Friday, February 5, 2010

देशात सध्या चालले आहे तोडा ,फोडा आणि राज्य करा चे राजकारण


मुंबई कुणाची ? हा सध्या देशाचा गंभीर प्रश्न सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांना 
सतवतो आहे. सर्व नेते मराठी जनतेला आणि उत्तर भारतीय जनतेला वेड्यात काढत आहेत. फक्त मुंबईची सुधारणा होऊन देश सुधारणार नाही, देशातील सर्व राज्यांमध्ये आणि शहारामध्ये रोजगाराच्या  संधी उपलब्ध झाल्या पाहिजेतसर्वांची ओढ मुंबई कडेच का? भामट्या नेत्यानो थोडा प्रामाणिक विचार करा आणि मुंबई ला वाचवायला मदत  करा; आणि मतांचे राजकारण बंद करा !
आपल्या देशाला सर्वात मोटा लाभलेला शाप आहे जातीवाद धर्मवाद,आता नवीनच निर्माण झालेला प्रांतीय वाद! हे सर्व आतापासून नाही इतिहासात पण आपल्या बघायला मिळेल ,राजे शिवाजी यांनी  आपल्याला एकत्र आणण्याचा उत्तम प्रत्यन केला होता आणि तो यशस्वी हि होत होता पण दुर्दैवाने राजे वेळेच्या अगोदर या जगातून गेले ,त्यांच्या राज्यात त्यांनी कोणत्याही धर्माचा , जातीचा तिरस्कार केला नाही त्यांना अखंड हिंदुस्तान निर्माण करायचा होता तो पण सर्वाना सोबत घेऊन ..पण हा जनता राजा या जगातून गेल्यानंतर नंतरची राज्यकर्ते आणि जनता सर्वे विसरली आणि आपापसात वैर निर्माण करून वागू लागली अजूनही आपल्या देशातील जातीव्यवस्था संपत नाही ,देशातील  जनता देशाचा चांगला आणि वाईट इतिहास विसरली आहे पण देशातील नेत्यांनी देशाचा वाईट इतिहास लक्षात ठेवला आहे  तो म्हणजे इंग्रजांनी वापरलेली थोडा फोड राज्य करा ची नीती, इंग्रजांनी आपलीच माणसे आपल्या विरुद्ध वापरली तेच काम आपली नेते आज करता आहेत !
देशासाठी बलिदान दिलेल्याला देशभक्तांचे जीवन व्यर्थ जाते कि काय असे वाटते. सुभाषचंद्र बोस सारखे नेते देशाबाहेर राहून देशा       साठी लढले ..लोकमान्य टिळक,भगत सिंग,मौलाना आझाद मादाम कामा , गांधीजी , बाबासाहेब आंबेडकर सर्व जातीची आणि सर्व धर्माची लोक देशासाती लढली पण आजची नेते देशात राहून देश  आणि  जनतेमध्ये फुट  पडण्यासाठी लढत आहेत , देशातील नेत्यांसाठी  गंभीर प्रश्न आहेत देश कुणाचा  हिंदूंचा  कि मुसलमानाचा ? मुंबई कुणाची ? विदर्भ वेगळा हवा आहे कशाला ? तेलंगाना वेगळा हवा आहे कशाला ? काश्मीर मध्ये काय चालू आहे करोडो रुपयांचा खर्च  करून पण झेंडा फडकवू शकत नाही २६ जानेवारीला! देशाचे तुकडे करून नेत्यांना काय साध्य करायचे आहे ? खुर्ची आणि सत्ता मिळवायची आहे आणि देश लुटायचा आणि जनतेने फक्त गम्मत बघायची  आणि गप्पा मारायच्या, जनता फक्त गप्पा मारत असते! अमेरिकेमध्ये , ब्रिटन मध्ये  कायदे खूप चांगले आहेत , भारतात पण कायदे चांगले आहे त्यांचे पालन काण्याची हिम्मत दाखवावी  मग जनतेने इतर देशांचे कौतुक करावे, आपल्या कडे सर्व काही (बुद्धिमत्ता ,नैसर्गिक साधन संपत्ती ,तंत्रज्ञानआहे पण दुर्दैवाने  आपल्याकडे खरे देशप्रेम नाही! देशाच्या अधोगतीला  ज्याप्रमाणात  नेते, सरकारी अधिकारी जबबदार आहेत त्याच बरोबर जनता पण तेवढीच जबाबदार आहे  ! देशाच्या मुख्य समस्या आहेत गरिबी, पैशाचे केंद्रीकरण, (पैसा सर्वांकडे का नाही ?) शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी टंचाई ,बेरोजगारी ,गरिबांना शिक्षण,देशातील मुलभूत सुविधाचा अभाव,महिला सशक्तीकरण. भारत स्वतंत्र झाल्यापासून बर्याच महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे  , आमच्या नेत्यांसाती महत्त्वाच्या समस्या आहेत देश कुणाचा ? हिंदूंचा कि मुसामानाचा ह्या  जातीला आणि समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, तेलंगाना  वेगळा झाला पाहिजे ,विदर्भ वेगळा झाला पाहिजे, इतक्यावरच त्यांचे समाधान नाही होत आहे, तर ते सध्या मुंबई शहर कुणाचे ? या विषयावर जनतेला भडकवत आहेत! सर्व भारतीयांना माहिती आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे , साहजिकच मुंबई वर महाराष्ट्राचा अधिकार जास्त आहे! मला मान्य आहे देशातील सर्वांचा अधिकार आहे, पण जसा आईचा मुलांवर बापापेक्षा जास्त हक्क असतो कारण ते आईच्या रक्तामासाचा गोळा असतो आणि नऊ महिने तिने त्याला पोटामध्ये वाढवलेले असते ,त्याचप्रमाणे मुंबई वर हक्क महाराष्ट्राचा आहे आणि मग इतरांचा पण आहे , जसे गांधीनगर गुजरात साठी  महत्त्वाचे आहे , आग्रा उत्तरप्रदेश सठी, भोपाल मध्यप्रदेश सठी , हैदराबाद आंध्र साठी  महत्त्वाचे आहे तसेच  मुंबई महाराष्ट्रासाठी आहे! महाराष्ट्रातील आणि उत्तर भारतीय नेते जनतेला वेड्यात काडून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत! जनतेला असल्या भामट्या नेत्यांची गरज नाही , मुंबई ची भकाल वस्ती झाली आहे  मंत्रालय  पासून ते विरार, गोवंडी पर्यंत झोपडपट्ट्या वाढल्या आहेत जनतेला मुलभूत सुविधा मिळत नाही आणि मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे परदेशातून पाहुणे आल्यावर आम्ही काय दाखतो लोकल मधून- बाहेर शौचालयाला बसलेली जनता दाखवणार? मंत्रालय जवळची झोपडपट्टी दाखवणार ?-२ तास अडकलेली ट्राफिक दाखवणार ? कि संध्याकाळी आमच्या लोकाल ट्रेन मध्ये कोंबलेली जनता(जनावरासारखी) दाखवणार ? नेत्यानो  थोडे रस्त्यावर या झोपडपट्ट्या मध्ये फेर फटका मारा  थोडे जाणून घ्या कोण राहते झोपड्या मध्ये ? कशा प्रकारची लोक राहतात बोगस रेशन कार्ड बनवून विदेशी अतेरिकी प्रवृत्तीचे लोक तर नाही राहत ना? अगोदर  सर्व जाणून घ्या मग सांगा मुंबई कुणाची ? आणि मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण? किती दिवस मतांसाठी समाजात फूट पडणार ? चांगले उच्चशीक्षित नेते बोलतात कि मुंबईला आतंकवादी हल्ल्या पासून उत्तर भारतीय सैनिकांनी वाचविले! अरे मूर्ख नेत्यानो जेव्हा देशाचा नागरिक सैनिक सेवेत भरती  होतो तेव्हा तो देशाचा सैनिक मानून भरती होतो , राज्याचा सैनिक म्हणून नाही आणि हेच भामटे  नेते देशाला  एकात्मतेचा संदेश सांगणार यांची लायकी तरी आहे का ? अरे नेत्यानो देशातील प्रत्येक राज्य प्रत्येक  शहर सुधारले पाहिजे , समाजातील सर्व घटकांचा , सर्व जातींचा सर्व धर्माचा विकास झाला पाहिजे तेव्हा देश सुधारेल ! हे शहर कुणाचे, हा प्रदेश वेगळा पाहिजे, तो वेगळा पाहिजे  हे आता बंद  करा ,जनतेचा अंत बघू नका  जनता जनार्दनाला माझी एक कळकळीची विनंती आहे कि , आपले देशप्रेम फक्त २६ जानेवारी १५ ऑगस्ट साठी मर्यादित ठेवू नका . ते अखंड  राहूद्या ,नाहीतर देश परत गुलामगिरीत  जायला वेळ लागणार नाही आतापर्यंत आपण राजांची , इंग्रजांची, नेत्यांची  गुलामगिरी करत आलो आहे. असेच वागलात  आणि जाती-धर्माच्या नावाने वैर करत राहिलात तर देश परत गुलामगिरीत जाणार आणि त्यासाठी परत आपले स्वातंत्र सैनिक जन्म घेणार नाही कारण त्यांनी मागच्या ६० वर्षात काय झाले हे बघितले आहे ! देशातील राजकीय आणि धार्मिक नेत्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे कि त्यांनी जनतेला एक  दुसऱ्याच्या धर्माचा आणि जातीचा आदर करायला शिकवा आणि हे धर्माचे ,जातीचे आणि प्रांताचे राजकारण बंद करा! नाहीतर मग 
तुमच्या अंगावरचे कपडेओरबडून जनता तुम्हाला पायाखाली तुडवेल !                             

