Monday, March 5, 2012

मुंजे पिंपळा वरून लोकसत्तात उतरले

काल संध्याकाळी असच हातात लोकसत्ता घेतला आणि वाचावे नेटके या संपादकीय पानावरील (पण ७) मुख्यमंत्री.कॉम लिंक वर नजर गेली. वाचायला सुरुवात केली तर अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही. असो. पण आता हा लोकसत्ता मधील मुख्यमंत्री बद्दलचा लेख वाचून फारच कीव आली यांची. आणि नकळतच डोळ्यासमोर समोर हे खालील चित्र आले.गांधीजींच्या वाक्याचे - "आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता". 



तर घडले असे की एका मित्राने लोकसत्ताच्या वाचावे नेटके या ब्लॉग बद्दलच्या सदरा बद्दल सांगितले आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता ही पाठवा असे सुचवले. तेंव्हा खालील ई-मेल त्यांना पाठवला 


आणि मग लोकसत्तातील कुणी तरी हे खालील वर्णन म्हणजे 'प्रसिद्धीचा छुपा उमेदवार...' वगैरे मुख्यमंत्रीचे केले.




वरील ई-मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे या नावाने पाठवला गेला होता आणि वरील पिक्चर मध्ये 'अमोल सुरोशे' यांचे ठळक अक्षरात एकदम वरती असे नाव 'ब्लॉगर्स' म्हणून आहे. याचा अर्थ ते हा ब्लॉग चालवतात असा होतो आणि कुणाची ही त्यावर नजर पडेलच. तसेच अनेक लेखांच्या खाली ही सरळ सरळ अमोल सुरोशे हे नाव ही आहे. मराठी वाचणारा कुणी ही ते सहज वाचू शकतो. आणि पाठवलेल्या ई-मेल मधील हिरव्या रंगाने स्पष्ट केलेल्या ओळी अमोल सुरोशे या ब्लॉगच्या लेखकांपैकी एक आहेत हे ही ठीक ठीक मराठी वाचणारा आमच्या सारखा खेड्यातला माणूस ही सांगू शकेल राव. बर तिथे नीट समजले नसेल तर ब्लॉग वाचल्यावर  तर कुण्याही शहाण्या माणसाला ते समजेल.

म्हणजे याचा अर्थ  लोकसत्ताच्या त्या लेखाचा प्रॉब्लेम अमोल सुरोशे हे या ब्लॉग चे लेखक आहेत हा नव्हे तर अमोल 'सुरोशे' या ब्लॉग चे लेखक कसे, हा आहे का? ही पोट दुखी वेगळ्याच कारणाने आहे हे अगदी स्पष्ट होते. लोकसत्ता काही शहाणी (?) लोके लिहितात आणि काही शहाणी लोके वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग त्यांच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री आणि जिजाऊ.कॉम ही कधीच समर्थन करत नाही आणि किमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे. दुसरा काही तरी ट्राय करा. हा हा. कारण या असल्या टीकेने किंवा केलेल्या हशा ने फष्ट्रेत होणारांपैकी आम्ही नाहीच. दु:ख याचेच वाटते की अतिशय खालच्या पातळीवर येवून हीन अशा भाषेत लोकसत्ताच्या हुशार महोदयांनी हे लिखाण केलाय आणि हे कमीत कमी लोकसत्ता कडून  तरी अपेक्षित नव्हते. पण जेंव्हा जात आणि विशिष्ट वर्गाचा द्वेष डोळ्यात असते तेंव्हा मात्र हे होतेच. आणि या हुशार लेखकाचे तेच झाले.
हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून निघालेले हे पिंपळा वरचे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नको द्यायचे असे वाटते पण, न बोललेले शब्द म्हणजे गैरसमज आणि तो ही हार मानल्याचा म्हणून पुढील प्रपंच. नसता खरच मुख्यमंत्री समोर लोकसत्तातील हा लेख म्हणजे शुल्लक, आमच्यासाठी तरी. कारण आमचे ९०% पेक्षा अधिक वाचक कधीच डायरेक्ट डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. मुख्यमंत्री.कॉम टाकून ब्लॉग वर येत नाहीत ते येतात गुगल सर्च वरून. त्या मुळे त्या मुंज्याला अपेक्षित जाहिरात बाजी आम्हाला अपेक्षित नाहीच. आणि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही. खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. पण त्याच ही आम्हाला स्वतःलाच अप्रूप नाही. कारण मुख्यमंत्री.कॉम आणि जिजाऊ.कॉम  या विचारांसमोर अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे कुणीच नाहीत. असो. 

