Tuesday, September 4, 2012

बहुजन समाजच्या जोरावर हे सर्व संमेलन चालते तो ह्याला किती भिक घालणार ?


 खरच आज मटा पेपर मध्ये वाचून धक्काच बसला.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत जातीच्या नावाने मतांची भिक मागणारे हि आधुनिक भट भिक्षुक.

बर हि भिक मागतांना स्वतःला ब्राम्हण समाजाचे उद्धारकर्ते सांगून इतर बहुजन समाजाकडे आकसाने बघायचे, सरकारी भिकेवर साजरे होणारे हे सोहळे आणि त्यामध्ये ह्यांची अव्याहतपणे चालणारी यांची हि भिक्षुकी.
गेली अनेक वर्षे हे संमेलन म्हणजे विशिष्ट समाजाची मक्तेदारी बनलीये हे तर एवढे दिवस बोलले जाताच होते पण आज तर उघडपणे ह. मो. मराठे यांनी जातीच्या नावाने सरळ सरळ मतांची भिक मागितली. ज्या छत्रपती शिवाजी - शाहू - फुले - आंबेडकरी विचारांवर हा महाराष्ट्र उभा आहे त्यालाच कुठे तरी छेद देण्याचा हा प्रयत्न. आणि ह्या महापुरुषांच्या नावाने राज्य करणाऱ्या राज्य सरकारला माझे आवाहन आहे कि जर या महाराष्ट्रात जर कोणी वैचारिक-सांस्कृतिक दहशतवाद माजवत असेल तर असल्या सोहळ्यांना आणि अश्या लोकांना शासनाने तत्काळ नियंत्रण घातले पाहिजे.

ज्या भारतीय राज्य घटनेमुळे हजारोवार्षांपासून रुतलेले सामाजिक क्रांतीचे चक फिरू लागले, सबंध जाती -धर्माचे लोक एकत्रितपणे नंदू लागले तेव्हा ह्यांच्या पोटात दुखायला सुरु होते आणि स्वतःवर अन्याय होतोय अशी ओरड सुरु होते.

स्वतःला साहित्यिक आणि विचारवंत म्हणवून घेणाऱ्या ह्या थोर (?) व्यक्तिमत्वाने मनातील खरी भावनाच जणू त्याने बोलून दाखवली. मागील वर्षी च्या निवडणुकी मध्ये सुद्धा " प्रतिभा काय चाळी - झोपडपट्टीमध्ये जन्माला येते का काय", अशी दर्पोक्ती त्या वेळच्या एका स्त्री उमेदवाराने केली. हे काय चालले आहे या महाराष्ट्रात !

सबंध देशाला सामाजिक क्रांतीचे उदाहरण देणाऱ्या ह्या भूमीमध्ये हे असले वैचारिक दिवाळखोर असलेले जर मराठी साहित्य संमेलनात जर मिरवत असतील तर मग ज्या बहुजन समाजच्या जोरावर हे सर्व संमेलन चालते तो ह्याला किती भिक घालणार याबाबत मला शंकाच आहे.

सौजन्य: म टा

आजवरच्या मराठी साहित्य संमेलनांच्या निवडणुकांमध्ये जातीयता जोपासली जाते असे आरोप अनेक साहित्यिकांनी केले आहेत. खुद्द महात्मा फुल्यांनीच पहिल्या मराठी साहित्य संमेलनाची घालमोड्या दादांचे संमेलन अशी संभावना केली होती. मात्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार साहित्यिकांनी आपल्या प्रचारात उघडपणे जातीय भूमिका कधीही घेतली नव्हती. त्याला छेद देणारी गोष्ट यंदाच्या ८६ व्या साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेत घडली आहे. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सर्व मतदारांना पाठविलेल्या प्रचारपत्रात आपली साहित्यिक योग्यता स्पष्ट करतानाच आपण ब्राह्मण समाजासंदर्भात हाती घेतलेले काम सविस्तरपणे नोंदवत माझ्या या कामामुळे ब्राह्मण समाजाच्या मनातला भयगंड आणि न्यूनगंड संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे अनेकजण म्हणू लागले आहेत असा निर्वाळाही दिला आहे. 
या पत्रात ह.मो. २००४ सालचे जेम्स लेन प्रकरण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर झालेला हल्ला पुरुषोत्तम खेडेकर यांची शिवरायांच्या बदनामीची केंद्रे ही पुस्तिका यांचा हवाला देत म्हणतात गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे...या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे. आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी ही घोषणा केली असली तरी जातवार आरक्षणाच्या तरतुदीनंतर ब्राह्मणांच्या शैक्षणिक तसेच नोकरीच्या संधींवर मर्यादा आल्या. या नव्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ब्राह्मण तरुणांनी कोणत्या मनोधारणा स्वीकारल्या पाहिजेत हेही मी सांगतो. माझ्या या कामामुळे ब्राह्मण समाजाच्या मनातला भयगंड आणि न्यूनगंड संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे अनेकजण म्हणू लागले आहेत. ब्राह्मणांविरुद्ध करण्यात येणाऱ्या द्वेषमूलक अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी उभे राहण्याचे धैर्य मला परमेश्वरानेच दिले असावे अशी माझी भावना आहे. 
आपली भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची वा चातुर्वर्ण्याची तरफदारी करण्याची नाही असे या पत्रात ह.मो. म्हणत असले तरी ते विशिष्ट जातीच्या उघड समर्थनाची भूमिका घेतात. या भूमिकेची मांडणी व ह.मोंचा विस्तृत परिचय करून देण्यासाठी 'किर्लोस्कर मासिकाने सप्टेंबरचा विशेषांक काढला आहे. ह.मों.चे पत्र साहित्य संमेलन निवडणुकीच्या मतदारांना पोचूनही बरेच दिवस झाले आहेत परंतु मराठी साहित्य वर्तुळातून याविषयी कुणीही जाहीरपणे बोललेले नाही. ज्यांना ही भूमिका नापसंत आहेत तेही खाजगीतच याविषयी नाराजीचा सूर काढत आहेत.

No comments:

Post a Comment