Friday, October 2, 2009

गांधी जयंती निमित्त्य हार्दिक शुभेच्छा


आज २ ऑक्टोबर, भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांची जयंती.

त्या थोर महापुरुषास आमचे कोटी कोटी प्रणाम.


आज काल आम्ही तरुण मंडळी आमच्याच महापुरुषांच्या नावाने काही एक ऐकत असतो आणि तेच आम्ही बोलतही असतो, पण या मध्ये आमच्याच या महापुरुषांचा होणारा दररोजचा पराभव आम्हाला कधी कळला नाही असेच वाटते.


गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे जरी ब्रम्हसत्य असला तरी हे ऐकून काही लोकांच्या पोटात दुखल्याशिवाय राहत नाही हे ही तितकेच खरे, कदाचित आम्ही आज असा हि विचार करू शकतो कि एक माणूस एवढा अवघड कार्य कसा करू शकेल, कसा शक्य आहे हे ? वैगेरे

पण मित्रांनो हे कार्य त्या महात्म्याने करून दाखवल.

विविधतेने नटलेला हा देश.. विविध धर्म, भाषा आणि प्रांत या मध्ये विभागला गेला होता अश्या वेळी या बरीकासी शरीरयष्टी असणार्या माणसाच्या मागे अख्खा देश एका आवाजाने उभा राहिला, १५० वर्षे असणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीची, त्यांनी केलेल्या अन्यायाची जाणीव सर्व सामान्य लोकांना करून दिली , स्वातंत्र्य दिले म्हणजे .. त्यांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. मग सारा स्वातंत्र्य लढा उभा राहिला आणि हा देश स्वातंत्र्याची पहाट बघू शकला.

त्यांनी सांगितलेले सत्य, अहिंसा, स्वदेशीचा वापर, ग्रामस्वराज्य (खेडी स्वयंपूर्ण बनवा) ह्या संकल्पना आज हि कित्ती गरजेच्या आहेत हे आपण जाणतोच. त्यांनी समाज घडवण्याकडे हि लक्ष्य घातले, त्या
मुळे हिंदू समाजातील अनिष्ट रूढी परंपरांबद्दल त्यांनी नेहमी आपला विरोध दर्शविला, अस्पृश्यता हा समाजावरील कलंक असून तो आपण एकत्रपणे दूर केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते, त्या साठी ते लढले देखील.

थोडक्यात काय एक साधारण मानुस कुठल्या ही बळाशिवाय शिवाय काय चमत्कार घडवू शकतो ह्याचे सर्वोत्तम आदर्श उदहारण म्हणजे महात्मा गांधी. एकंदरीत तो माणूस जरी आज नसला तरी त्याचे विचार आज हि अमर आहेत,

आज त्यांच्या विचारांपुढे सारे जग नत-मस्तक होतांना आपल्याला दिसते. आणि ज्यांच्या नावाने इंग्रज सरकार थर-थर कापायचे आणि आज आपल्याच देशात आपण या महापुरुषाचा रोज पराभव करतो आहोत. मला खात्री आहे .. उद्याची पिढी या थोर माहात्म्यास वंदन केल्याशिवाय राहणार नाही... आज सर्व भारतीयांकडून मी महात्मा गांधी यांना कोटी कोटी प्रणाम करतो ......

जय हिंद .. जय महाराष्ट्र,

अमोल सुरोशे

4 comments:

प्रकाश बा. पिंपळे said...

राष्ट्रासाठी व्यक्तिगत जीवन पणाला लाऊन अवघ आयुष्यच नव्हे तर मरण सुद्धा पणाला लावणाऱ्या महात्मा गांधीना माझे कोटी कोटी प्रणाम! भारतीय स्वातंत्र्याला आणि भारतीय सामाजिक व्यवस्थेला बापुजींचे असलेले योगदान निर्विवाद आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बापुजींचे विचार आजही खूप महत्वाचे आहेत. भारताला स्वयम्पूर्ण होणे फार म्हत्वाचे आहे आणि त्या स्वयम्मपूर्णतेचा मार्ग बापूजींच्या विचारात आहे.
हे राष्ट्र 'महात्मा गांधी मार्ग' नाव असलेल्या रस्त्यावरून हजारो किलोमीटर चालते पण त्यांच्या विचारांनी काही वर्ष तरी 'पुन्हा' चालून बघा!
सर्वांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद!

