Tuesday, October 6, 2009

बजावा मतदानाचा हक्क - विधानसभा निवडणूक विशेष

पाहता पाहता तेरा तारीख जवळ येऊन ठेपली, सगळी कडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, रोज रोज खास्या, आणि मातब्बर नेत्यांच्या सभा रंगत आहेत, आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव होत आहे। कुणाला बदल हवाय तर कुणी आहे तेच स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे। रिंगणात उभे राहिलेला प्रतेक उमेदवार तर रोज रात्री झोपतो आणि सकाळी आमदार होऊनच उठतोय। एकंदरीत महाराष्ट्रातल्या प्रतेक वर्गातला व्यक्ती आज विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करत आहे. पण एक वर्ग मात्र शांत आहे. जे काही घडत आहे त्या कडे दुर्लक्ष करत आहे, त्याकडे बघायला पण ह्या वर्गाला वेळ नाहीये

हो एक वर्ग ज्याला महाराष्ट्रानं घडवलं, शिक्षण दिलं, सुशिक्षित बनवलं, स्वतः विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी पात्र बनवला.. तोच आणि तोच वर्ग आज शांत आहे ...... . आणि त्याच वर्गा बद्दल वर्गातल्या व्यक्तींबद्दल मला बोलायचय, जे विचार करत असतील कसा करायचा उपयोग तेरा तारखेच्या सुट्टीचा. म्हणत आसतील "can we plan for something on 13 Oct " आहो काहींना तर माहीतच नाही तेरा तारखेला काश्याची सुट्टी आहे ते.


बरोबर आहे कसा माहित राहणार आम्हाला, आणि काय करायचय आम्हाला माहित करून, आम्ही... आम्ही उच्य शिक्षित ना, आम्ही उच्य पगारी, आम्ही उच्य विच्यारी, आम्हाला ह्या राजकारणावर नाही भरोसा, सगळे एकाच माळेचे म्हणी मग का करायचा मतदान आसे विच्यार आमचे. आरे उच्य पगारी, उच्य विच्यारी माणसांनो, तुमच्या आश्या विच्यरांमुळे, देशाला, महाराष्ट्राला लाच्यारी येण्याची वेळ आली आहे.

" हे सगळे राजकारणी ढोंगी आहेत " , " आमचा सरकार लाचार आहे " , "विधानसभेत सगळे गुंड जाऊन बसले आहेत " , " अश्यांना लोक निवडून देतात तरी कसे " आसेच आपण वर्षानुवर्षे बोलत आलेलो आहोत . आरे नुसता बोलातच आलेल्या शहाण्यांनो, जेंव्हा वेळ येते तेंव्हा करता काय? . निवडणुकीचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून समजता, आणि मतदान करण्याच्या ऐवजी मजा करता !! . मतदानाचा हक्का ना बजावता बोलण्याचा तुम्हाला काय आधिकार !!! . आम्ही खूप व्यस्त , मतदान करायला आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही फक्ता बोलतो, आणि मतदान हे आमचा काम नाही मतदान करणे हे काम आहे ते बीनकामी, अडाणी, अविचारी माणसांचा. हेच काय तर राजकारण, निवडणूक हे म्हणजे धनाढ्य आणि गुंड लोकांचाच काम आहे हे जणू काय आम्ही ठरूनच ताकालोय .

वेळ नाही म्हणणारे आम्ही, राखी सावंत चा स्वयंवर नाही आवडत म्हणत रोज दोन तास चर्चा करतो पण कुणाला आणि का मतदान करायचा हे बोलायला वेळ नाही आमच्या कडे, आम्हाला बिदाई मधल्या 'ती' च्या वडिलांच्या मित्रांच्या मुलाचा नावा सहित मालिकेतल्या आख्या पात्रांचे नाव माहित पण आपल्याच मतदार संघात कोण कोणते उमेदवार निवडणूक लढवत आहेत हे नाही माहित. ह्या वर्गातल्या मुलींच्या समोर तर निवडणूक, राजकारणाचा विषय काढणे म्हणजे आधीच जवळ न येणाऱ्या मुलींना ४ हात दूर करणे होय. ह्यांच्या शी बोलावा तर एखाद्या सिनेमा बद्दल, एखाद्या अभिनेत्या बदलच, आहो मी कुठ म्हणतो कि तुम्ही त्यावर नका बोलू म्हणून, बोला कि बिन्दास्त बोला, बिनधास्त राहा, पण आधी बिनधास्त पणे राहण्याची वेळ आणा. हे ५-६ उरलेले दिवस विचार करा, मतदान करण्यासाठी एक तास वेळ द्या, चांगल्या उमेदवाराला विधानसभेवर पाठवा आणि राहा बिनधास्त ५ वर्ष.


मित्रहो, मी तुम्हाला सांगणार नाही कि तुम्ही कुणाला मतदान करावे. उमेदवाराची पात्रता कशी ठरवावी, कोणत्या मुद्यावर उमेदवाराला मतदान करायचा हे मी तुम्हाला नाही सांगणार. कारण तुम्ही जाणते आहात, मतदान कुणाला करावे हे तुम्हालाच ज्यास्त कळत, पण तुम्हाला ठरवायचा आहे कि तुम्हाला ह्या वेळेस मतदान करायचंच आहे. आता मतदान कुणाला करायचा ते तुम्हीच ठरवा, नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे साधी भाजी निवडताना १० वेळेस विचार करणारे आपण उमेदवार निवडताना पण विचार करणारच नं .

