Thursday, January 29, 2009

गांधी पुण्यतिथि - माझे विचार

आज गांधी पुण्यतिथि ... ३० जानेवारी १९४८ या इतिहासातील काळ्या दिवशी एका महा पर्वाचा अंत झाला.. त्यांच्या बद्दल आजच्या युवाकमधे खुप समाज-गैरसमज आहेत ..

आजच्या विचार करणार्या युवाकसाठी आजच्या दिवशी केलेला माज्या कडून हा छोटा प्रयत्न ... थोड़ा विचार करायला लावणारा प्रयत्न ...


1. सर्वात जास्त बोलले जाते असे ... माझ्या एका थोबाडीत मारली तर मी दूसरा गाल पुढे करीन - इति गांधी, पण मित्रानो सत्य थोड़ा वेगल आहे ... ते म्हणाले होते

'एकानं थोबाडीत मारली म्हणून त्याच्या भावाच्या थोबाडीत मारणं मला मंजूर नाही.'

आर्थाचा अनर्थ कसा करतात हे आपल्या सर्वाना "राज ठाकरे" यांच्या बाबतीत हिन्दी चैनल वाल्यानी काय केले या वरुण स्पष्ट झालेच आसेल .. तसाच घडले आहे गंधिजिच्या बाबतीत ,, आगदी जाणीव पूर्वक जे पाहिजे तेच

पोचवायचे लोकांपर्यंत ... एका ठिकाणी झालेल्या हिंदू मुस्लिम दंगालिचा राग दूसरी कडील त्यांच्या बंधू - भागिनिवर काढ़ने चुकीचे आहे आसाच ते म्हणाले .. आणि ते बरोबरच होते

2. सूडाचा बदला सूडानं म्हणजे 'जशास तसं' वागल्यानं पांडवांचा विजय झाला, असं महाभारतात म्हटलं आहे ना?'- प्रार्थनेला हजर असलेल्या एकदा एका तरुणानं जरा तावातावानंच

महात्माजींना विचारलं. 'महाभारताचा लावलेला तो अर्थ मला बरोबर वाटत नाही,' महात्माजी उत्तरले, 'बळाच्या जोरावर मिळवलेला विजय, हा खरा विजय नसतोच मुळी, हाच संदेश त्या महाकाव्यानं दिला आहे. पांडवांनी मिळवलेला विजय पोकळ आणि

निर्थक होता, हीच महाभारताची खरी शिकवण आहे. एकाच कुळाचे पांडव आणि कौरव आपसात लढले. त्यात दुष्टांचा नाश झाला हे जरी खरं असलं तरी त्या युद्धाचा शेवट काय झाला? पांडवांनी कुणावर राज्य केलं? तर एका स्मशानरूपी देशावरच ना?

युद्ध जिंकल्याचा आनंद उपभोगायला किती पांडव शिल्लक राहिले? फक्त सातजण! सूडाचा बदला सूडानं घेतला जाऊ लागला, तर काही दिवसांतच आपल्या देशाची तीच स्थिती होणार आहे.'

3. स्वातंत्र्यानंतरही सर्वसामान्यांच्या मनात जातीधर्माचा आधार घेत विद्वेष भिनवण्याचे काम काही शक्ती अविरतपणे करीत आहेत. विचारांची लढाई विचारांनी लढावी, हे सूत्र नाकारत ते व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेतात व विचार संपविण्याचा प्रयत्न करतात.

ही धर्माध मंडळी इतिहास विपरीत स्वरूपात मांडतात. गैरसोयीची ठरणारी इतिहासातील पाने पुसतात. अशाच मनोवृत्तीने ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. ही हत्या ज्या नथुराम गोडसेने केली तो एक व्यक्ती नव्हता, तो विद्वेषाचे

राजकारण करणाऱ्या शक्तींचा प्रतिनिधी होता.

4. महात्मा गांधींच्या हत्येची कारणे खोटी होती हे इतिहासाच्या दाखल्यांवरून सिद्ध होते.


गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न १५ वेळा झाला. त्यातील दोन हल्ले तर नथुराम गोडसेनेच केले होते. त्यामागचे एक कारण मुस्लिमांचे तुष्टीकरण व दुसरे ते फाळणीला जबाबदार होते, असे सांगण्यात आले; पण द्विराष्ट्र ही मुस्लिम लीग व हिंदूमहासभेची मागणी होती.

मुस्लिमांचे तुष्टीकरण हे कारण होते, तर स्वातंत्र्यपूर्व काळात १९३५ साली नथुरामने हल्ला का केला?

5. आज देशात अनुभवास येणारी धर्माधता, मग ती बहुसंख्याक हिंदूंची असो वा अल्पसंख्याक मुस्लिमांची, देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता आणि ऐक्याला मारक असल्याने तिचा मुकाबला सर्व स्तरांवर करणे अगत्याचे आहे. यासाठी सत्य

जाणून घेतले पाहिजे.

'गांधीजींचे राजकारण मुस्लिम अनुनयाचे होते, त्याची परिणती फाळणीत झाली. फाळणीनंतरही गांधींचे मुस्लिमप्रेम संपले नाही. त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केले म्हणून त्यांची हत्या झाली', असा प्रचार काही लोकांकडून

सातत्याने करण्यात येतो. पण वस्तुस्थिती तशी नव्हती.

स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या प्रवासात महात्मा गांधींच्या विचारांना विश्वमान्यता मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील महात्मा गांधींच्या विचारांना जाहीर मुजरा केला, पण भारतात मात्र नथुरामांचे वारसदार विद्वेषाचे

विष पेरतच आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर त्यांच्याच भाषेत देणे हे आपले कर्तव्य ठरेल, पण त्यांचीच नीती जेव्हा स्वकीय आपल्या मायभूमीत स्वत:चे उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी अमलात आणतात,

तेव्हा म्हणावेसे वाटते- 'गांधी, हम शर्मिदा हैं, तेरे कातिल अभी भी जिंदा हैं!'


हा मेल पाठ्वान्याचा एकाच हेतु होता ... आपण बरेच गांधी बद्दल फक्त एकिव बोलतो .. पण कधी स्वतः हुन विचार पण केला का ???आता तरी आपला देश विचारानी तरी स्वतंत्र होणार का .. का अजुन पण आपण विचारानी

गुलामच राहणार आहोत .....

आज त्यांच्या पुण्यतिथि निमित्या आपण सर्वानी एका आचारशील.. आणि विचारशील भारताच्या निर्मितीची शपथ घेउया ..

जय हिंद .. जय महाराष्ट्र


अमोल सुरोशे