Showing posts with label jijau. Show all posts
Showing posts with label jijau. Show all posts

Wednesday, February 19, 2014

शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४




या महाराष्ट्राच्या मातीत आणि माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे ज्यांनी बीज रोवले असे छत्रपती शिवाजी महाराज आज दिवशी म्हणजे १९ फेब्रुवरी १६३० रोजी, शिवनेरीवर जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मले. जिजाऊ साहेबांनी आणि शहाजी राजांनी केले संस्कार तुमच्या माझ्या सारख्याच जन्माला आलेल्या शिवबाला शिव-छत्रपती करून गेले.

इतक्या शतकानंतरही शिवाजी महाराजांचे आपण स्मरण करतोय याचे कारण या मातीवर, इथच्या माणसावर शिवाजी महाराजांनी केलेले उपकारच होय. सरदारकी हाताशी असतांना, जनतेबद्दल कळवळ नसती तर, स्वराज्याची नसती उठाठेव महाराजांनी केलीच नसती. पण इतरांचे दुख: बघून ते समजल्याने, त्याची तीव्रता अनुभवल्याने महाराजांना पुढे स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले. स्वराज्याला मूर्त रूप देत आले.

महाराजांचा हा गुण. हा दुख: समजण्याचा गुण, महाराज एक संवेदनशील, जबाबदार आणि म्हणूनच जाणते राजे होते हे दाखवतो. 'हे' जवळपास सगळ्यांनाच माहित आहे! पुढे काय?

अहो पण, इथेच तर गेल्या काही वर्षां पासून आपण चुकतोय. त्यांच्या या गुणाला "फक्त एक ओळ" किंवा भाषणात "शिवाजी महाराज की…" म्हणायच्या आधीचा डायलॉग म्हणून सोडून, "पुढे काय?" हा वायफळ प्रश्न विचारतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना समजायचे असेल तर त्यांच्यातला हा गुण तुम्ही-मी परत एकदा अभ्यासायला हवा.

जिजाऊ साहेबांनी यासाठीच तर परकियांच्या अन्यायाने जनतेचे होणारे हाल स्वतः महाराजांना सांगितले होते. इतरांचे दुख: महाराजांना समजावे म्हणून सांगितलेलं हे सगळ महाराजांनी काळजावर कोरल आणि आपल्याच 'रायेतेचे राज्य' उभे केले. जिथ परकीयांची भीती नसेल. भय नसेल. चूक नसतांना येणारे दुख: नसेल. असे राज्य.

मग इतके सगळे एका दुख: समजून घेण्याच्या गुणाने होत असेल तर अनेक शतकांपासून कोणतीही चूक नसतांना दुख: भोगणारे इथे आहेतच कसे? कदाचित याचे कारण, महाराजांचा हाच गुण डोक्यात घ्यायचा सोडून त्याच्या पुढे - 'महाराजांनी कसा अफजल्याचा चोथळा बाहेर काढला…'- याच्या अतिरंजित वर्णनात आपण रमलो, हे असावे. बर इथे थोडीच आपण थांबतो, इथून पुढेही ते आम्हाल सांगतात आणि आम्ही ऐकतो, "… मागे एकदा फलाण्या जागेवर महाराजांच्या पुतळ्याची विटंबनां झाली तेंव्हा "हजारो" मावळे त्या ठिकाणी आले आणि बघतच क्षणी कित्येत दुष्मनांची मुंडकी छाटली गेली….   वगैरे वगैरे … म्हणून आज 'त्या' सगळ्यांना सांगतो महाराजांच्या वाटी जाल तर आडवे पडू……". 

'हे असले' लोक आम्हाला शिवाजी शिकवतात. म्हणूनच मागच्या काही दशकात आम्ही 'देव शिवाजी' इतका पुजला की, आज त्याच्या नावे गावोगावी हजारो चौक असतील आणि काही शेकडो एक मंदिरे असतील. ही आमची कामगिरी! खरतर इथच्या मातीच्या कणाकणावर ज्याचा अधिकार, त्याला चौकापुरते आणि मंदिरापुरते करून ठेवले आम्ही. मंदिर किंवा चौक पूर्णतः गैर नाही. एक स्मरण म्हणून ते चांगले पर्याय आहेत. पण त्या चौकातून जाणारी प्रत्येक मुलगी, दुसरीकडे जाऊद्या, त्या चौकात तरी सुरक्षित राहील, हे कधी बघितलेय का आपण? तर नाही.

