Tuesday, November 3, 2009

सगळ्यांनी मराठीतच शपथ घ्यायला हवी.....! काय गैर आहे यात......?

महाराष्ट्रात मराठी नाही तर मग काय हिब्रीव मध्ये शपथ घेशील काय रे धस्कटा.....? आणि भारतात हिंदीत नाही तर मग काय जापनीज  मध्ये शपथ घेशील?
हिंदीला मुळीच विरोध नाही ती तर अवघ्या देशाची भाषा; पण महाराष्ट्राला ही स्वतःची अशी एक भाषा आहे म्हटल, तिला 'मराठी' म्हणतात! आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक हीच भाषा समजतात. सगळ्यानाच हिंदी येते असे नाही. कारण हिंदी येण्यासाठी शाळेत तर जावे लागते ना? सगळेच शाळेत गेल असते तर आमचा साक्षरता दर [लिटरसी दर] नसता का चांगला? 
अरे महाराष्ट्रातील मुंबईच्या जनतेचे नेतृत्व तू करणार आणि मराठीत नाही बोलणार व्हयं रे? [हिंदीत बोल की नको बोलू, अरे पण मराठीत नाही बोलणार हा कसला हट्ट, थोबाड फोडलं  असत  जर मला ते जमल असत तर!]. का तू मुंबईला महाराष्ट्राची म्हणताच नाहीस? आता थांब,  बघ तू आणि तुझ्या सारख्यांचे काय हाल होतात येणाऱ्या कोणत्या ही निवडणुकात ते! राष्ट्रीय पक्ष असो की मग प्रादेशिक, कुणीही मुंबईला आणि महाराष्ट्राला गृहीत धरलेलं सामान्य महाराष्ट्रीयन [मग तो आडनावाने बाहेरचा असो  किंवा मग  त्याच मूळ भारतातलं कुठलं ही असो, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करतो आणि तिला आत्मसात करण्याचा थोडा तरी प्रयत्न करतो आणि कोणत्याही प्रकारच या राज्यच अहित चिंतत नाही तो आमच्यासाठी महाराष्ट्रीयनच] माणसाला चालणार नाही! अरे कसला माज रे ? गोर गरिबांची पैसे वाटून मत मिळवता येतात, हाच तुझा आणि तुझ्यासारख्या [इतर मराठी आणि अमराठी भाषिक] नेत्यांचा समज, दुर्दैवाने बराच खरा! पण बदल होतोय, तो तुला ही आणि सगळ्यांनाच दिसतोय.
   तसं तर तमाम मराठी माणसाला माझ  एक म्हणन आहे, आता या देशात एक नियमच काढूत ज्या क्षेत्रातून/प्रदेशातून उम्मेद्वारी घेताय तिथली भाषा तुम्हाला अवगत असलीच पाहिजे! का नको?  कारण  अखेर त्याच लोकांच नेतृत्व करायचं ना त्यांना, आणि त्यांची भाषाच येत नसेल तर काय डोमल प्रश्न सोडवणार? [आता कमीत कमी हे तर म्हणणार नाहीत ना  की लोक प्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडेच असतात?] हा मुद्दा उचालावाच लागेल! ज्या लोकांचे तुम्ही नेतृत्व करता त्यांची भाषा यालाच हवी, म्हणजे तमिळनाडूत तमिळ, हरयाणा मध्ये हरयानवी, महाराष्ट्रात मराठी आणि याच प्रकारे प्रत्येक राज्यात, छोट्या छोट्या प्रदेशात त्यांची त्याची भाषा यालाच हवी. मग कशा जातील भाषा लोपाला! इकडं भाषेचे बारा तुम्हीच वाजवायचे आणि मग 'ही आणि ती भाषा संवर्धन समिती' काढून पैसा उकळायचा! काही मूर्ख म्हणत असतील अनेक भाषा केल्यातर प्रादेशिकता वाढेल, कशाला रे मग भाषावार प्रांत रचना केली? आणि मग हिंदी तरी का? आपण बोलुत की सगळेच इंग्रजी; लागेल थोडा वेळ पण होईल ना मग सारा 'भारत' - 'इंडिया'.
अरे अस्मितेचा प्रश्न मूळ असतो मग ती मराठी माणसाची असो की मग अमराठी माणसाची असो. एक लक्षात ठेव,  विरोध कुणालाच नाही पण 'माझ्या' कशाला ही धक्का लावणार अशील आणि तो ही विरोधी भावनेने,  तेंव्हा मग तू आणि मी!
अवघ्या भारताला परत एकदा विनंती करून सांगतो अरे कुणालाच विरोध नाही, पण माझं घर मला राहू द्या; नसता मग 'पाहुणे लाख पोसतो मराठी.....' आहेच की! एक सांगू मी ही एक भारतीय आहे, मला ही हिंदी भाषेचा तुझ्या पेक्षा जरा जास्त अभिमान आहे, कदाचित तुझ्यापेक्षा चंगली हिंदीही मला येते, तू तरी 'हिंदीचे डायलेक्ट' बोलतोस मी तर 'हिंदीच' बोलतो. आता तुला हिंदीचा इतका पुळका का तर योगा योगन तुझी भाषा हिंदी!
बघ महाराष्ट्र कळतोय का तुला , नसेल कळत तर घे गाठूड आणि जय महाराष्ट्र!

त्याच्या आधी मराठी माणसा तुला जगावं लागेल, आपलाच मुख्यमंत्री त्यांना मंत्री पद देतोच का? राज्यकर्ते बघा काही बोलता येते का तुम्हाला; की त्यासाठीही पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघताय? नका हो असं करू, नका आपली अस्मिता कुणाच्या पायावर टाकू, स्वाभिमानाचा बाळकडू पिलेला महाराष्ट्र, गटारातील घाण पिल्या सारख का वागतोय? आपण आता तरी जाग व्हायला  पाहिजे,  'बघा काय करायचं' कुणाला काही  सुचतंय का ते.....?

जय हिंद!                                                                   जय महाराष्ट्र!

-एका मराठी माणसाकडून मराठीतून शपथ घेण्यास विरोधकरनारासाठीटीप: सदर लेखक कुण्याही राजकीय संघटनेचा समर्थक वा सदस्य नाही. कुणाबद्दल काही अपशब्द निघालेच असतील तर तो भावनिक आवेश समजावा. लेखक एक अभिमानी भारतीय आणि महाराष्ट्रीयन आहे.    

No comments:

Post a Comment