Tuesday, November 24, 2009

जरा याद करो कुर्बानी .....

पुन्हा एकदा 26-11 च्या निमित्त्याने त्या काळरात्रीची दृश्ये डोळ्यासमोर आली, पुन्हा एकदा त्या काळीज चिरून जाणार्या कटू आठवणी ताज्या झाल्या।
26 नोव्हेंबर 2008 च्या त्या काळरात्री दहा पाकड्या अतिरेक्यांनी असा एक धुमाकूळ घातला ज्याचे नाट्य पुढचे ६० तास सबंध जग आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत राहिले।

फ़क़्त १० अतिरेकी आमच्या मायभूमी मध्ये येऊन काय गोंधळ घालू शकतात, हे त्या राक्षसी प्रवृत्तीच्या अतिरेक्यांनी दाखवून दिले. कित्येक निरपराध लोकांचे रक्त सांडून त्यांनी आमच्या छाताडावर पुढचे ६० तास एकच थैमान घातले. ज्या आतंकवादाला एका विशिष्ठ धर्माचे नाव देण्यात आले होते त्या आतंकवाद्यांनी आपल्या गोळ्या झाडतांना समोरच्या कोणालाही त्याचा धर्म विचारला नव्हता, त्यांचे फ़क़्त एकच ध्येय होते ते म्हणजे आम्हा भारतीयांच्या मनामध्ये एक दहशत पसरविणे, हा अतिरेकी हल्ला म्हणजे नेहमी प्रमाणे केलेला एखाद दुसरा हल्ला नव्हता, या हल्ल्याच्या निम्मित्याने त्यांनी आमच्या समोर काही प्रश्न उभे केले आहेत. आमच्या अस्तित्वाचाच प्रश्नं त्यांनी निर्माण केला आहे, मग या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार.. एक भारतीय म्हणून आपले हे कर्तव्य नव्हे काय.

एक भारतीय म्हणून मी त्या पाकड्या अतिरेक्यांना सांगू इच्छितो, आम्ही कोणासही घाबरणार नाही, नव्हे तशी हिम्मत देखील कोणी करू नये. आज हि आमच्या डोळ्यासमोर आमचे निधड्या छातीने लढलेले आमचे करकरे, कामते, साळसकर, तुकाराम ओंम्बळें आणि मेजर उन्नीकृष्णन सारखे सर्व जवान एक प्रेरणा म्हणून उभे आहेत. ज्यांनी आपला देह आमच्या संरक्षणासाठी टेकवला त्यांचे शौर्य आज हि आमच्या डोळ्यासमोर आहे. जे आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत केवळ लढले त्यांच्या बलिदानाची शपथ घेऊन सांगतो कि आम्ही या दहशतवाद समोर कधी हि आमचे गुढगे टेकवणार नाहीत. या मातृभूमीवर चालून येणाऱ्या त्या प्रत्येकास मग तो कुठल्याही धर्माचा का असेना त्याला सर्व प्रथम आमच्या या हिम्मतीशी लढाई द्यावी लागणार.

आजच्या या दिवशी मी त्या लढलेल्या प्रत्येक जवानास हजारो वेळा सलाम करतो .. सलाम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला.. सलाम त्यांच्या शौर्याला ....

पण आज देखील आम्ही फ़क़्त त्यांच्या आठवणीच काढणार का? ज्या प्रमाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे केवळ शासकीय उपक्रम होत चालले आहेत त्या प्रमाणे आमचे शासनकर्ते २६-११ च्या घटनेला देखील केवळ शासकीय कार्यक्रम म्हणूनच साजरा करणार आहेत का? आम्ही या सर्व गोष्टी मधून काही शिकणार नाहीत का ?
मी असा नाही म्हणत आहे कि शासनाने काहीच केले नाही, त्यांनी उचललेल्या त्या प्रत्येक सकारात्मक पावला बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
पण दुख होते जेव्हा हे ऐकण्यात येते कि हल्ल्यात बळी पडलेल्या काही सामान्य सैनिकांच्या घरी अजून हि शासकीय मदत पोचली नाही , शासनच्या मदतीसाठी त्यांच्या कुटुंबियांना सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत, हल्ल्यानंतर आश्वासनांचा पाऊस पडणारे आज त्यांच्या घरच्यांचे दोन अश्रू पुसतांनाही कधी दिसत नाहीत. शासन आपली जबाबदारी टाळत असेल तर त्याची त्यांना जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे, आमच्यातील प्रत्येकानं त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून हि जबाबदारी घेतली पाहिजे. ज्यांनी आपले कुटुंब पणाला लावले त्यांची त्या कुटुंबाचा आम्ही हि एक घटक आहोत हि जाणीव त्यांच्या कुटुंबियाना झाली पाहिजे.
दुख वाटते ते याचे कि या घटनेला एक वर्ष उलटले तरी हि त्या शहिदांच्या नावाने एक हि स्मारक या महाराष्ट्र मध्ये उभे राहू नये याचे. ज्यांनी आपले रक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडले त्यांना आम्ही अशी घोर उपेक्षा देणार का?
केवळ शासन आणि प्रशासनाला शिव्या घालून काही होणार आहे का, १०० कोटींच्या या देशामध्ये खरोखरच आमचे सुरक्षा रक्षक प्रत्येकाच्या जीवाची हमी देऊ शकणार आहेत का?

नाही .. नाही मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आपली जबाबदारी आहे.. केवळ आठवणी मध्ये रंगून जाण्या पेक्षा हे सर्व प्रश्न आपण स्वतः शी केला पाहिजे ..

