Tuesday, September 11, 2012

आरक्षणावरील एक चर्चा


  • रक्षणाच्या विरोधात बोलतांना अनेकांचा फार मोठा गैरसमज झालेला असतो. किंवा तो त्यांनी करून घेतलेला असतो. किंवा मग यात काय इतका विचार करायचा म्हणून गौण मानलेला असतो आणि म्हणून मग दुर्लक्षित. आरक्षण ही व्यवस्था भारता सारख्या विभिन्नातेने नटलेल्या (खरा पहिला  एका आर्थी 'भेदा-भेदाने' व्यापलेल्या ) देशाला अतिशय महत्वाची. आरक्षणाच्या विरोधात ओरड करणारे जास्तीत जास्त लोक त्याला व्यक्तिगत घेतात; माझा मित्र माझ्या पेक्षा डल्ल वगैरे होता आणि त्याला मेडिसिन मिळाले मी आयुर्वेदात घासतोय (औषधी ;) ) ! अशा आशयाची असतात. 
    पण या देशाची मालमत्ता आणि साधन संपत्ती प्रत्येकाची सारखीच आहे. आता प्रत्येकाला ती बरोबर विभागून देता येत नाही. म्हणजे हे घे तुझे २ गुंठे, हा घ्या तुमचा खाणीचा तुकडा, हे इतके लिटर पाणी तुमचे वगैरे वगैरे विभागणी खऱ्या अर्थाने करता येत नसते. पण तसं पहिले तर ती इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाची सम-प्रमाणात असतेच. आणि समजा जमिनी जरी गुंठ्या गुठ्याने वाटून  घेतल्या तरी ज्यांच्या नावे सध्या सात-बारे आहेत ते त्या सोडायला तयार होतील का? आणि जमिनीच्या मालकीकडे पहिले तर का मग जमिनी तथा कथित उच्च वर्णीयांच्या नावे जास्त आहेत? ते जन्माला वगैरे लवकर आले होते का? तर नाही. इथच्या हजारो वर्षांच्या व्यवस्थेने आपोआप त्यांच्या सात-बाऱ्यावर त्या चढवलेल्या होत्या. तितकेच काय तर याच व्यवस्थेन सगळ्यात आधी शिक्षण ही यांच्याच नावे १००% आरक्षित केले होते. पुढे जो शिकलेला तोच नौकरीत, या नियमाने मग तिथेही जवळपास १००% च्या आस पास उच्च वर्नियांचेच आरक्षण. मग एकंदर व्यास्थेत सगळेच मुठभर समाजातील लोक आली. पण पुढे शिक्षणाच्या पाझराने, होय पाझरा-पाझरानेच,  वंचित समाज पुढे आला आणि मग ओघानेच प्रस्थापित व्यवस्थेतील लोकांशी साहजिकच स्पर्धा करू लागला. स्पर्धेत हारायचे नाहीच हीच सवय लागलेली असल्याने किंबाहुणा एकेकाळी व्यवस्थाच तशी बनवली गेली असल्याने हा अनेकांच्या सर सरळ पोटावर पाय होता आणि अजूनही आहे; याने मग अनेकांच्या मुखातून द्वेष बाहेर पडू लागला. पण तो द्वेष अज्ञानातून आहे. हा प्रचंड देश मोजकीच लोके सांभाळू शकत नाहीत. म्हणून समाजाच्या प्रत्येक स्थरातून इथे लोक पाहिजेत. म्हणून त्यांना प्रोस्साहन पाहिजे. आणि हक्कच पहिला तर लोकसंखेच्या प्रमाणात इथल्या सगळ्या क्षेत्रावर प्रत्येक समाजाचा जितका तितका हक्क आहे. 
    आज जर खरच जातीनिहाय लोकसंख्या व्यवस्थेतील आणि संपत्तीतील वाट्यासहित 'नीट' मोजली तर आपल्याला थक्क करणारी आणि खरच आपण जाती व्यवस्थेमुळे किती अराजक माजवून ठेवले आहे हे दाखवणारी असेल. आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चाच हवी असल्यास ती वस्तू निष्ठा असावी. बिग पिक्चर समोर ठेवून असावी. गुणवत्ता वगैरेला काही धक्का बसत नाही. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते. 
    या सगळ्यामागच एक कारण आहे, बाबासाहेब अजून कुणालाच नीट कळले नाहीत (म्हणजे आम्हाला ते पूर्ण कळाले असेही नाही). आणि सगळ्यात म्हत्वाचे तर उच्चवर्णीयांना कळले नाहीत. त्या माणसाने संविधान एका विशिष्ट वर्गा साठी लिहिलेच नव्हते. ते होते अखंड भारतासाठी. अतिशय दूरदृष्टी ठेवून. त्यामुळे त्यांनी जो पाया मांडलाय तो खूप खंबीर आहे. त्या पायावर खर तर स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण समतावादी समाज निर्मिती करणे हे आपले सगळ्यांचे ध्येय असावे.  

