Thursday, October 31, 2013

रागा आणि नमो - आंधळे दळतेय कुत्रे पीठ खातेय - फक्त धडांचा देश

बुद्धिवंतांची भारतात कमी नाही. आमच्यासारखे तर गल्लोगल्ली आणि फेसबुकवर हजारो मिळतील. पण हे सगळ बाजूला ठेवून खरच किती दूरगामी परिणाम करणार आहे हे -आपण हौस म्हणून वैचारिक बोलणे, याचा विचार नाही.

तर या असल्या वैचारिक बोलण्याचा काठ गाठणारे, एक तर काहीच नाही किंवा असलेच तर फ़ौल असे कर्तब असणारे दोन महाशय या देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतायेत.

जवळपास सगळा देश आणि मेडिया सुद्धा हे दोघेच लायक आहेत अशा भ्रमात यान पैकी कौन अशी ओरळ उठवतोय. आणि यांपैकीच कुणी होणार असेल तर तो रागा असेल याचीच शक्यता जास्त.

आता नमो सारखा प्रचारकी माणूस रागाच्या पुढे उभा केल्यास तितकी क्षमता नसणारा रागा सुद्धा चमकून निघतोय. नुसताच रागा आणि त्या समोर अडवाणी उभे केले असते तर लोकांनी रागा साठी 'हा आणि पंतप्रधान?' असे विचारले असते, कारण अडवाणी सारख्या मात्तबर नेत्यापुढे, रागा ची कार्कीद्र आणि अनुभव काहीच नाही. असो. राजकारणाच्या मार्केट मध्ये रागा एकटाच उभा राहीला असता आणि त्याच्या समोर बीजेपी ने असाच कुणी तरी उभा केला असता, अडवाणी/नमो सोडून, तर रागा चा कुणी पंतप्रधान म्हणून टेकर नसता. पण जसे 'एकाच कंपनीचा प्रोडक्ट समोर असेल तर घेणारा हाच विचार करतो कि घेऊच की नको?'. पण तिथेच 'एका समोर एक असे दोन किंवा अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट असतील, तर तिथे घेणारा कमीत कमी काहीना काही घ्ययचेयच!' हा विचार करून असतो. म्हणूनच रागा समोर नमो असल्याने रागा 'सारख्यालाही' लोकांनी पंतप्रधान म्हणून घेण्यासाठी मानसिकता सुरु केली आहे. आणि शेवटी रागा कोन्ग्रेस सारख्या 'देश-व्यापी आणि काही अंशी धर्मनिरपेक्ष' असलेल्या पक्षात असल्याने उद्या तोच पंतप्रधान होणार याचीच जास्त शक्यता वाटते.

पण ते थोडे परवडण्यासारखे आहे. कारण ज्याचे काहीच कर्तब नाही तो कदाचित उद्या कर्तब दाखवेल. पण ज्याची काम करण्याची पद्धतच 'आतंकवादाचे हिटलारी' स्वरूप आहे तो विनाश सोडले तर इतर कुठेच घेऊन जाणार नाही.

पण भारता सारखा देश या दोघांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यापेक्षा कूप जास्त 'डीजर्व्ह' करतो. इथ अनुभवी पण निर्णय घेण्याची धमक असणारा हवा. सोबतच संवेदनशील आणि 'पूर्णतः धर्मनिरपेक्ष' असावा. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला अंतिम मानणारा असावा. आणि या दोघांतही ही कुवत नाही. दिल्ली आणि अहमदाबाद मध्ये भारत संपत नाही. त्यांना सोडून ही आपल्याकडे अनेक नेतृत्व आहेत. माध्यमांनी सामाजिक जबाबदारी म्हणून इतर पर्यायांचाही विचार करावा.

नसता जनता दळतेय आणि हे लोक देश खातायेतही परिस्थिती येईल. आपण धडावर डोके असल्यासारखे विचार करू म्हणजे पुन्हा 'मै ये हुं, मी वो हुं' म्हणून टोप्या घालून मिरवावे लागणार नाही.

काल परवाच तिसर्या आघाडी सारख काही तरी होऊ शकते याची ही शक्यता समोर आलेली आहे!


खाली मागे एकदा सीताराम येचुरींचे या बद्दलचे बोलणे फार आवडले. खुपच संयमी आणि राकाराण्याच्या फंडामेंटल वर प्रकाश टाकणारी मुलाखत.टीप: माझा 'खरच' कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही :)

No comments:

Post a Comment