Tuesday, July 17, 2012

राजकीय निरक्षरता ही सगळ्यात भयानक आणि नुकसानकारक असते


राजकारणाबद्दल कोणत्याही देशातील लोकांची जागरूकता विषद करणाऱ्या या काही ओळी आज चाललेल्या अंधा धुंदीचे चांगले विशालेषण करते. 
राजकीय निरक्षरता ही  सगळ्यात भयानक आणि नुकसानकारक असते. त्या मुळेच समाजातील आणि राष्ट्रातील अनेक मानव निर्मित प्रश्न उद्भवतात. राजकारणाबद्दल जागरूक असणे अतिशय म्हन्त्वाचे असते कारण आपण ज्यांच्या हातात सत्ता देतो आणि राष्ट्र देतो तेच आपले आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य ठरवत असतात. आपण त्यांना निवडण्यात चुकलो किंवा मग त्या प्रक्रीयेपासुना  नाम निराळे राहिलो तर उद्या नक्कीच आपल्याला भयंकर अशा भविष्य काळाला सामोरे जावे लागेल. पण त्या पेक्षा सोपा उपाय या सगळ्या बद्दल जागरूक राहणे आणि त्यात सक्रीय असा सहभाग घेणे. 

बर सहभाग म्हणजे राजकारण्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणे नव्हे तर, 

1. सक्षम आणि इमानदार राजकारण्यांच्या मागे भक्कम उभे राहणे

2. तसे राजकारणी नसतील तर ते शोधणे सापडले नाही तर

3. निर्माण करणे

4. असे चांगले राजकारणी निवडून येतील त्यासाठी जमेल त्या प्रकारे त्यांच्या बाजुने बोलणे 

आपल्या या बद्दलच्या प्रक्रिया आम्हाला नक्की कळवा. आम्हाला डावे, उजवे किंवा कुणीही वर्ज्य नाहीत.  

No comments:

Post a Comment