Thursday, December 3, 2009

मराठी पाउल पडते पुढे ...


मधल्या काळात मराठी सिनेमाला आलेली मरगळ झटकून मराठी सिनेमा आता आपली कात टाकू लागलाय, अनेक उच्च कोटीच्या कलाकृती या मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये दाखल होत आहेत.
तोच तो पण म्हणून आपली नाक मुरडणारा आमचा मराठी प्रेक्षक आता पुन्हा सिनेमा गृहांकडे वळेल अशी अपेक्षा नक्कीच करता येईल.
गेली कित्येक वर्षे या मराठी सिनेमाने आमच्या या मराठी जनतेला आगदी हसवले, रडवले. त्या त्या काळाच्या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रभाव त्या काळातील चित्रपटांमध्ये दिसून येतो.

अगदी भक्तीपर चित्रपटांपासून ते तमाशा चित्रपट, तसेच राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करणारे अनेक चित्रपटांनी आम्हाला अगदी खिळवून ठेवले.

आज पिढी बदलली .. तसेच काही स्वागतार्ह बदल आमच्या मराठी सिनेमा मध्ये हि झाले .. मराठी चित्रपट दुसर्यांदा ऑस्कर वारी ला निघाला .. अनेक अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपट आपले वेगळे स्थान टिकवून आहे, मराठी चित्रपटाचा दर्जा हा आता नक्कीच अंतर-राष्ट्रीय झाला आहे ह्या मध्ये कुठलेही दुमत नाही.

सध्याच्या काही काळात प्रदर्शित झालेले काही चित्रपट ज्यांनी आपले वेगळे पण सिद्ध केले आहे.

वळू, टिंग्या , गाभ्रीचा पाऊस , मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, चेकमेट, गोष्ट छोटी डोंगरा एव्हढी, जोगवा , गंध , गैर, कैनवास, सुखांत, हरीश चंद्राची.. वैगेरे अगदी आत्ताचे हे चित्रपटांवरून आपल्या लक्षात येईल कि मराठी सिनेमा खूप बदललाय. येणारे काही चित्रपट झेंडा, नटरंग, आणि अनेक नवीन नवीन विषयांना हात घालणारे आणेल चित्रपट येऊ घातले आहेत.

वरील पैकी प्रत्येक चित्रपट हा आपले वेगळे पण टिकवून आहे.

गरज आहे या चित्रपटांची माहिती सर्वांना होण्याची कारण आपली नेहमी एकाच ओरड असते, मराठी सिनेमा आलेला काळातच नाही ॥ तरी आपण सर्व मराठी मनाच्या लोकांनी जेव्हा जेंव्हा आपल्याला या मराठी सिनेमांबद्दल समजेल ते आपण इतर हि सर्वांना कळवावे .. मराठी सिनेमा एक नवा श्वास घेतोय .. त्याला गरज आहे आपल्या प्रतिसादाची ..

अमोल ....

No comments:

Post a Comment