Sunday, May 1, 2011

बदलत्या महाराष्ट्राचा दिन




आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिनू, पण कितीक वर्षे हा दिन आनंदाचाच राहील हे माहित नाही. ज्या गतीने आपण प्रगती ( अधोगती हा शब्द बारा राहील का ......?) करत आहोत आणि ज्या गतीने ह्या प्रगतीला बाधक अशी कृत्ये करत आहोत,  यावरून या गतीच्या गणितात महाराष्ट्राला निगेटीव्हच उत्तर सध्या तरी मिळेल असे वाटत आहे.  जग ज्या गतीने विकसित होतेय, ज्या गतीने पारदर्शी होतेय, ज्या गतीने एकत्र होतेय त्याच गतीने महाराष्ट्र, मागे जात आहे, त्याच गतीने इकडे भ्रष्ट्राचार होत आहे आणि त्याच गतीने आम्ही महाराष्ट्र - मराठा, ब्राम्हण, माळी, कोळी .....  असा जातीत विभागात आहोत. हे सिद्ध करायला काही आकडेवारी ही आहे, पण त्याच पेक्षा महत्वाची जिवंत लोकांची असहनीय अशी आयुष्य आणि अनुभव आहेत.
गेल्या कितेक वर्षां पासून तीच ध्येये आणि तीच धोरणे आहेत. पण अजून ही त्यांच्या पासून आपण खूप दूर आहोत असेच  वाटते. बदल होत नाही अस नाही, पण गती काय आणि दिशा काय याला ही खूप महत्व आहे. आपल्याला फक्त साधन लोक निर्माण करायचेत की, ती सधनता टिकवणारे, वाढवणारे आणि गोर गरीबांपर्यंत त्या सधनतेचे फळ नेणारे निर्माण करायचेत हा एक मोठा प्रश्न. तस याच उत्तर आहे आपल्याकडे. पण योग्य त्या उत्तरला मूर्त स्वरूप देणे अवघड असल्याने,  सोप्पे उत्तर आपण स्वीकारत आहोत. आणि सोप्या उत्तराने आपल्या सत्तेत असणाऱ्यांना जाच ही नाही  आणि फायदा सुद्धा आहे. कारण निवडणुका जिंकायला बहुमत लागते,  मग त्या बहुमताल एकदा सधन केल  किंवा साधन केला जातंय अशी समजूत करवून दिली की झालं! आलेच दुसरे कुणी बहुमता विरोधात उभे राहायल तर त्यांना ही क्षणिक सधनता दिली की ते ही बहुमतात. मग अवघड उत्तराकडे जायचेच  कशाला.
झालाच छळ गोर गरीबांचा तर होऊ देत की; त्यांना छळ काय आणि साध आयुष्य काय यात फरकच माहित नाही. म्हणून चालाय सगळ सोयीस्कर. असो .
पण आता जास्त काळ हा सामान्य माणूस झोपेत राहणार नाही. इतकी वर्ष, अरे आपण एका जातीचे..... मलाच मत द्या, अरे शिवाजी महाराज की जय .... मलाच मत द्या, अरे त्यांच्या पासून भारतला वाचवायचे असेल तर..... मलाच मत द्या, आपल्यावर भूतकाळात अत्यचार झाला आहे म्हणून...... मलाच मत द्या. हे हे सगळे दिवस लवकरच जातील. तरुण वर्गाला शिवाजी महाराज तर  अजूनच  जवळचे वाटत आहेत, पण आता  त्यांना शिवाजी समजून घ्याला इतर कुणाची गरज भासत नाही, कुणी ही 'शिवाजी महाराज की...' म्हंटला की 'जय...' म्हणतील ही, पण चुकीच्या मार्गाला जाणर नाहीत. कुणीही उमेदवार फक्त जातीचा आहे म्हणून मतदान करणार नाही. होय आम्हाला इतिहास माहित आहे, पण भविष्यासाठी आम्हाला पुन्हा नवा इतिहास राचायचाय ह्या इर्षेने तरुण उभा राहत आहे. दिसत नसतील हे तरुण सगळीकडेच, पण एकदिवस प्रत्येक तरुणात हाच तरुण दिसल्यावर आश्चर्य करू नये. महाराष्ट्राकडे इतर काही असो की नसो, पण विचारवंतांचे विचार आहेत, त्यांची चरित्र आहेत तेच काफी. हळूहळू त्या सगळ्या चरित्रातील  आणि तरुणातील दलाल निघून गेले की संपन्न आणि उज्ज्वल महाराष्ट्र नव्याने उभा राहायला वेळ लागणार नाही .
  
हे नव्या महाराष्ट्राचा स्वप्न संपन्न होऊ दे हीच जिजाऊ आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना. 
पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.                  
                                                                                                               जय महाराष्ट्र .

खूप काही बोलायचं, सुचवायचं. पण तेच कधी पासून बोलतोय, सुचवतोय , जमेल तस आम्ही करतोय ही. पण मोठ्ठ काही तरी करण्यासठी प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच योगदान हवय.


2 comments:

Krishna Pandey said...

उत्तम और नेक विचार बंधू... हमें अपने आपसी भेद-भाव को भुला कर तथा जाती, धर्मं, अमीरी-गरीबी, प्रांतीयता, और अन्य विषयों से ऊपर उठ कर राज्य के विकास में योगदान करना चाहिए... महाराष्ट्र राज्य में विकास की जितनी सम्भावना तथा संसाधन है, उसके अनुरूप विकास की गति काफी असंतोषजनक है... हमारे नेता आज भी सदियों पहले के जाती-धर्म को मुद्दा बना के चुनाव जीत जाते है... इस बार राज्य की विकास के लिए अपना मत दे... इस अच्छे प्रयास के लिए मैं ह्रदय से शुभकामनायें देता हूँ...

THANTHANPAL said...

आजचा महाराष्ट्र
आदर्श बद्दल , जैतापूर बद्दल . पुणे ulc स्कॅम बद्दल कलमाडी बद्दल वाळूमाफिया , तेल माफिया , पाणी माफिया, शिक्षण माफिया, सहकार माफिया , मंदिर माफिया, धर्म माफिया, ड्रग आणि डॉक्टर माफिया, न्याय माफिया, मद्य माफिया, दूध माफिया, भेसळ माफिया, टोल माफिया, भ्रष्ट्र माफिया , वैज्ञानिक माफिया , हाप्ते माफिया , डिजिटल माफिया , मिडिया माफिया, झेंडा माफिया, फतवे माफिया, चमचे माफिया, सेझ माफिया,भूखंड माफिया ,वीज माफिया, टेंडर माफिया, बँक माफिया , प्रशासन माफिया,पोलीस माफिया , घोटाळे माफिया , पान-सुपारी माफिया , युतीराज्य माफिया, सत्ताधारी माफिया , विरोधी माफिया, तोडपाणी माफिया , भाषा माफिया , टाग्गे माफिया, आबा दादा बाबा माफिया , पक्ष माफिया, मुखवटा माफिया, मुन्नी शीला माफिया , खेळ माफिया , पाप-पुण्य माफिया , कंपूशाही माफिया ......... या माफियां शी लढत महा-राष्ट्र निर्माण करणाऱ्या सामान्य माणसास , आम आदमीस common -man ला महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!!! अजून कोणा बद्दल शुभेच्छा!!!!!!...... असतील तर कळवा .धन्यवाद !!!!

Post a Comment