महाराजांनी जनतेचे दुख: ओळखले शेतसारे माफ केले. लेकी-बळींना अभय दिले. पण आज मात्र आम्हीच स्वकीयांचे रक्त विकून येणाऱ्या पिढ्यांसाठी जागोजागी फ्ल्याट आणि भूखंड कसे मिळवता येतील या योजनेत गुंतलेले आहोत. आणि ओरडलेच कुणी तर जेवतांना कुत्र्याला टाकतात तशी भाकर फेकून मोकळे होतो. लेकी-बळीं चे विचारूच नका, त्यांची सुरक्षा आम्ही (अस्तित्वात नसलेल्या) शासन व्यस्थेच्या हाती दिलीये. म्हणजे एकंदर कुणालाही 'लेखी' असे काही प्रोब्लेम्स नाहीयेत.

शिवाजी महाराजांच्या या जयंती निमित्य थोडं मागे वळून पाहिल्यास जयंतीला शक्तिप्रदर्शनाचा एक मंच अनेकांनी बनवल्याचे जनवतेय. छत्रपतींच्या मावळ्यांनी खरे तर समाजातील दुखीतांचे दुख: समजून त्यावर उत्तरे शोधायला हवीत. जातीपातींच्या बेड्यात जखडलेला समाज मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हातात आलेला मोबाईल आणि त्यावरील फेसबुक आणि व्हाट्स-अप ने प्रगती आपल्या पर्यंत हवी तशी पोहचली या अर्धवट सत्यात मावळ्यांनी तरी राहू नये. तुम्ही बघितला नसेल तर, एकदा 'फॅंड्री' हा चित्रपट नक्की बघा. समाजात अजूनही अनेक वर्ग आहेत ज्यांच्या हात आणि तोन्डाची भेट व्हयाची असेल तर त्यांना अजून ही आपल्या 'स्वभिमानासारख्या' मुलभूत हक्काला मुकावे लागते. अजूनही आपण, कधी कळत आणि कधी न-कळत, वर्षानुवर्षे चलत आलेली जातीयतेची री तशीच ओढत अलोयेत. या अदृश्य रेषांनी आपली मने दुभंगलीयेत. कित्येक शिवाजी चित्रपटातील जब्या आणि पिऱ्या सारख्या मुलात घाबरून दडून बसलेत. बाहेरची सरंजामी कदाचित परकीय मुघलांपेक्षाही अन्यायकारक वाटत असावी त्यांना. आणि म्हणूनच आपण बदलत नाहीयेत. कारण सगळेच शिवाजी घाबरलेत, नव्हे नव्हे घबरवलेत! कारण ते धाडसी झाले तर सरदारक्या कशा चालायच्या? जहागिऱ्या कशा मिळवायच्या?

शिवाजीचे विचार अंगीकरायचे असतील तर हातात घेतलेल्या, नव्हे, दिलेल्या पताका आधी खाली ठेवा आणि लेखणी हातात घ्या. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारे तुम्ही ओळखतच असाल, पण इतिहासातील मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी पुरून-पुरून खाणारे अतिशय कावेबाज असतात. त्यांच्या पासून जपून राहणे तसे अवघडच पण तरी प्रयत्न करा. आऊ जिजाऊ आणि तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद सदैव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेतच!

आपण सगळे हे करू शकलो तर छानच नसता पुढची पिढी आपल्या लेखणी धारदार बनवतेयच.

आजचे मावळे अजूनही
'रस्ते नसणाऱ्या रस्त्यांनी' पायपीट करत असले तरीही
घाबरून कुठे तरी दडून बसले तरीही
अगडबंब नेत्यांच्या स्कोर्पिओचे काडी इतकीही किंमत नसलेले ड्रायव्हर आणि रखवालदार असले तरीही
आणि
फक्त 'नरेगा'च्या कामावरच घर धकवत असले तरीही,

मी आज प्रचंड आशावादी आहे.

कारण, मी बघितल्यात परवाच
थंडी आणि अंधाराला कपात त्याच खडकाळ रस्त्यावरून
तुमच्या व्यवस्थेच्या मदतीशिवाय
शाळेत जातांना जिजाऊ!           



पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जिजाऊ. कॉम कडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जीजाऊ.                                                                                                 जय शिवराय. 

