Showing posts with label maharashtra. Show all posts
Showing posts with label maharashtra. Show all posts

Thursday, June 16, 2011

जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते



राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब
[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४]
स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू. स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग.
त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते.
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचला. म्हणूनच पुन्हा नवीन स्वरुपात जिजाऊ.कॉम आणण्याचा विचार झाला. आणि आज, त्या नवीन स्वरुपासाहित, जिजाऊ.कॉम आऊसाहेबां चरणी अर्पण करत आहोत.

राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.

आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन.
जय जिजाऊ.

आपलेच,
कार्यकर्ते, जिजाऊ.कॉम



>आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही. आम्हाला घेणे आहे ते फक्त राष्ट्राच्या निर्माणाशी, शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसाशी.

>
आम्हाला कोणत्याही जात, धर्म, राष्ट्र,राज्य, पक्ष, वर्ग [आर्थिक/शिक्षित/अशिक्षित/शहरी/ग्रामीण] चे वावडे नाही.

भेट द्या आणि सहभाग नोंदवा : www.jijau.com


Monday, March 21, 2011

कुणी इंग्रजीत महाराष्ट्राबद्दल इतक छान लिहल की मन कस आनंदी होत

Sunrise in the west

I go to Maharashtra a couple of times a year, trips to Mumbai not counted, to a cooperative in the rain shadow region of the Sahyadris.
The cooperative has an old tradition of involving an economist in its work, since it was found by the legendary Professor D.R. Gadgil. Ihave been with them for the last three decades, arguing first for diversification — since cane in a dry region was clearly not sustainable — and then in the early ‘90s arguing for knowledge as a source of growth. They spend around Rs 90 crore a year on education and health now, and I am happy also to see this feed back into better agriculture.
Maharashtra agriculture has done decently well, given its severe resource constraint: water. In my mind, the star performers are: a million hectares under tree crops and horticulture; a fishing economy doing reasonably well; and of course, Bt cotton. The tree crops go back to Shankar Rao Kolhe’s perspective plan for horticulture. Shankar Rao, the sugar baron of Kopargaon, prepared a long-term horticulture plan for Maharashtra when minister, and an excellent support system was developed to implement it. This continues. Today, Maharashtra has a complete package including financial, technological and processingsupport to any one wanting to seriously grow tree crops — a boon in this dry region. 

To me, a great pleasure is to watch Gandhi-capped Patils coming on their Hondas and partaking of mutton biryani and Marathi chicken with their Chardonnay in the dry districts’ wineries. There are around 60, producing around 97 per cent of the stuff made in India. Globalisation at its benign best. Dairying has done well too, and in recent years the production of value-added products like skimmed milk, white butter and so on has grown at phenomenal annual rates, like 80 per cent.  

पूर्ण येथे वाचा .. http://www.indianexpress.com/news/sunrise-in-the-west/765147/

 

Friday, November 26, 2010

एका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उमप नावाचा झंझावात शांत


अगदी काल पवारवा पर्यंत विठ्ठल उमप नावाच्या शाहिराने अवघा महाराष्ट्र आपल्या पोवाड्याने जागवला होता. आज तो पोवाडाच शांत झाला. विठ्ठल उमप यांचे आज दिनांक २६ नोव्हे. २०१० रोजी नागपूर येथे भाषण देतांना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते  ८० वर्षाचे होते. वयाच्या ८ व्या वर्षा पासून ते  ८० वर्षांपर्यंत विठ्ठल गंगाधर उमप  हे संगीत क्षेत्रात कार्यरत होते. महाराष्ट्रच शाहिरीभूषण  असलेले विठ्ठल उमप एक उत्कृष्ट नाटककार, संगीतकार, गीतकार आणि शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आंबेडकरी चळवळीला उमपांचे खूप मोठे योगदान आहे आणि अवघा महाराष्ट्र या त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही आणि खरं पहिल तर मुक्त होऊ ही इच्छित नाही. एका कलाकाराला मंचावर असताना मृत्यू यावा हीच खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचे  लोन महाराष्ट्रभर घेऊन जाणारे शाहीर शेवटचा श्वास घेताना जय भीम म्हणूनच गेले.   
त्यांच्या पोवाड्यांनी आजही महाराष्ट्र गर्वाने छाती फुगतो आणि असाच फुगवत राहावा हीच पांडुरंगा  चरणी प्रार्थना.