तर आम्ही या मुंजाच्या लेखनाचा निषेध वगैरे नोंदवणार नाहीत, सरळ समाचार घेणार आहोत आणि पोटदुखीची करणे ही दाखवणार आहोत. तर या महोदयांचे म्हणणे आले की 'हा एक अतिशय सामान्य ब्लॉग आहे.' अहो आहेच हा ब्लॉग सामान्य, आणि तो सामान्यांसाठीच आहे. तरी एक हुशार व्यक्ती आमच्या ब्लॉगला सामान्य म्हणते यातही आमचे मोठेपणाच. यात फार आक्षेप नाही. पुढे शिवजयंतीच्या लेखा बद्दल ते म्हणतात की 'शिवरायांबद्दल अधिक लिहल गेलय आणि सध्य प्रश्ना बद्दल कमी.' अरे मुंज्या तो लेख शिवजयंतीचा आहे तिथे शिवरायाच केंद्र असणार. आणि तो लेखच नव्हे तर सगळा ब्लॉग आणि तुमचा सगळा पेपर ही त्या दिवशी शिवरायंचे गीत गाण्यात घालवला तरी ही त्यांचे उपकार फिटणार नाहीत. आणि त्यांच्या पुढे आपण सगळेच निष्प्रभ. तो तर एकच लेख होता. ओके ओके तर पोटदुखी याची का - की शिवजयंतीच्या दिवशी हे लोक 'विचार' करायला लागलेत. कारण समस्त मुंजांना वाटते की या समाज घटकाने फक्त रस्त्यावर फिरावे, धिंगाणा घालावा, आक्रमक व्हावे, ढोल ताशे बदडून जयंत्या साजऱ्या कराव्यात पण 'विचार' करू नये. कारण यांची खरी हार आम्ही विचारा करायला लागण्यात आहे. असो. आता तर अधिक पटीने विचार करणार.
पुढे आम्ही दलित ग्रामीण साहित्याच्या व्याखेची टर उडवली असे त्यांचे म्हणणे आहे आणि पुन्हा हे आमच्या 'हीन अभिरुचीच' उदाहरण अशी जी खालच्या पातळीची भाषा त्या मुंज्याने वापरली आहे ती वाचून त्यांचा पोटशूळ किती मोठा आहे ते कळाले. होय आम्ही ग्रामीण आणि दलित साहित्यिक अभिरुचीहिणच तुमच्या नजरेत. अरे बाबा ती व्याख्या पुन्हा एकदा वाच. ती आमची किंवा आमच्या मित्राची नसून, टेबलाच्या पलीकडचे म्हणजे आम्ही ज्या बाजूला आहोत त्याच्या विरोधी बाजूचे लोक (म्हणजे तुमच्या बाजूचे) दलित आणि ग्रामीण साहित्याकडे कसे बघतात हे सांगणारी आहे. आणि दलित आणि ग्रामीण साहित्याचा एकच शब्दखंड की काय तुमच्या सारख्यांनी एकाच पुस्तकात का केला याच कारण सांगते. तुम्ही दोन्ही साहित्य प्रकारांना थोड्या बहोत प्रकारांने चुकाच समजता. असो, तुम्ही आम्हाला आता पर्यंत अभिरुची हीन म्हणतच आलात, तुमच्यात फार फरक होणार नाही, तुम्ही लुप्त होई पर्यंत तरी. आणि हे ही पोट दुखीचे करणाच ना की शेतकरी, खेड्यातले अमच्यासाखे चार शब्द लिहायला शिकले. हो की नाही. :). असो. 
तुमचे विश्लेषण की काय ते आमच्या शैलीच्या पलीकडे विचारानं पर्यंत जाऊच शकले नाहीत. ते अधिक आवडले असते. चार शिव्या जरी दिल्या असत्या विचारांना तरी. कारण तिथे सरळ मुकाबला करता आला असता विचारांचा. पण इथे तुम्ही शैलीत अडकवून शालीतून जे निशाने साधायचा प्रयत्न करताय तो तुमच्या सारख्या प्रतिभावंताला (?) अशोभनीय आणि तुमचीच संकोचित विचार वृत्ती दाखवतो.
तसा लोकसत्ताचा आम्ही फार आदर करायचो पण जात्यंध आणि वर्गान्ध्या झालेले तुम्ही त्या नावाला एक दिवस काळिमा फसणार आणि तुमच्या मुळे नव्हे तर, गर्वाने सांगतो शिवरायांच्या विचारानं मुळेच, येणारा पुरोगामी महाराष्ट्र तुमच्या सारख्या पुरोगामित्वाच्या शाली पांघर्लेल्यांना कधीच माफ करणार  नाही. कारण तुम्ही अनेकांना दाबून दडपून, हीन लेखून निहीसे करण्याचा प्रयत्न करत आहात, हातात मेडीयाची ताकद असल्याने. पण बहुजन समाज आणि सामान्य माणूस हे सगळं आता तरी समजलाय. आणि तुम्ही चुकीच्यान वर वार केलाय, एकटे आम्ही कधीच नाहीसे होणारण नाहीत! जर आयोग्यच वाटत होता ब्लॉग तर अर्ध पण वाया घालवल नसतं तुम्ही. पण हीनवण्याची संधी सोडली तर ते मुंजे कसले! आम्ही म्हंटला ना तुम्ही आम्हाला बऱ्याच जागी भेटलात. पुण्यात ब्लॉगर्स मिट ला भेटलात. तेथे आमच्या सोबत आलेल्या कांबळे नावाच्या मित्राला त्याचे नाव माहित नसल्याने आनंदाच्या आवेगात जेंव्हा साहित्य संमलेनाच्या अध्यक्षान विषयी काही तरी बातमी आली तेंव्हा म्हणालात 'बरं झाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुणी शिंदे, जाधव, कांबळे झाले नाहीत'. त्या साहितीकाच्या विरोधात आम्हाला अस काहीच नाही. पण माननीय मुंजे तुम्ही आम्हाला अनेक ठिकाणी भेटता. तुम्हाला हा आत्मविश्वास झालाय की जिथे तुम्ही असता तिथे आम्ही पोहोचायची लायकीच नाही. पण तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. तुमच्या शालीच्या वरून तुम्ही कोण हे अनेकांना दिसले आहे आणि ज्यांना दिसले नाही त्यांना ही एक दिवस दिसेलच. तुम्ही व्यक्ती नाहीत तुम्ही एक प्रवृत्ती आहात - पिंपळावरील मुंजे - नावाची.                             
तुमच्या त्या द्वेष पूर्ण लेखाने आमच फार काही बिघडत नाही पण आमच्या वाचकांचा गैरसमज होऊ नये आणि तुमच्या सारख्यांचे जातीय विचार जास्त पसरून आमच्या या सामजिक क्रांतीच्या प्रवाहाला अडसर होवून नये ही काळजी म्हणून हा प्रपंच. आणि तस ही तुम्ही आता थांबवू शकत नाहीत आम्हाला. आता तर नक्कीच नाही! कारण आधी कधी कधी वाटायचे  आमचे विचार योग्य आहेत का? पण तुमच्या सारख्या कडून विरोध झालाय म्हंटल्यावर तर आत्मविश्वासच आला की नक्कीच आम्ही योग्य दिशेने जातोय. तो फुटकळ जातीय द्वेष पूर्ण लेख लिहून तुमच्या विचारांची किंमत तुम्ही अगदी तुमच्या पेपरच्या रद्दीच्या किमती इतकीच केलीत, अजून जास्त घसरू नका, वेळे आधीच नाहीसे व्हाल. 
आमचे विचार भले ही सामाजिक असोत,पण ते आमचे व्यक्तिगत विचार आहेत. ज्यांना पटतील त्यांनी जरूर वाचावेत, टीका कराव्यात, पण उद्देश्य स्पष्ट असावा. आमच्या या जिजाऊ, शिवराय, फुले, आंबेडकर, तुकडोजी, गाडगेबाबा यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळीला तुमच्या शुभेच्छा नसल्या तरी ही चालतील. आमचे मोजकेच का असेनात पण  हितचिंतक फार खंबीर आहेत.

