांना काय साध्य करायचे आहे ? खुर्ची आणि सत्ता मिळवायची आहे आणि देश लुटायचा आणि जनतेने फक्त गम्मत बघायची  आणि गप्पा मारायच्या, जनता फक्त गप्पा मारत असते! अमेरिकेमध्ये , ब्रिटन मध्ये  कायदे खूप चांगले आहेत , भारतात पण कायदे चांगले आहे त्यांचे पालन काण्याची हिम्मत दाखवावी  मग जनतेने इतर देशांचे कौतुक करावे, आपल्या कडे सर्व काही (बुद्धिमत्ता ,नैसर्गिक साधन संपत्ती ,तंत्रज्ञानआहे पण दुर्दैवाने  आपल्याकडे खरे देशप्रेम नाही! देशाच्या अधोगतीला  ज्याप्रमाणात  नेते, सरकारी अधिकारी जबबदार आहेत त्याच बरोबर जनता पण तेवढीच जबाबदार आहे  ! देशाच्या मुख्य समस्या आहेत गरिबी, पैशाचे केंद्रीकरण, (पैसा सर्वांकडे का नाही ?) शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी टंचाई ,बेरोजगारी ,गरिबांना शिक्षण,देशातील मुलभूत सुविधाचा अभाव,महिला सशक्तीकरण. भारत स्वतंत्र झाल्यापासून बर्याच महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे  , आमच्या नेत्यांसाती महत्त्वाच्या समस्या आहेत देश कुणाचा ? हिंदूंचा कि मुसामानाचा ह्या  जातीला आणि समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, तेलंगाना  वेगळा झाला पाहिजे ,विदर्भ वेगळा झाला पाहिजे, इतक्यावरच त्यांचे समाधान नाही होत आहे, तर ते सध्या मुंबई शहर कुणाचे ? या विषयावर जनतेला भडकवत आहेत! सर्व भारतीयांना माहिती आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे , साहजिकच मुंबई वर महाराष्ट्राचा अधिकार जास्त आहे! मला मान्य आहे देशातील सर्वांचा अधिकार आहे, पण जसा आईचा मुलांवर बापापेक्षा जास्त हक्क असतो कारण ते आईच्या रक्तामासाचा गोळा असतो आणि नऊ महिने तिने त्याला पोटामध्ये वाढवलेले असते ,त्याचप्रमाणे मुंबई वर हक्क महाराष्ट्राचा आहे आणि मग इतरांचा पण आहे , जसे गांधीनगर गुजरात साठी  महत्त्वाचे आहे , आग्रा उत्तरप्रदेश सठी, भोपाल मध्यप्रदेश सठी , हैदराबाद आंध्र साठी  महत्त्वाचे आहे तसेच  मुंबई महाराष्ट्रासाठी आहे! महाराष्ट्रातील आणि उत्तर भारतीय नेते जनतेला वेड्यात काडून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत! जनतेला असल्या भामट्या नेत्यांची गरज नाही , मुंबई ची भकाल वस्ती झाली आहे  मंत्रालय  पासून ते विरार, गोवंडी पर्यंत झोपडपट्ट्या वाढल्या आहेत जनतेला मुलभूत सुविधा मिळत नाही आणि मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे परदेशातून पाहुणे आल्यावर आम्ही काय दाखतो लोकल मधून- बाहेर शौचालयाला बसलेली जनता दाखवणार? मंत्रालय जवळची झोपडपट्टी दाखवणार ?-२ तास अडकलेली ट्राफिक दाखवणार ? कि संध्याकाळी आमच्या लोकाल ट्रेन मध्ये कोंबलेली जनता(जनावरासारखी) दाखवणार ? नेत्यानो  थोडे रस्त्यावर या झोपडपट्ट्या मध्ये फेर फटका मारा  थोडे जाणून घ्या कोण राहते झोपड्या मध्ये ? कशा प्रकारची लोक राहतात बोगस रेशन कार्ड बनवून विदेशी अतेरिकी प्रवृत्तीचे लोक तर नाही राहत ना? अगोदर  सर्व जाणून घ्या मग सांगा मुंबई कुणाची ? आणि मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण? किती दिवस मतांसाठी समाजात फूट पडणार ? चांगले उच्चशीक्षित नेते बोलतात कि मुंबईला आतंकवादी हल्ल्या पासून उत्तर भारतीय सैनिकांनी वाचविले! अरे मूर्ख नेत्यानो जेव्हा देशाचा नागरिक सैनिक सेवेत भरती  होतो तेव्हा तो देशाचा सैनिक मानून भरती होतो , राज्याचा सैनिक म्हणून नाही आणि हेच भामटे  नेते देशाला  एकात्मतेचा संदेश सांगणार यांची लायकी तरी आहे का ? अरे नेत्यानो देशातील प्रत्येक राज्य प्रत्येक  शहर सुधारले पाहिजे , समाजातील सर्व घटकांचा , सर्व जातींचा सर्व धर्माचा विकास झाला पाहिजे तेव्हा देश सुधारेल ! हे शहर कुणाचे, हा प्रदेश वेगळा पाहिजे, तो वेगळा पाहिजे  हे आता बंद  करा ,जनतेचा अंत बघू नका  जनता जनार्दनाला माझी एक कळकळीची विनंती आहे कि , आपले देशप्रेम फक्त २६ जानेवारी १५ ऑगस्ट साठी मर्यादित ठेवू नका . ते अखंड  राहूद्या ,नाहीतर देश परत गुलामगिरीत  जायला वेळ लागणार नाही आतापर्यंत आपण राजांची , इंग्रजांची, नेत्यांची  गुलामगिरी करत आलो आहे. असेच वागलात  आणि जाती-धर्माच्या नावाने वैर करत राहिलात तर देश परत गुलामगिरीत जाणार आणि त्यासाठी परत आपले स्वातंत्र सैनिक जन्म घेणार नाही कारण त्यांनी मागच्या ६० वर्षात काय झाले हे बघितले आहे ! देशातील राजकीय आणि धार्मिक नेत्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे कि त्यांनी जनतेला एक  दुसऱ्याच्या धर्माचा आणि जातीचा आदर करायला शिकवा आणि हे धर्माचे ,जातीचे आणि प्रांताचे राजकारण बंद करा! नाहीतर मग 
तुमच्या अंगावरचे कपडेओरबडून जनता तुम्हाला पायाखाली तुडवेल !                             

जय हिंद                                    जय महाराष्ट्र!

-रवींद्र पवार, नाशिक[रवींद्र पवारांचा हा लेख खास मुख्यमंत्री कार्यकर्ताच्या वाचकांसाठी येथे देत आहोत]