खर तर या १०० कोटी जनतेने स्वतः च एकत्र येऊन एकमेकांचे पर्यायाने राष्ट्राचे संरक्षण केले पाहिजे, तेव्हाच या देशावर आक्रमण करणार्यांचा खरा खुरा पराभव होईल.
आपल्या देशाच्या संरक्षणार्थ आपणच डोळ्यात तेल घालून खडे टाकले पाहिजे, आपस मधील वाद विसरून एक राष्ट्र- भारत राष्ट्र सुरक्षित ठेवले पाहिजे.

बाकी आमचा इतिहासच सर्वांना सांगून जातो कि या देशावर वाकडी नजर टाकणार्याला याच माती मध्ये गाडल्याशिवाय हि मायभूमी कधी शांत झाली नाही .. दोन ओळी मनामध्ये आल्या .. त्या इथेसांगतो, लक्षात ठेवा हरामखोर पाकड्यानो ...

"इतिहास आमचा शौर्याची खान

फ़क़्त वीर जन्मती हे तू जान
असतील हजारो कसाब जरी
पुरून उरेल
भारत मातेचा एकच जवान .. एकच जवान."

या २६-११ च्या निमित्त्याने शपथ घेऊया ...
आम्ही कुठल्याही अंतर-बाह्य दहशतवादाला बळी पडणार नाहीत.
या दहशतवादच बिमोड करण्यासाठी आमच्यातील प्रत्येक जन आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार .. आम्ही कधी हि हतबल होणार नाहीत.
या लढाई मध्ये लढणाऱ्या त्या सर्व सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीर पाने उभे राहू ..
आमच्या सुरक्षे साठी असलेले नियम. कायदे आम्ही नेहमी पाळणार.. त्यांचा आदर करणार.
आणि आम्ही सर्व जन आमची करडी नजर ठेवून या राष्ट्राची सुरक्षा करणार ...

चला सामील होऊया या लढाई मध्ये आणि करुया आपल्या दुश्मनाचा नायनाट....

या आतंकवादाच्या लढाई मध्ये शहीद झालेल्या त्या तमाम वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम .. आणि श्रद्धांजली.

जय हिंद .. जय जवान .. जय किसान .....

अमोल सुरोशे

5 comments:

Deepak said...

आजच्या या दिवशी मी त्या लढलेल्या प्रत्येक जवानास हजारो वेळा सलाम करतो! सलाम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला!! सलाम त्यांच्या शौर्याला!!!

Yogesh said...

आपल्या जीवाची बाजी लावून मातृभूमीच रक्षण करणार्‍या प्रत्येक वीरास सलाम!!! जयहिंद!!!

प्रकाश बा. पिंपळे said...

kharach magil warshich mumbai attack sagalyana halawun sodnara hota. Tya srva shahidana ani hallyat bali padalelya nishpapana mazi shradhan jali ani ladhlelaya jawanana. koti koti pranam.
mala wate bharatane ata tari aplya internal security kade seriously pahile pahije. jantechya manatil bhiti ajun hi geleli nahi. nahi ti sarkarchya manatun geliye [karan ashya hallyanantar anekana rajiname dyave lagatat, mag bhiti nasanar tar kay?]. shasan sanvedanshil mulich nahi asa mhnar nahi pan, pan sanvedan shil ahe mhanje zale ka.....? tya mrit jawananchya gharchyan kon adhar denar? kon tynchakade baghanr ani mag ka mhanun udya ekada jawan ashya hallyachya weles BINDHAST houn Ladhel. Karan tyala mahit asel, aplyanatar, jyanchya sathi apan ladhat ahot te aplya kutumbachi kalaji ghenar nahit. mage aslyelaya mulanchi kalaji ghenar nahit. Char paper madhe nav yeun kadhich sansar dhakat nahi ki Pot bharat nahi. Aata mhanal aple sainik wa police itake swarthi nahit. Nahitach te, pan tyan nahit ka ghara aaplyasarkhi, tyani nako ka karayla aap aplya lekara balancha wichar.....?
barech prashna anuttarita aahet....! Tya jawanachya gharachyana ni bali padalelya lokanchya kutumbala sarkarcha adhar watawa,tyastich tyan niwadun diley. Nyav devatene lawar tya harami kasabla ni ya katat samil asalelyana ashi shiksha dyavi ki punha himmat hou naye kunachi [pan khra sangu malach wishwas nahi mazya ya vyavasthe var ki he khrach asa kahi kartil ki natar lokani halle karu nayet, karan bagha na aplya loksabhevar ahlla zala, amhi kay upatala?]. nirash tar nahi pan hairan matra ahe ya saglay andhalya karbharakade pahun. kadachit chuk hi asel mi pan .... mahit nahi ka ahe he sagal asa te.... ka amhala amchyach loakana nyay dyal wel lgato.... ka amhi jat ani dharamachya palikade kade jaun deshacha vichar karat nahit, manavatecha vichar karat nahit..!
aso tya sarva jawanan maze koti koti pranam ani hya kavitechya oli... vyartah na jaye balidan....!
Jai Hind ! Jai Maharashtra!

Anonymous said...

गोळीबार चालू असताना तीन पोलिस अधिकारी एकाच गाडीतून तेथे कसे निघाले?

Nipun Pandey said...

भारत मातेचा पुत्र आहे मी, मला कर्ज आहे या मातेचे . दहशतवादाचा बिमोड करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्या साठी माझे संपूर्ण जीवन त्या साठी समर्पित आहे. हि शपथ घेऊन मी त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन ज्यांनी समर्पित केले त्या प्रत्येक वीरास सलाम करतो, त्यांच्या असीम शौर्याला कोटी कोटी सलाम .. मा तुझे सलाम ... जय हिंद

निपुण पाण्डेय

Post a Comment