Friday, December 11, 2009

व्यसनमुक्ती महाराष्ट्र शासनाची

सध्या आमचे महाराष्ट्र शासन दारू पिऊन झिंगणाऱ्या माणसा सारखे रोज काही न काही बरळत आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ नेहमी "दारू - दारू आणि फ़क़्त दारूच " एवढा दिसत आहे.

कदाचित कसलेही कर्तुत्व नसतांना आमच्या मराठी जनतेने त्यांना पुन्हा एकदा खुर्चीवर बसविले आणि बहुतेक त्याचा त्यांना जोरदार सेलिब्रेशन करायचा आहे, म्हणून सरकार स्थापन झाल्या पासून हे लोक विविध प्रकारच्या दारूच्या गोष्टी करत आहेत.
इन मीन चार दिवसांमध्ये आमच्या आदिवासी मंत्र्यांना मोह पासून दारू बनवण्याचा "मोह" सुटला, या पूर्वी ते वनमंत्री होते बहुतेक तेव्हाच त्यांची नजर तिथे गेली असेल, पुढे लोकांचा कडवा विरोध बघून त्यांनी तात्पुरता का होईना हा मोह आवरता घेतलेला दिसतोय. पण त्यांना हा मोह पुन्हा कधी होईल हे काही सांगता येत नाही. गरीब आदिवासी लोकांच्या असलेल्या पारंपारिक जमिनी हिसकावून गेली साठ वर्षे आम्ही त्यांना आधीच भरपूर न्याय दिला आहे , आता या दारू पायी त्यांचे राहिलेले आयुष्य हि उध्वस्त करू पाहतोय. एवढ्या वर्षात त्यांच्या साठी काही ठोस शैक्षणिक, सामाजिक आर्थिक योजना राबविण्यात यांना अपयश आले आणि हे रोज नव नवीन योजना ज्यांचा फायदा काही ठराविक खादी वाल्यांना आणि ठेकेदारान्ना होणार.आणि हे कम मात्र ह्यांच्या यादी मध्ये सर्वात आगोदर आहे।

हे वादळ थांबते न थांबते तोच आता धान्या पासून दारू बनविण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे.एकीकडे गरीब आणि सामान्य लोकांना रोजचे जीवनावश्यक धान्य आवाक्या बाहेर जात आहे, महागाई ने आपला कळस गाठला आहे, शासन मुर्दाडा सारखे पडून आहे, सामान्य माणूस ओरडून ओरडून थकला आहे, आवश्यक धान्याची काळा बाजरी होतांना दिसत आहे, कृत्रिम महागाई निर्माण करण्यात येत आहे .. आणि आमचे शासन या धान्या पासून दारू बनवण्याचे प्रयत्न करीत आहे, म्हणजे लोकांनी आता धान्य न खाता सरळ दारूच ढोसावी असा सल्ला जणू सरकार देत आहे. खराब अन्न धान्या पासून दारू बनवणार हा जरी दावा असला तरी त्या मागचे दूरचे दुष्परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि या मागचे काळे कारनामे आपणच शोधून काढले पाहिजेत.

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे कि नाही" हे विचारण्याची वेळ आता आली आहे, लोक कल्याणकारी सरकार स्थापन करून समाजाच्या कल्याणासाठी काही करण्याचे सोडून ह्या सरकारला दिवसा ढवळ्या दारूचे कारखाने सुरु करण्याची दुर्बुद्धी सुचली आहे .. लोकांना खायला अन्न नाही , आज हि आमच्या देशात ४०% लोक आर्ध पोटी झोपतात आणि ह्यांना त्यांचे पोट भरण्या ऐवजी त्यांना दारू पाजण्याचे सुचत आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दारू बनवण्याचे कारखाने आणि त्यांचे परवाने हे तमाम राजकीय पक्षातील लोकांना वाटले गेले आहेत, माझ्या कडे सर्व नावे आहेत पण एवादाच सांगू इच्छितो कि या मध्ये सर्वच राजकीय पक्षातील बड्या राजकारण्यांचा समावेश आहे, म्हणून कोण्या एकाला दोष देण्यात काही आर्थ नाही .. सांगायचा उद्देश हा कि तमाम राजकीय बळ ह्या दारू बनवण्याच्या मागे आहे.. आता गरज आहे या राजकीय आणि धनशक्ती विरुद्ध आपल्याला उठाव करावा लागणार .. एव्हडे दिवस आपल्याला पिळून खाणारे हे राजकारणी आता आपल्या खाण्यावरच उठले आहेत.. आताच जागे व्हा नाही तर उद्या आपल्या खाण्याचे पण वंदे होतील आणि आज चपाती नाही म्हणून लेकरांना गहू-ज्वारी पासून बनलेली दारू पाजावीलागेल.

