Tuesday, July 13, 2010

खरच लाज वाटत नाही का आम्हाला मराठी असल्याची ?

हे विचारण्याचे कारण म्हणजे, ६० वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिलेली एक कठोर जखम महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून पुन्हा एकदा ताजी झाली.

साडे नऊ कोटी मराठी जनतेचा हा माझा महाराष्ट्र! खरच अआपल्या पैकी कित्ती लोकांना या जखमेची जाणीव राहिली आहे. महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव, कारवर सह इतर ८६५ गावातील माझे मराठी बांधव गेली ६० वर्षे या स्वतंत्र भारता मध्ये राहून गुलामगिरीचे आणि अन्यायाचे जीवन जगत आहेत. दिवसा ढवळ्या तेथील मराठी जणांवर तेथील कन्नडी पोलीस (नव्हे खाकी वर्दीतले गुंडेच ते ) लाठ्या काठ्यांनी बडवत आहेत. ६० वर्षे झाली ८० पेक्षा जास्त हुतात्मे हजारो लोकांचे रक्त सांडून देखील आपल्याच हक्कासाठी आपल्याला रोज रडावं लागत आहे. त्या साठी भिक मागावी लागत आहे. हा भिकारडे पण का आला ? याला कारण म्हणजे आमचे भिकारचोट राजकीय नेते? दिवस रात्र एकमेकांच्या विरोधात बोलणे हाच यांचा धर्म, पण महाराष्ट्राच्या या गंभीर प्रश्न बाबत कधीच कोणी एकत्र आले नाही. कधी कधी वाटते यांना हा प्रश्न सोडवायचा आहे कि नाही . कारण जो भाजप महाराष्ट्रामध्ये बेळगाव प्रश्नी रान उठवण्याची भाषा करतो त्याच भाजपची सत्ता सध्या कर्नाटक राज्यामध्ये आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे नितीन गडकरी म्हणजेच मराठी असून देखील त्यांच्याच पक्षाच्या एका मुख्यमंत्र्यांना त्यांना झालेल्या अत्याचाराबद्दल साधा जाब हि विचारावा वाटत नाही खरच हि खूप खेदाची बाब आहे. मी भाजपचे नाव घेतले म्हणजे बाकीचे काही त्यांच्या पेक्षा वेगळे नाहीयेत.. कधी काळी कॉंग्रेस च्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थती होती, त्यांनी हि काही केले नाही. ज्या महाराष्ट्रीय नेत्यांचे दिल्ली मध्ये थोडे थोडके वजन आहे ( म्हणजे शरद पवार साहेब) त्यांनी देखील या प्रश्न बाबत आपल्या कानावर हात ठेवले. शिवसेनेने आगदी सुरुवाती पासून सीमावासीयांच्या आंदोलना मध्ये आपला सहभाग नोंदवला पण आता कोणी दुसरे त्याचे श्रेय घेऊन जाईल म्हणून ते हि कधी कधी आपले हात राखूनच वागतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना आणि राजकीय पुढार्यांना कधी हि हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावा असा कधी वाटलाच नाही.
आता हा प्रश्न खूपच चिघळला आहे, अन्यायाच्या सर्व सीमा त्यांनी ओलांडल्या आहेत, लोकशाहीचा जिथे रोज दिवसा ढवळ्या मुद्दा पडला जातो तिथे असलेल्या माझ्या मराठी बांधवांची काय परिस्थती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. फ़क़्त मराठी म्हणून त्यांच्या मुलभूत अधिकारांवर जी गदा आणली जात आहे ती आम्ही गेली ६० वर्ष षंढा सारखे नुसते बघत बसलो आहोत. मराठी असल्यामुळे कित्येक मराठी युवकांचे शिक्षण, रोजगार हे या भागात अगदी मातीत मिळाले. मराठी माणसाला मिळणारी रोजची अपमानजनक वागणूक याला तेथील जनता आता कंटाळली आहे. त्यांना आस आहे ती त्यांच्या सर्व महाराष्ट्र वासीयांची .. त्यांचा सर्व राजकीय पक्षांवरील विश्वास हा उडाला आहे, रोजची आंदोलने, मोर्चे आणि लाठीचार हेच त्यांचे भाग्य बनले आहे. ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी त्यांची हि धडपड चालू आहे त्या महाराष्ट्रातील कित्ती लोकांना या प्रश्नाचा गांभीर्य आहे काय माहित. पण ते वेडे मराठे मात्र या शिवबाच्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी तळमळ करत आहेत.
पण सध्या आमचा हाच शिवबाचा महाराष्ट्र निश्चिंत झोपला आहे, सीमा वासियांचा प्रश्न असो कि पर प्रन्तियांचा आम्ही या सर्व प्रश्नाचे भवितव्य काही राजकीय पक्षांकडे किंवा पुढार्यांकडे देऊन गाढ झोपलो आहोत, नाही तर आप आपल्या जीवनात मग्न झालो आहोत. खरच का आम्ही एवढे स्वार्थी झालो आहोत, का आमच्या सर्व भावनाच मेल्या आहेत, का आमचा स्वाभिमान कुठे तरी हरवून गेला आहे .. नेमका काय झाला आहे. आमच्याच बांधवांच्या या दुखाची आम्हाला आज जाणीव होत नाहीये.

