Wednesday, July 18, 2012

नामांतर चळवळ, जात आणि यशवंतराव

आंबेडकर लाईव्ह या संकेत स्थळावरील प्रा. अरुण कांबळे यांच्या 'नामांतराचे दिवस' या लेखातील यशवंत यांच्या बद्दल या काही ओळी.  पूर्ण लेख ही खूप चांगला आहे आणि नामांतराच्या चळवळीचे जवळपास चित्राचा कांबळे यांच्या लेखणीत उभे राहते. नक्की वाचवा.


" मी यशवंतरावांना भेटत असे. यशवंतरावांनी नेहमीच्या पद्धतीने माझे स्वागत केले. साहित्यिक घडामोडीसंबंधी चर्चाही केली. मराठवाड्यातील हिंसाचाराबद्दल बोलणे सुरू झाले तेव्हा अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती असलेली ध्वनिफित मी त्यांना ऐकवली. दलितांच्या मदतीला धावून जाणार्‍या नांदेडच्या महाजन पाटलाची हकीकत ऐकून यशवंतराव भारावले. त्यांच्या डोळयातून अश्रूधारा वाहिल्या, माझा हात धरून ते म्हणाले, ” आमचीही स्थिती महाजन पाटलांसारखी आहे. मराठवाड्यातील लोक माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.” यशवंतरावांचे ते पाणावलेले डोळे आजही माझ्या डोळयांसमोर दिसताहेत. "


 सौजन्य: http://www.ambedkarlive.com

No comments:

Post a Comment