Sunday, August 7, 2011

जाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन असणे आवश्यक आहे

जाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन असणे आवश्यक आहे : जाती व्यवस्थेच्या विरुद्ध लढाईत त्या व्यास्थेचे मूळ, तिचे संगोपन आणि वाटचाल कशी झाली हे जाणून घेणे खूप महत्वाचे. म्हणजे जाती व्यवस्था ना रंगावरून ठरली, ना फक्त संपती आणि व्यवसायावरून. तिच मूळ मुख्यतः स्वार्थात आहे. एखादा व्यवसाय एका कुटुंबाला आवडला आणि मग आपली मक्तेदारी मोडून निघू नये म्हणून इतर जातींवर तो न करण्याचे बंधन लादले गेले. मुख्यातः ह्या निगेटिव्ह राईट प्रकारच्या व्यवस्था निर्मितीत उच्चवर्णीय म्हणवल्या जाणाऱ्या घाकांचा पुढाकार होता आणि त्या टिकून ठेवण्यासाठी अजून ही आहे. आता जाती निर्मूलन म्हणजे, माझ्या मते तरी, ही मक्तेदारीच मोडून काढणे. आणि आता पर्यंतच्या झालेल्या सामाजिक असमतेला नष्ट करणे आणि समाजातील काही घटकांचा हरवलेला किंवा काढून घेतलेला आदर आणि आत्मविश्वास परत देणे हे ही जातीव्यास्था निर्मुलानातील काही महत्वाचे मुद्दे. पण हे करतांना इतर कोणत्याही जातीतील लोकांचा द्वेष करणे वा सर्रास जातीय/वर्गीय विरोध दर्शवणे जाती निर्मूलनाच्या कार्यात बधाच आणेल आणि आणत ही आहे. The essence of Caste system eradication is in bringing equality, not by hatred, unnecessary-violence (do it only when there is no other option than violence) but by strategic moves using policies, practices and mutual co-operation for betterment of life not just for a society and group of people but for for the mankind.

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

"आवडलेल्या व्यवसायाच्या निवडीवरून जात व्यवस्था अस्तित्वात आली...." असे माझे म्हणणे नाही, तसा अर्थ निघता असेल तर येथे मी लिखाणात मांडणी करण्यात चुकलो. मला अपेक्षित असलेला अर्थ म्हणजे या वाटणीला सुरवात वरून खाली झाली. आणि मक्तेदारी लोकांनी फक्त सुलभ आणि अधिक अर्थप्राप्ती असलेल्या व्यवसायात उपयोगात आणली. कदाचित माझा तर्क जाती व्यवस्था टिकून राहण्यात का यशस्वी झाली या साठी अधिक योग्य आहे. आणि मग आता मलाच असा प्रश्न पडतोय की समजा व्यावसायिक माक्तेदारीने जाती व्यवस्था दृढ होत गेली तर एकदम सुरुवातीला कोणत्या अधरावर व्यवसाय वाटप केले गेले होते ? कुणास काही काल्पन असेल तर प्रकाश टाकावा. नेमाडेंच्या 'हिंदू' मध्ये याचे उत्तर सापडेल कदाचित कुणी वाचली असेल तर कालवावे .....

Post a Comment