Saturday, July 10, 2010

शिवाजी महाराज, महाराष्ट्र, धर्म, जाती आणि देश

महाराष्ट्रासाठी एक खूप दुर्दैवी घटना, म्हणजे जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी उठणे. महाराष्ट्र शासनाला साधे ते ही थांबवा आले नाही; ही शरमेची बाब आहे. आणि या बंदी उठण्याला कुणी भाषण स्वातंत्र्यचा विजय असे म्हणत आहे, तर अशा वाचाळांना आणि बोलबच्चन बुद्धिवाद्यांना माझ्या कडून चार थोबाडीत ( संदर्भ: टी.ओ.आय मधील या संधार्भातील बातमी). महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ते काही आज काल परवा झाले नाही; कितेक वर्षां पासून या ना त्या मार्गाने आणि छोट्या आणि मोठ्या स्वरुपात पुरोगामीवाद महाराष्ट्रात अस्तित्वात आहेच. खुद्द शिवाजी महाराजांचे पुरोगामीपण सिद्ध आहे. पण पुरोगामी पण म्हणजे नवे आणि कसे का असेना स्वीकारणे नव्हेच. म्हणून या निर्णयाला स्वीकारणे म्हणजे पुरोगामी असे कुणी म्हणत असेल तर, असे लोक कृपया पुढे काही वाचू नका, आणि पुन्हा येथे भेट ही देऊ नका. उद्याच काय, आजच आपल्या याच स्वभावामुळे आपल्या 'अस्तित्वावरच' बाहेरचे आणि काही घरचेच संशय घेत आहेत आणि टिंगल उडवायल ही मागे पाहत नाहीत. जेम्स लेन सारखा परदेशी येतो काय आणि इथे राहून लिहितो काय, पुस्तक सुद्धा प्रकाशित करतो काय आणि आमच्या .... ला सुद्धा पत्ता नाही लागत. तो माxx लिहून जातो आणि मग आम्ही जाती-पातींच्या  मुद्यांना उकरतो आणि राजकारण सुरु करतो. असेल यात काही लोकांचा जात्यंधपणा, पण सगळ्या जातीलाच दोष देणे योग्य ही नाही आणि देऊ ही नये. मग पुन्हा कुण्या एका जातीने शिवाजी फक्त आमचाच आहे असे ही बोंब मारत फिरू नये आणि त्याच प्रकारे भांडारकर फुटले तर कुण्या एकाच जातीने गळ ही काढू नये.
तुम्हा सर्वांना विनंती करतो  की, जेम्स लेनचे पुस्तक बाजारात कुठे ही दिसता कामा नये, कुणी ही वाचता कामा नये. कारण त्या ह.खो. ने मांडलेला इतिहास त्याच्या सडक्या दिमाकातून बाहेर पडलेले काल्पनिक खेळ आहेत. उगाच काल्पनिक खेळांना इतिहास म्हणून सामान्य जणांची फसवणूक करण्याचा जो प्रकार समस्त शिकलेल्या लोकांनी मांडला आहे त्याचा समाचार इतर शिकलेल्या 'सर्व जातींच्या' लोकांनी घेने फार गरजेचे आहे.
वर वरून पाहता जात गेली असली (शहरात तरी) तरी बऱ्याच लोकांच्या डोक्यातून जात अजून ही गेली नाही, म्हणूनच भांडारकर संस्थेचा सगळ्या ब्राम्हनांशी, संभाजी ब्रिगेडचा सर्व मराठ्यांशी अश्या प्रकारचे संबंध जोडले जातात. आज गावो गावी आणि गल्ली बोळात हजारो संघटना आहेत त्यांना 'अशी' राष्ट्रीय मान्यता देण्यात आणि समस्त लोकांशी सर्रास जोडण्यात काहीच अर्थ नाही! (या वाक्याने मी भांडारकर किंवा संभाजी ब्रिगेड ह्या मोठ्या किंवा लहान संघटना आहेत हे सांगत नाही) भांडारकर संस्थेने केले कार्य ही फार मोठे आहे आणि संभाजी ब्रिगेडने काही विषयांवर उठवलेला आवाज ही योग्य आहे, या दोन्ही गोष्टींना ना कुण्या ब्राम्हणाचा विरोध असावा ना कुण्या मराठ्याचा. छत्रपती 'फक्त' संभाजी ब्रिगेडचे, छावाचे, मराठा सेवा संघाचे किंवा एकाद्या विशिष्ट जातीचे कधीच होऊ शकत नाहीत आणि या पैकी कुण्या ही संस्थेच हा उदेश्या असावा असेही मला वाटत नाही, असेल तर त्यांनी स्वतःच  अस्तित्व पुन्हा एकदा तपासून पहाव. पण त्याच प्रकारे इतर कोणताही समाज या प्रकारे महापुरुषांना स्वतःचेच म्हणून ठेऊ शकत नाही किवा, सामान्यतः व्यक्तीवर, व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी ही सांगू शकत नाही.
छत्रपती हे स्वयंप्रकाशित सूर्य होते, त्या सूर्याला कुणी आपल्या छत्राखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते छत्र नक्कीच जाळून खाख होईल यात तीळ मात्र ही शंका नाही! कारण अजून ही विविध जातील प्रखर शिवप्रेमी जिवंत आहेत, आणि या शिव प्रेमींना शिवाजी महाराज  कोणत्या जातीचे होते त्या पेक्षा त्यांनी केलेले कार्य मोठे वाटते. या शिव प्रेमी मध्ये सर्व जातील लोक आहेत- माळी, कोळी, ब्राम्हण, मराठा,  सुतार, लोहार, कुंभार आणि अशा अनेक (जातींची आपल्याकडे कमी नाही :( ).
हा जो सगळा घोळ झालाय तो सगळा हा सगळा एकमेकांच्या जाती द्वेषामुळे आणि जात्यांधपणा मुळेच; याच अधिक स्पष्ट कारण मला देता येईल पण बऱ्याच भावनिक दुखापती होतील म्हणून नको.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्यावर सुद्धा आमचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालाय, अगदी त्या यु. पी. च्या मायावती सारखा. आता हे जेम्स लेन प्रकरण का झालाय याच्या वर वाद करत बसण्या पेक्षा सगळ्या जातींनी एकत्र येऊन पुन्हा अशी पिल्लावळ जन्माला येऊ नये याची काळजी घ्यावी.
त्या सोबतच जातींच्या आणि धर्मांच्या कोशातून बाहेर येऊन मी महाराष्ट्रीय आहे, मी एक भारतीय आहे या भावनेला स्वतः मध्ये बळकट बनवूया.
जय जिजाऊ!                                                                        जय शिवराय!