             

डावूनलोड लेख






                        

Thursday, March 4, 2010

कृषी बाजारभाव, ग्रामीण युवक, आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस, नौकरी

जिजाऊ.कॉम वरील काही अपडेट

रोज कृषी बाजारभाव पहा: http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushibajarbhav

ग्रामीण युवकांनो स्थापन करा  बाजार माहिती केंद्र:  http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushimandal/bajara-mahiti-kendra


आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस इ. नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण माहिती :
http://www.jijau.com/spardha-pariksha


नौकरी सेक्शन:

रेल्वे भरती मंडळात २६१२ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे कमर्शियल क्लार्क (१२०३ जागा), अकाउंट क्लार्क (१८२ जागा), तिकिट निरीक्षक/तिकिट कलेक्टर (८२३ जागा), ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट (३०९ जागा), ट्रेन क्लार्क (९५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये १० जागा
राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.

चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात शिक्षकांच्या ३ जागा
चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज २१ दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.

एनटीपीसीमध्ये ४३८ जागा
एनटीपीसी या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी- मेकॉनिकल (१६२ जागा), इलेक्ट्रिकल (११० जागा), कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन (५८ जागा), सिव्हिल (४८ जागा), फायनान्स (४० जागा), ह्यूमन रिसोर्स (२० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.ntpccareers.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये सिनिअर अकाऊंटस ऑफिसर, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आदी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१० आहे. अधिक माहिती www.oil-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात १२ जागा
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात मुख्य व्यवस्थापक (कमर्शियल) (१२ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक (४ जागा), अधिक्षक (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.nhdcltd.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जळगाव महापालिकेत ५३ जागा
जळगाव महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानात कर्णदोष विशेष शिक्षक (६ जागा), दृष्टिदोष विशेष शिक्षक (५ जागा), मतिमंद विशेष शिक्षक (१४ जागा), बहुविकलांग विशेष शिक्षक/सेरेब्रल पाल्सी विशेष शिक्षक (२ जागा), श्रवण भाषा वाचा तज्ज्ञ (६ जागा), व्यवसाय मार्गदर्शक (४ जागा), भौतिकोपचार तज्ज्ञ (७ जागा), व्यवसायोपचार तज्ज्ञ (९ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती द. ६ मार्च २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलटच्या ३ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलट (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ८ मार्च २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

डेक्कन ग्रामीण बँकेत १३० जागा
डेक्कन ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (१३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये २२ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये करार तत्त्वावर अनुभवी अभियंता (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ५ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती ६ मार्च २०१० होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. डीएनएमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्ताच्या ३ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्त (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशनमध्ये ३० जागा
चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये रिफायनरी ऑपरेटर (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

रेल्वे भरती मंडळात जागा १६५३ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे सहायक स्टेशन मास्तर (१६२९ जागा), ट्रफिक असिस्टंट (२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी १७ जागा
एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स इंजिनिअर (१७ जागा), पब्लिक रिलेशन (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://ntpc.timesjobs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ३९ जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर (६ जागा), असोसिएट प्रोफेसर (१६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Thursday, February 18, 2010

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

                                                                         शिवजयंती विशेष जिजाऊ.कॉम

      छत्रपती शिवाजी महाराज जयंती
                                    [१९ फेब्रु १६३०- ३ एप्रिल १६८०]


"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
-
समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
आजच्या या पावन दिनी जिजाऊ.कॉम तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

"
शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.


कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड, शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!


शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!


कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

महत्वाची नोट: महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. जमेल तेथे यासाठी आग्रह धरावा.
राष्ट्रकार्यात सहभागी व्हा: जिजाऊ.कॉम वर नोंदणी करा

 

पीडीएफ वाचा, आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास सहकार्य करा आणि हा मेल सर्वांना पाठवा.
                                                            सर्व हक्क CC न्वे www.jijau.com

Sunday, January 10, 2010

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती

[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४] आज १२ जानेवारी; इतिहासातील असा दिवस जो प्रत्येक स्वाभिमानी मराठ्याने [मराठा-प्रत्येक महाराष्ट्रीय] आपल्या हृदयात कायमचा कोरून ठेवला पाहिजे.आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवाबंसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.

