Friday, November 26, 2010

मुंबई २६-११, स्मरण विस्मृतीत जाणाऱ्यांचे !

२६ नोव्हेंबर २००८, भारत भूमीवर पाकड्या अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ, शेकडो निरपराध लोकांचे मृत्यू , आणि आपल्याच माय भूमीवर आपल्याच वीरांचे रक्त सांडले आणि लढता लढता त्यांना वीर मरण आले... बघता बघता या सर्वांना आज दोन वर्षे पुरी झाली. हा पहिला हल्ला होता जिथे आपल्या देशातच युद्धजन्य परिस्थती निर्माण झाली होती, ग्रेनेड, गोळ्या, बॉम्ब यांचा हल्ला चालू होता सबंध देश आपल्या डोळ्याने आणि मेडिया च्या कृपेने (?) हे सर्व पाहत होता...
आज या सर्व गोष्टींची आठवण काढण्याचा उद्देश म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न आला कि , आपल्या देशात अनेक स्मृती दिनांसारखा हा देखील केवळ एक स्मृती दिन म्हणूनच पाळण्यात येईल का ?, कारण सकाळ पासूनच श्रद्धांजली वाहने, स्मृती यात्रा काढणे, भाषण करणे याला सुरुवात झाली आहे, आपला मेडिया या बाबतीत आपल्याला आज दिवसभर हेच दाखवणार .. पण आज नेमकं काय वेगळं अपेक्षित होता ? काय अपेक्षा होती माझी आणि माझ्या सारख्या असंख्य भारतीयांची ज्यांच्या डोक्यावर सतत हि मृत्यूची टांगती तलवार आहे.

दोन वर्षे झाली ह्या प्रसंगाला, काय बदलले ?

शासन बदलले ?- नाही , प्रशासन बदलले ? - नाही , नेते बदलले ?- नाही, पाकिस्तान बदलला ??- कधीच नाही, देश बदलला ? दुर्दैवाने नाही , आम्ही स्वतः तरी बदललो का ???? - याचा उत्तर आपल्याला शोधायचे आहे .... निदान आज तरी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारावा, माझ्या मते तीच खरी श्रद्धांजली असेल त्या शहिदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना.

काहीच बदलत नाहीये, कुणीच बदलत नाहीये .. हे खर असला तरी आपण स्वतः तरी या बदलाची सुरुवात करावी. जग बदलेल कि नाही मला माहित नाही .. पान या बदलाची सुरुवात तर मी माझ्या पासून करू शकतो .. गांधीजी फार वर्षापूर्वी एक मोलाची गोष्ट सांगून गेले .. "be the change you wish to see in the world !!" हे का आपण सोयीस्कर पाने विसरतो ?

एखाद्या रियालिटी शो प्रमाणे आपण तो प्रसंग पहिला, नैसर्गिकपणे आपल्या भावना अगदी उचंबळून आल्या .. काही क्षणासाठी अखंड देश एक झाला .. होय फ़क़्त काही क्षणासाठीच !! हा शो संपला मग काय .. देवाने माणसाला एक देणगी दिली म्हणतात.. "विस्मृती ". हळू हळू या सगळ्या आठवणी आमच्या विस्मृतीत जाणार आणि परत आम्ही आमच्या नव्या रियालिटी शो च्या प्रतीक्षेत बसणार.. तुम्ही - आम्ही तरी काय करणार हो, जिथे रोज घोटाळे होतात, करोडोंचा भ्रष्टाचार होतो, सत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा बघायला मिळते, खून होतात, देश तोडायची भाषा होते काय काय म्हणून लक्षात ठेवणार आम्ही .. एक भारतीय म्हणून जन्म झाला याचा अभिमान बाळगायचा कि ????????

या देशाचा वर्तमान जरी दुर्दैवाने फार चांगला चालला नसेल तरी हि सुदैवाने या देशाला अशी एक देणगी लाभली आहे ती या जगात अन्य कोणत्याही देशाला नाहीये, ती म्हणजे या देशाचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास.. जगातील सर्वात ताकदवान देशाचा ताकदवान नेता ओबामा या भूमीवर येऊन नतमस्तक होतो हि एक साधी घटना नसून .. हि घटना बर्याच गोष्टी सांगून जाते.

नक्कीच आम्हाला काही गरज नाहीये देशातल्या भ्रष्ट नेत्यांना आपल्या स्मृतीत जागा देण्याची, त्या हरामखोर कसाब आणि त्याच्या सारख्या अतिरेक्यांना स्मरणात ठेवण्याची .. आज गरज आहे ते या देशाच्या इतिहासाचे स्मरण करण्याची. याच इतिहासातून प्रेरणा घेऊन रोजचे जीवन जगण्याची... हा इतिहासच आपली ओळख आहे, गरज आहे आपली ती ओळख कायम स्वरूपी स्मरणात ठेवण्याची.

या देशाच्या इतिहासाचे प्रत्येक पान हे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले आहे, याच सोनेरी इतिहासात स्थान मिळवलेल्या आमच्या शहिदांना आज स्मरण करूया.. इतिहास हा देशाच्या भवितव्यावर कोरला जात असतो.. इतिहासातून आपण शिकायचा असत.. इतिहासातील चूक पुन्हा - पुन्हा करायच्या नसतात एवढा जरी शिकलो तरी हा देश आणि आपण सुरक्षित राहू.

निगर गट्ट राजकारणी आणि बेताल मेडिया यांना विसरून आज स्मरण करूया स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांचे , स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांचे, स्वराज्य संवर्धक छत्रपती संभाजी राजांचे.. या देशासाठी लढलेल्या त्या स्वातंत्र्य वीरांचे.. गांधी.. भगत सिंघ आणि टिळकांचे, स्मरण करूया अशा पित्याचे जो अजूनही हार मानत नाही.. मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या पित्याचे, आपला मुलगा गमावून देखील ज्याने राजकीय नेत्याला आपल्या घराचे दरवाजे ज्यांनी बंद केले, जो आज हि सबंध देशभर एका आशेने सायकल वर फिरत आहेत अशा पित्याचे .. त्यांची ती आशा आहे तुमच्या आमच्या बद्दल .. स्मरण करूया करकरे.. कामटे.. साळसकर आणि ओळंबे या सर्वांचे.

या सर्वांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानातून आपण सर्वांनी काही शिकावे हीच खरी आज श्रद्धांजली !

जय हिंद .. जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

No comments:

Post a Comment