Wednesday, September 9, 2015

पुरोगामी आणि पराभवएक हाती असतो. भयंकर विचारी. लांडग्यांच्या विरोधात सारखा काही तरी सुधारणावादी लिहानारयांच्या टोळीतला एक महत्वाचा. लांडग्यांच्या लबाड्या जंगलाला सांगत असतो सदैव. पण होत काय ? एकदा सगळे लांडगे त्याच्याकडे येतात हार फुले घेऊन. सांगता तुम्ही म्हणता ते आम्हाला पटते. आम्ही त्याबद्दल खूप विचारही करत आहोत. आपण सगळ्यांनी मिळून जंगलाच भलं करू. हत्तीला ते पटते. ते म्हणतात तुम्हाला आमचा सेनापती व्हावे लागेल, मार्गदर्शन करावे लागेल. हत्ती दिलेल्या आदराने हुरळून जातो. नाही नाही म्हणत सेनापतीपद स्वीकारतो. तो सेनापती होतो.

अनेक सुधारकीची कामे केली जातात.सेनापती हत्ती आता पूर्णपणे लांडग्यांच्या हेतूबद्दल आणि निष्ठेबद्दल निश्चिंत होतो. अचानक एका सायंकाळी एक गरीब लांडगा इतर सुधारकी हत्तींनी मला एकट्यात पकडून मारले अशी खबर घेऊन येतो. लांडगा खोट बोलणार नाही याची खात्री असते सेनापतीला. आणि पुन्हा लांडग्याचा अवतार बघून तर खात्रीच पटते. गडबडीने बैठक बोलावली जाते. अहिंसक मार्गाने आपण त्या हत्तींनां जाब विचारायचा असं ठरवलं जात. पण हे सगळे सुधारकी हत्ती राहतात कोठे रात्रीला हे लांडग्यांना माहित नसते. सेनापती या नात्याने हत्ती सगळ्यांना जंगलातल्या एका मोठ्या वाड्या समोर घेऊन जातो. वाड्याला भयंकर मोठे दार असते अनेक लांडगी दर उघडण्याचा प्रयत्न करतात. पण असफल होतात. रात्रीची वेळ असल्याने आणि लांडग्यांबद्दल बिलकुल विश्वास नसल्याने आतून कुणीही दार उघडत नाहीत. आणि आपण दर उघडल्याशिवाय कुणीही लांडगा मध्ये येऊ शकणार नाही हा विचार करून सगळेच हत्ती शांत झोपी जातात.

शांत असलेला लांडग्यांचा जमाव अचानकच रागात येतो. सेनापतीला विनंती केली जाते कि आपण दार तोडू. पण कोणताही लांडगा दार तोडू शकणार नाही याची सगळ्यांनाच कल्पना असते. सेनापतीच्या नावाचा जय जय कार होतो. अख्ख जंगल सेनापतीच्या जय-जयकाराने दुम-दुमून निघते.

सेनापती हत्ती पुढे होतो. दाराला जोरजोरात धडका द्यायला लागतो. काहीच वेळात सेनापती हत्तीचे कपाळ रक्तबंबाळ होते. पण सेनापतीच्या नावाने जय जयकार चालूच असतो. जसा जसा जय जयकार आवेशात येउन केला जातो तशा तशा सेनापतीच्या धडका वाढतच जातात. आणि दार हळू हळू खिळखिळे होत जाते. जीवाची चिंता नकरता आपल्या अनुयायी लांडग्यांना न्यायमिळून देण्यासाठी हत्ती आपल्या धडकांनी शेवटी दार तोडून टाकतो. जसे दार तुटते तसाच सेनापतीचाही जीव जातो. सेनापती दारातच कोसळतो. पण क्षणातच लांडग्यांचे कळपच्या कळप त्याच सेनापतीच्या शवावरून वाड्यात शिरतात. प्रचंड संख्येने असणारे स-शत्र लांडगे बघता बघता नि-शत्र   हत्तींना घायाळ करून वाड्याचा ताबा घेतात. दुसऱ्यादिवशी सकाळी वाड्यावर, सेनापती हत्तीमेल्यावर वाड्यात पहिले पाऊल टाकणाऱ्या लांडग्याचे चित्र असलेले निशाण फडकत असते!              
            

No comments:

Post a Comment