    (सांगण्याची गरज नाही, पण एका अर्थाने या प्रतीवादाला मदतच होईल म्हणून. कारण आरक्षणाचे समर्थान करणारे आरक्षण घेणारेच असतील असा हा फार मोठा गैरसमाज बाळगून आणि वेळ पडलीच तर 'तुम्ही कशाला नाही म्हणाला आरक्षणाला?' अशी चर्चेची बोळवण करून आम्हीच खरे असा आव आणला जातो म्हणूनही. मी जन्माने खुल्या वर्गातील जातीतून आहे)


    प्रतिक्रिया :

    Sudhakar Patil प्रकाश विस्तारत लिहिण्यास वेळ नाहीये माझ्या कडे पण आजचा लेख वाचून आसं वाटलं कि तुम्हालापण राजकारणात जाण्याचे डोहाळे लागले आहेत राजकीय दृष्ट्या बोलायचा झाला तर लेख सुरेख, पटवून देण्याचा उत्तम प्रयत्न .... पण .... हा पण खूप मोठा आहे ... ....होय विषय खूप मोठा आहे ... विस्तारत फोन वर बोलेन
    September 5 at 12:57am ·  · 5

  • प्रकाश बा. पिंपळे Patil साहेब नक्की. बोलल्या शिवाय प्रश्नाचा आणि उत्तराचाही तळ लागणार नाही. आणि खरच तुमच्या सारख्या तळागाळात काम केलेल्यांचे विचार नक्कीच ऐकावेशे वाटतील. आणि राजकारणाचे म्हणाल तर २०१४ अजून दूर आहे! :) आणि तसा काही विचार झालाच तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर पाने उभे असतांना जातीय राजकारण करायची गरज कधीच पडणार नाही. आणि तसे केल्यास आपल्यात आणि आरक्षणाकडे राष्ट्रानिर्मानाचे आणि सक्षमीकरणाचे हत्यार म्हणून न पाहता, व्होट बँक इशू म्हणून बघानारात काय फरक? बाकी आमचे तर सध्या काही नाही राजकारणाचे, तुअमाचेच काही असेल तर, आम्ही कार्यकर्ते तयार आहोत पाटील साहेब!
    September 5 at 1:07am ·  · 3

  • Takshak Bodhi ‎. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते.

    Correctly pointed out Prakash ... :)
    September 5 at 7:48am ·  · 2

  • Kuldeep Deshmukh ‎@prakash & takshak, mitrano maz hya babtital knowledge thod kami ahe mhanun vicharto ki ase konti karana ahe ki jyamule amuk eka samaja la reservation dyawe amuk eka samaja la nako kinva kontya nikashan mule amuk eka samajala reservation dyav as tumhala watat

  • Shivraj Kalshitte Thank god I don't have reservation bcoz I and my generation will become stronger and more stronger......Keval dnyan ki kaam aata hai..
    September 5 at 9:28am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे ‎:) tasa nahi saheb lokaho. OBC cha MPSC wagaire che cutoff bagha, kalel ki tithehi spardha aahech karan loksankhyach titaki! Tech SC/SC che hoil yetya 10 warshat. Je ki changali bab aahe. Ani te magech na honyache karan mhanje aapali poor shikshan vyavstha - Pazara Pazaranech tithe pohachaliye Paravhane nahi!
    September 5 at 9:52am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Deshmukhsaheb loksankhechya pramanat representation ani Sadhanta asanya sathi garaj aasel tya wargla.
    September 5 at 9:54am ·  · 1

  • Atul Chalak Mala vatata pratek kshetrat arakshanachi defination hi vegali asavi.... Jasa shikshanat aarthik nikash, rajkaranat caste ani naukarit gunvatta...
    September 5 at 10:13am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Atulrao Tumhi mhanta te barobar aahe. Badal ani tyat sudharna vhyala pahijet. Loksankhecha ani tya kshetrancha nit abhyas karun. agreed.
    September 5 at 10:15am ·  · 1

  • Kuldeep Deshmukh Prakash Pimpalesadhanta ani representation he reservation mule yet ka ? ek sadha prashna ahe pujniy Dr. babasahebana reservation hot ka ? tari tyani kityek padvya milavalya na farak itka ahe ki tyana padvya milavatana Shahu maharaj Sayajirao maharaj yani welo weli madat keli ani mala watat ekda manus tya levela pohachala ki sadhanta aapoaap milte mala tari as watat, ani rahila sadhantecha prashna tar aaj itar sajat sudha motha warg nirdhan aahe mag tya anushanga ne sagalyanach reservation dyayacha ki madaticha hat dewun aapal kartvya purn karayacha he shasnanech tharvave pan cast basis reservation mhanje mala tari saral saral dividation vatat aapan janun bujun ekhadya wargala aapalyatun wegal kadhato as mala watat ani shahu maharajani tyanchya rajyat reservation chalu kela karan ti kalachi garaj hoti tya kali dalit bandhavana shikshana cha hakka nakarnyat yet hota pan aata sarv shiksha abhiyana tun sarvana shikshana cha saman hakk milala aahe as maz mat aahe
    September 5 at 11:12am · Edited ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे ‎1. Shahu maharaj Sayajirao maharaj yani welo weli madat keli - Reservation 2. levela pohachala ki sadhanta aapoaap milte - Babsahebanna anek ucchwarniyanni mothe zalyavar hi accept kele nahi 3. Itara samajatil jyanna garaj aahe tyanna garaj asel tya goshti nakki dyayala hawyat - agreed.

  • Amol Suroshe सडेतोड आणि सत्य लिखाण. सत्य बोलायला - लिहायला आणि वाचायला सुद्धा हिम्मत लागते. ती हिम्मत दाखवल्याबद्दल अभिनंदन.

    काल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..

    आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

    आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

    आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

    आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.

    आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.

    अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.
    September 5 at 11:35am ·  · 6

  • Takshak Bodhi आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

    Correct ... :)
    September 5 at 11:39am ·  · 2

  • Hemant Sardeshmukh · Friends with Mahesh Pawar
    ‎1) Arakshan fakt jativar adharit asave ka? 2) Tyapeksha te arthik sthitivar adharit asane jast sayuktik nahi ka? 3) Jethe arakshan asel tethe gunavatteshi tadjod, he trivar satya nahi ka? 4) Jar jativar adharit arakshan asel tar apan jatibhed manato, asa artha hot nahi ka? 5) Arakshan kiti varshe asave yababat Dr. Babasahebani ghatanet kahi lihile ahe ka? Ki he jatibhed kayamswarupi aapalyat phoot padatach rahtil? Krupaya aapale vichar manda.
    September 5 at 2:05pm ·  · 2

  • प्रकाश बा. पिंपळे ‎1. Tase pahile tar nasawe. (4 che uttar details baghavet) 2. ek comment madhe mhnataly apramane reservation is not meant for just removing poverty - aarthik garaj asel tar EBC wagaire sarkhya facilities asawyat ani tya ajun jast aswyat 3. Gunwatteshi tadjod hotach nahi - minimum eligibility kuthe hi asatech ani kamat gunatmak farak hot nahi. Competition hi kami hot nahi karan - OBC che udhaharan tyancha cutoff kahi weles Openchya peksha 1 te 2 marks ne jastach asto 4. Apan Jatibhed ajunahi manato mhanunach khare tar aarakshanachi garaj aahe 5. Tyachi mala kalpana nahi, pan te jay karnanni dile gele ti karne aajun sampaleli nahit. Apan pratikriya baddal Dahnyawad. Ani apan sagalyannich jatibhed nirmualnalasathi praytan kele tar tumhala apekshit aarakshan virahit vyavstha yetya 50 warshat disel. Provided eauality purna taha achieve zaleli pahije
    September 5 at 2:20pm ·  · 1

