Wednesday, April 18, 2012

पुन्हा एकदा : हसावे की रडावे वाचावे नेटके ला पाहून

काही दिवसांपूर्वी लोकसत्ता या प्रसिद्ध मराठी दैनिकात एक 'वाचावे नेटके' नावाचे  ब्लॉग विषयक सदर सुरु झाले. कदाचित एखाद्या चांगल्या उद्देशाने सुरु केलेले हे सदर आपल्या रोजगार हमी योजने सारखे झाले आणि उदेष्य, प्रत आणि सगळ्याच गोष्टींचा गोंधळ झाला. रोजगार हमी सारखच कुणाला तरी हे काम, कदाचित रोजंदारीवर, दिले गेले आणि त्याने अगदी त्याच प्रकारचे लिखाण केले. व्यंग बाजूला ठेवले तर एक लक्षात येईल की समस्त ब्लॉग जगताकडून या सदराचे निराशा जनकच स्वागत आहे. लोकसत्ता सारख्या माध्यमाने अगदी अविचारी असे हे फक्त आणि फक्त ब्लॉग या माध्यमाची खिल्ली उडवणारे सदर सुरु करून एक बट्टा लावून घेतला. ब्लॉग हे माध्यम सामान्यांच्या हातात माध्यमाची ताकद देणारे आहे (कुबेर साहेब हे खूप चांगले जाणतात); पण तिथेच मग 'मास की क्लास' हे युद्ध लावून हे सदर अनेक नव्या ब्लॉगर्स चे खच्चीकरण करत आहे. ते असे की सामान्यांना, म्हणजे ज्यांना ब्लॉग हा प्रकार माहित नाही त्यांना, ब्लॉग या प्रकाराबद्दल चुकीची माहिती देवून त्यांना ब्लॉग वाचण्या पासून परावृत्तच केले जात आहे. माध्यमांनी विचारांवर टीका करावी फक्त शैल्यांवर नव्हे, नसता हा सगळा प्रकार शेलकीच वाटतो. असो. आता आम्ही कहालील काही लेख आमच्या ब्लॉग बद्दल छापून आले तेंव्हा लिहिले आणि त्या नंतर अनेक ब्लॉगर्स ने आपले विचार मांडले आहेत. तरीही नेटके करत असलेला हा प्रकार थांबवत नाही, हे पाहून पुन्हा एकदा आमची स्थिती हसावे की रडावे अशी झाली आहे. आपल्याला 'नेटकेला' या ब्लॉगर्सनी दिलेले 'फटके' येथे वाचायला मिळती - 

मुख्यमंत्रीची प्रतिक्रिया:

मुंजे पिंपळा वरून लोकसत्तात उतरले

--

काय वाटेल तेची प्रतिक्रिया


--

वटवट सत्यवानची प्रतिक्रिया

लिहावे फाटके !!

--
तसेच अनेक प्रतिक्रिया नेटकेच्या बुडा खाली येथे

नेटकेवाल्याने  स्वतःचे बारसे 'अभिनवगुप्त' हे आशात करून घेतले आहे! 

2 comments:

हेरंब said...

या फाटक्याला खच्चून फटके पडल्याशिवाय सुधारणार नाही तो. या सोमवारी पुन्हा काही गरळ ओकली तर मी त्याला यापेक्षाही वाईट शब्दांत धुणार आहे !!

प्रकाश बा. पिंपळे said...

नक्की हेरंभ साहेब. याला असाच धडा शिकवला पाहिजे! कुबेर साहेब पण झोपलेत वाटते!

Post a Comment