Tuesday, September 4, 2012

संविधानाच्या पायावरच कुऱ्हाड ...

आपल्याकडे राजकारणी सुद्धा कधी उघड उघड म्हणत नाहीत की मी मराठा आहे म्हणून मला मते द्या. ते जनतेनेच 'बिटवीन द लाईन' रीड करायचे असते. पण साहित्यिकांनी राजकारण्यांना ही निर्लाज्जतेत हरवावे हे दु:खद. आणि काहींनी जशी ***ह्रिदय सम्राट म्हणून स्वत:च स्वतःला घोषित केले त्यांसारखेच हे महाशय ही स्वतःला आधुनिक "साहित्यिक क्षेत्र नि-बहुजन" करणारा समजत आहेत की काय? आणि राहिलाच प्रश्न एका संघटनेच्या धोरणांचा. त्यांनी ते द्वेषकारक लिहिणे मराठ्यांच्या जातीला आणि जात बाजूला ठेवली तर शिवरायाला मानणाऱ्या कोणालाच शोभणारे नाही.  पण तितकेच चूक जेम्स लेन प्रकरणात यावर चर्चेने उत्तर काढू म्हणणे!
तसेच महाराष्ट्रातील ज्या जातीचा यांनी उल्लेख केलाय ती जात या राज्याला परकी नाहीये. जितक हे राज्य इतर कुणाच तितकच त्यांचही. किंबहुना हे वाक्य येथे लिहिण्याची सुद्धा गरज नाही इतके हे सगळ्यांचे आहे. आणि राहिला प्रश्न आरक्षण वगैरेचा;  त्या महान साहितीकांनी पांढरे केस होई पर्यंत भारत  कधी अभ्यासालाच नाही असे वाटते. कारण आमच्या सर्ख्याने उचलली जीभ लावली टाळ्याला करून आरक्षणा बद्दल बोलणे वेगळे आणि तुमच्या सारख्या मोठ्या नावजलेल्या आणि समाज इतकी वर्षे पाहिलेल्या माणसाने असे म्हणे म्हणजे काही दशकान पूर्वी लिहिलेल्या संविधानाच्या पायावरच कुऱ्हाड घातल्या सारखे. असो.

No comments:

Post a Comment