  • Kuldeep Deshmukh ‎@amol & takshak , mitrano aapan jya samajik paristiti mule magasalelya warga chi gosht karta ahat ti paristiti tya kala pramane ahe ka ? Ani jya lokani ti paristiti bhogali te lok tari aaj ahet ka ? Mitrano kala pramane jatiy wishamte chi dhar pan bothat zali ahe ani ji kahi thodi bahut jatiyta ahe ti gramin bhagat ahe karan ajun pan shikshan, nave vichar tya bhagat mhanave titkya pramanat pochale nahi pan mala khatri ahe ek diwas jatiyta tya bhagatun pan samul nasht hoyil ani rahil tumhi je pratinidhitwa denya chi gosht karta ti denyachi gosht nahi ahe ti milavnyachi gosht ahe tyana apan reservation hya nava khali kamkuvat tar karit nahi ahot na, ani samjat apanach jatiyta pasarvat nahi na hyacha vichar karava

  • Takshak Bodhi ‎@ Kuldip - Jatibhed Nirmulana Sathi Dr. Babasahebani lihilela "Annihilation of Cast" ya pustakatlya babinacha samajatlya sarva staratil lokani avalamb kela ani tashi Manasikata Thevali badalavali tar Arakshan sarkhya gostichi garaj bharatala nahi. Pan konihi tya babinacha avalamb karayala tayar nahit ani kibuhuna tashi manasikata tayar honyasathi ankhi kitek varsha lagatil kai thavuk.

    Current Jatibhedache udhaharan dyayache zalyas, Google News madhe Dalit shabd type karun search karave deshabharatil khup sare udhaharn pahala milatil, kiva "Cast no Bar - SC/ST/OBC please excuse" yevadhacha search karave 4-5 lakha peksha jast result miltil.Yachach arth Jitiyata hi fakt gramin bhagatacha navhe tar shahari bhagatil educated lokanmadhe suddha ahe yache he praman.
    September 5 at 3:41pm ·  · 2

  • Vishalsing Chauhan mitrano mala fakt mazya eka prashnache uttar dya me ek teacher competitive exam deto maza ek x friend pan competitve exam deto tyche economical background mazya peksha khup changle ahe pan mpsc chaya cutt off la tyala mazya peksha 14 mark kami asunhi tyala chance ka an mala ka nahi karan me so called uch vargat janmala aalo mhanun?????

  • Takshak Bodhi ‎@ Vishalsing - Tumachya prashnache uttare varil prakash ni lihilelya likhana madhe ahe.

  • Vishalsing Chauhan pan mag he amchych veles ka

  • Vishalsing Chauhan mag he sagli mule jar ya vyasthevirudh band karu lagli tar

  • प्रकाश बा. पिंपळे Vishalsing band wagaire kahi honar nai! Ani reservation naste tar ata paryant nakkich band zale aasate. Karan tokachi paristhiti. Ani tya prashnachi kalji ghyayala Creamy layer certificate aahech ki!
    September 5 at 6:58pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan maz example bajula thevu ,pan aajhi so called open madhil mule jya laukik arthane apan gunvata ha birud vaprto tya arthane pudhe asun sudha tyna yogya to job milat nasel tar tyni kay karayche?an ekhadya IAS officer chya mulala reservation dene an eka garib shetkarychya mulala davlane ka kuthala nyay??
    September 5 at 6:59pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan praksh rao pan sc st sathi cremylayer aste ka? yachahi vichat vhyala hava na

