
आज घरी राजमाता जिजाऊ जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.
या घरगुती कार्यक्रमा मध्ये सोसायटी मधील ३-४ लहान मुला - मुलींनी मला एक प्रश्न विचारला.. दादा हा फोटो कुणाचा ????
या प्रश्नाने मी दोन क्षण स्तब्ध झालो, खर तर हा प्रश्न येणाऱ्या पिढीने आपल्या वर्तमान पिढीला विचारलेला होता.
आपल्याला वाटते आपल्या मुला - मुलींवर शिवाजी - संभाजी किंवा जिजाऊ - झाशी च्या राणी सारखे संस्कार घडायला हवेत, पण जर त्यांना हे व्यक्तिमत्वच माहित नसतील तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये गैर ते काय, कोण आहे गुन्हेगार या परिस्थितीला ? आपल्या राष्ट्रीय प्रेरणा स्तंभांची आपणच केलेली उपेक्षा याला कारणीभूत आहे.
ज्यांच्यामुळे अस्तित्वामुळेच आपण आपली मान ताठ करून घराबाहेर पडतो आज त्यांनाच आपण विसरायला लागलो आणि जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य काय असते हे वेगळ सांगायची गरज नाहीये.
जिजाऊ सारख्या विरमातेचे, युगपुरुष छत्रपती शिवाजी राजांचे आणि संभाजी राजांचे संस्कार घरा घरा मध्ये रुजल्याशिवाय नवीन पिढी घडणार नाही.
पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ जयंती दिन निमित्य आवाहन करतो .. इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरू नका.. आटोकाट प्रयत्नाने पेटवलेली स्वाभिमानाची ती मशाल आपल्या हाताने विझवू नका... अन्यथा येणारी पिढी आम्ही आमच्या हाताने एका अंधाकारामध्ये ढकलून देऊ.
जय जिजाऊ.
 

 
 
 
 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment