Monday, July 23, 2012

टीम अण्णा.... जरा सांभाळून !!



देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले भारताचे १३ वे राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी यांच्या विरुद्ध टीम अण्णाने अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

भारताचे राष्ट्रपतीपद म्हणजे एक संवैधानिक पद असते, हे पद म्हणजे या देशाची प्रतिष्ठा असते म्हणूनच या प्रतिष्ठेला कधीच धक्का लागू नये म्हणून राष्ट्रपती पदाबाबत एक आचारसहिंता पाळणे या देशात सर्वांनाच बंधनकारक असते, स्वतः राष्ट्रपतींना सुद्धा या पदाची प्रतिष्ठा सांभाळण्याचे बंधन असते. असे असतांना टीम अण्णा नामक एक टोळके या देशाच्या एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या माणसाविरुद्ध केवळ बडबड करते हे काही योग्य नाही.

आयुष्याची चाळीस - पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात घालवायची, सबंध काळामध्ये कधी हि स्वतःवर कुठला डाग लागू नये याची काळजी घ्यायची सोबत दिवस रात्र काम हि करायचे ! एवढा सारं करायचं आणि कुणीही उठायचा आणि काही हि बोलायचं याला काही अर्थ आहे का? प्रणव मुखर्जी यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि स्वच्छ नेत्यांवर फ़क़्त ते कॉंग्रेस चे आहेत म्हणून उठ सूट टीका.. बर टीका करणारे हि कोण, समाजात कुठले हि स्थान निर्माण न करू शकलेले. आपली पोटं भरली कि ह्यांना देशाच्या भुकेची चिंता होते ! आणि टीव्ही बघत देशाच्या सबंध व्यवस्थेलाच शिव्यांची लाखोली वाहतात. खर तर ज्या व्यवस्थेमुळे सर्व सामान्य गरीब जनतेला एक आवाज प्राप्त झाला आहे थेट त्या व्यवस्थेलाच हे लोक टाकाऊ म्हणून बोंबा मारत फिरतात.


भ्रष्टाचाराला विरोध हा सर्वमान्यच पण त्यासाठी देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणे कदापि मान्य नाही , व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करण्याला हि काही मर्यादा असतात बाकी तुमच्या कडे जर खरच भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे आहेत तर हि लढाई कोर्टाद्वारे पण लढता आली असती पण निव्वळ प्रसिद्धी च्या भूकेपोटी नुसते आरोप करत सुटायचे हे कुठे तरी थांबायला हवे.

एक  गोष्ट मात्र  नक्की आहे , याच व्यवस्थेने हजारो वर्षे गुलामगिरी मध्ये असणाऱ्या देशाचा . विविधतेने नटलेल्या देशाचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकलाय ! हि व्यवस्था खूप भक्कम आहे त्यात वेळोवेळी सुधारणा हि हवीच आणि ती होणारही पण ते सुद्धा सर्व सामान्य "नियमित" मतदान करणाऱ्या  माणसाच्या मर्जीने आणि इच्छेनेच ! न कि ट्विटर, फेसबुक, मेडिया किंवा एखादी टीम  म्हणते म्हणून.

सबंध राजकीय व्यवस्थाच भ्रष्ट आणि आम्हीच काय ते धुतल्या तांदळाचे अश्या अविर्भावात टीम अण्णा राहिली आणि त्यामुळेच अनेक लोक या चळवळी पासून दुरावले ते कायमचेच ! आता हि अण्णा टीम ने जर स्वतःला आवर नाही घातला तर लोकांच्या मेहनतीने उभी राहिलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ यांच्या सारख्या लोकांमुळे संपुष्टात येईल... त्यामुळे सांगतोय .. जरा सांभाळून !

- अमोल


No comments:

Post a Comment