Wednesday, September 16, 2015

असेतु हिमाचल नसलेल्या राष्ट्रातला हा भाग - मराठवाडाउशिरा आलेले स्वातंत्र्य म्हणजे मराठवाडा मुक्तीदिन जो आज आहे. प्रचंड हालअपेष्टा सहन करून आजवर अस्तित्वात असलेला आणि सगळ्या जगाला शहाणपण येउनही अजून आपण कधी शहाणे होणार याची वाट बघत राहणारा असेतु हिमाचल नसलेल्या राष्ट्रातला हा भाग - मराठवाडा!

ज्या ज्या म्हणून संकटांना एकदा समाज सामोरे जात असतो तशी सगळी संकटं मराठवाड्याने पहिली - हिंदू मुस्लिम वाद, सवर्ण दलित वाद, संरांजामी आणि सामन्यांचा वाद आणि निसर्गाच्या ताळमेळाशी वाद, इत्यादी. या सगळ्याचे कारण कशात आहे हो शोधणे मोठे मुश्किल वरना आजवर काहीना ना काही इलाज निघाला असता. नेतृत्वाची कमी म्हणावं तर २-३ मुख्यमंत्री महरष्ट्राला देणारा हा भाग. पण ही सगळी राजकीय नेतृत्व. वाईट वाटेल अनेकांना, पण आज मुक्तीदिन आणि ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला जखडलेय त्यांचा उहापोह केल्याशिवाय खरी मुक्ती मिळणार नाही. म्हणून - तर ही सगळीच जातीय आणि संरांजामी नेतृत्व. कुठे सरंजामशाही अनेक पिढ्यान पासून तर कुठे एक पिढी मागपासून. नाव न घेताच सांगेल पण काही नेतृत्व अगदी हवी म्हणून बनवलेली. त्यांच्या पुढच्या पिढ्या आता सरंजामी गाजवातायेत. तर असो. इथे सरंजामी काही एका जातीचा ठेका नाही. प्रत्येक जातीतला नेता आपल्या जातीचा आणि तिच्या हिताचा रक्षक म्हवून घेतो आणि 'जात खत्रे में है' अस मानणारे  निर्बुद्ध मग अशांच्या पाठीशी राहतात. हे अगदी चांगल्या शिक्षित जाती पासून अशिक्षित जातीपर्यंत लागू पडते म्हणून गैरसमज नसावा.

यासाठी उत्तर काय ? तर - शिक्षण!

राहीलं उद्योग व्यवसायाचं. तो खेदाने म्हणव लागेल मोजक्या जातींची मक्तेदारी आहे. पण त्यात त्यांचा असा काही विशेष दोष नाही. मक्तेदारी कधीही स्वतःहून जात नसते आणि का जाईल? तो ज्याच्या त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ती कधीही मोडून काढावी लागते. एका चांगल्या अर्थाने माक्तेदाऱ्या मोडून निघणे हे अगदी मक्तेदारी असणाऱ्या समाजासाठी सुद्धा हिताचे असते. वरना त्यांच्या लेकराला आवडो नआवडो त्याच त्याच व्यवसायाच्या दावणीला त्यांना नविचारता बालपणीच बसवले जाते. याला उपाय नाही. कदाचित असे दुष्काळ आणि शेती आणि शेती संबंधित बुडीत निघणारे व्यवसाय बघून तरी लोकांना शेतीचा मोह राहणार नाही. शेती नसावी असं नाही आणि शेतकरी नसावा असंही नाही. पण जमीन किती आणि त्यावर जगणारी मानसं किती याचा काही तरी ताळमेळ असावा.

सोबतच दळणवळणाची  साधनं अत्यंत अपुरी आहेत. याची कल्पना अगदी देवगिरीचे तिकीट काढतांनाही येईल, इतकी ती ठळक आहे.

लोकांची धार्मिक वृत्ती ही एक मला अशात दिसणारी अत्यंत विरोधाभासी गोष्ट. पण कदाचित तो विरोधाभास नसून गरिबी, अज्ञान आणि निर्बुधत्ता, होय निर्बुधात्ताच अगदी आमचीही, यांच देवाच्या अस्तित्वाशी असणारं को-रिलेशन असेल. इतके धार्मिक उत्सव आणि संतांची भूमी असणाऱ्या या पवित्र भूमीवर पाऊस का पडत नसावा? सगळ्या मराठवाड्यातली देवळं अगदी चांगला पाऊस पडणार नाही तोवर एकदा बंद करून तरी पहा, असलाच तिथे देव आणि असेलच त्याच्या हातात तर अस्तित्वाच्या प्रश्नाने कमीत कमी पाऊस तरी पडेल तो. आणि नसेल तर चुपचाप आपण झाडे लावली पाहिजेत.

तसं सगळच इतक निराशाजनक नाही. बराच काही छानही चाललाय. पण असलेल्या पेक्षा नसलेल्याची जाणीव जास्त भासते.

बाकी महाराष्ट्राच्या निर्माणचं बीज ज्या संतांनी लावले, त्याची उभारणी ज्या छत्रपतींनी केली ते सगळे मुळचे मराठवाड्यातलेच.आता करीअर सगळ्यांनी पुण्याकडे जाऊन केले तो भाग वेगळा!

असो. मराठवाडा मुक्ती दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!            

No comments:

Post a Comment