Friday, November 13, 2009

महाराष्ट्रातील राजकीय चक्रीवादळ .. फयान

विधानसभेच्या निवडणुका संपल्या ... मराठी मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सरकारमध्ये बसवले, कुठलाही जोश - जल्लोष बाजूला ठेवून हे सरकार कसे बसे स्थापन झाले, मंत्रिमंडळ स्थापनेला लागलेला अक्षम्य वेळ आणि "खाते" वाटपासाठीचा घोळ .हे सर्व संपून . सरते शेवटी .. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाली ...

पण यंदाच्या निवडनुकीमधून एक कीड या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागली .. हि कीड होती मराठी द्वेषाची .. समाजामध्ये दुही माजवणारी एक विषवल्ली ... पहिलीच गरळ ओकण्यात आली ती मराठी मधून शपथ घेण्याची .. बर मान्य तुम्हाला मराठी येत नाही पण मी फ़क़्त हिंदीतूनच शपथ घेणार हा अट्टाहास कशासाठी ... ते ही सर्व प्रसार माध्यमांच्या समोर.

महाराष्ट्राच्या सुवर्णी महोत्सवी वर्ष मध्ये सर्व निवडून आलेल्या आमदारांनी जर मराठी मध्ये शपथ घेतली तर खरच हि सन्मानाची गोष्ट राहिली असती ,, पण हा बेताल वक्तव्य करणारा .. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी थोडेच या राजकारणामध्ये आला आहे..


हा केवळ महाराष्ट्र द्वेषापोटी हिंदी मधून शपथ घेण्याचा केलेला हट्ट होता ... खर तर महाराष्ट्रामध्ये मराठी साठी आग्रह धरावा लागतो हीच केवढी मोठी शोकांतिका .. वेळोवेळी संविधानाचा संदर्भ देऊन आम्हाला राष्ट्र निष्टा शिकवली जाते ते हि यांच्या सारख्या अतिरेक्यांशी सबंध असणाऱ्या राष्ट्रद्रोही माणसांकडून ...केवळ धर्माचा राजकारण करणारे , हे धार्मिक कट्टरतावादी म्हणजे राजकीय आतीरेकीच ... मग काय बिघडले या वृत्तीच्या कानाखाली मराठी आवाज काढला तर ..

आरे आमचा इतिहासच सांगतो कि आशाच धर्मवेड्या औरंगजेब..अफजल ..शायीस्तेखान ह्यांना ह्याच मराठी माती मध्ये पाणी पाजले गेले .. मग त्यांच्या ह्या औलादीला जर मराठी हिसका दाखवला तर बिघडले कुठे.

मराठी माणसाचा आपमान करणाऱ्या किंवा मराठीचा द्वेष करणाऱ्या या वृत्तीच्या विरोधात काढलेला हा आवाज सबंध महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये गेला असेल यात कसलीही शंका नाही.

मला मान्य आहे विधानसभेचे पावित्र्य .. पण खर सांगा खरच तिथे गेलेले सगळे काय पवित्र आहेत का .. मग जर अशी घाण साफ करायची असल्यास आपले हि थोडेसे हात खराब होणारच ना .. मग तेच झाला .. झाली आमची हि थोडी चूक .... झाले आमचे पण हात खराब .. पण हि महाराष्ट्राला लागलेली घाण बाजूला तर सारली गेली .

कालपर्यंत उर्दूला राजभाषेचा दर्जा द्या म्हणणारे आणि अचानक हिंदी प्रेम उफाळून आलेले आज मराठी शिकण्याची तयारी दाखवत आहेत .. मराठी भाषा म्हणजे माझ्या आई प्रमाणे हे बोलत आहेत .. मराठीच्या शिकवण्या लावल्या जात आहेत .. हे सर्व जर एकदा कानाखाली आवाज काढून त्यांना उमजत असेल तर काय हरकत आहे.

खर तर महाराष्ट्रामध्ये हि परिस्थती उद्भवणे हेच आमचे दुर्दैव म्हणावा लागेल, पण आता तरी सर्वांनी लोकेच्छा समजून घेऊन आता तरी मराठी चे संवर्धन केले पाहिजे .. पक्ष कोणताही असो हे सार्यांचेच कर्तव्य आहे .. ते सर्वांनी पार पाडलेच पाहिजे .. मग कोणी हि आमच्या भावनेचा असा अनादर करू शकणार नाही.

चार ओळी मराठी मध्ये बोलण्याची ज्यांची मानसिक तयारी नाही असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही तर हि कीड संपूर्ण महाराष्ट्र समाज पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा कानाखाली काढलेला आवाज कुठल्याही प्रकारे दबू ना देता संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवला पाहिजे.. मराठी चा द्वेष करणार्यांनो सावधान .. एकदा का हा मराठी माणूस पेटला ना .. ह्याला विझवता विझवता सर्व काही जळून खाक होईल ... ते होऊ देऊ नका ,, या मराठी संस्कृतीने सर्वांनाच खूप प्रेमाने स्वीकारले आहे, मग तुम्ही हि या मराठी संस्कृतीचा स्वीकार हा केलाच पाहिजे ,, त्या शिवाय तरणोपाय नाही ...

शेवटी त्या दोन ओळी आठवतात ..

असंख्य पाहुणे पोसते मराठी .. शेवटी मद्यांध तख्त फोडते मराठी

जय महाराष्ट्र ........ जय भारत

एक मराठी माणूस ..

4 comments:

Arvind Toshniwal said...

tumache mhanane yogya aahe.

loto ke bhoot baantose nahi manate.