  • प्रकाश बा. पिंपळे Reality Bagha. Jase anek jan mhantat ha wishay khup moththa aahe. Tasa kaharch to khupmotha aahe. That's why I have mentioned in article to look at the Big picture. Show me the IAS and so called reach sending their children to the Government Jobs. There are very few. And also examples as you mentioned are very personal many times as mentioned in article again. A day will come when you will find all reserved category cutoffs same as that of the open. You will find the same competition among them as the open category. we don't see it as of now because there is very less penetration of education among those classes. Yes, now the point should be how fast we bring those this level? And also accept them socially. Education can be a good medium for it! I know people like Vishalsing are doing that very honestly. I have personally seen his passion for education. But still questions like these bug them and that was the reason I wrote the piece. To get this point to such honest fellows who want to know and get convinced about this very issue. Others who have there reservations of opinion on this may please neglect it :)
    September 5 at 7:07pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan pan mag he sagle vyavstheche balich ka?

  • Bhande Nitin Patil aata houn jaudya 2014 ch election, bhashanachi tayari jabardast zaleli disatey :)
    September 5 at 8:48pm ·  · 1

  • Sudhakar Patil होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललाय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबा साहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.




    आता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण असा होतं ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर SC / ST साठी ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्यांना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का. आणि जे लोक खरच नोकरी करत आहेत त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....

    एक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........




    आजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का ??? , गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का ??
    September 5 at 9:50pm ·  · 2

  • Vishalsing Chauhan patil 2014 che election ladhvach aapla fukt prachar
    September 5 at 10:09pm ·  · 1

  • Kuldeep Deshmukh Totaly agreed with sudhakar patil
    September 5 at 10:20pm ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)
    September 5 at 11:15pm ·  · 1

  • Bhushan Mhatre · Friends with Vijay Panzade
    great

  • Pradyumna Deshpande Prakash : लेख छान लिहिलाय !! पण मनातून एक गोष्ट सांगा.. हा लेख कुठल्या भावनेतून लिहिला?? आरक्षणाचे दुष्परीनाम तुम्हाला नाही भोगावे लागले का??
    श्री. आंबेडकरांनी फक्त १० वर्षांसाठी हे आरक्षण दिलं होतं .. त्यानंतर ते चालू ठेवण्यात भारतीय नेत्यांची भूमिका लक्षणीय आहे.. मला एक कळत नाही.. शिक्षणात आरक्षण मिळाल .. ठीके.. नोकरीत आरक्षण मिळाल ठीके.. पण २ वेळा Already लाभ घेवून झाला असेल, तर परत बढतीमध्ये कशाला पाहिजे राव ??
    मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये.. पण फक्त एक लेव्हलला घ्या ना... तुमचं शेपूट वाढतचं चाललंय !! ओपन Categoryमध्ये येणाऱ्या सर्व जाती.. त्यांना कधी आरक्षण मिळाल का हो?? नाही मिळाल तरी त्या प्रगती कर्तायेतच ना ? :)
    बाकी तुझा राजकारणात किंवा बी-ग्रेडमध्ये सहभागी व्हायचा विचार असेल तर शुभेच्छा !! :) आणखी काही बोलू इच्छित नाही !! :)
    14 hours ago ·  · 2

  • Sandeep Nandgaonkar Prakash PimpaleTakshak Bodhi Pradyumna Deshpande बघा मित्रानो.. SC असो ST OBC किंवा मराठा किंवा ब्राह्मण कित्ती दिवस असा भांडायचं आहे..
    आता SCआणि ST च्या लोकांना २-३ जाऊद्या ५ पिढ्या पर्यंत आरक्षणान मिळालाच पाहिजे.. यात वाद नाही
    ...See More
    10 hours ago ·  · 2

  • Kuldeep Deshmukh Deshpande saheb cast base reservation mala pan manya nahi pan b-grade cha vishay kadhun tumhi siddh kel ajun pan castism ahe
    2 hours ago · 

  • प्रकाश बा. पिंपळे Aso mala kashacha rag nahi. Karan te watane ani tase label lawane sahajik aahe. :) khanta hi nahi. Pan kadachit yanche lokanna nakki kalel. Apan shant dokyane wichar karawa hich apeksha. Jai Hind!http://www.youtube.com/watch?v=7EUnXOL165o&feature=relmfu


