Saturday, August 6, 2011

कम नशिबी शेतकऱ्याची कुंडली

अनेक कम नशिबी शेतकऱ्यांची कुंडली कदाचित अशी असावी. लहानपणी नशिबी ढोरं,नंतर नांगर आणि मग थोड मोठं झाल की खत आणि मग दुष्टचक्राची सुरुवात.


(प्रेरणा राजेंद्र देशमुखांची (http://myblog-prahaar.blogspot.com/) एक फेसबुक पोष्ट)


जाता जाता: कुंडल्या बनत कुठे ही असल्या तरी रेखाटल्या मात्र कागदावरच असतात. आणि कागद जाळणे जास्त कठीण नसते. इतर आणि कुंडलीच्या कागदात फरक इतकाच की इतर कागद जाळायला काडीची पेटी ही बस असते. पण इथे मात्र मशालीच हव्या असतात- बदलाच्या आणि धाडसाच्या.

2 comments:

THANTHANPAL said...

** या ठिकाणी शासन ,भ्रष्ट्र नौकारशाही, बेईमान सत्ताधारी विरोधी राजकरणी नेते हे तीन मोठे पापी मानवी ग्रह एकत्रित झाले आहे . यांची शांती जगातील कोणत्याही संपत्तीने होणे शक्य नाही. या करता या ग्रहांचा कायमचा नाश करणे हाच एक उपाय आपल्या हाती आहे. त्याकरता जालीम एन्डोसल्फ सारखे जालीम विष ते ही शुद्ध स्वरूपातील पाहिजे.

सौ गीतांजली शेलार said...

नमस्ते मुख्यमंत्री कार्यकर्ता, शेतकरया विषयी तळमळ समाजातील प्रत्येक घटक करत असतो, चर्चेचा शेवट पुढारी आणि सरकार यांच्यावर थोपून मोकळा होतो. मी नाही म्हणत की ते लोक दोषी नाहीत? आहेत पण मला एक गोष्ट मनापासून सांगावी वाटते, जो पर्यंत आपण स्वत:मध्ये बदल घडवत नाही तोपर्यंत समाज बदलत नसतो. आज राजरोसपने मत विकणारे लोक जोपर्यंत मताचा हा बाजार थांबवत नाहीत तोपर्यंत असच सरकार निवडून येणार आणि हेच लोक आपल्या कार्यकालात हि रक्कम आपल्या मानगुटीवर बसून वसूल करणार. हे बदलायचं असेल तर आपल्यासारख्या कॉमन म्यान पासून सुरवात करुया चला देश बदलूया!

Post a Comment