Thursday, December 13, 2012

यशवंतराव चव्हाण विचार मंच



फेसबुक वर यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्य सुरु झालेल्या या उपक्रमाला आपली साथ लाभावी. त्यातून आणि या सह्याद्रीच्या मातीने बनलेल्या महापुरुषाच्या विचारातून तुम्हाला ही नक्कीच खूप काही सकारात्मक भेटेल. 

त्या पानावरील काही नोन्दी :

यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर ते खरे समाजकारणी होते. राज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवला. म्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनले. अखेरपर्यंत त्यांनी साहित्यसेवा केली. त्यांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे....”
-
मा.श्री. विनायकराव अभ्यंकर, निवृत्त नौसेना अधिकारी
-- 
"यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात समाज परिवर्तन घडविणारे अनेक चांगले निर्णय घेतले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. त्यांच्या आई, विठाई या न शिकलेल्या. घरात आर्थिक चणचण, कोणताही आधार नाही, अशा परिस्थितीत यशवंतराव मोठे झाले. त्यांच्या आईने त्यांना काबाडकष्ट करून शिकविले. याचे भान ठेऊन यशवंतरावांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो गरीब मुलांसाठी. या मुलांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी 900 रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलती देण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. यात तीव्रता होती, मात्र कटूता कुठेही नव्हती. संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा व निरोपाचा ठराव विरोधी पक्षाने मांडला होता. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. हीच याश्वान्त्रावांची खरी कमाई होती..."
-
मा. श्री. मधुकर भावे, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार
--
"यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे असामान्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांच्या नावाचे प्रभुत्व मराठी मनांवर आजही आहे. या नावाला अन्य विशेषणांची गरज नाही. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, निर्णय त्यांची संवेदनशीलता, सुसंस्कृतता यांचा प्रभाव नव्या पिढीवर पडणे गरजेचे आहे. शिक्षणाला साधन मानणाऱ्या यशवंतरावांनी गरीब घरातील मुलांसाठी आर्थिक निकष लावून मोफत शिक्षणाची सोय करताना आपले मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते...."-मा. डॉ. एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, पुणे.
--
युरोप अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे. कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. सहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाही. सद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे...”
-
मा. श्री. भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत 
--
यशवंतरावांनंतर राज्याचे विघटन सुरु झाले. यशवंतरावांनी महाराष्ट्राला जातीविरहित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यानंतर अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केले. मात्र आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीत. यशवंतरावानंतर महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आज देशात व महाराष्ट्रात राहिले नाही...”
-
मा. श्री. श्रीनिवास पाटील, माजी खासदार, कराड 
-- 
यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारला गवसणी घालून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे एकही नेतृत्व आज राहिले नाही. महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत मागे राहिला आहे. यशवंतरावानंतर जातिवादावर अस्मिता जपणारे संघटन वाढू लागले आहे...”
-
मा.श्री. किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत

अधिक जाणण्यासाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया येथे भेट द्या : https://www.facebook.com/pages/Yashwant-Vichar-Manch/280568318692687

No comments:

Post a Comment