जय जिजाऊ!                                                                                                                    जय शिवराय!
जय महाराष्ट्र!

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता

1 comment:

प्रकाश पोळ said...

मुख्यमंत्री कार्यकर्ता हा अतिशय छान ब्लॉग आहे. मी या ब्लॉगचा नियमित वाचक आहे. मराठीतील एक दर्जेदार ब्लॉग असे मी मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या बाबतीत म्हणेन.
परंतु तुमचं ब्लॉग दर्जेदार आहे की निव्वळ क्षुल्लक हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आजपर्यंत ज्या मुंज्यानी चांगले काय नि वाईट काय हे ठरवले तेच तुमच्या ब्लॉगचा दर्जा ठरवणार. कारण ठरवणे त्यांच्या हातात आहे असे त्यांना वाटते.
प्रसिद्धी माध्यमे बहुतांशी प्रमाणात त्यांच्याच हातात असल्याने ते त्यांना हवी ती प्रतिमा समाजात निर्माण करू शकतात. परंतु बहुजन वाचक एवढ्याने भुलणार नाही. आपले लिखाण उत्तम आहे. नित्य लेखन करावे. सर्व बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे.
मीही अशा जातीय/धर्मांध प्रवृत्तीविरुद्ध बहुजन समाजात जागृती करण्यासाठी सह्याद्री बाणा ब्लॉग तयार केला आहे. भाषा थोडी परखड वाटेल, परंतु ब्लॉग वाचावा आणि प्रतिक्रिया द्यावी.
आपला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचा लेख सह्याद्री बाणावर प्रसिद्ध केला आहे.
http://www.sahyadribana.com/

Post a Comment