हे सर्व कमी होते कि काय परवा आमचे राणे साहेब म्हणाले कि, आमचा शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतो, त्यांना माझी विनंती आहे कि त्यांनी मेलेल्या लोकांची आकडेवारी परत एकदा बघावी.. कित्ती लोक दारू पिणारे होते आणि कित्ती नाहीत, त्यांचा दारू बंदी करा हा निर्णय योग्यच होता पण त्याचे खापर आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या माथी मारायची काही गरज नव्हती, त्यांना विष प्यायला पैसा नाही आणि हे त्यांना दारुडे कसे काय म्हणू शकतात .. एकीकडे दारू मुळे शेतकरी आत्महत्या करतो म्हणायचा आणि दुसरी कडे दारू उद्योगाला चालण्या देण्या साठी सारे सरकार कामाला लागते आहे .. हे न समजण्या इतपत आम्ही काय वेडे आहोत का .. आणि न समजनार्यांनो आता तरी समजून घ्या .. कसला सावळा गोंधळ सुरु आहे इथे ..

हा निर्णय घेतांना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव येईल हे एक कारण दिले जात आहे, मला खरच त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव येते, इथे आमचा शेतकरी गेली कित्येक वर्षे रोज मारत आहे, त्यांच्या सध्या सुध्या गरजा हे लोक पुर्या करू शकले नाहीत, पाणी नाही , वीज नाही, खात नाही, बी बियाणे नाही आणि हे काहीच नसतांना उगवलेल्या थोड्या थोडक्या अन्न धान्या पासून यांना दारू बनवायची आहे, म्हणजे आज वर आम्हाला खाऊ घालणारा उपाशी होताच आता आम्हा सर्वांना पण उपाशी मारण्याचे ह्यांचे कारस्थान दिसत आहे. या मागे कुठल्याही प्रकारचे शेतकर्याचे कल्याण नसून इथे काही राजकीय लोकांची घरे भरण्यासाठी हा दारू चा धंदा शासनमान्य करण्याचा हा डाव आहे.

हा डाव वेळीच हाणून पडला पाहिजे .. दारू ची नाश काना खाली वाजवल्या शिवाय उतरत नाही, या सरकारची नशा उतरवायची असेल तर त्यांना लवकर शुद्धी वर आणणे हे आपले कर्तव्य आहे .

ह्या विरोधात आपण आपल्या परीने होईल तिथे होईल तसा विरोध प्रकट करूया, पुढे ह्याच्या विरोधात एक लढा हि उभा राहील त्या लढ्या मध्ये देखील सामील होऊया .. चांगल्या समाजाची निर्मिती मध्ये आपला प्रत्येकाचा सहभाग हा असलाच पाहिजे ..

जय हिंद .. जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

2 comments:

Anonymous said...

नमस्कार , लेख छान वाटला. आपल म्हणन मला पटल.
हा हा. म्हणे शेतकरी दारु पितात म्हणून आत्महत्या करतात. मग सर्वात जास्त आत्महत्या मुंबई व्हायला पाहिजे, कारण राज्यातील जास्त दारु तेथेच खपत असेल. नाकर्तेपणा लपवायचा चांगला मार्ग आहे.

Vijay Deshmukh said...

उत्तम लेख. पण नेमकं काय करावं म्हणजे "ही" नशा उतरेल ?

Post a Comment