Friday, May 14, 2010

छावा: छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती (१४ मे) निमित्य हार्दिक शुभेच्छा!




महाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले.
त्यांच्या जयंती निमित्य काही दुखडे आम्हाला मांडायचे आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आपण बराच चूक मांडला आता पुन्हा त्या सत्य इतिहासाची आपण एकदा फेर मांडणी करायला हवी. इतिहास शिकणाऱ्या तरुणांनी हे शिवधनुष्य उचलावे. आणि संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने जे जातीय द्वेषाचे राजकारण होत आहे ते थांबवावे. महाराष्ट्र हा दलित, ब्राम्हण, मराठा या सगळ्यांचा आहे. इथच्या संकृतीवर, इतिहासावर, महापुरुषांवर प्रत्येकाचा हक्क आहे. पहिल्याने दुसऱ्याचा किंवा तिसर्याचा, दुसर्याने पहिल्याचा किंवा तिसर्याचा किंवा तिसर्याने पहिल्याचा किंवा दुसऱ्याचा द्वेष करू नये. आणि कुणीही कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी बाळगण्याचा प्रयत्न किंवा अट्टाहास करू नये; जमले तर विविध क्षेत्रात काही इतर-समाजबांधव मागे राहत असतील त्यांना हात द्यावा, जुन्या जाचक - रूढी आणि परंपरा यांना फाटा फोडून भावूबंधकीचा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने महा-राष्ट्र पुन्हा उभा करायला सर्वानीच 'जमेल तेथे जमेल तसे' प्रयत्न करायला हवेत.
वेब वर संभाजी महाराजांबद्दल बरेच काही उपद्रवी लेख आहेत त्यांचा नायनाट करणे हा आपण एक उदेष्य ठेवू, जिथे कुठे असे काही सापडेल ते पब्लिक फोरम मध्ये नकळवता जमेल त्या मार्गाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करूयात, हाच संकल्प आज सोडू.
सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बोला छत्रपती संभाजी महाराज की........... जय!
संभाजी महाराजांबद्दल अधिक येथे वाचा
संभाजी महाराज समाधी तुळापुर (पुणे) ला भेट देण्याचा विचार असेल तर हे नक्की वाचा.
जय जिजाऊ!
www.jijau.com

Sunday, May 2, 2010

महाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाचा लेख.....!

सदर लेखात शासनाने ओपन सोर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या बद्दल खूप काही दिले आहे.
----
आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळवून देणे आणि राज्यभाषेतील ‘कंटेन्ट क्रिएशन’ या दोन बाबींकडे तरी राज्य शासनाने प्रकर्षांने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आता गरज आहे- ‘डिजिटल व्हिजन’ची!
‘गिव्ह अस द व्हिजन दॅट वी मे नो व्हेअर टू स्टँड अ‍ॅण्ड व्हॉट टू स्टँड फॉर. बिकॉज अनलेस वी स्टँड फॉर समथिंग, वी विल फॉल फॉर एव्हरीथिंग !’
पीटर मार्शल यांचे हे विधान जगभरात गाजले. कारण माणूस, संस्था, राज्य अथवा देश यांना व्हिजन म्हणजे दूरदर्शीपणा का, कसा व किती गरजेचा असतो, हे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितले. वर्धापन दिनाच्या दिवशी सारे जण आपल्या यशाचे मूल्यमापन करतात. पण त्याच बरोबर गरज असते ती भविष्यातील वाटचालीच्या दिशादर्शनाची.
आज सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र काय अवस्थेत आहे? महाराष्ट्राने वेगवेगळ्या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा तज्ज्ञांनी घेतलेला आढावा मुळीच दिलासादायक नाही. येणारा काळ हे डिजिटल युग असणार आहे, याची जाणीव एव्हाना आता आपणा सर्वांनाच झालेली आहे, तशीच ती शासकीय पातळीवरही झालेली असावी. पण वास्तव मात्र, जाणीवजागृतीची गरज अधिक असल्याचे स्पष्ट करणारे आहे.
सध्या बरेच जण इंटरनेट आणि मोबाईलचा वापर बँकिंगसाठी करतात. कधी मोबाईलचे बिल तर कधी विजेचे बिल आपण इंटरनेटवरून भरतो आणि इंटरनेटचा पुरेपूर वापर करत असल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळते. जी आपली अवस्था तीच सरकारचीही. सरकारचे चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, त्या संबंधित विभागामध्ये संगणक लागले आणि तेथील कर्मचारी संगणकावर काम करू लागले की, सरकारला वाटते संगणकीकरण झाले. वेगवेगळ्या विभागांच्या वेबसाईटस् तयार झाल्या की, त्यांना वाटते आपण माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो आहोत. सामान्य जनता त्याचा वापर किती करते, त्यांच्या सोयीचे काय आहे- याचा विचार फारसा होताना दिसत नाही.

पूर्ण येथे वाचवा

सौजन्य: लोकसत्ता