    In an interaction with reporters during Idea Exchange organized by Loksatta, the...See More
    2 hours ago ·  · 

  • प्रकाश बा. पिंपळे Purna aika ani punha punha aika. Mala patale anekanna patel. Ani Mohanrao nakkich brigade madhe janar nahit ;)
    2 hours ago · 

  • कृष्णा पाण्डेय 
    I 'll like to repost my fb status on 8th July 2012 in this regard, that says "Turned few pages of Newspaper "Sunday Times of India"... on Page No. 16, found a news that headlines "Scored Zero in exam? Get seat in AP course". It further read
    s "22 of 78 students who scored zero in the entrance test this year will get admission in engineering and agriculture courses as they belong to SC or ST Communities". BTW exam is called EAMCET, and deciding factor to award them this reward was their 40% marks in Class XII. Wondering where our country's future leading to?"
    I personally feel that the reservation or any govt. aid shud be given on basis of family income with reference to poverty line. Jai Hind.
    2 hours ago · 

  • कृष्णा पाण्डेय 
    I may agree to your findings on past, but look at country now. There are countless schemes from Govt. for different categories and minorities. Now tell me if all General category people are born rich and intelligent? If not, why should not 
    they get benefited from govt. schemes? You will also agree that not all SC/ST people are poor in country now-a-days, so why should their children get reservation in various schemes? How will you justify this, without some concept like "an eye for an eye" ;-)
    2 hours ago · 

  • प्रकाश बा. पिंपळे It's not an eye for an eye! It's an extra eye for those, whom this society had kept blind for last many years. And why and extra eye now? - So that they can cover up the distance and come with those who had taken their both the eyes and has 4 eyes in the past.

7 comments:

प्रकाश बा. पिंपळे said...

कृष्णा पाण्डेय I agree but what abt my question??
2 hours ago · Like

कृष्णा पाण्डेय and why it's taking more than 60 years for the upliftment? and what do you propose about no. of years this reservation system should go on?
2 hours ago · Like

कृष्णा पाण्डेय And as you are blaming Poor Education System in India, Schools and Colleges are not caste wise, teachers are same. In my Engg. college, Students from SC/ST were given books free from library for entire semester, concession in fees etc... Even then if they were not able to get job, whom to blame??
2 hours ago · Like

प्रकाश बा. पिंपळे said...

प्रकाश बा. पिंपळे Answer : 1. It's taking nation to the equality and growth. Haven't you ever seen colleges where students can get admissions when they have zero marks; just based on how much they can pay? (management seats) 2. The private CETs are nothing but just the show of merit, everybody knows what is more imp there? Why don't we cry about the decreasing merit there? I hope these are answers to your questions. And about the free books and more than 60 years for upliftment : How honestly the efforts have been done to eliminate the casteism and improve quality of foundational education for so called lower castes and rural india? As far as I know the officers implementing these were surely from so called Upper Castes! And in fact they were. And about the question of merit inspite of free books and freeship - Can't you see students with similar poor academic record with pockets full of cash from parents. It's the individuals that you are pointing out, not the class. Students who fail belong to all classes not just these. And you might have surely neglected the students who have passed in First Class with distinction from these classes. Let's not point out useless personal experiences. Let's think big! Which I have already pointed out in the main piece. And we can't look at the bigger picture, it's our fault and crime against nation! I hope this is sufficient explanation to awake those who are asleep; and countless lines are insufficient for those who don't want to come out of 18th century sleep full of dreams with upper castes ruling religion, economy and country.
about an hour ago · Like

प्रकाश बा. पिंपळे said...