Wednesday, November 24, 2010

लालू - पासवान यांना बिहारी दणका !

देशातील सर्वात मागासलेल्या राज्यात निवडणुका पार पडल्या, तुलनेने कमी हिंसाचार यंदा बघायला मिळाला पण या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात बरेच रथी महारथी एकमेकांसमोर उभे टाकले होते.
या राज्यातील तमाम बिहारी जनतेने केवळ आणि केवळ विकासाला साथ देऊन बाकी सर्वांना अक्षरशः धूळ चारली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या विकास कामांची पावती म्हणून त्यांना निर्विवाद सत्ता देण्याचे काम येथील जनतेने केले. खरोखरच हि एक बदलाची नांदीच म्हणावी लागेल, वर्षानुवर्षे केवळ जाती-धर्माच्या आधारे निवडणुका जीन्कानार्यांना जनतेने जोरदार चपराक दिला आहे.

बिहार मध्ये केवळ जाती पतीच्या समीकरणाने १५-१५ वर्षे सत्ता उपभोगणारे लालू-पासवान असो वा बिहारी स्वाभिमानावर आघात करणारी कॉंग्रेस जी आपल्या प्रचारसभे मध्ये "हमने पैसा दिया, हमने पैसा दिया" म्हणून बिहारी जनतेचा स्वाभिमान दुखावत होती, कुठल्याही प्रकारचा विकास न करता ज्यांनी केवळ टोलवा- टोलवी केली त्यांना बिहारी जनतेने साफ नाकारले आणि विकासाची एक आशा निर्माण करणाऱ्या नितीश कुमारांच्या हात मध्ये एक हाती सत्ता देऊन त्यांना बिहारच्या विकासासाठी पाठींबा दिला. देशातील एक महत्वाचे राज्य पण गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अज्ञान यांनी ग्रासलेला, खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर त्यामुळे देशातील इतर राज्यांवर पडणारा ताण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर याला पर्याय म्हणजे फ़क़्त आणि फ़क़्त बिहार चा विकास, मग तो कोणी पण का करेना. बिहार चा विकास म्हणजेच पर्यायाने भारताचा विकास. भारताला लागलेला मागासलेपणाचा हा कलंक पुसण्यासाठी हि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता लोकांनीच ठरवावे कशाला महत्व द्यायचे, देशातील सर्वात मागासलेल्या राज्यातील लोकांना देखील आता हेच ठासून सांगायचे आहे कि बस झाले आता, ६० वर्षे झाली आता केवळ विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांनीच इथे राज्य करावे. सततच्या राजकारणाला कंटाळून आता तेथील जनता एकदिलाने विकासाच्या आशेत आहे, आपण आता अपेक्षा करावी कि बिहार आता विकासाच्या दिशेने आपली वाटचाल पुढे चालू करील.

जय हिंद - जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे नांदापूरकर

Tuesday, February 2, 2010

राहुल गांधीला रोक ठोक उत्तर.......!

राहुल  तुझ्या आजीने इंदिरा गांधीने अकाली दलाला नष्ट करण्यासाठी पाकीस्थान सरहददीवर असलेल्या संवेदनशील पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले त्याचे नाव तुला माहित नसल्या मुळे सांगतो General Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही.......
अधिक येथे वाचा ...
सौजन्य: परभणीकर ठणठणपाल

Monday, February 1, 2010

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण, आपल्या प्रतिक्रिया कळवा

१ मे २०१० ला महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे एक सांस्कृतिक धोरण असावे ह्या कारणासाठी शासनाने ४ ऑगष्ट २००९ रोजी एका समितीची स्थापना केली होती. ह्या समितीने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक धोरणाचा मसुदा शासनास पाठवला आहे, हा मसुदा म्हणजे अंतिम धोरण नाहीये यात अपूर्णता असू शकते म्हणून या मसुद्यावर सर्वांचे विचार /सूचना मागवण्यात आलेले आहेत. सदर मसुदा वाचून त्यावर आपली मते कळवावीत. आपले सल्ले आणि अपेक्षा २८ फेब्रु. २०१० अखेर पर्यंत खालील पत्यावर कळवाव्यात किंवा २५ फेब्रु. २०१० अखेर पर्यंत team@jijau.com ला इ-मेल कराव्यात.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाचा मसुदा येथे डाउनलोड करा.


