Sunday, June 6, 2010

शिवराज्याभिषेक दिना निमित्य हार्दिक शुभेच्छा

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या मराठी जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.
या दिनी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात हा संकल्प.
जय जिजाऊ !             जय शिवराय!                                            जय महाराष्ट्र!

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम   
www.jijau.com

1 comment:

Anonymous said...

http://www.flickr.com/photos/6782/6492104711/

Post a Comment