या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.
कित्येक मावळ्यांनी आपले मरण पेलून धरून, त्याला घडीभर ताटकळत ठेवून हे स्वराज्य घडवले, टिकवले आणि वाढवले. हे स्वराज्य साकार होण्यासाठी कित्येकांनी आपले रक्त सांडलेले आहे. आणि हे असे घडायला, झोकून देऊन लढायला प्रवृत्त व्हायला गरज असते शिवबाची आणि तो शिवबा घडायला गरज असते ते जिजाऊचीच!
इतिहासाचे ज्ञान नसले तरी चालेल पण जान मात्र असायलाच हवी! या धावणाऱ्या जगात नक्कीच आपल्याकडे वेळ नाही. तसा तो कोणत्याच पिढीला नसतो. ज्याला त्याला आप-आपली कामे असतात; पण वेड लागल की वेळ मिळतो! त्यामुळे जमेल तेंव्हा इतिहास आठवून पहावा, त्यातून धडे घ्यावेत. चुकांना सुधारून पुन्हा चुका रहित इतिहास लिहावा. नाविन्य तर हवच; ते आणण्यासाठी ही स्वातंत्र्य घ्याव. पण हे सगळ करताना समोर कुणाचातरीआदर्श असला तर प्रवास आणि नव-निर्माण सुखकर जाते. वेगळ सांगायची गरजच नाही- इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!
आपल्या पिढीत प्रत्येकाला काही तरी करण्याची तळमळ आहे, प्रत्येका मध्ये ती जिद्द आहे; अहो, कारण आमचा इतिहासच तसा सोनेरी आहे, कारण आम्हाला वारसाच तसा लाभला आहे! रक्तात आहे ते दिसणारच ना मग! आज गरज आहे ती प्रेरणेची, एका योग्य दिशेची. आम्हाला काही प्रश्न पडले, कशी सापडेल हि दिशा? सामान्यातल्या अती सामान्या मध्ये सुद्धा एक वेगळेपण असते, त्याच्या मधे सुद्धा काही तरी करण्याची जिद्द असते, कसा मिळेल त्याला वाव? कशी मिळेल त्यांना काही तरी करण्याची संधी ? सगळी कडे अंधार असतांना कोण देईल त्यांना प्रकाश? सगळ राष्ट्र एकाच दिशेला पळतंय, बरं ती दिशा चूक की बरोबर हे तरी कुणी पडताळून पाहताय का? आम्ही प्रगती करत आहोत की इतर काही? आम्ही म्हणतो आकडेवारी नुसार राष्ट् प्रगती करत आहे. आम्हाला फक्त एका प्रश्नाच उत्तर द्या, होय तुम्हीच, तुम्हा जसा समाज आणि जस राष्ट्र हव आहे, ते हेच का? आकडेवारीला विरोध नाही पण शेवटचा माणूस सुखी आहे का? नसेल तर का नाही ? [कुणी म्हणत असेल- "होय, शेवटचा माणूस सुखी आहे", तर यजमान आपण खोट बोलत आहात! घरा बाहेर पडा एकदा!] आणि या सर्वांचे उत्तर शोधतांना कुठे तरी मनात येऊन जाते-

अंधार होत चाललाय दिवा पाहीजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे॥
आता, शिवबाच का? हा प्रश्न कुणाला जर पडला असेल तर, कृपया एक लक्षात ठेवा शिव-चरित्रा सारखा धगधगता दीपस्तंभ आपल्या समोर असतांना आपल्या सारख्या तरुणांना इतरत्र भटकण्याची गरज नाहीये. जगाच्या पाठीवर जिजाऊ, शिवबा आणि संभाजी सारखे व्यक्तिमत्व आपल्याला सापडणार नाही. आपल्याला ह्याचा अभिमान असला पाहिजे; त्यांचे चरित्र आमच्या मनावर कोरले गेले पाहिजे. जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ह्याचे जातिवंत उदाहरण म्हणजे शिव चरित्र! कोलंबस किंवा सिकंदर ह्यांचा आम्ही आदरच करतो; पण, जेंव्हा आपण आदर्शासाठी प्रत्येक वेळी परकीयांकडे बघतो तेंव्हा काही ओळी आठवतात:

कशास हवा तूम्हा सिकंदर,

कशास हवा कोलंबस,

छ्त्रपतीला स्मरा एकदा, अरे छ्त्रपतीला स्मरा एकदा;

अन् बघा, तुम्हिच हो सिकन्दर, अन् तुम्हिच हो कोलम्बस, तुम्हिच हो कोलम्बस!