मी वर सांगितला कि तुम्ही म्हणता " अश्या गुंड लोकांना लोकं निवडून देतात तरी कसे. तुम्हाला वाटते दुरुची बाटली, पैसा घेऊन लोक मतदान करतात म्हणून हे गुंड लोकं निवडून येतात. पण मी सांगतो मित्रहो अश्या लोकांना विधानसभेवर पाठवण्या मागे जेवढा वाटा दारू,पैसा साठी मतदान करणाऱ्या अज्ञानी लोकांचा तेवढाच मतदान न करणाऱ्या तुम्हा आम्हा ज्ञानि, सुशिक्षित लोकांचा आहे. हे खरा आहे कारण आज आपल्या सारख्या लोकांमुळे ५० ते ६० टक्केच मतदान होते आणि त्यात पण १० ते २० उमेदवार उभे असल्यामुळे २० ते २५ टक्के मतदान ज्या उमेदवाराला मिळेल तोच निवडून येतो. म्हणजे बघा ज्या उमेदवाराला ७५ ते ८० टक्के लोक नाकारतात त्तोच उमेदवार आज विधानसभेवर जात आहे. राजकारणी भाषेत बोलायचा झाला तर ज्याची २० टक्के वोट बँक तोच आमदार.

मला सांगा मतदान न करणाऱ्या ५० टक्के मध्ये कोण येतं ? , आम्हीच नं ? , मग सांगा नको असणारे उमेदवार विधानसभेवर पाठवण्यात कुणाचा ज्यास्त वाटा?. महाराष्ट्राची धुरा अपात्र लोकांच्या हातात देण्या मागे कोण दोषी ? . निष्क्रिय नेते तयार करण्याला कोण जबाबदार ? ह्या गोष्टीवर जरा विचार करण्याची वेळ आली आहे . तुमचा मत किती महत्वाचा आहे ह्याच्या महत्वाची महत्वपूर्ण जाणीव ठेऊन तुमचा मतदान करण्याला सगळ्यात ज्यास्त महत्व द्यायची वेळ आता आली आहे.

म्हणून म्हणतो एक दिवस दैनंदिन काम बाजूला ठेऊन , एक तास वेळ देऊन, उज्वल महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून...


उच्चा-शिक्षित ,उच्चा पगारी वाल्या

विचार आता तुला करायचा आहे,
मतदानाचा हक्क बजाऊन
चांगल्या उमेदवारालाच विधानसभेवर पाठवायचा आहे ।

सुधाकर पाटील

(माझा कुठल्याही राजकीय पार्टीशी संबंध नाही. खास या आपल्या मुख्यमंत्री ब्लॉग साठी लेख आणि या व्यासपीठावरून आपल्याला केलेले मनापसुनाचे आवाहन.)

4 comments:

Mahendra said...

मला वाटतं की आपल्य लोकांना अजुनही डेमोक्रसी म्हणजे काय हेच निटसं कळलेलं नाही. आपल्या दृष्टीने डेमोक्रसी म्हणजे कुठेही पान खाउन थुंकणे, कसंही रहाणं, आणि कुठलेही नियम न पाळणं. आपल्या सारखे लोकं जर मतदाना करिता बाहेर पडतिल तरच मग खरा नेता कोण ते समजेल.
आजकाल फक्त ४०- ते ५० टक्के मतदान होते.. ह्या पैकी जवळपास १० ते १५ टक्के मतं मिळवणारा पक्ष हा राष्ट्रिय नेता म्हणजे पंतप्रधान वगैरे पदावर बसतो.
आपला पंतप्रधान हा पुर्ण लोकसंख्येच्या पैकी फक्त १०-१५ टक्के लोकं निवडतात, आणि राजकिय नेत्यांना पण नेमकं हेच हवं आहे. हेच दुर्दैव आहे आपल्या देशाचं.

साळसूद पाचोळा said...

लोकशाही राष्ट्रात प्रतेक नागरिकाने राजकारणात भाग घ्यायलाच हवा... त्याला राजकारानाची समज असायलाच हावी... अन्यथा लोकशाही अपुर्णच राहते.
.
२६/११ च्या नतर जे लोक ताज पुढे मेनाबत्या घेवून निस्षेध कर्ट होते, ते नेमके मतदानाच्या दिवशी जातात कुटे ?
.
ते मेणबत्ती वाले गेले कुठे ?
.. भ्रष्ट राजकारणी निवडून गेला असेल तर तो यांच्याच मूले ... त्यामुले तोंडाला पावडर लावून, शोर्ट कपडे घालून, उअच्च्भ्रू म्हणुन मिरवनार्याना "सरकारचा" निषेध करण्याचा नैतिक अधिकार नव्हताच.
.. मतदाना कड़े पाट फिरवणारा हाच समाज राश्ह्ताच्या अधोगातिसाही कारनिभुत आहे हे ह्या शाहान्याना "जबरदस्तीनेच" समजावे लागेल.. सांगुन ही जमात एकनार नाही म्हनुनच कदाचित नि. आयोगाने मोल, थियेटर्स बंद टेवण्याचा निर्णय घेतला असावा...
.
नेते भ्रष्ट असतील, असतात पण तरीही त्यातात्या त्यात चांगला निवडने गरजेचे आहे... वासरात लगादी गाय शहानी म्हणतात तसे...

साळसूद पाचोळा said...

.
आपल्या ब्लॉग चे नियमित वाचक कसे व्हायचे.. तो ऑप्शन off आहे... i m not able to click on it..
कृपया सांगावे...

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

Hi sachin.. Thanks for comment..

You can subscribe to d new posts n comments. That button seems to be working fine. U just try once.


Amol

Post a Comment