Wednesday, November 24, 2010

लालू - पासवान यांना बिहारी दणका !

देशातील सर्वात मागासलेल्या राज्यात निवडणुका पार पडल्या, तुलनेने कमी हिंसाचार यंदा बघायला मिळाला पण या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात बरेच रथी महारथी एकमेकांसमोर उभे टाकले होते.
या राज्यातील तमाम बिहारी जनतेने केवळ आणि केवळ विकासाला साथ देऊन बाकी सर्वांना अक्षरशः धूळ चारली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या विकास कामांची पावती म्हणून त्यांना निर्विवाद सत्ता देण्याचे काम येथील जनतेने केले. खरोखरच हि एक बदलाची नांदीच म्हणावी लागेल, वर्षानुवर्षे केवळ जाती-धर्माच्या आधारे निवडणुका जीन्कानार्यांना जनतेने जोरदार चपराक दिला आहे.

बिहार मध्ये केवळ जाती पतीच्या समीकरणाने १५-१५ वर्षे सत्ता उपभोगणारे लालू-पासवान असो वा बिहारी स्वाभिमानावर आघात करणारी कॉंग्रेस जी आपल्या प्रचारसभे मध्ये "हमने पैसा दिया, हमने पैसा दिया" म्हणून बिहारी जनतेचा स्वाभिमान दुखावत होती, कुठल्याही प्रकारचा विकास न करता ज्यांनी केवळ टोलवा- टोलवी केली त्यांना बिहारी जनतेने साफ नाकारले आणि विकासाची एक आशा निर्माण करणाऱ्या नितीश कुमारांच्या हात मध्ये एक हाती सत्ता देऊन त्यांना बिहारच्या विकासासाठी पाठींबा दिला. देशातील एक महत्वाचे राज्य पण गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अज्ञान यांनी ग्रासलेला, खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर त्यामुळे देशातील इतर राज्यांवर पडणारा ताण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर याला पर्याय म्हणजे फ़क़्त आणि फ़क़्त बिहार चा विकास, मग तो कोणी पण का करेना. बिहार चा विकास म्हणजेच पर्यायाने भारताचा विकास. भारताला लागलेला मागासलेपणाचा हा कलंक पुसण्यासाठी हि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता लोकांनीच ठरवावे कशाला महत्व द्यायचे, देशातील सर्वात मागासलेल्या राज्यातील लोकांना देखील आता हेच ठासून सांगायचे आहे कि बस झाले आता, ६० वर्षे झाली आता केवळ विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांनीच इथे राज्य करावे. सततच्या राजकारणाला कंटाळून आता तेथील जनता एकदिलाने विकासाच्या आशेत आहे, आपण आता अपेक्षा करावी कि बिहार आता विकासाच्या दिशेने आपली वाटचाल पुढे चालू करील.

जय हिंद - जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे नांदापूरकर

No comments:

Post a Comment