Mahendra said...

चर्चिल पण गांधिजींच्या बद्दल बोलतांना म्हणाले होते, दॅट नेकेड इंडियन.. हॅज टेकन ओव्हर द कंट्री बाय स्टॉर्म.. यातंच त्यांच्या कार्याचा गौरव दिसतो.

साळसूद पाचोळा said...

गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले...
असे म्हनून नकळतपणे का होइना पन आपन इतर "देश्भक्तांचे"(?) अवमुल्यन करत आहोत्त असे नाही का वाटत?

इतर मध्ये क्रां. फडक्यांपासून ते शुबाषबाबुं पर्यंत सारेच येत्तात.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

नाही, नक्कीच नाही.

आपल्या देशा मधे एक शिष्टाचार पाळला जातो तो म्हणजे ज्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथि असेल त्या दिवशी त्या व्यक्तींच्या जीवन कार्य बद्दल चर्चा करायची अणि त्यांच्या जीवनातून आपलाल्या काय शिकता येइल हे आपन बघायचे , त्याच प्रमाणे मी या लेखा मधे गांधी जयंती निमित्त्य गांधीजींच्या आदर्श जीवनाबद्दल चर्चा केली, अणि काही असलेले गैरसमज आजच्या तरुण पिढीने दूर दूर करून घ्यावेत एवढीच अपेक्षा व्यक्त केली.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो क्रन्तिकारी होते ज्यांची इतिहासमधे सधी नोंद देखिल नाही, पन नक्कीच मी त्यांना कुठलेही दुय्यम स्थान दिले असा कृपया समजू नका, स्वातंत्र्य लढ्य मधे लढलेला तो प्रत्येक जन तेवढ्याच महत्वाचा होता, त्याचा ही तो खारीचा वाटा होता त्या बद्दल कुठलेही दुमत असण्याचे कारन नाही, सगलेच लढत होते .. त्या सर्वांना आमचा सलाम ..

आणि तुम्ही नमूद केलेल्या व्यक्तींचे ही तेवढेच महत्व .. त्यांनी ही देशासमोर एक आदर्श निर्माण केला ..
पन मला दुःख या गोष्टीचे होते की का आपन या सर्व महापुरुशांची नेहमी तुलना करतो .. त्यांना एका तराजू मधे तोलतो, खरच आपन आज एवढे मोठे झालो आहोत का.. की त्यांची योग्यता किंवा अयोग्यता आपन सिद्ध करावी ..

या माणसाने आपले संपूर्ण व्यक्तिगत जीवन राष्ट्राला वाहून दिले, पण व्यक्ती द्वेषाच्या सुडामुळे आपल्यचं देशात त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली, ज्या व्याक्तीद्वेशाने स्वकीयांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा संपूर्ण मराठेशाहीचा घात केला .. तसाच घात गांधीजींचा आणि त्यांच्या विचारांचा होतांना दिसतो आहे,

मृत्युनंतरही ज्या माणसाची रोज विटम्बना होत असते .. त्यांच्या बद्दल असलेले गैरसमज आपल्या सारख्या तरुणांनीच दूर केले पाहिजेत.. गांधीजींच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहेत , पण त्या महा पुरुषाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला.. गांधी म्हणजे फ़क़्त अहिंसा एवढाच दृश्य त्यांनी आजवर आम्हाला दाखवले .. आणि आम्ही हि ते बघत गेलो..

आमच्या या महापुरुषांचा होणारा पराभव रोखण्यासाठी .. त्यांची होणारी विटम्बना थांबवण्यासाठी आता आपल्यालाच जागा होण्याची गरज आहे, आणि तेवढीच अपेक्षा या लेखातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण या लेखाला दिलेल्या आपल्या मार्मिक टिप्पणी बद्दल धन्यवाद.. मी आशा करतो कि या उत्तराच्या माध्यमातून या लेखाचे उद्दिष्ट लोकांच्या पर्यंत पोहचेल ..

पुन्हा एकदा धन्यवाद.. आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा ..

आपलाच अमोल

जय महाराष्ट्र

Post a Comment