Friday, December 11, 2009

खुशखबर .. अखेर सरकारची नशा उतरली ...

परवा सरकारच्या व्यसनमुक्तीची गरज आहे आशा आशयाचा लेख लिहिला.. बर्याच प्रसार माध्यमांनी देखील हा मुद्दा उचलून धरला .. आणि शेवटी सरकार नमते झाले.. धान्या पासून दारू बनवण्याचा निर्णय सरकारने अखेर रद्द केला. सर्व दिलेले परवाने स्थगित करण्यात येतील आणि दिलेले अनुदान देखील परत घेतले जाणार आशी माहिती गृहमंत्री आबा पाटील यांनी काल विधिमंडळात दिली. या संदर्भात प्रश्न उचलून धरणाऱ्या त्या सर्व लोक प्रतिनिधींचे जाहीर आभार.. शेवटी लोकशाहीचा विजय झाला.. लोकांच्या इच्छेचा आदर करून शासनांनी हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल त्यांचे हि अभिनंदन.

या बाबतीत आज वर्तमानपत्रात बातम्या देखील आल्या आहेत

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=31158:2009-12-11-18-13-16&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104आणि काल आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभार .. समाज घडवण्यासाठी आपला सहभाग नेहमीच अपेक्षित आहे ....

आपलाच ..
अमोल सुरोशे

No comments:

Post a Comment