माहित नाही पण जे प्रतिनिधी आम्ही निवडून दिले आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात त्यांना आम्ही का जाब विचारात नाहीत, आमच्या बांधवांचे भवितव्य आज दुर्भाग्याने यांच्या हातामध्ये आहे, आणि हे जर हा प्रश्न गांभीर्याने घेणार नसतील तर त्यांना तिथे बसण्याचा अधिकार तरी काय आहे? लोकशाही आहे.. लोकांच्या मताची काही किंमत आहे कि नाही ? लोकशाही वर अजूनही विश्वास असणार्यांनो उठा ! तुमचा आवाज तुमच्या प्रत्येक लोक प्रतिनिधी पर्यंत जाऊ द्या, त्यांची कुंभकर्णाची झोप तुमच्या आवाजाने उडालीच पाहिजे नाहीतर ते २५ लाख मराठी बांधव आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या महाराष्ट्राला कधीच माफ करणार नाहीत.. कधीच नाही ..

सर्व राजकीय पक्षातील लोकांनी आता तरी सर्व विसरून या मुद्द्यावर एकत्र या , अन्यथा महाराष्ट्राचे लचके तोडायला सुरुवात झाली आहे, या शिवबाचा हाच महाराष्ट्र अपंग झाल्या सारखा दिसत आहे.

ज्या शहाजी राजांनी बंगलोर शहर वसविले, तेच आज महाराष्ट्राच्या उरावर चालून येत आहे. दिल्लीची हि साथ त्यांना लाभली आहे.. पण हा माझा महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस अजूनही बेसावध आहे, सर्व जन आप आपल्या सोयीने आपली आपली भूमिका घेत आहेत. आता हे सर्व थांबले पाहिजे सर्वांची हो हो सर्वांची म्हणजे सर्व मराठी माणसाची मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना एकच भूमिका असली पाहिजे ती म्हणजे बेळगाव, कारवर, निपाणी सह ८६५ गावे हि महाराष्ट्रामध्ये सामील झालीच पाहिजे आणि तेथील मराठी लोकांवर होणारे अमानुष अत्याचार हे आता थांबलेच पाहिजेत.

या मराठी माणसाला रोज रोज जखमा देऊ नका .. दिल्ली लाही झुकवण्याची ताकद येथील मराठी मनगट मध्ये आहे. आजवर रक्त सांडले आहे अजून कित्ती दिवस आम्ही असेच बघत बसणार आहोत. का आमच्यातला माणूस आज गप्प आहे ! मराठी म्हणून नाही तर नाही पण एक माणूस म्हणून तरी सबंध मराठी मनाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा एवढी एकच अपेक्षा करतो

जय महाराष्ट्र !!!!!!!!!


अमोल सुरोशे

No comments:

Post a Comment