Tuesday, June 22, 2010

ग्रामीण भागासाठी आता संगणक केवळ २५०० रुपयात !

आता इझिटेक सोलुशंस देणार सर्वात स्वस्त दारात कॉम्पुटर
यु एस एफ ओ स्कीम अंतर्गत नोव्हाटीयम व बी एस एन ल यांचा प्रयास

जळगाव : जळगाव येथे नुकतेच सुरु झालेले इझिटेक सोलुशंस चे संचालक श्री विलास नेवे यांनी सांगितले नोव्हाटीयम सोलुशंस लिमिटेड चेन्नई या कंपनीने यु एस एफ ओ स्कीम व बी एस एन ल यांचा बरोबर मिळून जनतेला सर्वात स्वस्त दारात कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) मिळून देण्याचा प्रयास केलेला आहे त्याची किमंत फक्त २५०० रुपये व ट्याक्स (ग्रामीण भाग ) आहे कारण याला यु एस एफ ओ कडून अनुदान मिळत आहे .
इझिटेक सोलुशंस चे संचालक श्री विलास नेवे हे यावल तालुक्याचे राहावासी असून सध्या जळगाव येथे स्थाइक झाले आहे त्यांनी कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) ची माहिती देताना सांगितले कि ज्या वेळेस कॉलेज ला शिकत होतो त्या वेळेस मला कॉम्पुटर घ्यावयाचा होता परंतु त्याची किमंत फार असल्या मुळे मी तो घेऊ शकलो नाही हे मागील दिवस मला आठवले ज्या वेळेस नोव्हाटीयम सोलुशंस लिमिटेड चेन्नई या कंपनी भेट देऊन तेथील कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) ची माहिती घेतली तेव्हा मला फार आनंद झाला कि इतक्या स्वस्त दारात कॉम्पुटर मिळेल तर कोणताही विध्यार्थ्याची कॉम्पुटर घेण्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही.
आजचे युग हे कॉम्पुटर युग आहे प्रत्येक क्षेत्रात आज कॉम्पुटर चा वापर होतो त्या मुळे प्रत्येकाला कॉम्पुटर येणे अवश्हक झाले आहे आपल्या देशात असे भरपूर विध्यार्थी आहेत कि जे कॉम्पुटर हा विषय शिकत आहे पण त्यांच्या जवळ स्वतःचे कॉम्पुटर नाही
कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) हा इंटेल कंपनी चा पी ४ कॉम्पुटर आहे या बरोबर बी एस एन ल ब्रोडबेण्ड (इंतारनेठ ) कनेक्शन सुद्धा देण्यात येणार आहे. २५०० रुपयात आपणास मिळेल सी पी यु , यु एस बी कीबोर्ड , माऊस, मोनितर, व बी एस एन ल ब्रोडबेण्ड (इंतारनेठ ) कनेक्शन . या कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) याची वैशिष्ट्य म्हणजे हा कॉम्पुटर सर्व सामान्य कॉम्पुटर सारखा आहे परंतु त्याची कार्य प्रणाली मध्ये क्राउड तेक्नोलोजी वापरण्यात आलेली आहे या मधील स्वप्त्वेअर हे एक केंद्रीय नेटवर्क सर्वर च्या माध्यमाने चालविले जातात या सर्वर वरून आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम एम एस ऑफिस , गेम , नेट ब्राउझर हि सोफ्टवेअर प्राप्त होतात हा एक व्हैरस व देघाभाल विरहित कॉम्पुटर आहे कारण यात अजून बर्याच प्रकारची विशेषताये आहेत.
ह्या कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) अधिक माहिती साठी आपण सर्व बी एस एन ल ऑफिस मध्ये व इझिटेक सोलुशंस दु। न. २६६, ग्राउंड फ्लोर , नवीन बी जे मार्केट ,जळगाव येथे संपर्क साधू शकतात किवां टे.न.०२५७ २२३५५५० मो. न. ९९२११९९७७७ वर फोन करू शकता.

- कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

1 comment:

Anonymous said...

Thank you for sharing this info. I hope to buy one such PC for my housemaid's daughter who wants to learn computers!

Post a Comment