Tyaanee kadhaleli chappal konala ka nahi disalee?

fakta 2 prasar madhyamaaneech tee dhakhavalee baakichyani ka nahi ?????????

Arvind Toshniwal said...

tumache mhanane yogya aahe.

loto ke bhoot baantose nahi manate.

Tyaanee kadhaleli chappal konala ka nahi disalee?

fakta 2 prasar madhyamaaneech tee dhakhavalee baakichyani ka nahi ?????????

प्रकाश बा. पिंपळे said...

अमोल यांनी मांडलेले विचार अगदी बरोबर आहेत. महाराष्ट्रात मराठीचा अट्टाहास नाही केला जाणार तर मग कुठे....? त्यांचे काही शब्द अगदी सत्य आणि ते ही दाहकपणे मांडतात: 'वेळोवेळी संविधानाचा संदर्भ देऊन आम्हाला राष्ट्र निष्टा शिकवली जाते...', अरे जे अस करतात त्यांनी एकदा का होईना परत महराष्ट्र आणि त्याचा इतिहास वाचवा; नाही नमन केला यांनी तर नाव बदलेल! एक तर हा आजचा वाचाळ मिडिया [सगळे नाही, काहीजन] हगवण लागल्या सारख्या 'ब्रेकिंग न्यूज' देत असतो; कडीचाही अभ्यास न करणारी वाचाळ लोक दिवसभर बडबड करत असतात; आणि वैचारिक दिवाळखोरीच प्रदर्शनच नव्हे तर प्रचार आणि प्रसार करतात! त्यांच्याच डोक्यातल्या काही पैदावळी सामान्य माणसाच्या डोक्यात घुसतात आणि मग तो हि तेच बरळत बसतो. काय होणार ठाऊक नाही या राष्ट्राच? गांधी, विनोबा, विवेकानंद आणि यांच्या सारख्या लोकांचाच हे राष्ट्र का? हा ही संशय यांच्याकडे पाहीलकी मनात येतो. 'स्वाभिमान आणि अस्मिता' 'पैसा आणि सत्ता' यांच्या घरी 'ठेवली' आणि हे त्या हरामीच्या कमाईवर जगतात कि काय? दुर्दैवाने असा ही संशय येतो.
आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये कोणती आहेत? की आयुष्य जगणं म्हणजे काय? हेच कदाचित आज आपण विसरलोत. मी विषयांतर केलेले नाही; भाषा, देश आणि कुटुंब या सगळ्याचाच अभिमान बाळगणं आपण सोडून दिलंय. ह्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नाच्या मुळाशी 'स्वार्थ' आहे; मला काय घेणे त्याच्याशी ही वृत्ती आहे! म्हणूनच तर ही मराठीद्वेषी पिलावळ इथ आली आणि टिकली; आणि आज आपल्या उरावर बसून मजा मारतेय. पुन्हा उच्चार करतो द्वेष कुणाचाच नाही, पण खांद्यावर घेतलं म्हणून कानात _तायच नाही!
मला मान्य आहे लोकशाहीचा अपमान झाला विधानसभेतील 'श्रीमुखातील ध्वनीने' , पण याच लोकशाहीचा मागे लोकसभेत पैसे आणून व्यापार केला गेला, तिची एक प्रकारे बोलीच लावली गेली हे नाही दिसलं कुणाला, हे तेंव्हा बरळले पण काय केल? का नाही निलंबन केल (कायद्यात आणि भाषेत अडकवून तो प्रश्न वेगळ होता अस म्हणू नका)! इतके गुंड तुम्ही निवडणुकीत उभे करता, त्यांना नाही थांबवता आल? आणि हे हिंदी आणि इंग्रजी मिडिया वाले, अरे मराठी शिका पुढच्या साऱ्या पिढ्यांचा कल्याण होईल तुमच्या! अरे पुढचा माणूस काय म्हणतो काय नाही, जरा लक्ष देऊन ऐका, त्याचा जरा प्रगल्भ होऊन विचार करा, तुम्ही कितेक लोकांपर्यंत पोहचता, थोड तरी जबाबदारीने वागा, नाही तर लोकशाहीचा ४ था आधारस्थंभ तरी नका म्हणून घेऊ!
श्रीमुखात भडकावलेली ठीकच आहे आणि चार आमदारांचे निलंबन हा निर्णय योग्य की अयोग्य हे मला माहित नाही पण तो कदाचित फक्त लोकशाहीचा अपमान होतेय म्हणून घेतलाय की काही राजकीय क्रोर्य आहे त्यापाठीमागे हे मात्र याच मिडीयाने शोधायला हवे. आणि एक सांगा अशी कामा तुम्ही नाही तर कोण करणार? एकंदर काय तर निलंबित आमदारांच्या मतदार संघाचे नुकसान नका होऊ देऊ, यांचे भत्ते कापा, दोन महिने जेल मध्ये ठेवा हव तर पण...... जनतेच्या प्रगतीशी खेळू नका!


जय हिंद! जय महाराष्ट्र!

(सदरील टिप्पणी मिडिया, लोकप्रतिनिधी आणि सामान्य माणसांना(लेखक ही येतो त्यात, हे वेगळे सांगणे नव्हे!) उद्देशून आहे )

Vilas said...

अमोल यांनी मांडलेले विचार अगदी बरोबर आहेत.
आहो कोण तो अबू आणि महाराष्ट्रात आवाज वाढवतो...दोन ठिकाणाहून काय निवडून आला तर असे... सरकार मधील आमदार शेन खात होते की काय...याला वेळीच त्याची जागा दाखवायला हवी....
Picture Abhi Baki Hai Mere Dost..!!!
-विलास

Post a Comment