कृष्णा पाण्डेय So, u think that reservation system shud go on till the end of universe? I was not talking abt "private" CETs, n i didn't knew if they exist. And I don't think people from upper-caste are selected from heaven to rule, it's democracy in country, please next time vote on basis of caste. "If govt schemes for education didn't reached to poor, it was also conspiracy of upper-caste officers?" I never heard this kinda argument ever by anyone. I guess secondly you will say all the scams ever done in history of country was done by upper-caste politicians? Can you claim that only upper-caste police officials are corrupt? Do you think that any wrong-doing was done by people from reserved category on this planet ever? And what you are calling useless personal experiences, when discussed constitute an idea. Like you shared your personal thought here. Did u heard by any chance reservation in IITs, reservation in promotion, what next you recommend, BMW for being born in a reserved category family? I personally feel that reservation or any govt. benefit shud be strictly on basis of poverty line.
58 minutes ago · Like

Krishna Kharwade Maaf kara mat-bheda baddal pan jith gunwatta lagate tithe bhawna chalat nahit. Eke kali hi aarakshnachi sankalpna thodya kala sathi bari hoti mhnunch Dr. Babasahebani 10yrs sathi tyacha puraskar kela. Pan aaj promotion sathi aarakshn he Congrescha shalit gundalela shastra aahe. Gawakade salane gadi bhetat nahi, mujor zalet te tyana asalelya maja mule nahi tar aniyantrit ritya jagna sopa karun, rationing hyala barech paryay kalachya oghat yayla have hote, aale ka nahi? Jantela lachar banawaych chalu ahe. ... Ajun barach kahi....
55 minutes ago · Like · 1

प्रकाश बा. पिंपळे awaghad aahe! Pande saheb. tumhi mhanta tase mhanayancha maza uddehsya nahi. But yiu you say can be a possibility that uppercatses haven't tried well for their upliftment, becasue they thought the way you are thinking now. Please don't take it personal, you are not alone who is talking it. It's a thinking. Please do read the piece again you you will get all the answers, if by any chance you want to understand this issue. Or The Speech by Bhagvat of RSS may suffice an explaination. Reservation is not the only tool for eradicating casteism from society we need many such strong tools and they will surely be created and implemented. And it will be there as long as the discrimination based on castes exist. Kharwade saheb matbhed asane chnagalech mala hi dusri baju bhaghta yeil in case mazya hatun nisatali asel tar. Tar tumachya prashanachi uttare hi bhagvat yanchya waril inteview madhe aahet. Ani gavakade majur na milanyache mukhya karan dalit samajala milanarya suvidha nahit, tar shaharankade alela londha aahe. To sagalyach jatincha aahe. Ani apan hi apekshach ka thevaychi ki tyanni aplya shetatach rabawe? Jasa apalyala Rashancha gahu milato tasach tyanna hi milato fakt itakach ki kami bhavat. Pan to affordable sagalyanna aahe. Baki 10 wagaire warshat jasa dalit samajala gavatlya mandirat Mokala pravesh milala nahi tasach resrvation che kam hi sampalele nahi. Pan hoil te ek diwas. Apalya sarkhya sudnyanni ya praytnanna hatbharach lawayala hawa! Baki dhanyawad!

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

I Think Krishna Pandey has not gone thru my answer...

आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.

आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.

अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...


जोपर्यंत आपल्या देशातून जात - धर्मावर आधारलेली व्यवस्था समूळ नष्ट होणार नाही तोवर हजारो वर्षांपासून असलेल्या सर्व वंचितांना आरक्षणाचे कवच हे असणारच. आपल्या याच देशात तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्माला आले ह्याला खूप महत्व आहे आणि त्यावरच तुमचे सामाजिक स्थान देखील अधोरेखित होते असे असतांना फ़क़्त आरक्षण हा एकमेव जलद पर्याय आहे ज्यामुळे काही प्रमाणात तरी आपण सामाजिक न्याय आणि समानता राबवू शकतो . हां ! आता आरक्षणाचा हा पर्याय किती प्रामाणिक पणे राबविला जातो यावर तो किती वर्षांपर्यंत चालू राहील हे अवलंबून आहे. सामाजिक स्तरावर जेव्हा सर्व जन एका रांगेत उभे राहतील त्यानंतरच मग केवळ आणि केवळ आर्थिक बाबींवर आरक्षण आकारले जाऊ शकते.

आता ज्यांना समाजामधून जात निघून गेलीये हे म्हणायचेय त्यांनी कृपया आपला चष्मा बदलून पुन्हा एकदा देशावर दृष्टी टाकावी. उत्तर मिळेल.