इतिहास हा नुसता पाठ्यपुस्तकाचा भाग न राहता तो आमच्या रक्तामध्ये भिनला पाहिजे. सामान्यांना तो आपला वाटला पाहिजे. खोटा अभिमान, स्वार्थी बाणा, आणि पोकळ गप्पा याला कुठल्याही प्रकारे महत्व द्यायला नकोय. प्रत्येकाने थोडेसेच पण काही तरी करावे, भले ते कुठेही असो. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याप्रती आपले काही कर्तव्य आहे. आज ही स्वातंत्र्य शेवटच्या लोकांपर्यंत पोचले नाहीये, गरीब श्रीमंत ही दरी वरचेवर वाढत चालली आहे. समाजामध्ये "बळी तो कान पिळी" हि भावना वाढत चालली आहे. खाली असणारा आज सर्व बाजूने दाबला जात आहे. हे चांगल्या समाजाच्या निर्मितीचे लक्षण नाहीये. विचार करा, तुमच्या मुलाला तुम्हाला हव ते शिक्षण द्यायचे आहे, देता येईल? हवा तो व्यवसाय करायचा आहे, करता येईल? समजा त्याला राजकारणात जायचे आहे, सोप्पा आहे का ते? आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे काही अंशी का होईना फक्त दिखाऊ-उच्चांक आपण गाठत आहोत. पटत नसेल तर, वरील काही प्रश्नांना एकदा खरी-खुरी उत्तरे देऊन पहा.
ही परिस्थती बदलण्याची गरज आली आहे आणि त्यासाठी गरज आहे अशी भावना बाळगणाऱ्या, ही भावना समजणाऱ्यानी एकत्र येण्याची! थोडे थोडकेच असले तरी चालती, पण प्रयत्न करणारे असावेत. अशा युवकांना आमचे आवाहन आहे- एकत्र या! काही तरी करण्याची हीच भावना आपल्या सर्वां मध्ये एक नाते निर्माण करते आहे. कुठे काही चांगले होत असल्यास पुढे होऊन अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन द्या. कुठे काही चूक घडत असल्यास त्याच्या आड येण्याची हिम्मत ही ठेवा. तुमच्यासारखे या जगात खूप आहेत आणि नक्कीच तुमच्यासोबत उभे राहतील. आपले विचार प्रकट करा, त्या विचारांना आचरणात आणा, आपल्या स्वतःची आणि आपल्या समाजाची निर्मिती अथवा विकृती ही आपल्याच हाताने होत असते. बदल घडलाच पाहिजे आणि तो आपणच घडवायचा आहे. कदाचित प्रश्न पडत असेल की मीच का आणि आत्ताच का? तर, एक लक्षात ठेवा- तुम्ही नाही तर कोण? आणि आता नाही तर कधी?
जिजाऊ.कॉम आपल्याला एका स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांच्या चळवळी साठी आवाहन करते आहे. आपल्या सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहे. या साठी गरज आहे आपल्या सहकार्याची. आम्हाला मान्य आहे, ही तर या कार्याची फ़क़्त सुरुवात, पण हाती घेतलेले हे कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे पुढे नेत राहू हा विश्वास तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. एका सुखी संपन्न आणि प्रगत महाराष्ट्राचे आणि देशाचे स्वप्न साकारण्या साठी जिजाऊ.कॉम ची आपल्या सर्वांना ही भावनिक साद- काही करा आणि कुठे ही करा, पण करा. ज्याने राष्ट्र घडेल!
जिजाऊ मा साहेब ह्यांच्या ह्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम! त्यांनी आम्हाला एक इतिहास दिला, आम्हाला आमची एक ओळख दिली, आम्हाला शिवबा दिला, आम्हाला त्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांचा शंभू बाळ दिला, आज आम्ही काय देणार त्यांच्या ह्या महाराष्ट्राला?
आपण प्रत्येकजण त्यांना एक वचन देऊ - ''राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य माझेच आहे अस समजेन आणि तिच्या साठी मला शक्य होतील ते आणि शक्य होईल तिथे प्रयत्न करेल. चांगले बदल घडवेल आणि त्यांची सुरवात माझ्यापासून करेल".
हे आई जिजाऊ, आम्हास ते बळ दे, तो आशीर्वाद दे!

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

-जिजाऊ.कॉम परिवार
www.jijau.com


सदर कार्यात सहभागी व्हा, तुम्ही आमच्या पाठीशी नव्हे तर सोबत रहा. समविचारी लोकांना एकत्र करण्यसाठी आणि राष्ट्र निर्मितीत या नव्या लोकशाही मार्गाने जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकसहभागाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. कारण हा शिवधनुष्य आमच्या एकट्याने पेलणे फार अवघड आहे. कृपया नोंदणी करा आणि आपल्या मित्रांना ही नोंदणी करण्यासाठी सांगा, आणि आज जिजाऊ जयंती निमित्य एक लाख नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करण्यास मदत करा.
नोंदणी साठी कृपया भेट द्या: http://www.jijau.com/you-can-contribute/callforcontent/नोंदणी



Wednesday, September 23, 2009

जिजाऊ

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळूमायाळू या आईच्या पदाराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.



जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!


प्रकाश बा. पिंपळे
www.jijau.com