अजून पोस्ट संपली नाही, कारण वाचत असताना बऱ्याच लोकांना काही प्रश्न आले असतील ते थोडे स्पष्ट करतो. आता मी 'जय जिजाऊ' म्हटलं  म्हणजे मी नक्कीच मराठा सेवा संघ किंवा संबंधित संघटनेचा भाग असेल असे कुणास वाटले असेल तर, या ब्लॉगशी वा जिजाऊ.कॉमशी संबंधित कुणाचाही ही कोणत्याही जातीय व धार्मिक, राजकीय संघटनेशी संबंध नाही. आणि पुढचे काही प्रश्न तुमच्या साठी, जय महराष्ट्र म्हटलं की शिवसेनेचाच का? आणि जय जिजाऊ म्हटलं की सेवा संघाचाच का? गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभिमान या सगळ्या गोष्टींचा?

टीप:सदर पोस्ट मधून कुणाच्या जातीय भावना दुखवल्या गेली असतील तर  क्षमा. सर्व जातींच्या नावांचा उल्लेख फक्त गरजेपायी केला गेलेला आहे. कुणास ही काही गैर वाटत असेल तर कळवावे.
            

4 comments:

Vijay Deshmukh said...

गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभिमान या सगळ्या गोष्टींचा?

100% sahamt

प्रकाश बा. पिंपळे said...