आरक्षण कुणाचे हक्क हिरावून घेण्यासाठी नसून हजारो समाजाने नाकारलेले हक्क कायद्याच्या मदतीने सर्व घटकांपर्यंत पोचवणे या साठी आहे. नक्कीच याला कालमर्यादा असावी आणि ती अपेक्षित ठेवूनच घटनाकारांनी १० वर्षांची मुदत दिलेली होती. प्रत्येक १० वर्षांनी सामाजिक समानतेचा अभ्यास (अगदी आकडेवारी सह) करावा आणि गरज असेल तरच पुढे ते चालू ठेवावे. यासाठी मागासवर्गीय समाजाचा गेल्या साठ वर्षातील अनुशेष हि फार बोलकी आकडेवारी आहे.

लोकसंख्येने बहुसंख्य असणाऱ्या एकूणच बहुजन समाजाची सामाजिक परिस्थती हि अजूनही तळागाळापर्यंत सुधारलेली नाहीये. बोटावर मोजता येतील अशा काही जातींनी आणि जातीतील काही लोकांनी प्रगती केल्यामुळे आपल्याला अजूनही कोटी कोटी वंचितांचे, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचे दुख जाणवत नाहीये. इतर मागासवर्गीय समाजदेखील आपल्या पारंपारिक रोजीरोटीच्या व्यवसाया पलीकडे जाऊ शकला नाही. याचाही आपण सखोल विचार करावा.

नक्कीच आरक्षणामुळे बदल हा दिसतोय, मोठ्या प्रमाणावर दिसतोय पण हा बदल अटळ आणि आवश्यक आहे. याला कोणी हि नाकारू शकत नाही. शेवटी ज्या समाजव्यवस्थेमध्ये आपण जन्माला आलो त्या व्यवस्थेला दुरुस्त करणे, सुधारणे हे आपले कर्तव्य आणि हि व्यवस्था सुधारण्यासाठी आरक्षण हे एक प्रभावी हत्यार आहे, त्याचा उपयोग योग्य रीतीने व्हावा बस एवढेच.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद म्हणजे केवळ एखादा सामाजिक कायदा करणे एवढ्या सध्या दृष्टीकोनातून या कडे कोणी बघू नये, हे एक पाऊल होते हजारो वर्षांचा अन्याय, अत्याचार आणि अंधकार दूर करण्यासाठी ! हजारो वर्षे समाजातील प्रत्येक क्षेत्रात असणारी विशिष्ट समाजाची मक्तेदारी मोडण्यासाठी ! एकूणच समाजव्यवस्थेला बळी पडलेल्या सर्व समाजाचा सांगोपांग विचार करून आणि कोणावरही अन्याय न होऊ देता दुर्बलांचे हात बळकट करण्यासाठी उपाय म्हणजे आरक्षण. हजारो वर्षांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करून स्वतंत्र आणि समान न्याय प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश्य !

अर्थसत्ता, राजसत्ता, धर्म सत्ता, लोकसत्ता म्हणजे विशिष्ट वर्गाचीच हक्काची जागा, इथे इतरांना घुसण्यास तर सोडा विचार करण्यास देखील मज्जाव मग अशावेळी ह्या प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी म्हणून आरक्षणासारखे एक कायदेशीर हत्यार !

आरक्षण म्हणजे काय केवळ पोट भरण्यासाठी केलेली सोय नसून ते सामाजिक क्रांतीचे महत्वाचे पाऊल आहे. यामुळे समाज ढवळून निघणार, बदल हि घडणार किंबहुना तो घडतोय कारण ते अटळ आणि आवश्यक आहे.
शेवटी ज्या समाजव्यवस्थेमध्ये आपण जन्माला आलो त्या व्यवस्थेला दुरुस्त करणे, सुधारणे हे आपले कर्तव्य आणि हि व्यवस्था सुधारण्यासाठी आरक्षण हे एक प्रभावी हत्यार आहे, त्याचा उपयोग योग्य रीतीने व्हावा बस एवढेच.

Unknown said...

मी सुद्धा खुल्या वर्गातून असून सिद्ध आरक्षणाचा समर्थक आहे...

Post a Comment