शासनास पाठवायचा पत्ता:
सांस्कृतिक कार्य संचलनालय,
महाराष्ट्र शासन, पहिला मजला,
जुने सचिवालय, विस्तार भवन,
महात्मा गांधी रोड.
मुंबई-४०००३२.
अखेरची तारीख : २८ फेब २०१०


साभार :- जिजाऊ .कॉम

धन्यवाद !!!!!!!!!!!!!

Friday, November 13, 2009

महाराष्ट्रातील राजकीय चक्रीवादळ .. फयान

विधानसभेच्या निवडणुका संपल्या ... मराठी मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सरकारमध्ये बसवले, कुठलाही जोश - जल्लोष बाजूला ठेवून हे सरकार कसे बसे स्थापन झाले, मंत्रिमंडळ स्थापनेला लागलेला अक्षम्य वेळ आणि "खाते" वाटपासाठीचा घोळ .हे सर्व संपून . सरते शेवटी .. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाली ...

पण यंदाच्या निवडनुकीमधून एक कीड या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागली .. हि कीड होती मराठी द्वेषाची .. समाजामध्ये दुही माजवणारी एक विषवल्ली ... पहिलीच गरळ ओकण्यात आली ती मराठी मधून शपथ घेण्याची .. बर मान्य तुम्हाला मराठी येत नाही पण मी फ़क़्त हिंदीतूनच शपथ घेणार हा अट्टाहास कशासाठी ... ते ही सर्व प्रसार माध्यमांच्या समोर.

महाराष्ट्राच्या सुवर्णी महोत्सवी वर्ष मध्ये सर्व निवडून आलेल्या आमदारांनी जर मराठी मध्ये शपथ घेतली तर खरच हि सन्मानाची गोष्ट राहिली असती ,, पण हा बेताल वक्तव्य करणारा .. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी थोडेच या राजकारणामध्ये आला आहे..


हा केवळ महाराष्ट्र द्वेषापोटी हिंदी मधून शपथ घेण्याचा केलेला हट्ट होता ... खर तर महाराष्ट्रामध्ये मराठी साठी आग्रह धरावा लागतो हीच केवढी मोठी शोकांतिका .. वेळोवेळी संविधानाचा संदर्भ देऊन आम्हाला राष्ट्र निष्टा शिकवली जाते ते हि यांच्या सारख्या अतिरेक्यांशी सबंध असणाऱ्या राष्ट्रद्रोही माणसांकडून ...केवळ धर्माचा राजकारण करणारे , हे धार्मिक कट्टरतावादी म्हणजे राजकीय आतीरेकीच ... मग काय बिघडले या वृत्तीच्या कानाखाली मराठी आवाज काढला तर ..

आरे आमचा इतिहासच सांगतो कि आशाच धर्मवेड्या औरंगजेब..अफजल ..शायीस्तेखान ह्यांना ह्याच मराठी माती मध्ये पाणी पाजले गेले .. मग त्यांच्या ह्या औलादीला जर मराठी हिसका दाखवला तर बिघडले कुठे.

मराठी माणसाचा आपमान करणाऱ्या किंवा मराठीचा द्वेष करणाऱ्या या वृत्तीच्या विरोधात काढलेला हा आवाज सबंध महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये गेला असेल यात कसलीही शंका नाही.

मला मान्य आहे विधानसभेचे पावित्र्य .. पण खर सांगा खरच तिथे गेलेले सगळे काय पवित्र आहेत का .. मग जर अशी घाण साफ करायची असल्यास आपले हि थोडेसे हात खराब होणारच ना .. मग तेच झाला .. झाली आमची हि थोडी चूक .... झाले आमचे पण हात खराब .. पण हि महाराष्ट्राला लागलेली घाण बाजूला तर सारली गेली .

कालपर्यंत उर्दूला राजभाषेचा दर्जा द्या म्हणणारे आणि अचानक हिंदी प्रेम उफाळून आलेले आज मराठी शिकण्याची तयारी दाखवत आहेत .. मराठी भाषा म्हणजे माझ्या आई प्रमाणे हे बोलत आहेत .. मराठीच्या शिकवण्या लावल्या जात आहेत .. हे सर्व जर एकदा कानाखाली आवाज काढून त्यांना उमजत असेल तर काय हरकत आहे.

खर तर महाराष्ट्रामध्ये हि परिस्थती उद्भवणे हेच आमचे दुर्दैव म्हणावा लागेल, पण आता तरी सर्वांनी लोकेच्छा समजून घेऊन आता तरी मराठी चे संवर्धन केले पाहिजे .. पक्ष कोणताही असो हे सार्यांचेच कर्तव्य आहे .. ते सर्वांनी पार पाडलेच पाहिजे .. मग कोणी हि आमच्या भावनेचा असा अनादर करू शकणार नाही.

चार ओळी मराठी मध्ये बोलण्याची ज्यांची मानसिक तयारी नाही असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही तर हि कीड संपूर्ण महाराष्ट्र समाज पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा कानाखाली काढलेला आवाज कुठल्याही प्रकारे दबू ना देता संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवला पाहिजे.. मराठी चा द्वेष करणार्यांनो सावधान .. एकदा का हा मराठी माणूस पेटला ना .. ह्याला विझवता विझवता सर्व काही जळून खाक होईल ... ते होऊ देऊ नका ,, या मराठी संस्कृतीने सर्वांनाच खूप प्रेमाने स्वीकारले आहे, मग तुम्ही हि या मराठी संस्कृतीचा स्वीकार हा केलाच पाहिजे ,, त्या शिवाय तरणोपाय नाही ...

शेवटी त्या दोन ओळी आठवतात ..

असंख्य पाहुणे पोसते मराठी .. शेवटी मद्यांध तख्त फोडते मराठी

जय महाराष्ट्र ........ जय भारत

एक मराठी माणूस ..

Tuesday, November 3, 2009

सगळ्यांनी मराठीतच शपथ घ्यायला हवी.....! काय गैर आहे यात......?

