Saturday, May 14, 2011

छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा !


युगपुरुष छत्रपती शिवराय, कल्याण च्या सुभेदाराची सून मातेच्या सन्मानाने परत पाठवणाऱ्या चारित्र्यवान पित्याचा पुत्र म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे ! ज्या संस्काराच्या कुशीमध्ये शिवबा घडले त्याच जिजाऊ यांच्या संस्काराच्या कुशीमध्ये वाढलेले शंभू बाळ यांची आज १४ मे रोजी जयंती !

महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम भारतीय तरुणांसाठी आदर्श असणारा हा सिंहाचा छावा म्हणजे एक जिवंत वादळ ! अवघ्या आयुष्यामध्ये ज्या माणसाच्या वाट्याला डोंगर एवढी संकटे आली, जो माणूस या संकटांना अगदी कणखर पणे सामोरा गेला, प्रसंगी सह्याद्री सारखा कणखरपणा तर कधी कवी मनाचे तरल असे शिव पुत्र शंभू राजे.

वयाच्या ३२ व्या वर्षी ज्याने स्वाभिमानाने स्वराज्यासाठी बलिदान स्वीकारले पण महाराजांचा - महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी हि कमी होऊ दिला नाही, अतिशय ताठ मानेने , तोच बाणेदार पण तीच करारी नजर आणि हसत मुखाने ते मृत्यूला सामोरे गेले आणि पुढे हे स्वराज्य टिकले.

नऊ वर्षे ज्या माणसाने तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळासारखा सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला, जंजिर्याच्या सिद्धी जौहर पासून ते गोवाच्या पोर्तुगीजांपर्यंत , मुगल - आदिलशाही असो व कुतुबशाही या सर्वांन्शी निकराने लढाई देणारा, या सर्वांवर आपली कायम जरब ठेवणारा स्वराज्याचा तरुण छत्रपती म्हणजे खरा खुरा स्वराज्य संरक्षक.

याच स्वराज्याच्या छत्रपतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले, महाराणी येसूबाई यांना त्या काळी एक महत्वाचे स्थान दिले, "श्री सखी राज्ञी जयति - महाराणी येसू बाई" हि राज मुद्रा त्यांच्या हाती सोपवली आणि स्वराज्याचा कारभार हाती दिला , स्त्रियांचा आदर करणारे आणि त्यांना स्वराज्याच्या एवढ्या मोठ्या स्थानावर बसवणारे हे छत्रपती !

याच छत्रपतींच्या बदनामीचा कट केला गेला, अवघ आयुष्य जो माणूस केवळ आणि केवळ लढला त्याला त्याच्या बलिदाना नन्तर सुद्धा या कट कारस्थानांशी लढाव लागतंय हे एक शोकांतिकाच !

वयाच्या चौदाव्या वर्षी या माणसाने संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, असे एक नाही तर सात ग्रंथ लिहिले, कवी मनाचे, प्रचंड भाषा समृद्ध असणारे, मराठ्यांचा मुकुटमणी आमच्या पर्यंत कधी पोहोचू दिलाच नाही , मुद्दाम संशयाचे वातावरण निर्माण करणारा इतिहास जाणीवपूर्वक लिहिला गेला आणि त्याचे पुढे उदात्तीकरण देखील करण्यात आले , पण सत्य हे सूर्यासारखे, किती काळ झाकून ठेवणार.. आज न उद्या हे सत्य समोर येणारच नव्हे ते आले हि आहे . म्हणूनच साडे तीनशे वर्षे झाली तरी हि शंभू राजे हे तमाम युवकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतात, ज्यांच्या इतिहासाची पणे उलातांना आमच्या अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या केवळ नामघोषाने आमची छाती भरून येते आणि मान ताठ होते.

सिंहाचा छावा, स्वराज्य संस्थापक शिवरायांचा सुपुत्र ज्याने स्वराज्य नुसते राखलेच नाही तर ते चौपटीने वाढवले त्या स्वराज्य सरंक्षक छत्रपती संभाजी राजांना आमचा मानाचा मुजरा !

तमाम मराठी युवकांना छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा !

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

1 comment:

रोहन... said...

स्वराज्य सरंक्षक छत्रपती संभाजी राजांना आमचा मानाचा मुजरा !

युगपुरुष छत्रपती शिवराय, कल्याण च्या सुभेदाराची सून मातेच्या सन्मानाने परत पाठवणाऱ्या.....

हे मात्र काही पटले नाही.. ही कथा मूळ कागद पत्रात नाही.. ती आली कुठून???

Post a Comment