जय हिंद                                    जय महाराष्ट्र!

-रवींद्र पवार, नाशिक



[रवींद्र पवारांचा हा लेख खास मुख्यमंत्री कार्यकर्ताच्या वाचकांसाठी येथे देत आहोत]

2 comments:

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

पवार साहेबांचे मुख्यमंत्री वर स्वागत !!!!

आपले विचार अगदी रोखठोक असून .. आपली तळमळ या विचारांतून दिसून येते .. खरोखरच .. मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयाचा प्रसार माध्यमे आणि केवळ मतांसाठी राजकारण करणरे यांनी पार कीस काढून टाकला आहे .. मुंबई कोणाची ? हा प्रश्नच कसा निर्माण होऊ शकतो .. थोडी तरी विकासाची दृष्टी असलेल्यांनी केवळ उत्तर भारतीय मते मिळवण्यासाठी ह्या मुंबई ला बकाल करू नये.. मुंबई एक बेतांपासून बनेलेल शहर आहे.. त्याला काही मर्यादा आहेत.. ह्या मर्यादा ओळखून इथे जे कायद्याने राहतात.. वर्षानु वर्षे आपले आणि पर्यायाने महाराष्ट्राचे भले करतात.. त्यांची काही काळजी करायचे सोडून सर्वांनी या .. इथेच या.. कोणी नाही आडवणार .. हे कशासाठी .. ? मुंबई सारखे उद्योग अनेक शहरांमध्ये उभे राहिले पाहिजेत .. ज्या मुंबई चा अभिमान देशाची आर्थिक राजधानी म्हणून आहे त्याच मुंबई चा श्वास आता गुदमरतोय .. मतांचा राजकारण बंद केला पाहिजे .. अन्यथा मुंबई ला आपण कायमच हरवून बसू .. मुंबई देशाची आहेच .. पण या सगळ्या संघर्षाचा मूळ कारण हे आहे.. कि आता मुंबई अजून भर सोसू शकत नाही .. राजकारण्यांचा काय .. त्यांना ५ वर्षे खुर्ची पाहिजे असती.. पण आपल्याला ह्याच शहरामध्ये कायम राहायचे आहे.. म्हणून हे शहर जिवंत राहिला तरच आपण जिवंत राहू ... मुंबई केवळ अस्मितेचा नाही तर सर्वांच्या जगण्या-मारण्याचा देखील प्रश्न आहे.. म्हणून आता अजून मारू नका.. बस झाला.

अमोल ..

Anonymous said...

kay asmita asmita?ghanta asmita!
mayla aata je ahet tech marun jatil eka divashi traffic madhe, train madhe nahi tar pavasamadhe ajun kay vayche baki rahile ya mumbai che! bhandan kay karaylet mayghale tyanna samajat nahiye ka...... hyanchya aail hya saglyanchya

Post a Comment