महाराष्ट्रात मराठी नाही तर मग काय हिब्रीव मध्ये शपथ घेशील काय रे धस्कटा.....? आणि भारतात हिंदीत नाही तर मग काय जापनीज  मध्ये शपथ घेशील?
हिंदीला मुळीच विरोध नाही ती तर अवघ्या देशाची भाषा; पण महाराष्ट्राला ही स्वतःची अशी एक भाषा आहे म्हटल, तिला 'मराठी' म्हणतात! आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक हीच भाषा समजतात. सगळ्यानाच हिंदी येते असे नाही. कारण हिंदी येण्यासाठी शाळेत तर जावे लागते ना? सगळेच शाळेत गेल असते तर आमचा साक्षरता दर [लिटरसी दर] नसता का चांगला? 
अरे महाराष्ट्रातील मुंबईच्या जनतेचे नेतृत्व तू करणार आणि मराठीत नाही बोलणार व्हयं रे? [हिंदीत बोल की नको बोलू, अरे पण मराठीत नाही बोलणार हा कसला हट्ट, थोबाड फोडलं  असत  जर मला ते जमल असत तर!]. का तू मुंबईला महाराष्ट्राची म्हणताच नाहीस? आता थांब,  बघ तू आणि तुझ्या सारख्यांचे काय हाल होतात येणाऱ्या कोणत्या ही निवडणुकात ते! राष्ट्रीय पक्ष असो की मग प्रादेशिक, कुणीही मुंबईला आणि महाराष्ट्राला गृहीत धरलेलं सामान्य महाराष्ट्रीयन [मग तो आडनावाने बाहेरचा असो  किंवा मग  त्याच मूळ भारतातलं कुठलं ही असो, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करतो आणि तिला आत्मसात करण्याचा थोडा तरी प्रयत्न करतो आणि कोणत्याही प्रकारच या राज्यच अहित चिंतत नाही तो आमच्यासाठी महाराष्ट्रीयनच] माणसाला चालणार नाही! अरे कसला माज रे ? गोर गरिबांची पैसे वाटून मत मिळवता येतात, हाच तुझा आणि तुझ्यासारख्या [इतर मराठी आणि अमराठी भाषिक] नेत्यांचा समज, दुर्दैवाने बराच खरा! पण बदल होतोय, तो तुला ही आणि सगळ्यांनाच दिसतोय.
   तसं तर तमाम मराठी माणसाला माझ  एक म्हणन आहे, आता या देशात एक नियमच काढूत ज्या क्षेत्रातून/प्रदेशातून उम्मेद्वारी घेताय तिथली भाषा तुम्हाला अवगत असलीच पाहिजे! का नको?  कारण  अखेर त्याच लोकांच नेतृत्व करायचं ना त्यांना, आणि त्यांची भाषाच येत नसेल तर काय डोमल प्रश्न सोडवणार? [आता कमीत कमी हे तर म्हणणार नाहीत ना  की लोक प्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडेच असतात?] हा मुद्दा उचालावाच लागेल! ज्या लोकांचे तुम्ही नेतृत्व करता त्यांची भाषा यालाच हवी, म्हणजे तमिळनाडूत तमिळ, हरयाणा मध्ये हरयानवी, महाराष्ट्रात मराठी आणि याच प्रकारे प्रत्येक राज्यात, छोट्या छोट्या प्रदेशात त्यांची त्याची भाषा यालाच हवी. मग कशा जातील भाषा लोपाला! इकडं भाषेचे बारा तुम्हीच वाजवायचे आणि मग 'ही आणि ती भाषा संवर्धन समिती' काढून पैसा उकळायचा! काही मूर्ख म्हणत असतील अनेक भाषा केल्यातर प्रादेशिकता वाढेल, कशाला रे मग भाषावार प्रांत रचना केली? आणि मग हिंदी तरी का? आपण बोलुत की सगळेच इंग्रजी; लागेल थोडा वेळ पण होईल ना मग सारा 'भारत' - 'इंडिया'.
अरे अस्मितेचा प्रश्न मूळ असतो मग ती मराठी माणसाची असो की मग अमराठी माणसाची असो. एक लक्षात ठेव,  विरोध कुणालाच नाही पण 'माझ्या' कशाला ही धक्का लावणार अशील आणि तो ही विरोधी भावनेने,  तेंव्हा मग तू आणि मी!
अवघ्या भारताला परत एकदा विनंती करून सांगतो अरे कुणालाच विरोध नाही, पण माझं घर मला राहू द्या; नसता मग 'पाहुणे लाख पोसतो मराठी.....' आहेच की! एक सांगू मी ही एक भारतीय आहे, मला ही हिंदी भाषेचा तुझ्या पेक्षा जरा जास्त अभिमान आहे, कदाचित तुझ्यापेक्षा चंगली हिंदीही मला येते, तू तरी 'हिंदीचे डायलेक्ट' बोलतोस मी तर 'हिंदीच' बोलतो. आता तुला हिंदीचा इतका पुळका का तर योगा योगन तुझी भाषा हिंदी!
बघ महाराष्ट्र कळतोय का तुला , नसेल कळत तर घे गाठूड आणि जय महाराष्ट्र!

त्याच्या आधी मराठी माणसा तुला जगावं लागेल, आपलाच मुख्यमंत्री त्यांना मंत्री पद देतोच का? राज्यकर्ते बघा काही बोलता येते का तुम्हाला; की त्यासाठीही पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघताय? नका हो असं करू, नका आपली अस्मिता कुणाच्या पायावर टाकू, स्वाभिमानाचा बाळकडू पिलेला महाराष्ट्र, गटारातील घाण पिल्या सारख का वागतोय? आपण आता तरी जाग व्हायला  पाहिजे,  'बघा काय करायचं' कुणाला काही  सुचतंय का ते.....?

जय हिंद!                                                                   जय महाराष्ट्र!

-एका मराठी माणसाकडून मराठीतून शपथ घेण्यास विरोधकरनारासाठी



टीप: सदर लेखक कुण्याही राजकीय संघटनेचा समर्थक वा सदस्य नाही. कुणाबद्दल काही अपशब्द निघालेच असतील तर तो भावनिक आवेश समजावा. लेखक एक अभिमानी भारतीय आणि महाराष्ट्रीयन आहे.    

Tuesday, September 29, 2009

तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय बी एन लोकमत ला मुलाखत]



इथे वाचा: आय बी एन लोकमत