Thursday, September 3, 2015

इस देश मै रहणा है तो वन्दे मातरम केहना होगा!!

आसेतु हिमाचल का काय ते यानेच मिळणार आहे. समस्त हिंदुनंनी एकत्र यावे धर्म खतरे में है. पोर ऐकत नाहीत का. मुलींचे विचार बदला, सशक्तीकरनाच्या नावाखाली त्यांना जाहला धर्म रक्षण शिकवा.
काय म्हणताय …? गरिबी …इथाचे सामाजिक प्रश्न का ?
…. ते होतील हो पूर्ण आधी आसेतु हिमाचल असे हिंदू राष्ट्र बनू द्या. मग बघा एकछत्री अमलाने कसे सगळे निकाली काढू ते …. साक्षात भगवान श्रीकृष्ण आमच्या सगळ्यात धर्म रक्षणासाठी संचारलेत !
काय म्हणता …. कृष्णाच्या वेळी मुसलमान ख्रिचन नव्हते …. ??
… अं अं अं अं अं…. मी येतो …. प्रथानेची वेळ झालीये कृष्ण नाराज होईल उद्या गोकुळ अष्टमी आहे नं … आणि खरेदीला पण जायचेय … पोराच्या शाळेत त्याला कृष्ण बनवून पण पाठवायचेय… कॉन्व्हंट शाळेत जातो तो फार शिस्त असते तिथे
… काय म्हणता … त्या आपल्या नसतात …. ?
…. अहो पण वेद शाळांनी थोडीच पोट भरणार आहे … ?
ये पोरा…. हा घेरे झेंडा मी आलोच …इस देश मै रहणा है तो वन्दे ….
ह्याल्लो ह्याल्लो ह्याल्लो... काय म्हणता ऐकू येत नाहीये इथे … काय ??? व्हिजा भेटला का अरुणला … वा वा … येतो आज तुझ्याकडे पेडे खायला ……हो हो … ठेवतो !
… … इस देश मै रहणा है तो वन्दे मातरम केहना होगा!! वन्दे मातरम केहना होगा!!!
या अशा जातीयतेच्या आणि धर्मांधतेच्या काड्या शिलगून … पोटाच्या प्रश्नाला दुय्यम ठेऊन समस्त समाज त्यातली त्यात अशिक्षित आणि आपल्या डोक्याने काम न करणारा, पेटवला जात आहे. इथे बहुजन हा शब्द वापरला असता … पण मग मला जातीय ठरवून मी 'काय' म्हणतोय ते सोडून मी 'कोण' आहे याच्यावर फोकस जाईल.
असो.

No comments:

Post a Comment