Dhanywad Vijayrao,
hech apan sarvana samjawun sangayal hawa ahe. karan 'fakt' hech lok abhman balagatat ani bakiche baghaychi bhuminka ghetat. tya mule yug purush paksha purush hotat ani mang jatit ani pakshat bandhale jatata.

Nayan said...

mala apale he mhanane manya nahi .. mala vatat ti pustakanvar bandhi nako ... vicharanche swatantra have...


http://nayanraut.wordpress.com/2010/07/18/len/

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

प्रश्न कोण्या एका जेम्स लेन चा नाहीये, प्रश्न आहे त्याच्या मागील मानसिकतेचा.

कोण कुठला तो जेम्स लेन त्याला आमच्या राष्ट्राची, आमच्या इतिहासाची किंवा आमच्या संस्कृतीची काय माहिती? कुठून त्याच्या डोक्यात हे काल्पनिक विचार प्रकटले ? कुठून त्याला हा साक्षात्कार झाला ? कुठल्या आधारावर त्याने हे लिखाण केले? खरा प्रश्न हा आहे.

कुठलेही राष्ट्र असो.. व राज्य ते उभे असते एका विचारांवर, आमचा हा महाराष्ट्र देखील एका प्रचंड स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांवर उभा राहिलेला आहे. हा वारसा आम्हाला मा साहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय यांच्या कडून लाभला आहे, हे आमचे महत भाग्यच म्हणावे लागेल कि याच भूमी मध्ये आमचा जन्म झाला. आता जर कोणी आमच्या विचारांवरच घाला घालणार असेल.. तर त्याचा मुकाबला कसा करायचा?

जेम्स लेन सारख्या गोऱ्या कातडीच्या बाहेरच्या माणसाला एवढे महत्व देण्याचे खरच काही हि एक कारण नाही, पण त्याच्या मागे लपलेली इथली जी भाडखाऊ मंडळी आहे, ज्यांच्या सडक्या मेंदूतून हि असले हीन दर्जाचे विचार प्रकट झाले आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, मला मान्य आहे विचारांनी त्याला उत्तर दिलेच पाहिजे, आणि ते या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस बळ एकीने देईल हि .. पण तूर्तास आपल्याच देशात जी हि पिल्लावळ आहे जे कि पडद्या आड राहून हा खेळ खेळत आहेत त्यांचा समाचार घेण्याची वेळ आता आली आहे.

समजा 'अ' व्यक्तीने 'ब' व्यक्तीला म्हणाले कि तुझा बाप तुझा नाहीच आहे .. तुझा बाप कोणी 'क' आहे तर अशावेळी तुम्ही काय कराल ? त्याला डी एन ए चे रिपोर्ट दाखवणार का?( म्हणजे त्याच्या ह्या विचारांचा तुम्ही विचारांनी मुकाबला करणार ) का सरळ त्याला त्याच्या बापाची आठवण करून देणार. आणि इथे प्रश्न कोण्या "अ" 'ब' 'क' चा नाहीये हे हि आपण लक्षात घ्यावं.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेजस्वी सूर्यच.. त्यांच्या कडे बघून घाण ओकानार्यांना कदाचित माहित नाही ती घाण त्यांच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, आणि राहिला प्रश्न राजकीय पोळी भाजून घेण्याचा.. आज काल आपल्या देशामध्ये तो सर्वांचा आवडता धंदा आहे, ज्यांना राजकीय पोळी भाजायची आहे त्यांना ती भाजू देत , पण शिवराय हे तमाम मराठी मनावर आज हि अधिराज्य गाजवतात, आमच्या मनाला कोणी दुखावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आम्ही होईल त्या प्रकारे प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाहीत, आणि नक्कीच यातून राजकारणकरणारे

विचार स्वतान्र्ताच्या नावाखाली जर कोणी विष ओकत असेल, आणि त्या मागे जर भयानक मानसिकता असेल तर अशी मानसिकता वेळीच ठेचून काढली पाहिजे, नाही तर ज्या समाजासाठी आपण वैचारिक स्वातंत्र्याची गोष्ट करत आहात तो समाजच अस्तित्वात राहणारनाही.

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Post a Comment