Tuesday, December 6, 2011

सोन्यासारखा देश करपून जातांना

कुठल्याही देशात एखाद्या मुद्द्यावर वाद हा अपेक्षितच असतो .. पण तो वादच असावा, निव्वळ गोंधळ नसावा.
एकीकडे आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका गंभीर संकटाकडे वेगाने आगेकूच करतांना दिसत आहे आणि दुसरीकडे आपल्या देशाची ध्येय धोरणे ठरवणारी संसद गेले आठवडाभर गोंधळाने गाजते आहे. कुणा कुणालाच (न सरकारला ना हि विरोधी पक्षांना) येणाऱ्या भाविताव्या विषयी चिंता नाही का वाटत. का संकट आल्यावरच ह्यांची डोळे उघडतील. १२५ कोटींच्या देश्चे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेमध्ये येणारे संकट ओळखण्याची दृष्टी कोणाकडेच नसावी हि केवढी दुर्दैवाची बाब.

खर तर देश सध्या भरकटलेल्या अवस्थेत असल्यासारखा भासतो आहे, ज्यांनी (मग ते राज्यकर्ते असोत कि विरोधक) काही बोलायचे किंवा करायचे अपेक्षित आहे ते एका निष्क्रिय अवस्थेत अडकले आहेत.. आणि ज्यांनी ओरडून ओरडून सांगितले तरी एक पान देखील हलणार नाही त्यांच्या बोलण्याला आणि वागण्याला कुठलीही मर्यादा राहिली नाही. हे ह्या साठी इथे नमूद करतोय कि अण्णांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ज्या मध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे कि या देशातील अनु उर्जा सुरक्षे संदर्भात एक जन लोकपाल सारखी एक स्वायत्त संस्था असावी ज्यावर सरकारचे किंवा पंत प्रधानांचे नियंत्रण नसावे आणि ते लोकांच्या प्रतिनिधींकडे असावे ( लोकांचे प्रतिनिधी म्हणजे टीम अण्णा किंवा सिव्हील सोसायटी सारखे काही लोक), एवढ्या गांभीर्य पूर्वक विषयावर तुम्हाला वाटत नाही का हे एक प्रकारे मर्यादा उल्लंघन झाले.

एका दृष्टीने सबंध व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न हि वेळोवेळी होताच असतो, "जो जो राजकारणी तो तो चोर " हि संकल्पना रूढ होतांना दिसते आहे. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा त्याच त्याच प्रश्नांची वेगवेगळ्या पद्धतीने उजळणी करतो पण त्या प्रश्नांचे उत्तर शोधायला कुठे तरी कमी पडतोय.

सरकारचेही डोके ठिकाणावर आहे कि नाही असेच म्हणावे वाटते, सोशल नेट वर्किंग संकेत स्थळांवर देखरेख करण्याचे शहाणपण यांना सुचले कारण यांच्या दैवतांवर ( गांधी परिवार) काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.
या मुद्द्याला एका धार्मिक बुरख्याचे पांघरून घालून सरकार काय साधू इच्छिते हे समजायला हि मार्ग नाही.

उद्योजक, शेतकरी, नौकारदार, कामगार यांचे प्रतिनिधित्व कुठेतरी हरवले आहे. सध्या तरी देशाच्या प्रत्येक प्रश्नाची चेष्टा करण्या ऐवजी चिंता व्यक्त करण्याची जास्त गरज आहे असे मला वाटते.

आजच्या या सकाळी देवाकडे एक प्रार्थना करतो, परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे रे बाबा.. सोन्यासारखा देश करपून जातांना बघू नाही शकत.
- अमोल सुरोशे (नांदापूरकर)

1 comment:

Post a Comment