Friday, November 1, 2013

पुन्हा एकदा महापुरुषांचा पराभव,

शालेय जीवनात असतांना एक धडा कि कविता वाचलेली, "महापुरुषांचा पराभव " ! जसजसा मोठा होत गेलो तस  तसा शिवरायांचा , बाबासाहेबांचा , फुल्यांचा , गांधींचा किंवा अन्य महापुरुषांचा त्यांच्याच अनुयायांकडून  दररोज होणारा पराभव याची देही याची डोळा जवळून  बघत आलो.

लहानपणी एका धड्या पुरते  वाचलेले आमचे "लोहपुरूष" म्हणजेच सरदार वल्लभ भाई पटेल गेली ६ ० वर्षे गांधी - नेहरू प्रेमात आकंठ बुडालेल्या काँग्रेस च्या कृपेने  कुठे तरी अडगळीत पडले होते, आणि आम्ही सज्जन - सरळ भारतीयांनी हि त्यांना एक - दोन शालेय धडे किंवा लेखांपुरते मर्यादित ठेवले .  थोडक्यात या सर्वांपासून दूर आजवर सुखात असणारे आमचे सरदार - लोहपुरूष गेल्या काही दिवसात पुनच्छ एकदा आमच्या राजकीय मैदानात उतरवले गेले.

निमित्य होते त्यांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे. विचारांचे लोणचे घालून केवळ पुतळे आणि स्मारकांच राजकारण करणाऱ्या या देशात हा हि कार्यक्रम अगदी नेहमीप्रमाणे डोळे दिपवून ठेवणारा झाला, असही आमची  महापुरुषांच्या  दिव्य विचारांना बघण्याची दृष्टी थोडी अंधुकच त्यात दिपवणारे स्वप्न दाखवले  म्हणजे झालेच…. आम्ही पुढचे काही वर्षे पुन्हा झोपायला तयार.

तर असो … सांगायचा मुद्दा हा कि बराच काळ सुखात असणर्या आमच्या लोह्पुरुशाची अचानक खेचाखेच सुरु झलि…

ज्या लोकांच्या बलिदानाने, त्यागाने हा देश स्वतंत्र झाला त्याच लोकांचा  गेली साठ वर्षे सोयीने  विसरून विस्मृतीत गेलेली कॉंग्रेस अचानक जागी झाले कारण आता यांचा वारसा सांगणारे आमचे नवे  ' सरदार'  म्हणजे  'वारसदार' हो …. नेहमिप्राने अगदी दणक्यात म्हणजे काय ते ब्रांडीग का काय करून लोकांच्या समोर अवतरीत झाले.  मग काय अगदी महाभारतापासून सुरु असणारा फ़ेमस खेळ वारसा हक्काचा खेळ सुरु झाला  … आता हा खेळ आला म्हणजे एकमेकांचे वस्त्रहरण होणार हे हि ओघाने आलेच.

मग काय दोन्ही बाजूंनी 'सरदार 'आमचेच कसे  हे सांगण्याचा प्रयत्न सुरु केला.

ज्या बापूंचे पटेल हे कट्टर अनुयायी होते त्याच बापूंची हत्या करणारी विचारसरणीला  देखील सरदार आणि त्यांचा निधर्मी पणा आपलासा वाटू लागलाय …. तर एवढी वर्ष अडगळीत फेकेलेले पटेल हे आमचेच हे सहसा न बोलणारे आमचे पंतप्रधान देखील    ठासून सांगायला बाह्या सरसावून पुढे आले.

सरदारांच्या विचारांची उंची एवढी मोठी होती (त्यांच्या होणाऱ्या पुतळ्या पेक्षाही)  कि त्यांच्यामुळे आजच्या ह्या अखंड देशाची निर्मिती झाली, तुकड्या तुकड्या मध्ये प्राप्त झालेल्या या देशाचे खरे पालकत्व स्वीकारले ते पटेलांनी. विखंडावस्थेत असणाऱ्या या देशाला जोडण्याचे काम च केले नाही तर या लोह्पुरुशाने या देशाला  लोखंडासारखी  मजबुती हि  दिली .

आज त्यांचे हेच सर्व तथाकथित  अनुयायी धर्म - भाषा - जात - प्रांत यांच्या जोरावर समाजाला तोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत आणि याच  तुटलेल्या तुकड्यांवर आपली मतांची झोळी भरण्याचे धंदे करीत अहे.

थोडक्यात काय तर … सरदार हे केवळ महापुरुष नव्हते तर लोहपुरूष देखील होते, त्यांना तोडणे किंवा ओढणे दोन्ही हि अवघड, पण आता हे हि शिव-धनुष्य त्यांच्या अनुयायांनी उचलले आहे, पुन्हा एकदा एका महापुरुषाचा पराभव त्यांच्याच अनुयायांच्या हाताने होणार .

आता तुम्हाला आणि आम्हाला ठरवायचे आहे कि पटेलांच्या विचारांना गगन भरारी द्यायची का त्यांच्या गगनचुंबी पुतळ्याला पराभवाचा  "हार"  घालायचा .

जय हिंद - जय महाराष्ट्र

-- अमोल


2 comments:

प्रकाश पोळ said...

अगदी खरे आहे. अत्यंत स्पष्ट आणि परखड शब्दात आपण सत्य मांडले आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जे काम करत आहात ते खूप आवश्यक आहे. समाजप्रबोधनाची चळवळ अशीच चालू ठेवा.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

धन्यवाद प्रकाश जी

Post a Comment