Sunday, September 2, 2012

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला : आज दादर शिवाजी मंदिर रात्री ८| पोवाडे | विचार | नंदू माधव | राजकुमार | धर्म भेद | जाती भेद | चौफेर


अनुभव  १ :


छत्रपती शिवाजी राजांना भेटायचं ? मग नक्की बघा ... " शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम नगर मोहल्ला" . गेली साडे तीनशे वर्ष हरवलेले शिवराय सापडले.पिढ्या न पिढ्या ज्यांच्या केवळ आणि केवळ नामघोषाने सबंध महाराष्ट्र मुलुख ढवळून निघाला ते छत्रपती शिवराय आले आहेत तमाम शिवप्रेमींच्या भेटीला. माध्यम आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सादर केलेले असे अप्रतिम दोन अंकी नाटक, " शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम नगर मोहल्ला" . खरोखरच गेली अनेक वर्षे ज्या शिवरायांची जाणीव मनामध्ये कुठे तरी मनामध्ये होती ते शिवराय आज प्रत्यक्षात अनुभवले. वर्षानुवर्षे केवळ किल्ले आणि स्वराज्याचे तोरण यांच्या पलीकडे न सांगितलेल्या शिवरायांच्या विविध धोरणांवर भाष्य करणारे आणि प्रकाश टाकणारे हे नाटक. या नाटकातील सर्वच्या सर्व कलाकार म्हणजे अस्सल ग्रामीण सोनं ! का नसणार .. सर्व जन पूर्ण वेळ शेतकरी ! जीव तोडून केलेली विषयाची मांडणी आणि अतिशय सुरेख असा अभिनय यांची सांगड बघायला मिळते. या सर्वांना सुरेख साथ आणि मार्गदर्शन लाभले ते या नाटकाचे निर्माता आणि दिग्दर्शक नंदू माधव यांचे. सर्वांचे कौतुक करावे ते थोडेच. ज्या शिवरायांचा उपयोग केवळ विविध समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी झाला त्यांचे खरे स्वरूप, त्यांचा खरा इतिहास मांडण्याचे धाडस या सर्व कलाकारांनी केले आहे त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन ! शिवरायांना मनापासून मानणाऱ्या सर्वांनी नक्की नक्की बघावे असे नाटक. नाटकाचा प्रयोग आज, दि. ३ सप्टेंबर रात्री ठीक ८ वाजता - शिवाजी मंदिर, दादर इथे आहे.

----
अनुभव २ :

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला
आज नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे रात्री ८ वाजता आहे. फोन बुकिंग ही करता येईल: ९८६९३५०४५२ 

एक अतिशय छान आणि विचार करायला लावणारे धाडसी नाटक. नंदू माधव (शाळा) यांचे दिग्दर्शन आणि राजकुमार तांगडे यांचे लेखन. तसेच अनेक पोवाड्यांच्या संगतीने अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील विषय हाताळला आहे. धर्मभेद, जातीभेद आणि तथाकथित 'सेकुलारांच्या' ही थोबाडीत मारणारे एक नाटक. कदाचित मेनस्ट्रीम मध्ये पहिल्यांदाच कुणी इतक्या प्रखरपणे आणि हसत हसवत ही असा एकाध विषय हाताळला. 

३/०९/२०१२ सोमवार रात्री ८ शिवाजी मंदिर, दादर . Phone Booking 9869350452


No comments:

Post a Comment